✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा गंमतगूढ (३) : नाती गुंतागुंतीची

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 09/08/2021 - 10:45  ·  लेख
लेख
भाग २ : https://www.misalpav.com/node/49198 ………………. पहिल्या दोन्ही भागांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हा भाग काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता आपण अजून जरा वरच्या इयत्तेत जाऊ ! या भागात संपूर्ण शोधसूत्रांची मिळून एक छोटीशी कथा रचली आहे. खाली ८ शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. ही नामे घेऊन त्यांच्यात एक विशिष्ट संबंध जोडून हा खेळ तयार केलेला आहे. तुम्हाला २ गोष्टी शोधायच्या आहेत : १. हे सर्व शब्द ओळखायचे आणि २. सूत्रांत दिल्याप्रमाणे त्यांचे एकमेकांशी असलेले नाते उत्तरातून सिद्ध करायचे. हे दोन्ही जमल्यासच उत्तर बरोबर ठरेल. (शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी). ओळखायची सर्व नामे सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात अंक अजिबात नाहीत. अनुक्रमेच सोडवायला घेतल्यास बरे होईल. शोधसूत्रे: १. याच्या कामाची व्याप्ती अफाट, कल्पनातीत (५) २. क्रमांक १ च्याच जातकुळीतील. याच्यापासून काय लपवणार? (४) (शक्यतो १ व २ चे उत्तर एकदम द्यावे म्हणजे सिद्धता होते). ३. हे चार अक्षरी ४. हे पाच अक्षरी. ३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही ! (शक्यतो ३ व ४ चे उत्तर एकदम द्यावे म्हणजे सिद्धता होते). ५. याच्याजवळ रात्र व श्रीमंती कपडा जो ३ व ४ ना अगदी प्रिय (५) ६. याच्यात कुठेही दूरवर पोचण्याची क्षमता. परंतु १ व २ चा पत्ता त्याला अजून सापडलेला नाही.! (५) ७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून बसल्या जागीच झेप घेतो. ती झेप कदाचित १ व २ पर्यंत पोचू शकते !(५) ८. याला डोक्यावर बसायची सवय. पण १ व २ चे बारसे करतेवेळी याला दूर ठेवण्यात आले (४). ………...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24278 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

:) वा

गॉडजिला
Wed, 09/08/2021 - 19:58 नवीन
सुटले की सर्व... कमाल आहे लोकांची
  • Log in or register to post comments

३. रातराणी ४ मदनबाण

शाम भागवत
Wed, 09/08/2021 - 20:01 नवीन
३. रातराणी ४ मदनबाण
  • Log in or register to post comments

४. हे पाच अक्षरी. मदनबाण ?

गॉडजिला
Wed, 09/08/2021 - 20:03 नवीन
४. हे पाच अक्षरी.
मदनबाण ?
  • Log in or register to post comments

?

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 20:06 नवीन
३. रातराणी ४ मदनबाण हे जोडी म्हणून योग्य आहे पण...... ५ चाश्रीमंती कपडा जो ३ व ४ ना अगदी प्रिय हा संबंध नाही जुळून येत.
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 20:09 नवीन
तीन व चार हे फुलांची नावे म्हणून सांगितल असेल तर मग त्यांना श्रीमंती कपडा प्रिय हे नाही पटत म्हणून अजून प्रयत्न करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

शेला

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 20:12 नवीन
शेला माणूस परिधान करतो.
  • Log in or register to post comments

महामाया

शाम भागवत
Wed, 09/08/2021 - 20:34 नवीन
महामाया मदनबाण दोघेही भुरळ पाडतात. भुरळ पाडणे हा गुण दोघांतही समान आहे. या दोघांना ओलांडल्या शिवाय १ व २ कडे जाता येत नाही. दोघांनाही शेला चालू शकेल. पण तो त्यांना प्रिय आहे असे म्हणवत नाही. माझे प्रयत्न संपले. :)
  • Log in or register to post comments

३ नीलकांत ? ४ शामसुन्दर ?

श्वेता व्यास
Wed, 09/08/2021 - 20:38 नवीन
३ नीलकांत ? ४ शामसुन्दर ?
  • Log in or register to post comments

शाम,

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 20:39 नवीन
या प्रकारच्या खेळांमध्ये शोध सूत्रांचे मूळ तत्व भाग 1 मध्ये सांगितले होते ते असे: "संपूर्ण शोधसूत्राचा एकाच शब्दात भावार्थ काढू नका दोन भिन्न सूत्रे = २ कल्पना >> दोन शब्द आणि मग जोडणे." … त्यानुसार... ५ चे चांदणशेला हे उत्तर असे बनले आहे चांदण + शेला. आता ५ सूत्र नीट बघा: …. श्रीमंती कपडा जो तीन व चारला प्रिय. त्यामुळे तीन व चार ही माणसे आहेत हे समजावे. ....... तुम्ही छानच खेळला आहात त्याबद्दल अभिनंदन आता हा बारकावा घेऊन अन्य कोणी जरूर प्रयत्न करावा.
  • Log in or register to post comments

श्वेता

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 20:44 नवीन
नीलकांत व शामसुंदर ही दोन नावे तुम्ही पुरुषांचे म्हणून घेत आहात की अन्य काही ते आधी स्पष्ट करा हे दोन्ही पुरुष असतील तर ते कोणालाही भुरळ कशी काय पाडतील?
  • Log in or register to post comments

देव म्हणून, नील आणि शाम

श्वेता व्यास
Wed, 09/08/2021 - 20:51 नवीन
देव म्हणून, नील आणि शाम वर्णाने भुरळ पाडतात, देवांना शेला प्रिय असतो, पण नावे माणसांचीही असतात, शिवाय नील व शाम हि सुप्त स्पर्धा आहेच. अर्थात उत्तर फक्त अंदाज आहेत, माझेही प्रयत्न संपले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

...

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 20:57 नवीन
देवांना शेला प्रिय असतो >> देव ही संकल्पना असल्याने त्यांना एखादी गोष्ट प्रिय असे म्हणता येईल ? या माणसांनी निर्माण केलेल्या देवांच्या प्रियच्या कल्पना आहेत. एखादी गोष्ट प्रिय असणे हा मानवी गुणधर्म आहे असे मला वाटते. पुन्हा १ व २ ला तीन व चार बद्दल अजिबात आकर्षण नको आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास

हम्म ओके

श्वेता व्यास
Wed, 09/08/2021 - 21:16 नवीन
हम्म ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ठीक आहे ..

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 21:31 नवीन
३ व ४ या स्त्रिया समजाव्यात आणि शोध घ्यावा म्हणजे सर्व नातेसंबंध व्यवस्थित जुळलेले दिसतील
  • Log in or register to post comments

अजून

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 10:00 नवीन
चार तासांनी समारोप करतो . जर नवीन खेळाडूंपैकी कुणाला तीन व चार साठी प्रयत्न करायचे असतील तर जरूर करा धन्यवाद
  • Log in or register to post comments

७ राहिलेलं आहे ना.

शाम भागवत
गुरुवार, 09/09/2021 - 13:50 नवीन
७ राहिलेलं आहे ना. योगविवेक हे पर्याय म्हणून मान्य केलं गेलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

शाम,

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 13:58 नवीन
तुम्ही प्रयत्न करत आहात का तसे सांगा नाहीतर आत्ता मी समारोपाला आलो होतो ! :)
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 14:58 नवीन
उत्तरे व स्पष्टीकरण: ३. मालविका (सुंदर राजकुमारी) ४. मृगनयनी (एक आकर्षक स्त्री) *३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. >> सौंदर्य. दोघींना ५ कडील श्रीमंती वस्त्र प्रिय. (परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !) …. ७. अजून एक उत्तर.: मुक्तचिंतक …. सर्वांचे अभिनंदन व आभार !
  • Log in or register to post comments

सर्व उत्तरे एकत्र

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 15:14 नवीन
सर्व उत्तरे एकत्र १. याच्या कामाची व्याप्ती अफाट, कल्पनातीत (५)..... विश्वनिर्माता २. क्रमांक १ च्याच जातकुळीतील. याच्यापासून काय लपवणार? (४)..... सर्वसाक्षी ३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !.... ३. मालविका व ४ . मृगनयनी ५. याच्याजवळ रात्र व श्रीमंती कपडा जो ३ व ४ ना अगदी प्रिय (५).... चांदणशेला ६. याच्यात कुठेही दूरवर पोचण्याची क्षमता. परंतु १ व २ चा पत्ता त्याला अजून सापडलेला नाही.! (५).... जगप्रवासी ७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून बसल्या जागीच झेप घेतो. ती झेप कदाचित १ व २ पर्यंत पोचू शकते !(५)..... मुक्तचिंतक ८. याला डोक्यावर बसायची सवय. पण १ व २ चे बारसे करतेवेळी याला दूर ठेवण्यात आले (४). ………... अनुस्वार
  • Log in or register to post comments

मला मालविका सापडलं पण मृगनयनी

शाम भागवत
गुरुवार, 09/09/2021 - 15:28 नवीन
मला मालविका सापडलं पण मृगनयनी काही सापडलं नव्हतं मृगनयनी यांचे शेवटचे लेखन ७ डिसेंबर २०१३ चे आहे. त्यात त्यांनी विनय आपटे यांच्या निधनाची बातमी त्यांनी दिली होती. तुम्हाला हे नाव कसे सापडले? तुम्ही मागे जात जात ४५८ पाने उलटली? मुक्तचिंतक यांनी जनातलं मनातलं या सदरामधे काहीच लिहिलेले नसल्याने हे सदस्यनामही सापडले नाही. त्यांनी फक्त अंडाभुर्जी व उकडलेली अंडाभूर्जी यावर दोन लेख लिहिले आहेत ते पाककृती सदराखाली आहेत. पण एकंदरीत मजा आली.
  • Log in or register to post comments

शाम,

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 15:33 नवीन
धन्यवाद. तुम्ही मागे जात जात ४५८ पाने उलटली?>>>> नाही हो, मी नवे लेखनमधून मागे जात असताना मला बऱ्यापैकी लवकर ते नाव मिळालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मला मृगनयनी सापडलं पण खात्रि

गॉडजिला
Fri, 09/10/2021 - 16:34 नवीन
मला मृगनयनी सापडलं पण खात्रि न्हवती कारण मालविका काही सापडलं नव्हतं… आणि का काय माहित पण गंमतगुढ धाग्यावर गेस मारायाचे धैर्य होत नाही… चुकीचे उत्तर देणे फार बॅड फिल होते कदाचीत मिपावर प्रतिसाद लिहायचा तोच मुळी स्वताचे म्हणणे सांगायला आत्मविश्वासाने असा सराव असल्याने निव्वळ गेस मारलेला प्रतिसाद लिहावासा वाटत नाही….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

बोअर

सुरिया
गुरुवार, 09/09/2021 - 15:29 नवीन
कंटाळवाणी कोडी. सादरकर्त्याचाच जास्त उत्साह असलेने नुसते वाचताना सुध्दा कंटाळा येतो.
  • Log in or register to post comments

सुरिया

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 15:34 नवीन
अभिप्रायाबद्दल आभारी आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

अगदीच उलट मत आहे माझं

अकिलिज
गुरुवार, 09/09/2021 - 19:18 नवीन
दोन दिवस कामामुळे फिरकलोच नाही. तरी खाली न सरकता पहीले मला कितपत जमतंय पाहीले. मग ह्ळू हळू खाली सरकत गेलो. समोर कोडं सुटताना दिसत होते. मजा आली नुसते वाचनमात्र राहूनही. कुमार१ सरांचं कौतुक आहे. अशी कोडी तयार करायलापण मेहनत लागते. अजून येऊद्या. जाता जाता सोडवणार्‍यांसाठी : प्रत्येक कोड्यात मदनबाण उत्तर वापरू नका. :)
  • Log in or register to post comments

अकिलिज

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 20:13 नवीन
धन्यवाद . पुढच्या वेळेस सहभागी व्हा .आनंद होईल.
मदनबाण उत्तर
>> या नावाची लोकप्रियता बघा किती ! तुमचे सदस्यनाम कुतूहलजनक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज

प्रतिसाद न वाचता फक्त

टर्मीनेटर
Fri, 09/10/2021 - 13:41 नवीन
प्रतिसाद न वाचता फक्त (क्रमांक २ = सर्वसाक्षी) एवढे एकच ओळखता आले 😀
  • Log in or register to post comments

....

हेमंतकुमार
Fri, 09/10/2021 - 14:08 नवीन
हरकत नाही. पण महत्त्वाचे ओळखलेत 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

चांदणशेला

हेमंतकुमार
Fri, 09/17/2021 - 19:15 नवीन
या खेळासाठी निवडलेल्या सदस्यनावांत चांदणशेला या नावाच्या तर मी प्रेमातच पडलो. नंतर काही भाषाप्रेमींशी या शब्दावर चर्चा केली. जालावर सहज धुंडाळले असता एक छान कविता मिळाली ज्यात तो आहे. त्या कवितेचा अंश इथे देतो: राधा म्हणते, तुजसाठी पैंजण पायी तुजसाठी काजळ डोळां भेटींस तुझ्या मी येते - घेउनिया चांदणशेला"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा