Skip to main content

Smart Watch

लेखक NiluMP यांनी मंगळवार, 16/03/2021 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नविन Smart Watch घावयाचा आहे बजेट ३००० ते ५०००. Requirements Activity Accuracy तगडी लाईफ Good Touch interface Good Looks

वाचने 33171
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

जीपीएस आणि सेन्सरसह?

नविन Smart Watch घावयाचा आहे बजेट ३००० ते ५०००.
मग दुकानात जा. मिपावर फालतू धागे काढून त्रास देऊ नकोस

In reply to by कपिलमुनी

माझ्या मुळव्याधीबद्दल वाटणार्‍या आपुलकीने ड्वाले पाणावले. तुझं वापरून झालं असेल तर दे थोडं (प्रत्यक्ष आलास तरी चालेल हो )

रुपयांची तयारी ठेवल्याशिवाय चांगली accuracy मिळत नाही असा अनुभव आहे. युट्युबर चे video बघा एकदा.

In reply to by आगाऊ म्हादया......

युट्युब चे व्हिडिओ प्रायोजित असल्याने विश्वास अर्थ वाटत नाही उदाहरणार्थ वॉच फेस मोफत नाहीत हे कोणीच युट्युब वर सांगत नाही

हे घड्याळ असल्याचा उपयोग काय होतो?? कोणी जाणकार सांगु शकेल का? घड्याळ फक्त वेळ पाहण्यासाठी वापरतात पण आजकाल स्मार्ट वॉच येत आहेत त्याचा खरेच काही उपयोग आहे का?? काय काय फॅसिलिटी असतात त्यामध्ये??

In reply to by बापूसाहेब

हार्ट रेट मोजता येते आपणास आपला स्लीपिंग पॅटर्न कळतो ब्लड ऑक्सिजन लेबल मोजता येते व्यायामाच्या काही प्रकारांचा आलेख पाहता येतो कोणाचा फोन आला आहे हे घड्याळ कळतं म्युझिक प्ले लिस्ट मध्ये पुढील किंवा मागील गाना जाता येते

In reply to by NiluMP

ही खरी स्मार्ट वॉच यादीत येतात. बाकी वॉचमध्ये खूप गोष्टी गाळल्याने स्वस्त होतात. फक्त रंगीत टच स्क्रीनमुळे स्मार्ट वॉच होत नाही. आणि 3 ते 5 हजारात येणारऱ्या वॉचला काय म्हणणार? ( नेटवाचनातील ज्ञानकण)

मी Apple watch चा उपयोग करतो ज्याचे फायदे किंवा उपयोग खालील प्रमाणे आहेत. १. वेळ पाहता येते. (वेगवेगळ्या डायल्स बदलता येतात, डिजिटल किंवा analogue पद्धत वापरता येते. २. अलार्म, टायमर, स्टॉप वॉच सेट करता येतात. ३. रिमाइंडर्स सेट करता येतात. ४. वेगवेगळे व्यायामाचे/योगाचे प्रकार टीव्ही बरोबर जोडून पाहता, करता येतात. ५. मेल्स बघू शकता ६. फोन घेऊ शकता ७.व्हॉटसअप पाहू शकता. ८. हार्ट रेट/पल्स पाहू शकता, मॉनिटर करू शकता. ९. चाललेले/धावलेले अंतर रेकॉर्ड करू शकता. १०. व्यायामाचे गोल्स सेट करू शकता. ११. गाणी ऐकू शकता. १२. फोन बरोबर सिंक्रोनाईझ केले तर फोन वरचे फोटो बघू शकता. अजून अनेक उपयोग आहेत, पण प्रामुख्याने मी हे वापरतो.

In reply to by सौन्दर्य

आणखी एक ) प्रतिष्ठा वाढते. ) याचा जीपीएस सेन्सर भारी असतो म्हणे. अक्युरसी - रेझलुशन ए मिटरचे असते. पोहणारे ( ओलम्पिकसाठी) यानेच lap timing घेतात. . . . पण किंमतीचा जामर लावलाय त्यांनी ३ -५ हजार रु!!!

बजाज इलेक्क्ट्रीकल ने म्हणे ९९.९ विषाणू व जीवाणू नष्ट करणारा सीलिंग फॅन काढला आहे ! काही दिवसांनी असे होईल .. मुलगी म्हणेल " तुमचे अन्युअल पॅकेज चांगले लठ्ठ आहे सबबी मला पसंत आहात पण विषाणू जीवाणू बद्दल काय क्षमता आहेत तुमच्या ? त्यावर मुलगा म्हणेल मी रोज रामदेव बाबांचा काढा घेतो , आमच्या घरात टूथपेस्ट , शॅव्हेग क्रीम ,साबण कपड्याचा व अंगाचा पासून किराणा माल ई ९९.९ टक्के जीवाणू विषाणू नष्ट करणारे आहेत ... काळजी नसावी ! "

यामुळे किती जिव वाचले किती लोकांचे आरोग्य सुधारले याचा सविस्तर ताळेबंद बघितल्या शिवाय ऊपयुक्तता सिध्द होइल काय ?

In reply to by गॉडजिला

ह्म्म ! मोटिव्हशनसाठी याचा जास्त वापर करु शकतो.शेवटी एखाद्या वस्तुचा कसा योग्य वापर करायचा हे व्यक्तिनुसार बदलते.

Noise Colorfit pulse ३००० ला घेतलं.इतक काय खास नाही,पण वापरते काही दिवस.फोन वगैरे घेण्याची सुविधा पाहिजे होती.मला वाकिंगसाठी पाहिजे होतं मुख्य!हार्ट मोनिटेरिंग चढ उतार पाहून जरा तेल,तूपावर कंट्रोल करावं लागणार.

माझे वडील 82 वयात पूर्णपणे ठणठणीत तब्येत, दात शाबूत, चष्मा कधी लागलाच नाही, मैलोनमैल पायी चालणे.. असे अचानक काहीही त्रास न होता शातपणे पंचतत्वात विलीन झाले. त्यांना कोणत्याही घड्याळाची किंवा अन्य कोणत्याही साधनांची कधी गरज भासली नाही त्यांचे एकूण सर्व सामान एका लहान पेटीत मावायचे. माझा आदर्श ते आहेत. हल्ली एवढी साधने घेऊनही खरोखर त्यांचा उपयोग कितपत होतो, याची शंकाच आहे. आपले फक्त शरीरच कोणत्याही साधनाखेरीज आरोग्य संदर्भात आवश्यक ते सर्वकाही करायला समर्थ असते, आधी फक्त प्रयत्न करुन बघायला हवे. अर्थात माझे विचार आजच्या काळात अनेकांना हास्यास्पद वाटतील हे मला ठाऊक आहे. असो.