✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंत्रिमंडळ बदल : ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या

स
साहना यांनी
गुरुवार, 07/08/2021 - 10:10  ·  लेख
लेख
सुप्रीम लीडर नी भारताच्या इतिहासातील सर्वांत "तरुण" मंत्रिमंडळ म्हणून नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती काल केली. त्यामुळे सरासरी वय ६१ वरून आता कोवळ्या ५८ ह्या तरुण वयावर येऊन थांबले आहे. ह्या तारुण्याच्या जोशांत नवीन मंत्रिमंडळ भरपूर काम करेल अशी अशा करूया. मंत्रीमंडळ म्हणे "परफॉर्मन्स" पाहून निर्माण करण्यात आले आहे. काँग्रेस ने ह्यावर प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. परफॉर्मन्स पाहून मंत्रीपदे बदलणे ह्याचा अर्थ कुणी तरी मंत्री परफॉर्म करत नाही असे मान्य करणे आहे असे श्री शिडंबरम इत्यादींनी म्हटले. परफॉर्मन्स आणि मंत्रिपद ह्यांचा संबंद नक्की काय हे समजण्यास राहुल गांधी ह्यांनी आपल्या भाडोत्री विद्वानांची बैठक बोलावली आहे असे गुप्त सुत्रा कडून मला समजले आहे. त्याशिवाय सुप्रीम लीडर नि एक नवीन मंत्रालय निर्माण केले आहे "सहकार मंत्रालय". आधीच देशाच्या मृतवत शरीरावर जी अनेक मंत्रीरुपी गिधाडे बसली होती त्यांत आणखीन एकाची भर पडली. कोळसा मंत्रालयाने कोळशाची वाट लावली, विमानवाहूतक मंत्रांनी विमानवाहतूक खड्ड्यांत घातली, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेश आणि व्हिएतनाम च्या हि खाली आलो. त्यामुळे सहकार मंत्रालय सुद्धा भारत सरकारच्या ह्या गौरवशाली परंपेरला कायम ठेवून सहकार क्षेत्र खड्ड्यांत घालील ह्यांत मला तरी शंका नाही. बारामतीश्रेष्ठिनी ह्या मंत्रिपदाचा धसका घ्यायला पाहिजे. नवीन मंत्रीपदे कुणाला मिळाली आहेत ह्यापेक्षा कुणा कुणाला नारळ देण्यात आला आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेणे मजेशीर आहे. - डॉक्टर हर्षवर्धन ह्यांना आरोग्यमंत्रालयातून नारळ देण्यात आला आहे. हा निर्णय अत्यंत योग्य आहे. हर्षवर्धन हे "हात लावीन तिथे आग" ह्या प्रकारचे आहेत. ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा दिल्लीचे संपूर्ण पतन झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली द्वितीय कोविड ने भारतांत धुमाकूळ घातला. हर्षवर्धन ह्यांनी दुसरी वेव्ह येणार नाही अशी मोदी ह्यांना खात्री दिली होती म्हणूनच मोदी हे गाफील राहिले. आपली गच्छंती होणार हे हर्षवर्धन ह्यांना आधीच समजले असल्याने त्यांनी मागील महिनाभर सर्वत्र मोदी ह्यांच्या पायाखाली लोटांगण घालण्याचे सत्र आरंभले होते. त्यांनीच "हेल मोदी" हे "हेल हिटलर" छाप बिरुद ट्विटर वर वापरायला सुरुवात केली होती. ह्यांची जागा मनसुख मांडवीया ह्यांना देण्यांत आली आहे. हर्षवर्धन हे गोठ्यात असलेल्या म्हाताऱ्या गायीप्रमाणे आहेत. दूध देणार नसली तरी आपुलकी म्हणून हिला गोठ्यांत जागा दिली जाते. हर्षवर्धन ह्यांच्याकडून काही लक्षवेधी काम भविष्यांत होणारे नाहीच. - प्रकाश जावडेकर ह्यांच्या जाण्याने मला प्रचंड दुःख झाले आहे. पूर्णपणे निष्क्रिय असा हा माणूस मोदी सरकारविषयी विनोदाची गंगाच होती. ह्यांची संपूर्ण कारकीर्द हि निष्क्रियतेने भरलेली आहे. MHRD म्हणून ह्यांनी शून्य काम केले आणि वर अभिमानाने "काँग्रेसचाच वारसा आपण चालवत आहोत" असे आम्हाला सांगितले. आपण काही करायचे नाही आणि दिवसभर ट्विटर वरून सुप्रीम लीडर ह्यांना visionary, historic असली विशेषणे लावत भरपूर चाटुकारिता करायची हे एकच काम ह्यांनी आरंभले होते. आता ह्यांची राजकीय कारकीर्द सॅम्पलयांत जमा आहे. ह्यांच्या कडे नक्की कुठले मंत्रिपद होते हे सुद्धा लक्षांत राहत नव्हते कारण त्याविषयावर ह्यांचे ज्ञान आणि कार्य शून्य होते. त्यांच्या मुलाखती विनोदी बनल्या होत्या आणि मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेचा चेहेरा म्हणजे जावडेकर बनले होते. ट्विटर वर जावडेकर शोधले तर तुम्हाला जबरदस्त विनोद सापडतील. - रवी शंकर प्रसाद जावडेकरांना निष्क्रियतेच्या बाबतीत जर कोणी टक्कर देऊ शकत असेल तर ते हे महापुरुष. निष्क्रियता सोडून द्या उलट काँग्रेस मधील नेते मंडळींचा सल्ला घेऊनच कायदे निर्माण करण्याचे सत्र ह्यांनी आरंभले होते. ह्यांच्या नेतृत्वाखालील नवीन IT कायदे काँग्रेसी खेचरांनीच पुढे रेटले होते. काँग्रेस ची हार आणि सुप्रीम लीडर चा उदय ह्याला प्रमुख कारण म्हणजे सरकारी नियंत्रणापासून दूर असलेली आधुनिक मीडिया हे काँग्रेस च्या नेत्यांनी आतापर्यंत ओळखले आहे आणि आधुनिक मीडिया चे कंबरडे मोडणे आणि सरकारी दंडुक्याची भीती पुंन्हा सामान्य मतदाराच्या हृदयांत घालणे हे काँग्रेस सरकारचे आताचे नवीन ध्येय आहे. सुदैवाने प्रसाद ह्यांनी काँग्रेस चे काम जास्त सुकर केले आणि नवीन IT कायदे पुढे आणले. ट्विटर ने ह्या कायद्यांचे पालन करण्यास नकार दिल्याने मात्र प्रसाद ह्यांची शोभा तर झालीच पण उलट प्रसाद ह्यांच्यामुळे सुप्रीम लीडर "वीक" वाटतात अशी कुजबुज सुरु झाली. त्याशिवाय भाजपचे IT सेल वाल्यानी सुद्धा म्हणे ह्या नवीन कायद्यावर सुप्रीम लीडर कडे तक्रार केली. पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे हे कायदे प्रसाद ह्यांनी नक्की पुढे का रेटले ह्यावरच शंका उत्पन्न झाली होती. बहुतेक वेळा असे दूरगामी कायदे हे सर्व कंपन्यांना विश्वासात घेऊनच केले जातात पण ह्यावेळी तसे घडले नाही आणि सुमारे $३००M च्या भारतीय गुंतवणुकी आता अमेरिकन आणि चिनी कंपन्यांनी पॉज केल्या आहेत. त्याशिवाय अमेरिकन दूतावास आणि विविध CEO ह्यांनी प्रसाद ह्यांच्या कारभारावर बऱ्याच तक्रारी केल्या होत्या म्हणे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अश्या अविर्भावांत प्रसाद ह्यांनी ट्विटर ला धमकी दिली पण ट्विटर ने अजून कायद्याचे पालन केले नाही तरी प्रसाद विनवणी सोडून आणखीन काहीही करू शकले नव्हते. भाजपच्या आतील वर्तुळाने ट्विटर वर बंदी आणणे भाजपच्या फायद्याचे नाही त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की तर होईलच पण अमित मालवेर च्या अर्ध्या टीम ला काहीही काम राहणार नाही असे चिंतन केले होते म्हणे. त्याशिवाय तामिळनाडू मधील उदाहरण पाहून ह्या कायद्याने भाजप कार्यकर्त्यांनाच जास्त त्रास होईल असे भाजप समर्थकांचे म्हणणे होते. थोडक्यांत प्रसाद ह्यांनी कुणा काँग्रेस धार्जिण्या माणसांचेच ऐकून हि गडबड केली होती. प्रसाद ह्यांची राजकीय कार्यकीर्द आता संपल्यांत जमा आहे. - पोखरीयल MHRD च्या बाबतीत सुप्रीम लीडर नेहमीच अत्यंत दुर्दैवी ठरले आहेत. किंवा कदाचित बिनकामाच्या व्यक्ती त्यांनी जाणून बुजून इथे पार्क केल्या असाव्यात. आधी स्मृती इराणी MHRD होत्या ज्यांनी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत खोटे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यांना अचानक काढून त्यांच्या जागी जावडेकर ह्यांना आणले. ह्यांनी त्या पदावर विक्रमी स्तराची कामचुकारी दाखवली आणि वरून त्याचे समर्थन केले. त्यानंतर ह्या पोखरीयल ह्या माणसाची नेमणूक झाली. ह्यांचे नाव सुद्धा लक्षांत ठेवणे कठीण होते आणि हि व्यक्ती कालपर्यंत आपण उर्दू भाषेच्या प्रसारासाठी किती मेहनत घेतली आहे ह्याची बतावणी करत होते. आता पोखरीयल ह्यांना दोष देऊन फायदा नाही कारण ह्या मंत्रिपदाचा सुप्रीम लीडर काहीही महत्व देत नाहीत हेच कदाचित त्याचे कारण असावे. पोखरीयल ह्यांची राजकीय कार्यकीर्द तशी मोठी नाव घेण्यासारखी नव्हतीच. **** स्म्रिती इराणी - ह्यांना वस्त्रोद्योग मधून काढून आता महिला कल्याणात टाकले आहे. ह्यांची उचलबांगडी वारंवार का होत आहे हे मला एक कोडे आहे. MHRD मध्ये ह्यांनी आधी भरपूर गोधळ घातला असला तरी उत्तरार्धांत त्यांना तेथील कामाची बऱ्यापैकी समज आली होती. RTE ह्या विषयावर गांभीर्याने विचार केलेली हि एकमेव भाजपाची मंत्री. आधी तिने काहीच ऐकून घेण्यास नकार दिला असला तरी शेवटी त्यांनी ह्या विषयांत लक्ष घातले. पण तेंव्हाच त्यांना काढून जावडेकर ह्यांना आणले. आता वस्त्रोद्योगात त्यांचा जम बसला असे वाटत होते तेंव्हाच त्यांना महिला कल्याणात टाकले आहे. हे प्रोमोशन आहे कि डिमोशन समजणे अशक्य आहे. **** सुप्रीम लीडर ह्यांचे कॅबिनेट मधील टॅलेंट डेफिसिट अतिशय उघड दिसून येत आहे. स्वयंप्रकाशी असे एक दोनच नेते इथे आहेत. त्यांच्यांत सुद्धा विशेष कार्यक्षमता आहे असे दिसत नाही. जेटली, स्वराज, पर्रीकर ह्यांना परमेश्वराने अकाली नेले. त्यांच्यात जी नेतृत्व क्षमता होती ती धमेंद्र प्रधान, राजनाथ सिंग, सीतारामन किंवा पियुष गोयल ह्यांच्यात दिसत नाही. पप्पू च्या आजूबाजूला जो घोळका असतो तसाच हा घोळका वाटतो. कदाचित सुप्रीम लीडर ना सुद्धा हे ठाऊक आहे. त्यांना कदाचित स्वयंप्रकाशी नेत्यांची भीती तरी वाटत असावी किंवा त्यांना आपली स्वतंत्र बुद्धी आहे हा त्यांच्या साठी अडथळा बनत असावा. त्यामुळे परराष्ट्र खाते सारख्या विभागांत ह्यांनी जुन्या बाबूंना मंत्री म्हणून नेमले आहे. आता सुद्धा विविध मंत्रिपदावर जुने बाबू लोक आहे. ह्यांना हुकूम ऐकून निर्बुद्ध पणे अंमलबजावणी करण्याची सवय असते आणि सुप्रीम लीडर च्या कार्यशैलीला हे कदाचित चांगले वाटत असावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57082 वाचन

💬 प्रतिसाद (206)

प्रतिक्रिया

आपल्याला, अनेक गोष्टी

गॉडजिला
Mon, 07/12/2021 - 09:14 नवीन
आपल्याला, अनेक गोष्टी सरकारनेच पुरवल्या पाहिजेत असे नेहमीच ठामपणे वाटत आलेले आहे. पूर्वापारची संवंय हे एक भारतात लोकशाही ही स्वकीय राजेशाही उलथवून झालेल्या क्रांतीने निर्माण झालेली नाही त्यामुळे लोकशाहीतही जनता स्वतःला तशी कमजोरच समजते सत्ताधाऱ्यापुढे... त्यातूनच सरकारनेच काही करावे ही भावना वाढीस लागते ही मानसिकता बदलायला अजूनही वेळ जाईल विशेषतः हजारो वर्षे राजेशाहीत काढल्यावर मानसिकता सहज बदलत नसते व खाजगी कंपन्या जनतेला लुटायलाच आलेल्या आहेत, हा खास समजावादाच्या पगड्यांतून आलेला गैरसमज, हे दुसरे-- अशी दोन कारणे आपल्याला, थोडीतरी बाजूला ठेवता येतील काय? खाजगी कंपन्या समाजकल्याणासाठी स्थापल्या आहेत हे ही भाबड्या जनतेला समजायला थोडा वेळ द्यावा गुरुजी
  • Log in or register to post comments

हम्म्......

प्रदीप
Mon, 07/12/2021 - 10:09 नवीन
"खाजगी कंपन्या जनतेला लुटायलाच आलेल्या आहेत" नाहीतर "खाजगी कंपन्या समाजकल्याणासाठी स्थापल्या आहेत " अशी सरळ, काळी- पांढरी मांडणी करणार्‍यांना काय सांगणार ? जाता जाता, तुम्ही हे सर्व टंकत आहात, (म्हणजे त्यासाठी (१) इंटरनेट्ला कनेक्ट होताहात व (२) मिपाचा सर्व्हर, अथवा/ आणि त्यांच्या CDN चा तुमच्या नजीकचा सर्व्हर ह्यांवर येत आहात) हे सर्व खास अथपासून इतिपर्यंत भारत सरकारने दिलेल्या सेवा वापरूनच, बरं का? तसे नसेल (म्हणजे, तसे ते नाहीच) तर मग ह्या साध्या प्रोसेसमधेही तुम्ही 'लुटले' जात आहांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

मी बीएसएन एल वापरतो

गॉडजिला
Mon, 07/12/2021 - 10:21 नवीन
सगळ्यांनी हिच्या जीवावर मलिदा खाल्ला टेलिकॉम मध्ये मी नाही पण bsnl लुटली गेली
सरळ, काळी- पांढरी मांडणी करणार्‍यांना काय सांगणार ?
हेच सांगा की बहुतांश खाजगी कंपन्या नफेखोरीसाठीच असतात हे अजून आम्हाला समजायचे आहे. आता नाही सांगितले तरी चालेल कारण तसेही ते समजलं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

परत एकदा...

प्रदीप
Mon, 07/12/2021 - 10:57 नवीन
१. बहुतांश नव्हे, सर्वच खाजगी कंपन्या स्वतःचा नफा मिळवण्यासाठीच असतात. २. पण ह्याचा अर्थ त्या लूटमार करतात, असा नव्हे. धर्मादाय धंदा करणे (म्हणजे नक्की जे काही असेल ते) व लूटमार करणे ह्यांत जमिन - अस्मानाचा फरक आहे. ३. खाजगीकरणाने, व खुल्या बाजारांत असल्याने, स्पर्धा निर्माण होते, व त्याचा अनेक तर्‍हांनी ग्राहकांना फायदा होतो. ४. अर्थात, सरकारचे थोडेफार नियंत्रण असणे जरूरीचे आहे. तुम्ही बीएसएनएल वापरता, तर ते ठीक आहे. आपण हे सगळे लिहीत असतांना ज्या यंत्रावरून वाचत/ लिहीत आहात, तेही सरकारच्या कुठल्या कंपनीने बनवले आहे काय, हेही तपासावे. आता नका सांगू,आम्हाला उत्तर माहिती आहे. तसेच तुमच्या मधे व तुम्ही जालावरून जे जे काही अ‍ॅक्सेस करत आहात, त्यांमधे फक्त बी. एस. एन. एल.च नाही. अगदी, कदाचित मिपाचा सर्व्ह्रर अथवा त्यांच्यासाठीचा सी. डी. एन. चा सर्व्हरही नक्कीच नाही. ३. साठी गेल्या काही दशकांतल्या भारतांतील अनेक 'सेवां'त आता खाजगी कंपन्याही उतरल्या आहेत, त्यांची आठवण स्वतःच करावी. त्यांची तुलना सरकारी तत्सम सेवेकर्‍यांशी करून पहावी. आता सांगू नये, मला उत्तर माहिती आहे. असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

१. बहुतांश नव्हे, सर्वच खाजगी

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 00:31 नवीन
१. बहुतांश नव्हे, सर्वच खाजगी कंपन्या स्वतःचा नफा मिळवण्यासाठीच असतात.
पुन्हा एकदा , चूक. ना नफा ना तोटा तत्वावर जनहितार्थ चालू कितीतरी खाजगी उद्योग पाहिले आहेत.
तुम्ही बीएसएनएल वापरता, तर ते ठीक आहे. आपण हे सगळे लिहीत असतांना ज्या यंत्रावरून वाचत/ लिहीत आहात, तेही सरकारच्या कुठल्या कंपनीने बनवले आहे काय, हेही तपासावे. आता नका सांगू,आम्हाला उत्तर माहिती आहे. तसेच तुमच्या मधे व तुम्ही जालावरून जे जे काही अ‍ॅक्सेस करत आहात, त्यांमधे फक्त बी. एस. एन. एल.च नाही. अगदी, कदाचित मिपाचा सर्व्ह्रर अथवा त्यांच्यासाठीचा सी. डी. एन. चा सर्व्हरही नक्कीच नाही.
परत चूक... मी सरकार निर्मितच वस्तू वापरतो असे नक्कीच नाही पण दिल्लीत केजरीवालने सरकारी शाळा अशा चालवल्या की खाजगी शाळांचे धाबे दणाणले... माझे प्रतिसाद भलेही उद्दामपणे प्रोवोक करायसाठी लिहले नसतील तरीही जर ते खरेच वाचले असतील तर मी एखाद्या व्यवस्थेचे मिंधे बनायच्या विरोधात आहे मग ती सेवा खाजगी असो की सरकारी... बॅलन्स/ तारतम्य/ समतोल आवश्यक आहे एव्हडाच माझा मतितार्थ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

पुन्हा चूक?

प्रदीप
Tue, 07/13/2021 - 07:11 नवीन
ना नफा ना तोटा तत्वावर जनहितार्थ चालू कितीतरी खाजगी उद्योग पाहिले आहेत.
उदाहरणे द्या. ना नफा, ना तोटा ह्या तत्वार खाजगी उद्योग चालत नाहीत. हे काही सामाजिक प्रेरणेने केलेले उपक्रम असतात. आणि त्यांच्या उत्पादनांची अथवा सेवेची कक्षा मर्यदित असते. असे उद्योग मूळ उद्योगधंद्याच्या तत्वाला अपवाद असतात. म्हणजे, बहुतांश उद्योग अशा तर्‍हेने चालवले जात नाहीत.
मी सरकार निर्मितच वस्तू वापरतो असे नक्कीच नाही पण दिल्लीत केजरीवालने सरकारी शाळा अशा चालवल्या की खाजगी शाळांचे धाबे दणाणले...
विषय आहे तुम्ही स्वतः हे सर्व जे लिहीताहात, ते कुठली सरकारी उत्पादने अथवा सेवा वापरून. आणि तुम्ही उदाहरण देताहात, दिल्लीतील शाळांचे. माझे असो. अधिक उजेडासाठी येथे तुम्हाला चंद्रसूर्यकुमारांनी दिलेला प्रतिसाद पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

:)

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 09:00 नवीन
विषय आहे तुम्ही स्वतः हे सर्व जे लिहीताहात, ते कुठली सरकारी उत्पादने अथवा सेवा वापरून. आणि तुम्ही उदाहरण देताहात, दिल्लीतील शाळांचे.
विषय आहे देश वेठीला धरू शकणारे उत्पादन खाजगी असावे की सरकारी नियंत्रणात, तुम्हालाच दैनंदिन जीवनातील किती गोष्टी खाजगी की सरकारी वर्गीकरणाची यावर चर्चा घसरावायची आहे... हो मी खासगी हॉटेल मध्ये जेवतो, गाडी सरकारी कंपनीने बनवली नाही पण यातील कोणतीही गोष्ट मला वेठीला धरू शकत नाही पण उद्या पेट्रोल दिवस नाही मिळाले तर वांदे होतील त्यामुळे खाजगी प्रॉडक्ट्स अन पेट्रोल लॉबीवर खाजगी मक्तेदारी या दोन वेगळ्या बाबी आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अधिक उजेडासाठी

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 09:35 नवीन
फक्त डोळे उघडे ठेवायचे कष्ट घेऊन माझे मुद्दे समजून घ्या... व मग उदाहरणात शिरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

> हेच सांगा की बहुतांश खाजगी

साहना
Mon, 07/12/2021 - 13:59 नवीन
> हेच सांगा की बहुतांश खाजगी कंपन्या नफेखोरीसाठीच असतात हे अजून आम्हाला समजायचे आहे. सर्व १००% खाजगी कंपन्या ह्या नफ्यासाठीच बनल्या आहेत. भारतीय कंपनी कायद्याचे मला जास्त ज्ञान नसले तरी नफा हाच एकमेव उद्धेश सर्व खाजगी कंपन्यांचा असतो. ** नफा हि अत्यंत चांगली गोष्टी असून त्याने समाजहित साधले जाते. उलट तोटा ह्याचा अर्थ संसाधनाची नासाडी असा असून त्यामुळे समाजाचे नुकसान होत जाते. ** दुसरी गोष्टी म्हणजे जी व्यक्ती नफ्यासाठी काम करते त्यांच्याकडे आपण प्रामाणिक पणे व्यवहार करू शकता, जी व्यक्ती किंवा कंपनी तुमच्यावर उपकार करण्याचा आव आणते त्यांच्याकडून तुम्हाला धोका होण्याची शक्यता नेहमीच जास्त आहे. उदाहरण म्हणजे अमेझॉन, गुगल इत्यादी कंपनी विदेशी असल्या तरी त्यांनी भारतीयांचा प्रचंड फायदा केला आहे. नफेखोर वॉलमार्ट आणि नफेखोर ऍमेझॉन भारतांत भांडून भारतीय जनतेच्या ताटात लोणी ठेवत आले आहेत. ह्याच्या उलट वल्र्ड व्हिजन पासून पेटा पर्यंत सर्व "धर्मादायी" विदेशी संस्था ह्यांची कांमे देशांत स्वच्छ वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

उदाहरण म्हणजे अमेझॉन, गुगल

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 00:35 नवीन
उदाहरण म्हणजे अमेझॉन, गुगल इत्यादी कंपनी विदेशी असल्या तरी त्यांनी भारतीयांचा प्रचंड फायदा केला आहे. नफेखोर वॉलमार्ट आणि नफेखोर ऍमेझॉन भारतांत भांडून भारतीय जनतेच्या ताटात लोणी ठेवत आले आहेत.
हो ना... तुम्हीही तुमची गुपिते मला सांगा त्याबदल्यात मी ही तुमचा फायदा करून द्यायला तयार आहे आयमीन तुम्हाला मेनिपुलेट केलं जातंय हेच समजायला जिथं अख्खे आयुष्य जाईल तिथे ताटात लोणी दिसणारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

बरं या खाजगी कंपन्या इतक्या बलाढ्य व धनाड्य आहेत

गॉडजिला
Wed, 07/14/2021 - 19:05 नवीन
कि ब्रेन वोशिंगसाठी डाटासायंटिस्टची फौज पद्धतशीर कार्यरत ठेवणे यांच्या डाव्या हातचा मळ आहे, विचार करा यांच्याकडे सरकारची माहीती आहे, जनतेची गुपिते आहेत, हा प्रचंड डाटा मॅनेज करायला डाटासायंटिस्ट दिवसरात्र राबवले जात आहेत मग हे पध्द्तशीर वापरून ब्रेन वोश करणे यांना किती जड असेल... जिथे जगातल्या बहुसंख्याना अडचण येता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारी कंपनीच तठस्थ आहे की नाही यावर ठामपणा नाही तिथे... माहिती ज्ञानाचा दुरुपयोग करून अराजक सहज निर्माण होऊ शकते भारत सरकारने खमकी भूमिका घेतली नाही तर देश आंदण दिल्या सारखे होईल खाजगीकरणात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

शिंपल गोष्ट

चंद्रसूर्यकुमार
Mon, 07/12/2021 - 11:14 नवीन
खाजगी कंपन्या समाजकल्याणासाठी स्थापल्या आहेत हे ही भाबड्या जनतेला समजायला थोडा वेळ द्यावा गुरुजी
खाजगी कंपन्या समाजकल्याणासाठी स्थापन केलेल्या नसतात. आपण नफा कमावावा म्हणून उद्योजक खाजगी कंपन्या स्थापन करतात. पण त्यांच्या व्यवहारांमधून समाजाचे कल्याण साधले जात असते. तसे समाजाचे कल्याण आपल्या व्यवहारातून साधले जात आहे याचा पत्ताही कोणाला नसतो आणि तसा उद्देशही नसतो. तरीही समाजाचे कल्याण त्यातून नकळत साध्य होत असते. त्याउलट सरकारी कंपन्या समाजकल्याणासाठी स्थापन केलेल्या असतात. नफा कमावावा या उद्देशाने नव्हे तर सामाजिक न्याय मिळावा, लोकांना सोयी मिळाव्यात म्हणून स्थापन केलेल्या असतात. पण त्यांच्या व्यवहारांमधून समाजाचे अहित होते असे सरसकट म्हणता येत नसले तरी त्यांच्याकडून स्त्रोतांची नासाडी होत असते आणि त्यातून समाजाचे नुकसान होत असते. तसे नुकसान आपल्या व्यवहारातून साधले जात आहे याचा पत्ताही कोणाला नसतो आणि तसा उद्देशही नसतो. तरीही समाजाचे नुकसान त्यातून नकळत होत असते. हे इतके शिंपल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

मला कळत नाही मी खाजगी मक्तेदारी विरोधात आहे

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 09:03 नवीन
भले भले मला खाजगी करणाच्या विरोधात का समजत आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मते आणि लेखनशैली

वामन देशमुख
Mon, 07/12/2021 - 09:35 नवीन
साहना यांची अनेक मते, सर्वसामान्यांना ती विचित्र वाटत असली तरी अगदी प्रॅक्टिकल असतात. अर्थात त्यांच्या लेखनशैलीमुळे काही वेळा गैरसमज होऊ शकतात हा भाग निराळा.
कोळसा मंत्रालयाने कोळशाची वाट लावली, विमानवाहूतक मंत्रांनी विमानवाहतूक खड्ड्यांत घातली, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेश आणि व्हिएतनाम च्या हि खाली आलो
पेट्रोलियम हा एक कच्चा माल असून इतर लक्षावधी आयात माला प्रमाणेच आहे. ह्याच्यासाठी वेगळे मंत्रालय ठेवणे हीच चूक आहे आणि आज काळ ह्या क्षेत्रांत ज्या समस्या आम्हाला सहन कराव्या लागतात त्याला कारणीभूत पेट्रोलियम मंत्रालयच आहे.
सरकारी शाळा चालविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना थेट पैसे देणे जास्त चांगले आहे आणि स्वस्त सुद्धा आहे.
शतशः सहमत. ज्या बाबीत सरकार हात घालते ती बाब सर्वसामान्यांसाठी अतिशय अवघड होऊन बसते हा सर्वत्र अनुभव आहे.
आम्हा भारतीयाना सरकारी भिकेवर जगण्याची अत्यंत आवड असावी म्हणून लोक पेट्रोलियम मंत्रालय सारख्या तद्दन उपद्रवी मंत्रालयाची भलावण करत आहेत.
सर्वत्र नाड्याच काय इतर सर्व अवयव सरकारी यंत्रणेने अवूळले आहेत. आणि ह्याच प्रकारच्या लाचारीच्या जीवनात भारतीयांना सुख मिळते असे वाटते.
पूर्णतः असहमत. मी आणि माझ्यासारखे कोट्यवधी भारतीय असे नाही आहोत.
  • Log in or register to post comments

प्रदीप याNइ साहनाजी

आनन्दा
Mon, 07/12/2021 - 10:20 नवीन
प्रदीप याNइ साहनाजी पेट्रोलियम वरच्या साधक बाधक चर्चेसाठी वेगळा धागा/ माळा काढला जावा असे सुचवतो.. त्यामध्ये एतद्देशीय व्यवस्था, भांडवलशाही व्यवस्था, करपद्धती आणि त्याचे फायदे तोटे यांच्यावर चर्चा व्हावी. विषय मोठा आहे आणि उगीच इथे वैयक्तिक आरोप/प्रत्यारोप करण्यात अर्थ नाही, तुम्ही केलेल्या अभ्यासाचा आम्हाला फायदा होऊ द्या.
  • Log in or register to post comments

सल्ला मान्य आहे. ह्यावर

साहना
Mon, 07/12/2021 - 13:54 नवीन
सल्ला मान्य आहे. ह्यावर सविस्तर लिहिले पाहिजे. ह्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल माईसाहेबांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

लिहिते राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/12/2021 - 11:26 नवीन
उत्तम विचार उत्तम मांडणी. वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

परिपूर्ण ज्ञान असणारा ह्या जगात तरी कोणी नाही

Rajesh188
Mon, 07/12/2021 - 13:05 नवीन
त्या पाहिले हे मनातून काढून टाका. ह्या आयडी मोठा ज्ञानी आहे हा मूर्ख हे ठरवायचा भानगडीत न पडणे उत्तम. इथे ते ठरवण्या इतक्या उच्च बुध्दी मत्ता असलेले कोणी नाही ईस्ट इंडिया कंपनी नी भारतासह अनेक देशांना गुलाम बनवलं हे इतके मोठे उदाहरण असताना. अनियंत्रित भांडवल शाही चे समर्थन करणारे ते कसे काय करतात. आफ्रिकेतील गरीब देशात भांडवल वादी लोकांनी काय गोंधळ घातला आहे. ह्या वर कधीच चर्चा होत नाही
  • Log in or register to post comments

लिहते रहा

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 00:38 नवीन
उत्तम विचार उत्तम मांडणी. वाचतोय. -कधी अडचण आली तर अवश्य कळवा पुन्हा लिहते करून टाकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

आफ्रिकेतील गरीब देशात भांडवल

रंगीला रतन
Tue, 07/13/2021 - 01:26 नवीन
आफ्रिकेतील गरीब देशात भांडवल वादी लोकांनी काय गोंधळ घातला आहे. ह्या वर कधीच चर्चा होत नाही
या विषयावर तुम्ही एक अभ्यासपुर्ण धागा काढाच राजेश भौ. आपण त्यावर एकदम टकाटक चर्चा करू. अट एकच मोदी,फडणवीस,भाजप,शिवसेना,गांधी,नेहरू,कॅांग्रेसचा काथ्या कुटुन कुटुन त्याची पुरी पावडर झाली आहे. तुमच्या नवीन धाग्यावर त्या लोकांचा कोणी नाव पण नाही काढायचा. तुम्ही पण नाही. कोणी काढलाच तर आपण लगेच रडत रडत संपादक मंडळाकडे तक्रार करून त्याचा प्रतिसाद उडवुन टाकु. मग कधी काढताय धागा? लै मज्जा येइल चर्चा करायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

भारताचा विचार केला तर

Rajesh188
Mon, 07/12/2021 - 13:14 नवीन
भारत सरकार ची धोरण काय असावीत हे कशावर ठरते. सामान्य मतदार लोकांचा विचार करून तर बिलकुल नाही बेहिशोबी मालमत्ता जमा करून स्वतः ला उद्योग पती समजणाऱ्या लोकांना विचारल्या शिवाय धोरण ठरत नाहीत. अफाट चोरी चा पैसा आपसात वाटून घेवून सरकार नियम,धोरण बनवते. इलेक्शन फंड हा सर्व प्रकाराला जबाबदार. पण हे सर्व प्रकाश मध्ये कधीच येत नाहीत. सरकार ठरवून सरकारी उद्योग बुडवितात.आणि सरकारी उद्योग वाईट अशी प्रतिमा निर्माण करतात. ठरवून चांगले चालत असलेले उद्योग तोट्यात आणले जातात आणि नंतर विकले जातात. हे सर्व भांडवलदार लोकांच्या इशाऱ्यावर चालत. त्या मुळे संपत्ती नियंत्रण कायदा झाला पाहिजे
  • Log in or register to post comments

नका हो असं बोलून

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 09:05 नवीन
एजन्ट लोकांशी कशाला शत्रुत्व घेताय ? जनतेच्या भल्यासाठी खाजगी मक्तेदारी निर्माण करणे म्हणजे हाविंग सेक्स फॉर व्हर्जिनिटीच असते हे सगळ्यांना माहीत असते पण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सरकारी उद्योग

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 09:23 नवीन
भांडवलदारांच्या इशार्यानेच खड्यात घातले जातात, आपण बसतो खाजगी कंपन्या किती चांगल्या म्हणत... एलआयसी गवरमेन्ट चालवते यातूनच सरकार किती सक्षम आहे याची साक्ष मिळते फक्त मोनोपॉलीच्या विरोधात आहे म्हणून खाजगी विमा विरोध करत नाही पण सरकार एखादी गोष्ट किती व्यवस्थित करू शकते हेच लोक समजून घेत नाहीत यांना सरकारी शाळा बंद करण्याची हौस फार सुधारण्याची बुद्धीच नाही तर करणार काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सरकारी उद्योग भांडवलदारांच्या

सॅगी
Tue, 07/13/2021 - 10:14 नवीन
सरकारी उद्योग भांडवलदारांच्या इशार्‍यानेच खड्ड्यात घातले जातात..
नक्की का? या हिशोबाने तर एलआयसीदेखील कधीचीच खड्ड्यात जायला हवी होती, कारण देशात खाजगी विमा कंपन्यादेखील आहेत...
एलआयसी गवरमेन्ट चालवते यातूनच सरकार किती सक्षम आहे याची साक्ष मिळते
परत, नक्की का? कारण याच हिशोबाने बिएसएनएल/मटेनिलि देखील सक्षमपणे चालल्या पाहिजेत...नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

मी नक्की काय बोललो समजले नाही ?

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 11:29 नवीन
हरकत नाही... नक्की का ? चे उत्तर हो नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

मी दिलेली ऊदाहरणे समजली नाहीत?

सॅगी
Tue, 07/13/2021 - 11:50 नवीन
हरकत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

विषय मिटला

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 13:16 नवीन
हरकत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

ऊदाहरणे समजून घ्यायची नव्हती म्हणून विषय मिटवला

सॅगी
Tue, 07/13/2021 - 14:32 नवीन
हरकत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

हरकत नाही

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 14:38 नवीन
आज ना उद्या आपल्यात सकारात्मक बदल होईल हे माहीत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हरकत नाही

सॅगी
Tue, 07/13/2021 - 14:47 नवीन
आज ना उद्या आपल्या सर्वांच्यात (म्हणजे तुमच्यातही) सकारात्मक बदल होईल हे माहीत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

हरकत नाही

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 14:48 नवीन
मी सर्वामध्ये सामाविष्ट असतो असे मी मानतो इतरांचे तसे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हरकत नाही

सॅगी
Tue, 07/13/2021 - 14:54 नवीन
तुमचे प्रतिसाद वाचून तर तसे वाटत नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर असेल बुवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

हरकत नाही

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 14:55 नवीन
तुमचे प्रतिसाद वाचून तर तसे वाटत नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर असेल बुवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हरकत नाही

सॅगी
Tue, 07/13/2021 - 15:11 नवीन
सकारात्मक बदलाची गरज तुम्हालाही आहे यावर तुमची हरकत नाही तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

तुमची हरकत आहे का ?

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 15:19 नवीन
मग माझी कशाला घेउ ? स्र्वांना बरोबर घेउन जाणे महत्वाचे अस्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

सर्वांना

सॅगी
Tue, 07/13/2021 - 15:22 नवीन
बरोबर घेऊन कुठे जाणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

पूर्व दिशेला

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 15:26 नवीन
पूर्वापार लोकं ते करत आलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

अमेरिकेत लिबरटेरियन लोक इतकं

कॉमी
Tue, 07/13/2021 - 11:38 नवीन
अमेरिकेत लिबरटेरियन लोक इतकं बिंडोकासारखं याच बाबीवर बोलतात. काही महाभाग यूएस फेडरल पोस्ट सुद्धा बंद करा म्हणतात का म्हणे तर अमेझॉन काम करेल. अमेझॉन बराच कार्यभाग पोस्तातर्फे उरकते ते दुर्लक्ष. पोस्ट संपूर्ण स्वतःच्या पैश्यातून चालते- दुर्लक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

USPS ३० वर्षे मागेच बंद

साहना
Tue, 07/13/2021 - 12:40 नवीन
USPS ३० वर्षे मागेच बंद करायला हवे होते. अमेरिकेत राहून भारताचा अनुभव हवा असेल तर मी नेहमीच ह्या घाणेरड्या संस्थेत जाते. मक्ख तोंडाची हि मंडळी अगदी स्टेट बँक स्टाफ ला सुद्धा लाजवेल अश्या पध्तीईं संथ गतीने बिनडोक पानाची कामे करत असतात. मागील ५ वर्षांत ह्या संस्थेने जनतेचे किमान ५ बिलियन डॉलर्स प्रतिवर्षी बुडवले आहेत. ह्याउलट फेडेक्स प्रति वर्ष सुमारे ५ बिलियन चा नफा करते आणि उलट जास्त चांगली सेवा देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हा हा हा

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 12:50 नवीन
फेडेक्स USPS च्या समोर लहान बाळ पण नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

संथ गतीने हे मान्य

सौन्दर्य
Wed, 07/14/2021 - 23:19 नवीन
संथ गतीने हे मान्य पण काहीजण नीट हसतही बोलतात. भारतातील पोस्ट ऑफिसेस व यूएस मधल्या पोस्ट ऑफिसेस मधला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे इथे तुमचे काम पूर्ण करूनच तुम्हाला जाऊ देतात, उगाचच तुसडेपणाने ह्या कॉउंटरवरून त्या कॉउंटरवर हाकलत नाहीत. जी काही माहिती तुम्ही विचाराल ती अत्यंत शांतपणे ते देतात व काम झाल्यावर थँक यु देखील म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

अमेरिकेत राहून भारताचा अनुभव

गॉडजिला
गुरुवार, 07/15/2021 - 01:17 नवीन
अमेरिकेत राहून भारताचा अनुभव हवा असेल तर मी नेहमीच ह्या घाणेरड्या संस्थेत जाते.
भारतात नेहमी येणे जमत नसल्याने त्या USPS ला नियमित भेट देत असतात तसे त्या महागडे फेडेक्सही वापरतात पण मधूनच त्यांना अमेरिकेत भारताचा अनुभव नेहमी हवा असतो त्यामुळे त्यांचा नाईलाज होतो त्यामुळे नेहमी त्यांना भारताचा अनुभव हवाय कि अमेरिकेचा हेच मला अजून स्पष्ट झाले नाहीये... मी अमेरिकेत असतो तर तीथे नेहमी भारताचा अनुभव घ्यायच्या फँदात मी का पढलो असतो ते हि मलाही नक्की सांगता येणार नाही पण मी ऑफिसकामासाठी ऑफिस खर्चाने नक्कीच महागडे फेडेक्स वापरले असते अन वैयक्तिक कामासाठी गपचूप नियमित पोस्टात गेलो असतो पण सहानाजी तसे करत नसाव्यात त्यामुळे त्यांनी अनुभव का लिहलाय हेच माझ्यापुरते पुरेसे स्पष्ट झालेले नाही ... What a strange LOVE hate relationship they have with USPS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

अमेरिकन कायद्याप्रमाणे USPS

साहना
गुरुवार, 07/15/2021 - 06:41 नवीन
अमेरिकन कायद्याप्रमाणे USPS ला पत्रांची मोनोपॉली आहे. फेडेक्स वगैरे पत्रे पाठवत नाहीत त्यामुळे कुणाला पत्र वगैरे पाठवायचे असेल आणि त्याची व्यवस्थित रिसीट हवी असेल तर USPS सोडून पर्याय नाही. माझी भांडणे सर्वत्र होत असल्याने बऱ्याच वेळा असल्या नोटिसा पाठविण्यासाठी मला USPS मध्ये जावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

खायला तिकडे अन पादायला इकडे

रंगीला रतन
गुरुवार, 07/15/2021 - 11:00 नवीन
अमेरिकन कायद्याप्रमाणे USPS ला पत्रांची मोनोपॉली आहे. फेडेक्स वगैरे पत्रे पाठवत नाहीत त्यामुळे कुणाला पत्र वगैरे पाठवायचे असेल आणि त्याची व्यवस्थित रिसीट हवी असेल तर USPS सोडून पर्याय नाही. जर नाईलाज म्हणुन तुम्ही त्या घाणेरड्या संस्थेत जाता मग सरळ तसेच लिहा की कशाला उगाच अमेरिकेत राहून भारताचा अनुभव हवा असेल तर मी नेहमीच ह्या घाणेरड्या संस्थेत जाते. अशी गरळ ओकायची? त्यातुन आमची अमेरीका कित्ती कित्ती छान आणी तुमचा भारत कसा घाण हे दाखवायला? आमच्या इथे बोलीभाषेत एक म्हण आहे खायला तिकडे अन पादायला इकडे तसं झालं की हे. मिपा सारखी तिकडेही काही संस्थळे असतील की, लिहा त्यावर या मोनोपॅाली विरोधात अमेरीकन जनतेला प्रोव्होक करणारे लेख, करा USPS च्या खाजगीकरणाची मागणी, नोंदवा अमेरीकन सरकारचा निषेध. माझी भांडणे सर्वत्र होत असल्याने बऱ्याच वेळा असल्या नोटिसा पाठविण्यासाठी मला USPS मध्ये जावे लागते. ही तुमची वैयक्तिक समस्या आहे त्याचं फ्रस्ट्रेशन काढायला उगा भारताला कशाला मधे आणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

सहमत

गुल्लू दादा
गुरुवार, 07/15/2021 - 13:06 नवीन
उगाच दूरदेशी राहून भारताविषयी कण्या कांडायच्या किंवा आस्था दाखवायची हे नाही बुवा आपल्याला आवडत. इतका भारत सुधारावा वाटत असेल तर इथे राहून काही तरी करा. इथे चांगलं नाही म्हंटल्याने चांगलं होणार नाही ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

+१

रंगीला रतन
गुरुवार, 07/15/2021 - 13:26 नवीन
+१ आपल्या सुरात सुर मिसळुन जीजी रं जीजी रं जीजी करणारे चार झीलकरी मिळले की कसा लेखकाचा तोल जातो हे अशा भाषेवरून दिसते. त्यांचे राजकारणबाह्य काही लेख चांगले असतात. त्यावर दादही दीली आहे. पण हे असले तारे तोडले की संताप येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

USPS हे अमेरिकन पोस्ट खाते

साहना
Fri, 07/16/2021 - 06:55 नवीन
USPS हे अमेरिकन पोस्ट खाते असून मी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे उगाच मी भारतावर टीका केली आहे असा गैरसमज पसरवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे माझी संपूर्ण टीका आणि ती कितीही टोकाची असली तरी जवळ जवळ १००% वेळा भारत सरकारवर (किंवा राज्य सरकार वर) आहे. मी कधीही संपूर्ण देश किंवा समाजावर टीका केलेली नाही. असेल तर दाखवून द्या मी क्षमायाचना करेन. देश आणि देशबांधव ह्यांच्यावर प्रेम नसते तर मला विविध विषयावर लिहून माझा वेळ खराब करायची काहीही हौस नाही. आणि इथे टीका करणाऱ्या बहुतेक लोकांना मिरच्या भारत पेक्षा USPS वर टीका केली आहे म्हणून झोम्बल्या आहेत असेच पाहून वाटते. देश आणि समाज हे सरकार पासून वेगळे आहे. प्रेम आणि निष्ठा हि लोक आणि समाजा प्रति असावी सरकार किंवा पार्टी किंवा नेतेमंडळी ह्यांच्याशी नसावी अशीच माझी भूमिका आहे. काही लोकांचा इतका बुद्धिभ्रम झालेला असतो कि लोक आणि सरकार ह्यांत फरक आहे हेच समजणे ह्यांना मुश्किल जाते आणि त्यामुळे दुसऱ्या देशांत सुद्धा जाऊन तिथल्या भ्रष्ट आणि कामचुकार पोस्टाशी सुद्धा प्रेम जडते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

चोराच्या उलट्या बंबा

गॉडजिला
Fri, 07/16/2021 - 17:10 नवीन
USPS हे अमेरिकन पोस्ट खाते असून मी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे उगाच मी भारतावर टीका केली आहे असा गैरसमज पसरवू नये.
मग मला भारताचा अनुभव हवा असेल तर मी USPS मध्ये जाते हे काय श्रीश्री188 म्हणतात काय ? USPS च्या खांद्यावर बोट ठेवून निशाणा भारतावर साधला त्यातही काही लोक तुमच्या USPS बाबत विधानावर सहमत नाहीत हे पाहून आता नवीन श्रीश्री188 टाईप प्रतिसाद वाचकांच्या माथी ? श्रीश्री 376 माताजी जिंदाबाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

> USPS ३० वर्षे मागेच बंद

साहना
Sat, 07/17/2021 - 04:28 नवीन
> USPS ३० वर्षे मागेच बंद करायला हवे होते. अमेरिकेत राहून भारताचा अनुभव हवा असेल तर मी नेहमीच ह्या घाणेरड्या संस्थेत जाते. मक्ख तोंडाची हि मंडळी अगदी स्टेट बँक स्टाफ ला सुद्धा लाजवेल अश्या पध्तीईं संथ गतीने बिनडोक पानाची कामे करत असतात. माझ्या लेखनाला मी जबाबरदार आहे तुमच्या आकलनशक्तीला नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

ज्या दिवशी मी माझ्या आकलन शक्तीला आपणास जबाबदार धरेन

गॉडजिला
Sat, 07/17/2021 - 15:50 नवीन
त्या दिवशी मी आपला खन्दा समर्थक झालो असेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा