✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)

श
श्रीगुरुजी यांनी
Tue, 05/18/2021 - 15:02  ·  लेख
लेख
मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain-use-super-spreader-kumbh-bjp-congress-toolkit-destroy-pm-image-1803935-2021-05-18
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
83648 वाचन

💬 प्रतिसाद (219)

प्रतिक्रिया

आंदोलनाचा पोपट पिंजऱ्यात डोळे

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/27/2021 - 14:59 नवीन
आंदोलनाचा पोपट पिंजऱ्यात डोळे मिटून आडवा पडला आहे, तो अजिबात हालचाल करीत नाही, त्याचा श्वास बंद आहे, तो काही खातपित नाही . . . परंतु तो मेलेला नाही. मोदी सरकार शेतक-याचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. २६ जानेवारीस आंदोलनाच्या नावाखाली दलालांनी संपूर्ण दिल्लीत यथेच्छ धुडगूस घातला. त्यानंतर ते आंदोलन संपले. सरकार आता तो विषय मागे सारून पुढे गेले आहे. ज्या आंदोलनाचा ४ महिन्यांपूर्वीच नैसर्गिक मृत्यु झाला ते कशाला सरकार चिरडून टाकणार? आता फक्त तेथे मूठभर निरूद्योगी दलाल शिल्लक आहेत. जनतेचा त्यांना कणभरही पाठिंबा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंदोलनाचा पोपट पिंजऱ्यात डोळे

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/27/2021 - 15:09 नवीन
आंदोलनाचा पोपट पिंजऱ्यात डोळे मिटून आडवा पडला आहे, तो अजिबात हालचाल करीत नाही, त्याचा श्वास बंद आहे, तो काही खातपित नाही . . . परंतु तो मेलेला नाही. मोदी सरकार शेतक-याचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. २६ जानेवारीस आंदोलनाच्या नावाखाली दलालांनी संपूर्ण दिल्लीत यथेच्छ धुडगूस घातला. त्यानंतर ते आंदोलन संपले. सरकार आता तो विषय मागे सारून पुढे गेले आहे. ज्या आंदोलनाचा ४ महिन्यांपूर्वीच नैसर्गिक मृत्यु झाला ते कशाला सरकार चिरडून टाकणार? आता फक्त तेथे मूठभर निरूद्योगी दलाल शिल्लक आहेत. जनतेचा त्यांना कणभरही पाठिंबा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१००

Ujjwal
गुरुवार, 05/27/2021 - 16:37 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत.

सुक्या
गुरुवार, 05/27/2021 - 21:40 नवीन
सहमत. हे शेतकर्‍यांंचे आंदोलन नाही ... हे दलाल लोकांचे आंदोलन आहे. आपली दलाली वाचावी म्हणुन हा सगळा आटापीटा चालु आहे ... पंजाब / हरियाना सोडले तर बाकी देशात यांना कुणी हिंग लावुन विचारत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

(तथाकथीत) शेतकरी आंदोलन

सॅगी
गुरुवार, 05/27/2021 - 17:35 नवीन
बाकी, या (तथाकथीत) शेतकरी आंदोलनाचे रिपोर्टींग करणार्‍या मिडियावाल्यांना "सोशल डिस्टंसिंगचा फज्जा" उडताना कधीच कसा दिसत नाही, त्या बद्दल एक चकार शब्द त्यांच्या वार्तांकनातून निघत नाही, ना त्यांच्या नेत्यांना यावर प्रश्न विचारले जात....हे काय गौडबंगाल आहे काही कळत नाही. इतर वेळेस ४ लोकं काय दिसली, की वार्तांकन करताना "सोशल डिस्टंसिंगचा फज्जा" बरोबर दिसतो... बहुदा कोरोनाने (तथाकथीत) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे असा समज असावा.
  • Log in or register to post comments

शेतकऱ्यांचं सोडा, परंतू

आग्या१९९०
गुरुवार, 05/27/2021 - 20:30 नवीन
शेतकऱ्यांचं सोडा, परंतू बहुमतातील सरकारला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करायची हिम्मत होत नाही,निघाले २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करायला. सहा महिने फक्त बाकी आहेत.नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या.
  • Log in or register to post comments

बरं मग काय करायचं?

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/27/2021 - 21:43 नवीन
बरं मग काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अवघड प्रश्न विचारु नका......

नावातकायआहे
गुरुवार, 05/27/2021 - 22:06 नवीन
अवघड प्रश्न विचारु नका......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सोपं आहे..

सॅगी
गुरुवार, 05/27/2021 - 22:06 नवीन
मख्ख चेहरा करून जे काही होईल ते पाहत बसायचं, चेहर्‍यावरची माशीही न हलवता, आणि हायकमांडने दिलेल्या आज्ञा एखाद्या रोबोटप्रमाणे निमूटपणे पाळायच्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काही बाळबोध प्रश्न.

सुबोध खरे
Fri, 05/28/2021 - 11:38 नवीन
काही बाळबोध प्रश्न. ४५ % जनता प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. जर हे सरकार शेतकरी विरोधी आहे तर ते दोन वेळेस कसं काय निवडून आलं? आणि ज्या सरकारने( यु पी ए १) स्वामिनाथन आयोग नेमला त्यांनी त्याच्या शिफारशींची अमलबजावणी का केली नाही? एका अतिशय हुशार आणि उच्च शिक्षित अर्थतज्ञाशी बोलताना मला जेवढे समजले ते असे. सरकारला शेतकरी आणि ग्राहक अशा दोन्ही गटांना नाराज करता येत नाही आणि स्वामिनाथन आयोगाच्या संपूर्ण शिफारशी स्वीकारल्या तर त्या शेतकऱ्यांसाठी उत्तम आहेत परंतु ग्राहकांसाठी फार महाग आहेत. आणि शेतकरी सुद्धा स्वतः ग्राहक आहेतच( ऊस पिकवणारा शेतकरी हा कापडाचा ग्राहक आहेच). शेतजमिनीबद्दलची शिफारस स्वीकारली तर भारताच्या औद्योगिकरणाच्या मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. हे डॉ मनमोहन सिंह यांनाही माहिती होतं. कसणाऱ्याचे शेत असा कुळकायदा जो महाराष्ट्रात १९४९ साली आला तो सर्व राज्यात आणणे अशक्य आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी या तशा एकांगी आहेत आणि आजच्या वेगाने होणाऱ्या जागतिकीकरणाच्या रेट्यात त्या बऱ्यापैकी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे त्या जशाच्या तशा अमलात आणणे कोणत्याही लोकशाही सरकारला अशक्य आहे. खखोदेजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

ज्यांना खरे कधी बोलायचं माहीत

आग्या१९९०
Fri, 05/28/2021 - 12:13 नवीन
ज्यांना खरे कधी बोलायचं माहीत नाही, त्यांना असेच प्रश्न पडणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काय सांगताय?

सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 11:45 नवीन
काय सांगताय? तुम्ही सांगा बरं, आता पर्यंत कोणत्याही सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे का लागू केल्या नाहीत. तरी बरं मोदी सरकारने त्यातील बऱ्यापैकी शिफारशी लागू केल्या आहेत. कोणत्या आहेत ते जालावर खोदून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ब्बॉर.

आग्या१९९०
Sat, 05/29/2021 - 12:04 नवीन
ब्बॉर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हॅ हॅ हॅ हॅ

सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 18:47 नवीन
हॅ हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

काही करायचं नाही

Rajesh188
गुरुवार, 05/27/2021 - 22:06 नवीन
अजुन जबरदस्त फेकाफेक करून शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट झाले असे रेटून सांगायचे.आहे काय आणि नाही काय.
  • Log in or register to post comments

स्वागत!

नावातकायआहे
गुरुवार, 05/27/2021 - 22:07 नवीन
स्वागत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

फेकाफेक करून शेतकऱ्यांचे

सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 11:49 नवीन
फेकाफेक करून शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट झाले श्री मोदींना काही कळतंच नाही. फेकाफेक करून शेतकऱ्यांचे उत्पादन तिप्पट झालं कशाला सांगायचं निदान दसपट झालं असं सांगायचं आणि वर पुराव्यासाठी शेतकरी आंदोलनातील पायाच्या मसाज पार्लर, वातानुकूलित कंटेनरचे, पंचतारांकित भोजनाचे फोटो टाकायचे. हा का ना का त्यांना आपल्या दिल्लीच्या महापुरुषांकडून अजून बरंच शिकायचंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

तुम्ही एनर्जी कर्त्यांवर कितीही खर्च केलीत

गॉडजिला
Sat, 05/29/2021 - 13:58 नवीन
तरी करवत्याना त्यामुळे शष्प फरक पडत नाही म्हणून खरा बदल अपेक्षित असेल कारवत्याना भिडा इथे, व कर्त्यांना खेळीमेळीत घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हॅ हॅ

सुबोध खरे
Sat, 05/29/2021 - 18:46 नवीन
हॅ हॅ इथे कोण लेकाचा सिरियसली घेतोय? कर्त्यांना आणि करवित्याना सुद्धा टिनपाट राजकारण्यांबद्दल आणि त्यांच्या गुलाम आणि चमच्याबद्दल असलेला राग इथे व्यक्त करून मोकळं व्हायचं आणि आपण शांत रहायचं हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा