1

सध्या मी काय पाहतोय ? भाग ३

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
26 Mar 2021 - 10:35 pm

अनेक वर्ष मी हिंदूस्थानात चांगले रस्ते असावेत यावर बोललो असेन पण आता देशात चांगले रस्ते, हायवे निर्माण होत आहेत याचा विशेष आनंद आहे. :)
आज मा.नितीन गडकरी यांची याच विषयावर असलेली मुलाखत पाहिली आणि देशात रस्त्यांचे काम ते अतिशय भव्यतेने, वेगाने आणि पैशांची बचत देखील करुन करत आहेत हे समजले. वेळ काढुन ही मुलाखात पहावी अशीच आहे.

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग २

मदनबाण.....

धोरणमाहिती

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

26 Mar 2021 - 10:58 pm | श्रीगुरुजी

बाकी सगळं ठीक आहे, परंतु पुणे-सातारा महामार्ग मागील अनेक वर्षे अत्यंत वाईट अवस्थेत आहे आणि आणि प्रत्येक वर्षी जास्तच वाईट होतोय आणि पथकर प्रत्येक वर्षी वृद्धिंगत होतोय. तो रस्ता कधी सुधारणार ते सांगा.

पुणे-सातारा महामार्ग मागील अनेक वर्षे अत्यंत वाईट अवस्थेत आहे आणि आणि प्रत्येक वर्षी जास्तच वाईट होतोय आणि पथकर प्रत्येक वर्षी वृद्धिंगत होतोय.
सुधारणा नक्कीच झाली पाहिजे, पण काहीच होत नव्हते तिथे बरेच काही होत आहे याचा आनंद नक्कीच वाटायला हवा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alec Benjamin - Let Me Down Slowly [Official Music Video]

सौंदाळा's picture

29 Mar 2021 - 11:19 am | सौंदाळा

सहमत,
रस्त्यावर चक्क इंटरलॉकिंग फरश्या वापरुन पॅच मारले आहेत. जिकडे रस्त्यात खड्डे नाहीत अश्या ठिकाणी सुध्दा गाडी वरखाली होते. रस्त्याची लेव्हल बरोबर नाही.
कितीतरी पुल अजुन (१० वर्षांपासून) चालुच आहेत. अतिशय निक्रुष्ट दर्जाचे काम आहे. त्यामानाने सातारा ते कराड्च्या थोडे पुढेपर्यंत एल अँड टी ने केलेला रस्ता उत्कृष्ट आहे.

धर्मराजमुटके's picture

26 Mar 2021 - 11:02 pm | धर्मराजमुटके

युसुफ दरबार यांचे बँजो वादन ऐकतोय / पाहतोय सध्या. हरहुन्नरी आहे माणूस.
नागीन धून

नागिन धुन वरुन मला माझा आवडता ट्रॅक परत आठवला !

मोहिनी :-
Peaky Blinders या सिरिज ने मला मोहिनी घातली असुन, मी पाहिलेल्या सिरीज पैकी सर्वात आवडलेल्या स्कॅम या वेब सिरिजला देखील मागे टाकुन १ नंबरवर आता Peaky Blinders पोहचली आहे. ४ सिझन पाहुन झाले असुन आता ५वा सिझन पहायला घेणार आहे. यातील प्रत्येक कॅरेक्टर हे आउट ऑफ पिक्चर कधीच वाटत नाही, दमदार कथा, अप्रतिम अभिनय, सुंदर संगीत आणि सुरेख चित्रिकरण या मालिकेत पहायला मिळाले आहे. गॉड फादर या चित्रपटा नंतर मला ही मालिका पाहताना तोच आनंद मिळाला जो कुठल्याही दमदार कलाकृती मधुन तुम्हाला अनुभवास मिळतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alec Benjamin - Let Me Down Slowly [Official Music Video]

शा वि कु's picture

29 Mar 2021 - 7:19 pm | शा वि कु

प्राईमवरच्या द बॉईज मालिकेचे पहिले पर्व पहिले. झकास आहे.

सुपरहिरो असलेले डिस्टोपियन जग आहे. ह्या जगात सुपरहिरो आहेत, ते लोकप्रिय सुद्धा आहेत, आणि ते राजकीय, आर्थिक आणि खरीखुरी शारीरिक/लढाऊ ताकद या सर्वच बाबतीत खूप ताकदवान आहेत.

पण ह्या लोकप्रिय सुपरहिरोज (सुप्स) नी बरेच कोलॅट्रल नुकसान केले असते. बऱ्याच लोकांनी प्राण गमावले असतात. सात प्रसिद्ध सुप्सच्या टिममधले काही सुप्स सत्तेच्या धुंदीत असतात, काही सुप्स आपल्या मुखवट्यामागे क्रूर असतात.

तर ह्या सुप्सकडून काहीना काही त्रास झालेल्या लोकांची टीम (द बॉईज) ह्यांच्याविरुद्ध लढायचा पवित्रा घेते.

ह्यात जस्टीस लीगची पॅरोडी असल्यासारखी आहे. म्हणजे होमलँडर हा सूप म्हणजे सुपरमॅन, क्वीन मेव्ह- वंडर वूमन, डीप- ऍक्वामॅन, ब्लॅक नॉइर- बॅटमॅन, ए-ट्रेन- फ्लॅश इत्यादी.

विनोद आणि जोरदार हिंसा असे मिश्रण आहे.

ट्रेलर मध्ये बराच रक्तपात आहे. सावधान !

द बॉईज - ऍमेझॉन प्राईम

मदनबाण's picture

31 Mar 2021 - 7:20 pm | मदनबाण

हिच्या पेक्षा जान्हवीच गाणं भारी आहे..Her expression woww!

हिच्या पेक्षा जान्हवीच गाणं भारी आहे..Her expression woww!
मी अगदी उलट म्हणतो... जान्हवी म्हणजे फक्त अब्बा डब्बा जब्बा आहे ! :))) श्रीदेवीची पोट्टी नसती तर कुणी इचारलबी नसतं ! expression ? घंटा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- KAKU | काकू | Rap Song by NEHA KULKARNI aka NASTI UTHATHEV | नस्ती उठाठेव | Savage reply to Kaku

Bhakti's picture

1 Apr 2021 - 9:29 am | Bhakti

हा हा
मला जान्हवी नाहीच आवडत , कदाचित गाण्याचं बीट्स भारी आहे म्हणून ती आवडली असेल.
रच्याकन ..पनघट गाण्याचे बीट्स पण धमाल आहेत ;)
https://youtu.be/5GRbUnw64W0

कदाचित गाण्याचं बीट्स भारी आहे म्हणून ती आवडली असेल.
मग ठीक हाय... ;) बाकी वरिजिनल ट्रॅक माझा फेवरिट हाय.
हल्ली जुन्या गाण्याचा नविन चित्रपटात केला जाणारा वापर वापर होत चालला आहे.
पनघट गाण्याचे बीट्स पण धमाल आहेत
ओक्के.
कव्हर व्हर्जन्स देखील कधी कधी फार आनंद देतात... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक पोरगी | Ek Porgi | Full Video Song | Aga Bai Arechyaa 2

Bhakti's picture

1 Apr 2021 - 12:36 pm | Bhakti

श्रीराम ...किती दिवसांनी पाहतेय , ऐकतेय :):):) ते पण सागर जैसी गाणं गाताना ...वाह!!
किती आभार मानू....मार डाला आज!

राघवेंद्र's picture

1 Apr 2021 - 9:19 am | राघवेंद्र

एकदम भन्नाट आहे हे :)

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2021 - 1:13 pm | चौथा कोनाडा

भारी +१

गणेशा's picture

1 Apr 2021 - 12:33 am | गणेशा

Drishyam २
क्लास..

दुसर्‍या भागात कानडाऊ योगेशु / कुमार१ आणि आता तुम्ही या भागात दृष्यम-२ बद्धल प्रतिसाद दिल्यामुळे हा चित्रपट डाउनलोड मारुन ठेवला आहे. पाहतो आणि कळवतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक पोरगी | Ek Porgi | Full Video Song | Aga Bai Arechyaa 2

मदनबाण's picture

2 Apr 2021 - 11:28 am | मदनबाण

दृष्यम-२ पाहिला, चित्रपट सुरवातीला काही काळ संथ चालतो नंतर वेग पकडतो. चित्रपटाची सगळी मजा शेवटच्या फक्त ४५ मिनीटात आहे. बाकी मला एकदमच भारी नाही वाटला. काय होइल याचा साधारण अंदाज आला होता, बॅग बदलीचा भाग जरा राम भरोसेच वाटला, परंतु हे जॉर्जकुट्टी ला देखील तसेच अपेक्षित असावे / असते कारण भाग्य या गोष्टीवर तो काही गोष्टी सोडतो.या चित्रपटा पेक्षा दृष्यम-१ हिंदीचा परिणाम मला अधिक भावला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Scatman (ski-ba-bop-ba-dop-bop) Official Video HD -Scatman John

प्रत्येकाचे वेगळे मत असते.

मला चित्रण.. संवादफेक.. Acting यात हा चित्रपट उजवा वाटला.

उलट मी भाग -१ यांचा लवकरच पाहीन..

प्रत्येकाचे वेगळे मत असते.
अर्थातच... मी फक्त मला जे वाटले तेच लिहले याचा अर्थ इतरांच्या प्रतिक्रियांना / रसग्रहण / अवलोकन / अनुभवास मी कमी लेखतो असा होत नाही.
पहिला भाग हिंदीत पाहिला आणि दुसरा मल्याळम मध्ये त्यामुळे देखील तुलनात्मक फरक वाटतो. तसेच पहिल्या भागात तुम्हाला चित्रपटात काय होणार आहे याची काहीच कल्पना नसते परंतु दुसरा भाग पाहताना तुम्हाला पहिल्या भागात काय होणार आहे याचा अंदाज येतो आणि चित्रपटातील काही सीन्समुळे पुढे काय घडणार आहे याची कल्पना तुम्हाला सहज येते जशी ती जॉर्जकुट्टीला देखील आलेली असते. :)

मला द टर्मिनेटर चित्रपट हा प्रतिसाद लिहिताना आठवला ! या चित्रपटाचा पहिला भाग आणि दुसरा भाग यांचा संबंध जरी असला तरी दुसरा भाग हा पहिल्या भागा पेक्षा अधिक सरस होता त्याच प्रमाणे याच्या पुढचे भाग मात्र दुसर्‍या भागा इतके परिणाम देउ शकले नाहीत.
Terminator 2 मी अनेक वेळा पाहिला आहे आणि आजही पहायचा झाला तरी मला त्याचा विशेष कंटाळा येणार नाही. यातील दोन सीन इथे देतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

दुसरा भाग पाहताना तुम्हाला पहिल्या भागात काय होणार आहे याचा अंदाज येतो
हे :- दुसरा भाग पाहताना तुम्हाला काय होणार आहे याचा अंदाज येतो. असे हवे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

टर्मिनेटर २-जजमेन्ट डे अफाट भारी सिनेमा आहे. त्याचे एक्स्टेन्डेड व्हर्जन पण उपलब्ध आहे, टोरेण्टवर मिळेल ते, जाम भारी आहे.

मदनबाण's picture

3 Apr 2021 - 6:28 pm | मदनबाण

ओह्ह, हे माहित नव्हते.
जालावर चेक केल्यावर खालील दोन पर्यांयांच्या प्रिंट्स दिसल्या :-
REMASTERED.EXTENDED
Director's Cut
यातला पहिला पर्याय डाउलोड मारला आहे. हे दोन्ही सारखेच आहेत की वेगळे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

प्रचेतस's picture

3 Apr 2021 - 6:53 pm | प्रचेतस

दोन्ही एकच आहेत.

ओक्के, चित्रपट परत पाहिला. यात ते सिन्स आहेत जे कट केले गेले आहेत. उलट असाच रिलीज केला पाहिजे होता असे आता वाटते. सुचवल्या बद्धल धन्यवाद.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

मदनबाण's picture

1 Apr 2021 - 8:26 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक पोरगी | Ek Porgi | Full Video Song | Aga Bai Arechyaa 2

मदनबाण's picture

1 Apr 2021 - 8:28 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक पोरगी | Ek Porgi | Full Video Song | Aga Bai Arechyaa 2

Bhakti's picture

1 Apr 2021 - 9:36 am | Bhakti

भारी प्रयोग!!

Bhakti's picture

1 Apr 2021 - 5:32 pm | Bhakti

Interstellar(२०१४)
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा,Sci-fi असूनही डोळे ओला करणारा.शेवट पाहतांना आठवलं की मी हा थोडा खूप पूर्वीही पाहिला होता.

मदनबाण's picture

1 Apr 2021 - 8:56 pm | मदनबाण

या चित्रपटात चक्क इंडियन आर्मीचा सर्व्हिलन्स ड्रोन तो सुद्धा अमेरिकेत ऑपरेट करताना दाखवला आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक पोरगी | Ek Porgi | Full Video Song | Aga Bai Arechyaa 2

मदनबाण's picture

1 Apr 2021 - 8:56 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक पोरगी | Ek Porgi | Full Video Song | Aga Bai Arechyaa 2

गणेशा's picture

1 Apr 2021 - 10:52 pm | गणेशा

https://m.youtube.com/watch?v=3VtmnCAVM3g&feature=youtu.be

आजकाल ह्या गायिकेची गाणी मला छान वाटतात ऐकायला..

हे गाणे तर इअरफोन लावून काय भारी वाजतेय वा

( vedio template कसे द्यायचे विसरलो मी.. थोडक्यात help करता का पुन्हा )

मदनबाण's picture

2 Apr 2021 - 11:09 am | मदनबाण

( vedio template कसे द्यायचे विसरलो मी.. थोडक्यात help करता का पुन्हा )
व्हिडियोच्या खाली SHARE लिहले असते तिथे क्लिक करा, पहिलाच पर्याय Embed दिसेल त्यावर क्लिक केल्यावर Embed Video चा बॉक्स उघडेल त्यात जो कोड दिसेल तो इथे कॉपी पेस्ट करा. [ width="560" height="315" असे बाय डिफॉल्ट असते ते आपल्या गरजे नुसार बदला ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Scatman (ski-ba-bop-ba-dop-bop) Official Video HD -Scatman John

गणेशा's picture

2 Apr 2021 - 11:59 pm | गणेशा

https://m.youtube.com/watch?v=eiGdsH1g20k&feature=youtu.be

Vidya vox..

(Embed asa paryay navhata )

Bhakti's picture

3 Apr 2021 - 1:01 pm | Bhakti

Embed असा पर्याय नसेल तर,शेअर पर्याय वापरून ते गाण क्रोम/डकडक इतर ब्राउझरवर जायच.
यू ट्यूब डेस्कटॉप मोड मोबाईल वर दिसतो ,तिथेच शेअरमध्ये Embed पर्याय दिसतो.थोडक्यात डेस्कटॉप मोडवर यू ट्यूब असेल तर Embed पर्याय दिसतो.
:)माझं आजच संशोधन :)

Bhakti's picture

3 Apr 2021 - 5:32 am | Bhakti

ती वेगवेगळ्या भाषांमध्ये सुंदर गाते.हे आशाजींचे मराठी रूपेरी वखळूत

ती वेगवेगळ्या भाषांमध्ये सुंदर गाते
ओह्ह... :) वरील व्हिडियो पाहुन मला आला वरदी चा खालील व्हिडियो आठवला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

Bhakti's picture

3 Apr 2021 - 1:03 pm | Bhakti

अवलिया..
मस्त

Bhakti's picture

3 Apr 2021 - 12:53 pm | Bhakti

कधी कधी 8D हे गाणे मन शांत करतात,8D मधील आवडत गाणं

गणेशा's picture

3 Apr 2021 - 10:10 pm | गणेशा

Watching दिल चाहता है..२nd time
२० वर्षानंतर.. कॉलेज नंतर पहिल्यांदाच...

शा वि कु's picture

4 Apr 2021 - 9:07 am | शा वि कु

मी embedded code आहे तसा पेस्ट केला तर पूर्वप्रकाशीत आणि प्रकाशित दोन्ही होत नाही आहे.
( फोनवर.)
काय बदल करावा बरे ?

मदनबाण's picture

4 Apr 2021 - 10:46 am | मदनबाण

@ शा वि कु
-
--
---
काय बदल करावा बरे ?
Comment बॉक्स खाली एक अजुन छोटासा बॉ़क्स असतो, त्यात Full HTML हा पर्याय निवडावा.
===============================================================
Kong: Skull Island हा काही आठवड्यांपूर्वी पाहिला होता,आता Godzilla vs. Kong पहायचा आहे, काही प्रिंट्स डाउनलोड मारल्या पण त्या डमी निघाल्या ! कोणाला अधिक माहित असल्यास सांगावे.
ट्रेलर :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai With Lyrics | Abhijeet, Sadhana Sargam | Masoom

शा वि कु's picture

4 Apr 2021 - 11:56 am | शा वि कु

Full HTML आहेच. कधी बदलले नाहीये.
ERR_BLOCKED_BY_XSS_AUDITOR अशी एरर येतीये.

गॉडझिला व. काँग yts वर आला आहे. 720p आणि 1080p दोन्ही उपलब्ध आहे.

शा वि कु's picture

4 Apr 2021 - 12:40 pm | शा वि कु

क्रोम अपडेट केल्यावर.

प्रचेतस's picture

4 Apr 2021 - 12:43 pm | प्रचेतस

कालच डाउनलोड केला, आज बघेन आता.

शा वि कु's picture

4 Apr 2021 - 12:53 pm | शा वि कु

भव्य प्राण्यांची भव्य हाणामारी पाहायला मिळणे हि एकमेव अपेक्षा होती , ती पूर्ण झाली.