मन आणि मांस
मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात? कारण आपली मनं त्यांच्या शरीरात वास करतात. माणूस मांसाचा गोळा असला तरी कुणी जाड असतो तर कुणी तोळामासा. त्याचप्रमाणे सुदृढ आणि सशक्त मने अनेकांच्या शरीरात वसलेली असतात. याउलट कृश मने केवळ काही जणांवर समाधान मानतात. जेवढ्या जास्त जीवांचे मिळून मन बनते तेवढेच ते हरहुन्नरी आणि प्रसन्न असते. आपल्या भोवती वावरणारी प्रत्येक व्यक्ती कित्येक मनांचे मांसल रूप असते. प्रत्येक माणूस हाच मनाचा मांसल भाग असतो. माणूस म्हणजे मांस. मन म्हणजे माणूस.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख अत्यंत दवणीय आहे.
लेख अत्यंत दवणीय आहे.
पण सर
वाह..
व्वा!!
धन्यवाद
दवणीय म्हणजे काय ?
प्रवीण दवणे गुगला.
कॉमी
ओह
होय मनाला मांस असते
तुम्ही गुरुदेवांचे "इन ट्यून
सापडेना
कपाळावर हात मारून घेणारी
काय हो, तुम्ही वाचलय का? :-)
वाचलंय? फिदी फिदी फिदी . . .
थोडा गोंधळ उडालाय.
भिंतीवर डोकं आपठणारी स्माईली
अनुस्वार, इथे ऐका :)
विद्या विनयेन शोभते।