‘आदिम तालाचं संगीत’ (“Melodies with a Primitive Rhythm”)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 May 2021 - 1:44 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

“Melodies with a Primitive Rhythm” व ‘आदिम तालाचं संगीत’ ही दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झालीत, त्या निमित्ताने हा लेख:

सांगायला आनंद होत आहे, की 2000 साली प्रकाशित झालेल्या ‘आदिम तालनं संगीत’ या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाचं नुकतंच इंग्रजी भाषांतरातलं पुस्तक “Melodies with a Primitive Rhythm” या नावाने चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर पुण्याच्या (आणि आता दिल्लीत वास्तव्य) प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. मूळ अहिराणी कवितासंग्रह डॉ. गणेश देवी यांनी स्वप्रस्तावनेसह बडोद्याच्या ‘भाषा केंद्रां’तून प्रकाशित केला होता.
‘आदिम तालनं संगीत’ या अहिराणी कवितासंग्रहात समाविष्ट झालेल्या माझ्या कविता म्हणजे १९८२ पासून २००० या काळात लिहिलेल्या अहिराणी कवितांमधल्या निवडक कविता आहेत. पैकी माझ्या दहा मराठी कवितांचा मीच केलेला अहिराणी अनुवाद आहे. (म्हणजे मुळात या दहा कवितासुध्दा अहिराणीच होत्या, पण त्यांचा मराठी अनुवाद काही मराठी नियतकालिकांत प्रकाशित झाला होता म्हणून त्यांना मराठी म्हणायचं.)
‘आदिम तालनं संगीत’ हा अहिराणी भाषिक कवितासंग्रह वाचून (कवितेतल्या वैश्विक पडसादांमुळे) अनेक बहुभाषिक मित्रांनी या कवितांचा लवकरात लवकर इंग्रजीत अनुवाद व्हावा असं वेळोवेळी सुचवलं होतं. पण आपण होऊन भाषांतरासाठी कोणी पुढं येत नव्हतं. आणि मी ही तसा कधी प्रयत्न केला नाही. पण अचानक आधी कोणताही परिचय नसताना प्रा. राजीव कुलकर्णी यांनी ‘साहित्य’ दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या माझ्या एका मराठी कवितेचा (कुठंतरी पाठवण्यासाठी) परस्पर इंग्रजी अनुवाद केला होता. आणि नंतर माझा ठावठिकाणा लागल्यावर त्यांनी मला ते पत्रानं कळवलं होतं. ते इंग्रजी साहित्याचे शिक्षक व अभ्यासक आहेत. परिचय झाल्यानंतर खूप दिवसांनी त्यांना ‘आदिम तालनं संगीत’ वाचायला सुचवलं. वाचून होताच त्यांनी या कवितांचा स्वत: आनंद घेत इंग्रजीत अल्पावधीत भाषांतर केलं.
प्रा. कुलकर्णी हे अहिराणी भाषिक नसल्याने त्यांना ह्या अहिराणी कवितांचं माझ्याकडून मराठी भाषांतर हवं होतं. ते मी त्यांना तात्काळ करुन दिलं. यामुळे या अहिराणी कवितासंग्रहाचा इंग्रजीसोबत मराठी अनुवादाचंही पुस्तक तयार झालं. विशेष म्हणजे इंग्रजी व मराठी भाषांतराची दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रकाशनाकडून सोबतच प्रकाशित झाल्याने सुखद धक्का मिळत आनंद व्दिगुणीत झाला.
आनंदाची अजून एक गोष्ट अशी, की श्री. कुलकर्णी यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर व मूळ अहिराणी ‘आदिम तालनं संगीता’तल्या कविता माझे कवी मित्र श्री. महेश लिला पंडित यांनी पुन्हा बारकाईने वाचून याच कवितांचा अहिराणीतल्या सूक्ष्म सांस्कृतिक संदर्भांसह नव्याने इंग्रजी अनुवाद करण्याचं काम आता स्वानंदानं सुरु केलं आहे. इंग्रजीतला हा दुसरा आणि तितकाच दर्जेदार वेगळा अनुवादही ते लवकरच पुस्तक स्वरुपात प्रकाशित करणार आहेत. तब्बल एकवीस वर्षांनंतर या अहिराणी कवितांची एकाचवेळी दोन दर्जेदार इंग्रजी भाषांतरांची पुस्तकं प्रकाशित होत आहेत, म्हणून आनंद होणं साहजिक.

पावसाचा आवाज:
पाऊस आणि पावसाच्या आवाजाचं मला लहानपणापासून प्रचंड कुतुहल मिश्रित आकर्षण आहे. आमच्या गावी पाऊस सुरु झाला, की मी अभ्यास करणं बंद करुन पावसाची गंमत पहात - पावसाचा आवाज ऐकत घराच्या दारात उभा रहायचो. (आजही पावसाचं स्वागत मी असंच काहीसं करत असतो.) पाऊस पडत असतानाचा, पावसाच्या वेळी वाहणार्‍या वार्‍याचा, आकाशात चमकणार्‍या विजा आणि गरजणार्‍या ढगांच्या समग्र आवाजाला मी ‘आदिम तालाचं संगीत’ म्हणतो. या शीर्षकाची एकच कविता या संग्रहात असली तरी एकूण कवितांत संखेने पावसाच्या कविताच बहुतांशपणे दिसून येतील.
पाऊस कोणताही असो, म्हणजे पावसाळ्यातला मोसमी असो, झडीचा असो, अवकाळी असो की मान्सूनपूर्व असो, मला तो आकर्षून घेतो. पावसांतून आदिम तालाचं संगीत मला ऐकू येत राहतं...
‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहात ही सर्व अहिराणी भाषेतली कविता. या कवितेचा मुख्य घटक म्हणजे भाषा आणि भाषेतली परिभाषा. या कवितेतली परिभाषा वाचून ही नक्की कोणती भाषा आहे, असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.
भाषा कोणतीही असो त्या भाषेत आविष्कृत होताना कवीची स्वत:ची एक भाषा तयार होत जाते. म्हणून व्यक्तीपरत्वे भाषा बदलते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून केवळ भाषा, परिभाषा वा विशिष्ट बोली समजून घेतली की कविता समजली, असं होत नाही. कोणतीही कविता अजून एक नवीच परिभाषा ठरते.
हे विवेचन म्हणजे या कवितासंग्रहातील समग्र कवितेची निर्मिती प्रक्रिया नाही, आस्वाद नाही आणि मर्मग्रहण - समीक्षणही नाही. फक्त प्रास्ताविक. संग्रहातील पहिल्या आवृत्तीतल्या एकशे त्रेपन्न आणि आता (२००१ ते २०२० या काळात लिहिलेल्या) ब्यायशी कविता अशा एकूण दोनशे पस्तीस कविता या इंग्रजी व मराठी आवृत्तीत समाविष्ट आहेत.
अनुक्रमे इंग्रजी व मराठी भाषांतरीत कवितासंग्रहांतील पहिली कविता:

1. I Approach My Poems

A friend visits,
speaks his chaste,
sophisticated, urbane language,
and tries to teach me the same.
I, too, try to imitate it
in his company....
Intoxicated by the flavour
of his own tongue,
the friend misses out on life.
When he leaves,
I shake off his language
and approach my poems…
0

१ . मी कवितेजवळ जातो...

शुध्द भाषा बोलणारा
माझा मित्र घरी येतो
आणि मला
शुध्द भाषा शिकवण्याचा
प्रयत्न करतो...

तो आला की
मी त्याच्याशी शुध्द भाषा
बोलण्याचा काटेकोर प्रयत्न करतो...

शुध्द भाषेच्या धुंदीत
मित्र जीवनाला सहज विसरुन जातो...
तो उठून गेला की मग मी
भाषा फेकून
कवितेजवळ जातो...
0

पुस्तके पाहण्यासाठी व मागवण्यासाठी लिंक:
Melodies with a Primitive Rhythm: Aadim Talna Sangeet (इंग्रजी)
Amazon:
https://www.amazon.in/dp/163886022X/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_YENWJB96...
Notion Press:
https://notionpress.com/read/melodies-with-a-primitive-rhythm
‘आदिम तालाचं संगीत’ - Aadim Talachh Sangeet' (मराठी)
Amazon:
https://www.amazon.in/dp/163886151X/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_T2E6Q1MD...
Notion Press:
https://notionpress.com/read/aadim-talachh-sangeet
(अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

वा. अगदी अभिनव असे आहे हे सगळे. अभिनंदन.
इंग्रजी आणि मराठी अनुवादाबरोबरच मूळ अहिराणी कविता या पुस्तकांमधे समाविष्ट केलेल्या आहेत की नाही हे समजले नाही. नसल्यास आगामी आवृत्तीत अवश्य कराव्यात.
नमुना म्हणून एक-दोन अहिराणी कविता मराठी भाषांतरासह मिपावर टाकल्या तर छान होईल.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 May 2021 - 9:29 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद. आपल्या सुचना नक्कीच आमलात आणण्याचा प्रयत्न करतो. मूळ अहिराणी कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती येतेय. आभार.

कंजूस's picture

2 May 2021 - 12:50 pm | कंजूस

उत्तम काम. यश मिळो.

शुध्द भाषा बोलणार्‍याला कवीता जवळ का करता येत नाही ?
- कोनास ठावं.
शुध्द भाषा बोलणार्‍याला जीवन का लक्षात ठेवता येत नाही ?
- कोनास ठावं.

कारणंमिमासा नसल्याने कसलीच आगापिछा नसलेले काव्य का समजले जाउ नये ?

वस्तुस्थिती ही आहे की शुध्द भाषा राजमान्य पाठ्यपुस्तकात शिकवली जाते म्हणुन ति जिथे बोलली जाते तिथे बहुसंख्य शाळेत गेले आहेत असे तरी किमान म्हणायला वाव असु शकतो.

अशुध्द अथवा इतर कोणत्याही पध्दतिची बोली भाषा ही शिक्षण, प्रांत, काळ यांचे प्रतिबिंबमिश्रण असते परीणामी तुम्ही कोणती भाषा बोलता याने तुमच्या आयुश्य समजण्याच्या अथवा कवीता जवळ करण्याच्या कौशल्यावर शष्प परीणाम होत नसतो. मग शुध्द भाषेबाबत इतका प्रोब्लेम कवीतेत का रंगवला आहे ?

आपल्या प्रतिक्रियेतून बोलीबद्दलचा व्देष दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल की कवितेत प्रमाणभाषेबद्दलचा व्देष आहे. पण तसं नाही तर भाषेच्या शिष्टपणाबद्दल ती कविता आहे. तुम्ही ग्रामीण वा आदिवासी भागात असता तर अशी प्रतिक्रिया आली नसती. पण राग नाही. असो.

गॉडजिला's picture

3 May 2021 - 9:04 pm | गॉडजिला

आपल्या प्रतिक्रियेतून बोलीबद्दलचा व्देष दिसून येतो
माझ्या प्रतिक्रियेतील नेमक्या कोणत्या वाक्यामुळे आपण हा समज करुन घेतला ?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 May 2021 - 8:59 am | डॉ. सुधीर राजार...

शाळेत गेलेले लोक

गॉडजिला's picture

4 May 2021 - 12:03 pm | गॉडजिला

बोली भाषा ही शिक्षण, प्रांत, काळ यांचे प्रतिबिंबमिश्रण असते

आता यात शाळेचा उल्लेख नाही दिसला ?

आता तुम्ही म्हणाल की कवितेत प्रमाणभाषेबद्दलचा व्देष आहे. पण तसं नाही तर भाषेच्या शिष्टपणाबद्दल ती कविता आहे

हे आपण लिहताय ? विरोधाभासी प्रकरण वाटत नाही ? की भाषेच्या शिष्टपणाबद्दल ही कवीता आहे असे मोघम विधान कराताना हा शिष्टपणा त्याज्य म्हणुन रंगवला आहे आपलासा की करावा असे कवीता सुचवते ? आनी का ते ही थोडक्यात स्पश्ट करा मुळात शिश्टपणा भाषेत न्हवे व्यक्तीत असतो हे देखील आपण दुर्लक्षित केलेत ? परत शिष्टपणा एका विशीष्ठ भाषाशैलीसोबत जोडुन माणसा माणसांत विभागणी आपण करत आहात असे मी नम्रपणे सुचवु इच्छितो. आणे माझे हे विधान पटत नसेल तर एक मिपा कट्टा करुयात तिथे तुम्हाला अनेक प्रमाण भाषेत बोलणारे लोकं दाखवतो जे शिष्ठ नाहीत व प्रमाण भाषा न बोलणारेही अनेक लोकं दाखवतो ते ही आजिबात शिष्ठ नाहीत.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 May 2021 - 9:02 am | डॉ. सुधीर राजार...

भाषा या जोडण्यासाठी, तोडण्यासाठी नव्हे.
पहिली गोेष्ट म्हणजे कोणत्याही भाषेचा व्देश करणे हे भाषाशास्त्राला त्याज्य आहे.
म्हणून माझ्या कवितेतून कोणत्याही भाषेला शिष्ट म्हटलेले नाही.
तर माणसालाच शिष्ट म्हटलेले आहे.
कविता असल्यामुळे हे संदिग्ध राहते. माझ्या लेखातून स्पष्टता दिसली असती. असो.

गॉडजिला's picture

4 May 2021 - 12:14 pm | गॉडजिला

भाषा या जोडण्यासाठी, तोडण्यासाठी नव्हे.

भाषा ही गरजपुर्तीसाठे असते(संपर्क्,ज्ञान्,भावना).

पहिली गोेष्ट म्हणजे कोणत्याही भाषेचा व्देश करणे हे भाषाशास्त्राला त्याज्य आहे.

बरं.

म्हणून माझ्या कवितेतून कोणत्याही भाषेला शिष्ट म्हटलेले नाही.

म्हणजे आपली कवीता भाषा शास्त्राला धरुन आहे असे अनुमान आपण सांगत आहात ? बरोबर ना ?

तर माणसालाच शिष्ट म्हटलेले आहे.

विशीष्ट भाषा बोलणार्‍या माणसालाच शिष्ट म्हटलेले आहे.

कविता असल्यामुळे हे संदिग्ध राहते. माझ्या लेखातून स्पष्टता दिसली असती. असो.

संदिग्धतेच्या आडा विचीत्र समजुती दुर न्हवे तर मजबुत केल्या गेल्या याचे वाइट वाटले. जर आपल्यासारखा प्रतिभावान व्यक्तीअसे करुन जात असेल तर सामान्यांची हालत काय होइल.

असो माझा आपल्या काव्यप्रतिभेबद्दल कसलाच आक्षेप नाही, आपला कवीतासंग्रह अनुवादीत झाला ही कौतुक मिश्रीत अभिमानाचीच बाब आहे आणी आपल्या आनंदात मी नक्किच सामावलेला आहे याबद्दल मनी जराही किंतु नसावा _/\_

आता तुम्ही म्हणाल की कवितेत प्रमाणभाषेबद्दलचा व्देष आहे. पण तसं नाही तर भाषेच्या शिष्टपणाबद्दल ती कविता आहे

हे आपण लिहताय ? विरोधाभासी प्रकरण वाटत नाही ? की भाषेच्या शिष्टपणाबद्दल ही कवीता आहे असे मोघम विधान कराताना मुळात शिश्टपणा भाषेत न्हवे व्यक्तीत असतो हे देखील आपण सपशेल दुर्लक्षित केलेत ? परत हा शिष्टपणा एका विशीष्ठ भाषाशैलीसोबत जोडुन माणसा माणसांत विभागणी आपण करत आहात असेही मी नम्रपणे सुचवु इच्छितो. आणे माझे हे विधान पटत नसेल तर एक मिपा कट्टा करुयात तिथे तुम्हाला प्रमाण भाषेत बोलणारे अनेक लोकं दाखवतो जे शिष्ठ नाहीत व प्रमाण भाषा न बोलणारेही अनेक लोकं दाखवतो ते ही आजिबात शिष्ठ नाहीत. मग शिष्ठपणा भाषेसोबत कसा जोडला जाउ शक्तो ?

धर्मराजमुटके's picture

3 May 2021 - 2:15 pm | धर्मराजमुटके

शुध्द की शुद्ध ? असो !
आपला प्रयत्न चांगला आहे मात्र वरील अनुवाद कवीतेपेक्षा स्व:गत प्रकारचा जास्त वाटतोय. पण जे पण आहे ते चांगले आहे मात्र थोडेसे सोपे आहे असे वाटते. वर चित्रगुप्तांनी सांगीतल्याप्रमाणे अहिराणी भाषेतील काव्याचे अनुवाद इकडे नमुन्यादाखल दिले तर जास्त समी़क्षा करता येईल.
धन्यवाद !

गॉडजिला's picture

3 May 2021 - 9:06 pm | गॉडजिला

शुध्द की शुद्ध ? असो !
बरे झाले कोणीतरी शुध्दता तपासली कारण मला सोताला प्रमान भाशेत लिहणं कंद्दीच झेपत नाय...

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 May 2021 - 9:03 am | डॉ. सुधीर राजार...

देऊ या. धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2021 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे