प्रारब्ध आणी कर्म

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
11 Mar 2021 - 11:27 pm

काही विचार स्वताःचे आणी काही दुसर्‍यांचे, आयुष्यातील यशापयशाचा आढावा घेताना डोक्यात उडालेला गोंधळ.
ज्ञात अज्ञात लेखकांचे आभार.

" कात्रजच्या घाटात वरती डोंगरावर काही माकडे खेळत होती, दोन तरुण मुलं मोटर सायकल वर सातारकडे जात होती मोटरसायकल बोगद्यात प्रवेश करत असताना अचानक मोठा दगड वरून गडगडत आला आणी पाठीमागे बसलेल्या तरूणाच्या डोक्यात पडला आणि मृत्यूला कारणीभूत झाला". रेडिओवर ही बातमी कदाचित तुम्ही सुद्धा ऐकली आसेल.

मनात विचार आला आसे का? विचार म्हणजे काय असते? मनातल्या मनात नं कळत चाललेली प्रश्नोत्तरे…… काय चुकलं त्याचं? माकडांचं आणी त्या तरूणाच मागच्या जन्मीचं काही वैर होतं का? हेल्मेट घातलं होतं का? कदाचित वाचला असता जर, गाडीचा थोडा वेग कमी असता तर?, ते कुठेतरी चहा प्यायला थाबंले आसते तर? माकडं तीथे उड्या मारत नसती तर? एक ना अनेक . बातम्या देणारी सुदंरी म्हणाली, प्रारब्ध, नियतीचा खेळ सारा , आणी पुढची बातमी देऊ लागली.

अशी एखादी अप्रत्याशीत घटना घडली की आपण त्याचं कारण शोधायचा प्रयत्न करतो. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतातच असे नाही मग उत्तर मिळाले नाही की आहेच मग प्रारब्ध, नशीब आणि नियती…

गोविंदाग्रजांची( रामगणेश गडकरी),
‘एखाद्याचे नशीब’ नावाची अर्थपूर्ण कविता.

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

त्यात ते म्हणतात,’ झाडांवर मेघांची वृष्टि होते. त्यांच्या हिरव्यागार पानांवर जलबिन्दू नाचतात. फुलांनी आणि फळांनी ती झाडे बहरून जातात. पण एखाद्या झाडावर मात्र आकाशातून वीज पडते आणि ते फुलते झाड पूर्णपणे काळवंडून जाते. जळून जाते.’ हे असे का घडते ? या प्रश्नाला त्यांचे उत्तर ‘ एखाद्याचे नशीब’ हेच आहे.

गीतरामायणा तील भरत भेटीचे वर्णन करताना ग दी मा लिहीतात

" माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा…"

प्रभू रामचंद्रांचा वनवास हा प्रारब्धाचा भाग म्हणायचं की कैकयीचा दुराग्रह, पुत्र प्रेम का राजा दशरथाची हतबलता.

कैकयीने भारताला राज्य मिळावे म्हणून जिवाचा आटापिटा केला, एवढचं काय आपलं सौभाग्य सुद्धा गमावलं. भरताला राज्य मिळालं का? मग हे विधिलिखित का आणीखिन काही म्हणायचे ?

जन्माने पहिला पांडव असुन, सूतपुत्र म्हणुन हिणविला गेला…. याला त्याची नियती जबाबादर की आईची चुक?

पण जेंव्हा सुतपुत्र अंगराज होतो ते त्याचं कर्तृत्व की नशीब … ?

स्व कर्तृवावर बनलेला,श्रेष्ठ धनुर्धर एकलव्य आपला अंगठा गुरूदक्षिणा देतो हि नियतीच, का गुरू द्रोणांचा दुजाभाव अथवा एकलव्याने एक प्रकारचा जाणून बुजून केलेला आत्मघात ?

आजकाल बर्‍याच गोष्टी विशेषतः अपघात, आत्महत्या, कुठलही अपयश, किंवा अपेक्षाभंग ह्या सर्वांना माणसं प्रारब्ध, नियती, नशीब यांच्या बरोबर जोडताना दिसतात . या मधे माणसं आपली चुक, अकर्म्यण्यता , दृढनिश्चय आणि आत्मविश्वास यांचा अभाव शोधतांना कधीच दिसत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा भविष्यातील चांगल्या वाईट घडणार्‍या गोष्टींचा संबध जोडताना त्यास प्रारब्ध म्हणावे की त्या व्यक्तीच्या परिश्रमाची फलश्रुती म्हणावे!

सुख अथवा यश “कर्तृत्वा” मुळे आणि दुःख किंवा अपयश “नियती” मुळे असं म्हणुन कसे चालेल ?

माझा प्रश्न असा आहे की नशीब ,प्रारब्ध, नियती म्हणजे नेमके काय? प्रारब्ध म्हणजे सेव्हिंग्ज बँकेतील साठवण आहे का? जर आसेल तर, आपल्याला पाहिजे तेव्हा का नाही वापरता येत. सगळ काही पुर्वसंचीता प्रमाणे आसेल तर कर्म आवश्यक आहे का? जर आपण काही मिळवायचे असेल तर नशीबाचा,प्रारब्धाचा भाग कीती?

प्रारब्ध, विधिलिखित, नियती हे सगळे समान अर्थी शब्द… "पाचविला", म्हणे सटवी बाळाचे भाग्य, नशीब कपाळावर लिहीते. " राधां वाढा उष्टी काढा मेलं आमच्या पाचवीलाच पुजलय", बरेचवेळा बायकांना म्हणातानां ऐकलय. पाचविची पुजा हा श्रद्धेचा भाग.

पण ही श्रद्धा थोडा वेळ बाजुला ठेऊन डोळस पणाने विचार केला तर त्या गूढ शब्दांचे कोडे थोडे सोपे होईल का?

आपल्या आयुष्याला समांतर चालणारी गोष्ट म्हणजे जर का नियती असेल तर मग जसा आपल्या जवळचा माणुस एखाद्या महत्वाच्या क्षणी कसे वागु शकेल हे सांगु शकत नाही तसेच नियती बद्दल पण असेल ना?
एखादी गोष्ट चुकविण्या करता आपण जिवा चा आटापिटा करतो पण नेमकी तीच गोष्ट घडते… काय असेल कारण? अशा वेळेस नियती ला सॉफ्ट टार्गेट ठरवलं जातं का?

“A person often meets his destiny on the road he took to avoid it”

असे असेल तर मर्फीज law नियती ला पण लागु होतो का? “If anything can go wrong, it will go wrong”

मग हाच law “If anything can go right it will go right” असा पण असायला हवा ना?
व. पु. म्हणतात तसे…" माणसाला जन्माला घालण्या मागे त्याला छळावे एव्हढीच फक्त नियती ची इच्छा नसते, ती प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवते…. बाकी आपण मिळवायचे असते ! " , आसे आसेल तर
नियती, प्रारब्ध हे शब्द निरर्थक नाही का? या शब्दानां माणसाच्या अपयशाला जबाबदार धरणे विसंगती नाही का? यशाआपयशात माणसांची क्रियाशीलता किंबहुना निष्क्रियतेचा सबंध जोडायचा सोडुन नियती, प्रारब्धाचा कितपत सहभाग ? प्रश्नच प्रश्न.

इंग्लिश मध्ये म्हण आहे ना “Victory has a hundred fathers and defeat is an orphan”

जर नशीब, नियती,कींवा प्रारब्ध आहे आसे मानले तर यश मिळाले म्हणून चांगले नशीब व अपयशाला वाईट प्रारब्ध आसे असायला हवे. नीट विचार केला तर मनुष्य प्राणी बुद्धीमान आहे. त्याला चांगल्या गोष्टींचे श्रेय स्वतःकडे हवे असते तर अपयशाचे खापर तो कुणा दुसर्‍या वर फोडायला कारण शोधत असतो… म्हणुनच कदाचित फक्त अशुभ नियती दिसत असेल….

आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तरे असतात, नीट शांत पणे बघितलं की ही प्रोसेस सहज लक्षात येऊ शकते…

अतिप्राचीन काली गुहेत नागडाउघडा राहणारा हा जंगली माणूस आज आपल्या वातानुकूलित बंगल्यात तर्‍हेतर्‍हेची वस्त्रप्रावरणे परिधान करून सुखेनैव राहिला आहे. नाना प्रकारची शास्त्रे त्याने जोपासली. ज्ञान आणि संस्कृती यांची प्रचंड वाढ केली. या सार्‍या गोष्टीला तुम्ही केवळ प्रारब्ध , केवळ नियती असली ठरीव ठशाची उत्तरे देणार आहात काय?

जर नियती, प्रारब्ध आहे तर आणी दिडशे वर्षानंतर स्वातंत्र्य मिळणार असेल तर वाट बघायचे सोडुन उगाच संघर्ष केला असे आहे का, मुळीच नाही. संघर्ष, बलिदान, असहयोग आंदोलने करून ब्रिटिश सरकारला सळो की पळो केल्यानंतरच स्वातंत्र्य मिळाले नाहितर आजही आपण गुलामच आसतो.

विचार करा, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली अपयश आले तर तो Dead end न मानता जर T junction समजले आणी उजव्या डाव्या रस्त्याचा पुढच्या वाटचालीसाठी उपयोग केला तर प्रगतीच्या वाटा, ध्येय दृष्टिक्षेपात येईल का नाही ?

आपल्या दृढनिश्चय बुद्धी चातुर्य आणि आत्मविश्वास याच्या जोरावर विधिलिखित बदलणारी,सावित्री, कठोर तपस्ये नंतर मोक्षदायीनी गंगेला भूतलावर आणणारा राजा भगीरथ हे खरं का अंगारे,धुपारे,गंडेदोरे, बाबा, नवस आणी प्रारब्ध, नशिब याच्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा ,आणी आयुष्याची फरफट करण्यात धन्यता मानणारा माणुस खरा.

माझं नशीब खडतर, आपल्या नशीबाचा भाग काय करणार ,कपाळकरंटा असे नशिबाच्या नावाने खडे फोडत बसण्याची पेक्षा आत्मनिरीक्षण केल्यास थांबलेली गाडी पुढे सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक संस्कृत सुभाषित शाळेत शिकलोय.

" अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतः सुखम् ॥

यात सगळ्या सुखःदुखा च मुळ माणसाच्या निष्क्रियतेचा , आळशीपणात आहे.
तर हे पण शिकलोय की " आसेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी "

कबीरदास जी कहते है, उसे गौरसे सुनो।

" ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग ।
तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग । "

तेरा मालिक तु ही है तो करम भी तेरे और फलभी तेरा। आगे कबीरदास जिंदगी जिनेका मंत्र दे रहे है उसे ध्यान मे रख।

" जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ,
मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ।"

सो पहले कुछभी नही तय हुआ। तुही तेरे किस्मतका धनी है।

पण एक लक्षात घ्या " वीर भोग्या वसुंधरा " आता सर्वस्वी निर्णय तुमचा आहे.
नशीब, नियती, पुर्वसंचीत किंवा प्रारब्ध आसो कींवा नसो, सगळ्यात जास्त आळशी प्राणी अजगराला सुद्धा भोजन मिळवण्यासाठी वळवळ करावी लागते, आपणतर सर्व प्राण्यांच्या मधे बुद्धीमान मनुष्य प्राणी आहोत.

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

12 Mar 2021 - 8:16 am | उपयोजक

इतकं फाट्यावर का मारलंय?

बाकी लेखातल्या काही मतांशी सहमत आहे.

साधारणपणे नशीब याच गोष्टीवरचा अस्मादिकांचा हा लेखही वाचून पहावा. झायरात हो. :)

http://www.misalpav.com/node/45055

कर्नलतपस्वी's picture

12 Mar 2021 - 9:18 am | कर्नलतपस्वी

प्रतीसादा बद्दल धन्यवाद. प्रतिक्रिया कळाली नाही. आपला संदर्भ लेख वाचला. छान लिहीलय. आपल्या लेखाचा विषय आणी वरील लेखाचा विषय हे वेगळे आहेत असे मला वाटते.

आता काही गोष्टी माझ्या विचारांबद्ल. जवळपास पंचेचाळीस वर्षे हिन्दी भाषी प्रदेशात राहिल्यामुळे भाषासमृद्धी व सादरीकरणात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही यशापयशात प्रारब्धाचा, नशीबाचा भाग आहे किवा नाही याचा आढावा घेण्याचा प्रयत्न. आसो शिक्षणा करता वयाची अट नसते. मिपा चा सदस्य झाल्यापासून पुष्कळ नविन गोष्टी शिकायला मिळत आहेत. धन्यवाद.
मी कीती कष्ट केले, मी कसा वेगळा हे दाखवण्याचा प्रयत्न कदापी नसुन कर्म आणि नशीब यातले समीकरण कसे ते शोधण्याचा प्रयत्न.

उपयोजक's picture

12 Mar 2021 - 9:37 am | उपयोजक

१. शुद्धलेखन इतकं का दुर्लक्षित केलंय असं म्हणायचंय.

२. जवळपास पंचेचाळीस वर्षे हिन्दी भाषी प्रदेशात राहिल्यामुळे भाषासमृद्धी व सादरीकरणात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अच्छा! मग ठीक आहे. :)

३. आपल्या लेखाचा विषय आणी वरील लेखाचा विषय हे वेगळे आहेत असे मला वाटते.

विषय तोच आहे. नशीब असतं की नसतं वगैरे. फक्त आयाम वेगळा आहे. माझ्या लेखात काही गोष्टी या निसर्गात:च मिळतात आणि त्यामुळे नशीब कसं बदलतं हा विषय आहे. असो. लिहिते रहा! पु.ले.शु :)

बापूसाहेब's picture

12 Mar 2021 - 10:05 am | बापूसाहेब

लेखन आवडले.
अश्या प्रकारचे लेख तेच लिहु शकतात जे जिवन खऱ्या अर्थाने जगलेत.. शेकडो हजारो प्रकारचे लोकं पाहिलेत. नित्यकर्मासोब आणि कर्तव्यासोबत अध्यात्माला देखील तितकेच महत्व दिलेय.
नाहीतर आज कितीतरी लोकं फक्त आलेला दिवस पुढे ढकलण्यात आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यात धन्यता मानतात.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2021 - 10:24 am | मुक्त विहारि

जनरल पॅटनचा, हा फेमस प्रश्र्न आठवला...

Bhakti's picture

12 Mar 2021 - 10:41 am | Bhakti

खुपचं मनातून लिहलय..
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि
अजूनही हे वाक्य बर्याच लोकांना मिथ्या वाटत... मज्जा आहे..
रच्याकने.. चमत्कार है तो नमस्कार है! :)

इंटेलेक्चुअल लेवल चांगली असणार्‍या लोकांनाच ते मिथ्या वाटतं.

Bhakti's picture

12 Mar 2021 - 12:00 pm | Bhakti

कदाचित
Eq,sq,aq,iq योग्य प्रमाणात असेल तर आजूबाजूला काय घडतंय यांचा परिणाम होत नाही...मला वाटत वर्षांपूर्वी हा मेसेज wa वाचला होता , तेव्हा मैत्रिणीना म्हणाले होते की माझा sq कमी आहे... कोणताही 'q'अधिक कमी झाल्यास ,.. विश्रांती घ्यावी.:)
(Random ;))

काय समजलो नाही.. मिथ्या वाटते म्हणजे नेमके वाटते?
ते असो, तुम्हाला या वाक्याबद्दल काय वाटते? सत्य की मिथ्या?

Bhakti's picture

12 Mar 2021 - 10:01 pm | Bhakti

विशेष काही नाही.
हे वाक्य ऐकतच मोठे झालो...पण तरीही कळतंय पण वळत नाही अशी अवस्था अनेकदा होत राहते.

उपयोजक's picture

12 Mar 2021 - 10:42 am | उपयोजक

नशीबवान

उपयोजक's picture

12 Mar 2021 - 10:44 am | उपयोजक

अभिषेक बच्चन हा सर्वाधिक नशीबवान असावा का? :)

पैसे मिळवून द्यायला महानायक वडील आणि पत्नी जगतसुंदरी!

शाम भागवत's picture

12 Mar 2021 - 11:34 am | शाम भागवत

घटना प्रारब्धानुसार घडत असल्या तरी त्या घटनांना प्रतिसाद कसा द्यायचा हे थोडेफार आपल्या हातात असू शकते/असते. त्यानुसार प्रारब्ध काही प्रमाणात बदलता येऊ शकते/येते.

त्यामुळे

विचार करा, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली अपयश आले तर तो Dead end न मानता जर T junction समजले आणी उजव्या डाव्या रस्त्याचा पुढच्या वाटचालीसाठी उपयोग केला तर प्रगतीच्या वाटा, ध्येय दृष्टिक्षेपात येईल का नाही ?

ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे असे वाटते. मात्र ही वाटचाल T स्वरूपाचीच असेल असे म्हणता येत नाही.

ही वाट T स्वरूपाव्यतिरिक्त, अडथळ्याच्या वरून असेल, खालून (भुयारातून) असेल, किंवा त्या अडथळ्यातून प्रवास करतानाच सापडत असेल. थोडक्यात वाट शोधताना त्याला कुठलीही मर्यादा घालू नये.

उपयोजक's picture

12 Mar 2021 - 3:41 pm | उपयोजक

घटना प्रारब्धानुसार घडत असल्या तरी त्या घटनांना प्रतिसाद कसा द्यायचा हे थोडेफार आपल्या हातात असू शकते/असते. त्यानुसार प्रारब्ध काही प्रमाणात बदलता येऊ शकते/येते.

मार्मिक! हेच बर्‍याच अभाग्यांना समजत नाही. कधी स्वत:बद्दल अतिआत्मविश्वास , कधी भिती, कधी न्यूनगंड, कधी समाजाची भिती काहीही कारण असू शकतं चुकीचा प्रतिसाद देण्यामागे. म्हणजेच पटकन त्यातल्यात्यात फायदेशीर निर्णय कसा घ्यावा हे शिकले पाहिजे.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2021 - 11:36 am | प्रकाश घाटपांडे

डॉ.लागूंचा मुलगा तन्वीर हा असाच लोकल मधून चालला होता. त्यावेळी बाहेरुन कोणीतरी मारलेला दगड खिडकीतून आत आला व तन्वीरचा प्राण घेतला. आता यात संभवनीयतेचा भाग बघा. गाडीचा वेग.दगडाचा वेग, खिडकितल्या बार मधून उरलेली जागा, आतील अनेक प्रवाशांपैकी नेमका तन्वीर, त्यातून त्याला लागणारे मर्मस्थान इ.. त्यावर काही लोकांनी लागूंना म्हटले, बघा तुम्ही देवाला मानत नाही ना? म्हणून तुम्हाला ही शिक्षा. त्यावर लागू म्हणाले, जो शिक्षा करतो तो परमेश्वर कसा? तो तर कृपाळू पवित्र आहे ना?

शाम भागवत's picture

12 Mar 2021 - 11:49 am | शाम भागवत

परमेश्वर दयाळू वगैरे नसतो. तसेच तो निष्ठूरही नसतो. तो फक्त आपल्याच कर्माचे प्रतिसाद आपल्याला देतो.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2021 - 11:54 am | मुक्त विहारि

खरोखरच देव असता तर,

प्रार्थनास्थळे नष्ट झाली नसती...

शाम भागवत's picture

12 Mar 2021 - 12:01 pm | शाम भागवत

परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व देव वेगळा. तिन्ही वेगवेगळ्या संकल्पनाआहेत. इंग्रजीत या सगळ्यालाच गॉड म्हणतात. त्यामुळे बऱ्याच जणांना हे तिन्ही शब्द समानार्थी वाटतात.
असो.

Bhakti's picture

12 Mar 2021 - 12:03 pm | Bhakti

सहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2021 - 12:47 pm | प्रकाश घाटपांडे

परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व देव वेगळा.>>>> एकदा सविस्तर लिहा यावर. सर्वसामान्य लोक या तिन्ही एकच मानतात

परमेश्वर वेगळा, इश्वर वेगळा व देव वेगळा. तिन्ही वेगवेगळ्या संकल्पनाआहेत. इंग्रजीत या सगळ्यालाच गॉड म्हणतात. त्यामुळे बऱ्याच जणांना हे तिन्ही शब्द समानार्थी वाटतात.
असो.

यावर अधिक विवेचन करावे... तेवढच काहीतरी अधीकचे समजेल. :)
मी तर क्रिएटर देखील म्हणतो... रोजच्या शब्दांचा कंटाळा आला की ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover

शाम भागवत's picture

12 Mar 2021 - 6:55 pm | शाम भागवत

ज्याने संपूर्ण विश्व व्यापलेले आहे तो परमेश्वर. तो फक्त असतो. तो जेव्हा एखद्या सजीवाच्या देहातून (उपाधीतून) प्रगट होतो तेव्हां त्याला इश्वर (परमेश्वराचा अंश) म्हणतात. या इश्वरातून आपल्याला देव घडवायचा असतो.

उदाहरण द्यायचे झाल्यास, समुद्र हा परमेश्वर समजल्यास, त्यातून निर्माण होणारी लाट, ही उपाधी समजता येईल. पण या लाटेत तो समुद्रच अंशरूपाने ओतप्रत भरलेला असतो. या लाटेतील त्रासदायक गोष्टी बाजूला करून, त्यातील लाभदायक गोष्टी शिल्लक ठेवल्या की त्यातून देव निर्माण होतो.

एखादा मोठा दगड असतो. पण शिल्पकाराला मात्र त्यातील मूर्ती दिसते. मग तो त्या मूर्तीच्या आड येणाऱ्या दगडाचा भाग काढून टाकतो व मूर्ती प्रगट होते. त्याप्रमाणेच आपल्यातला इश्वर हा सर्वशक्तिमान आहे. ती शक्ती चांगली अथवा वाईट नाही. यास्तव त्यातून चांगले ते ठेऊन व वाईट ते काढून टाकून, त्यातून आपल्याला देव बनवायचा असतो.

मग तो देव लाभतो. प्रसन्न होतो. कोप करतो. तो दयाळू असतो. निष्ठूर बनतो. वगैरे वगैरे.

वारा हवेतून निर्माण होतो. पण म्हणून वाऱ्याला हवा म्हणता येत नाही. तर एका विशिट्य प्रक्रियेतून हवेतून वारा निर्माण होतो. तसेच ही देव बनवण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला उपासना म्हणतात.

प्रार्थनास्थळे ही मनुष्य प्राण्यासाठी असतात ! तो समजुन घेण्यास सोपे जावे म्हणुन... त्याची मूर्त स्वरुपात भक्ती करणे सोपे जाते म्हणुन.
देव नसता तर हे विश्व देखील नसते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2021 - 8:28 pm | श्रीगुरुजी

+ १

परमेश्वर दयाळू वगैरे नसतो. तसेच तो निष्ठूरही नसतो. तो फक्त आपल्याच कर्माचे प्रतिसाद आपल्याला देतो.

एखाद्या दुर्दैवी घटना घडलेल्या व्यक्तीबाबत अत्यंत असंवेदनशील रितीने व्यक्त होणारे तत्वज्ञान. बळीलाच दोषी ठरवण्याची सोपी पद्धत. कोणा स्त्रीचा कोणी अंधारात हात धरला तरी "इतक्या स्त्रिया सोडून नेमका तुझाच का धरला?" या तर्काइतके निष्ठुर.

असो.

शाम भागवत's picture

13 Mar 2021 - 2:47 pm | शाम भागवत

तुमचे संवेदनशील तत्वज्ञान वाचायला आवडेल.

गवि's picture

13 Mar 2021 - 2:54 pm | गवि

उपहास? बरं...!!

अशा दुर्घटनेला कोणत्याही तत्वज्ञानात न बसवणे आणि कर्म वगैरेला दोष न देता किमान हळहळ व्यक्त करणे अथवा मूक राहणे हे अधिक संवेदनशील.

तो पोरगा कोवळ्या वयाचा होता. कसले कर्माचे फळ मिळाले त्याला? की तेही मागील जन्मातले मोजायचे? कोणी हरामखोर दगड मारणारा गणतीतही नाही.. जो गेला त्याचे मात्र कर्मफळ. धन्य...!!

अर्थात तुम्ही म्हणता तसं तुम्हाला असले काही तत्वज्ञान वाचायला "आवडेल" याबद्दल साशंक आहे. मजकडून इतकेच. वादात रस नाही. __/\__

मराठी_माणूस's picture

13 Mar 2021 - 3:01 pm | मराठी_माणूस

मगाशी शेवटचे वाक्य नव्हते

शाम भागवत's picture

13 Mar 2021 - 3:14 pm | शाम भागवत

असं तत्वज्ञान मांडणाऱ्याला हळहळ वाटत नाही, वाईट वाटत नाही किंवा तो अन्यायाचा प्रतिकार करत नाही ही गैरसमजूत आहे. किंवा असं कोरडं तत्वज्ञान कधी सांगायचं व कधी नाही सांगायचे इतके तारतम्यही अशा माणसाला नसते असे समजणेही मला चुकीचे वाटते.

मात्र आपला शोक आवरून थंड डोक्याने आपले विहित कर्म आचरायला ( वेळप्रसंगी न घाबरता अन्यायाचा प्रतिकार करायला) ह्याचा उपयोग होतो असे मला वाटते.

जो तो आपल्या दृष्टिकोनातून पहात असतो हेच खरे. या अर्थाने तुमच्याही मतांचा आदर आहे.
असो.
🙏

शा वि कु's picture

13 Mar 2021 - 5:02 pm | शा वि कु

फक्त टास्कमास्टर किंवा tally. erp च काम करतो काय ? :)

Rajesh188's picture

12 Mar 2021 - 2:47 pm | Rajesh188

ईश्वर हा कृपाळू नाही तो तटस्थ आहे.
कृपाळू,दयाळू नाही तर तटस्थ आणि क्रूर पण आहे.

शाम भागवत's picture

12 Mar 2021 - 6:56 pm | शाम भागवत

तो दयाळूही नाही. क्रूरही नाही.
तो फक्त साक्षी आहे.

चौकटराजा's picture

12 Mar 2021 - 7:18 pm | चौकटराजा

तो साक्षी आहे म्हणूनच त्याची कृपा वगैरे असे काही नसते. तसा त्याचा कोप ही काही नसतो. आपल्यात ज्या घटनेचे स्पष्टीकरण नीट मिळविण्याची एकतर क्षमता नसते वा ते कुणी दिलेच तर ते स्वीकारण्याची तयारी नसते त्यावेळी आपण कृपा वा कोप या सन्कल्पनान्चा आधार घेतो. भक्तीचे रुपांतर कृतज्ञतेकडून वेडात होते त्यावेळी उठसूट कृपा हा शब्द तोंडून येऊ लागतो. लोकल मधे चवथी सीट मिळाली तरी स्वामीन्ची कृपा ,महाराजान्ची कृपा, देवाची कृपा असे म्हणणारे आजूबाजूस अनेक सापडतील !

परमेश्वर कृपाळू आहे वगैरे विचार का मांडत होते? जिचं अस्तित्वचं मान्य नाही ती स्वभावाने कशी का असेना? काय फरक पडतो?

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2021 - 4:00 pm | प्रकाश घाटपांडे

त्यांना काही कठोर सश्रद्धांनी सागितले," बघा तुम्ही देव मानीत नाही ना? देवाने तुम्हाला शिक्षा केली". लागू म्हणाले की मी त्याला मानीत नाही म्ह्णून तो माझ्या मुलाला शिक्षा करणार असेल तर तो देव कसला? राक्षस असला पाहिजे.

मराठी_माणूस's picture

12 Mar 2021 - 4:03 pm | मराठी_माणूस

बघा तुम्ही देव मानीत नाही ना? देवाने तुम्हाला शिक्षा केली

असे खरेच कोणी त्यांना म्हणाले होते का ?

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2021 - 4:11 pm | प्रकाश घाटपांडे

अहो अशा गोष्टी चर्चेतून व्यक्त होत असतात. प्रत्यक्ष लागूंच्या पुढ्यात जाउन तो प्रश्न एखाद्या व्यक्तिने फिजिकली विचारायची गरज नसते. मी लिहिलेले कर्णोपकर्णी नसून प्रत्यक्ष लागूंच्या तोंडातून भाषणात, संवादात, चर्चेत ऐकलेले आहे.

मदनबाण's picture

12 Mar 2021 - 6:16 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover

श्रीगुरुजी's picture

12 Mar 2021 - 8:31 pm | श्रीगुरुजी

बालगंधर्व रंगमदिरासमोरील पर्ल हॉटेलमध्ये ज्याने प्रेयसीबरोबर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तोच हा मुलगा का? का तो दुसरा मुलगा?

चौकटराजा's picture

13 Mar 2021 - 9:13 am | चौकटराजा

तो पहिल्या पत्नीपासून झालेला .. आठवण जर बरोबर असेल तर त्याचे नाव आनन्द ! हा दीपा बसरूर यांचेशी विवाह झाल्यावर झालेला !

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2021 - 11:25 am | श्रीगुरुजी

बरोबर. त्याचे नाव आनंद होते. धन्यवाद.

उपयोजक's picture

12 Mar 2021 - 3:37 pm | उपयोजक

कुकर्म करताना देवाला घाबरला नाहीत तरी चालेल. पण कर्माला घाबरा. कारण देव दयाळू आहे; कदाचित क्षमा करेलही. पण कर्म दयाळू नाही; काहीतरी फळ दिल्याशिवाय कर्म तुम्हाला सोडत नाही.

शशिकांत ओक's picture

12 Mar 2021 - 8:49 pm | शशिकांत ओक

कुकर्म करताना देवाला घाबरला नाहीत तरी चालेल. पण कर्माला घाबरा. कारण देव दयाळू आहे; कदाचित क्षमा करेलही. पण कर्म दयाळू नाही; काहीतरी फळ दिल्याशिवाय कर्म तुम्हाला सोडत नाही.

त्या न्यायालयात स्टे ऑर्डर नाही ना जामीनावर सुटता येते. फल या नाहीतर पुढ्यच्या जन्मांत भोगावेच लागते...

कर्नलतपस्वी's picture

12 Mar 2021 - 9:09 pm | कर्नलतपस्वी

सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार.
घडलेल्या सर्वच गोष्टींच तर्क शुद्ध उत्तर मीळत नाही. म्हणून विचार मंथन.

सिरुसेरि's picture

13 Mar 2021 - 1:02 pm | सिरुसेरि

बाकी या Eq,sq,aq,iq टेस्ट कशा करतात ? ऑनलाईन टेस्ट साठी काही साईटस आहेत का ?

पण वाचण्या योग्य आहे...
https://orspartners.com/further-developing-your-iq-eq-and-aq/