विठ्ठल नाम
अभंगाची गोडी
चिपळाची जोडी
विठ्ठल नाम माळी
भक्ती फुले भाबडी...
अगम्य भिंती तोडी
शरीर झोला सांडी
चराचर चैतन्य बहू
मना सुख जोडी...
वेल वाढती वाकडी
शोधे आधार बापुडी
नाही बांडगुळ हे जाण
तू बांध नामाची झोपडी...
वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...
-भक्ती
वाट पाहून थकली
वाट पाहून थकली येईल मोक्ष कावडी रोज रोज का मग डोळ्यांत सूर्य बुडी...याचा अर्थ काय ?मोक्ष मिळेल म्हणून वाट पाहून
थँक्यू प्रचेतस जी
जिलाजी धन्यवाद
हाही अर्थ वेगळाच, आवडला.
विठ्ठल विठ्ठल _/\_
वाट पाहून थकली
बुडी का बुडे?
बरोबर
अच्छा
छान.
विठ्ठल विठ्ठल सर्वांना _/\_