मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात? कारण आपली मनं त्यांच्या शरीरात वास करतात. माणूस मांसाचा गोळा असला तरी कुणी जाड असतो तर कुणी तोळामासा. त्याचप्रमाणे सुदृढ आणि सशक्त मने अनेकांच्या शरीरात वसलेली असतात. याउलट कृश मने केवळ काही जणांवर समाधान मानतात. जेवढ्या जास्त जीवांचे मिळून मन बनते तेवढेच ते हरहुन्नरी आणि प्रसन्न असते. आपल्या भोवती वावरणारी प्रत्येक व्यक्ती कित्येक मनांचे मांसल रूप असते. प्रत्येक माणूस हाच मनाचा मांसल भाग असतो. माणूस म्हणजे मांस. मन म्हणजे माणूस.
वाचने
7944
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख अत्यंत दवणीय आहे.
लेख अत्यंत दवणीय आहे.
In reply to लेख अत्यंत दवणीय आहे. by विजुभाऊ
पण सर
In reply to लेख अत्यंत दवणीय आहे. by सतिश गावडे
वाह..
In reply to पण सर by प्रसाद गोडबोले
व्वा!!
In reply to पण सर by प्रसाद गोडबोले
धन्यवाद
In reply to लेख अत्यंत दवणीय आहे. by विजुभाऊ
दवणीय म्हणजे काय ?
प्रवीण दवणे गुगला.
कॉमी
ओह
In reply to कॉमी by उपयोजक
होय मनाला मांस असते
तुम्ही गुरुदेवांचे "इन ट्यून
सापडेना
In reply to तुम्ही गुरुदेवांचे "इन ट्यून by बोलघेवडा
कपाळावर हात मारून घेणारी
In reply to सापडेना by अनुस्वार
काय हो, तुम्ही वाचलय का? :-)
In reply to कपाळावर हात मारून घेणारी by श्रीगुरुजी
वाचलंय? फिदी फिदी फिदी . . .
In reply to काय हो, तुम्ही वाचलय का? :-) by नावातकायआहे
थोडा गोंधळ उडालाय.
In reply to कपाळावर हात मारून घेणारी by श्रीगुरुजी
भिंतीवर डोकं आपठणारी स्माईली
In reply to थोडा गोंधळ उडालाय. by अनुस्वार
अनुस्वार, इथे ऐका :)
In reply to भिंतीवर डोकं आपठणारी स्माईली by श्रीगुरुजी
विद्या विनयेन शोभते।
In reply to अनुस्वार, इथे ऐका :) by मनो