कानभट्ट , हलाला आणि दशक्रिया

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
11 Feb 2021 - 7:39 am

कानभट्ट , हलाला आणि दशक्रिया

मराठी मध्ये गेली काही वर्षे आशयघन चित्रपट निघतात हे सर्वश्रुतच आहे ...
आणि हिंदू धर्मातील वाईट चालीरीती या विषावर मोकळेपणाने लिहिले जाते ( नाटकेही आली त्यात ) / निर्माण केले जाते हे हि सुधृढ समाजाचे आणि पुरोगामी समाजचे लक्षण आहे ( मराठी समाज घाशीराम आणि नथुराम दोन्ही नाटके पैसे देऊन बघतो यात हि परिपकवता दिसून येते )

असाच काहीसा विषय घेऊन एक नवीन मराठी चित्रपट येताना दिसतोय तो म्हणजे "कानभट्ट "
लहान मुलाला आवडत नसतांना वेदविद्या शिकवयाला पाठवलं जातं आणि त्याचा ओढा शास्त्राकडे किंवा प्रयोगांकडे कल असलेल्या एका माणसाकडे जातो आणि त्यातून काय घटना घडतात असा साधारण हा विषय...( उगाच नको ती टीका नको म्हणून दिगदर्शकाने मुलाची आणि त्या माणसाची जातं एकच दाखवली आहे )

हे सगळे कौतूकास्पद असताना परत एकदा राहून राहून असे वाटते कि अश्या कलाकृती सर्व धर्मातील चालिरीनवर का काढल्या जातं नाहीत ( हलाला हा अपवाद आणि हॉलिवूड मध्ये ख्रस्ती धर्मावर पण उघडपणे भाष्य करणारे चित्रपट निघतात हे हि मान्य ) पण भारतात ?
असो

मराठीतील काही कोविद मुळे अडकलेले चित्रपट कोठे पेड प्लॅटफॉर्म वॉर आहेत का?
१) अश्लील मित्र मंडळ ( अलोक राजवाडे)
२) पांघरून ( महेश मांजरेकर )

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

11 Feb 2021 - 9:57 am | उपयोजक

कलादालनमधे???

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 10:22 am | चौकस२१२

मिपावर कलादालन याचा अर्थ मी नाट्य चित्रपट इत्यादी कला असाही घेतला आहे! म्हणून तिथे ..कदाचित माझी समजूत चुकीची असेल...
धाग्याचा कणा हा सामाजिक असला तरी तो चित्रकृती वर आधारित असल्यामुळे आणि माझ्या वरील समजुतीमुळे मी तो कलादालन येथे टाकला
पुढल्यावेळेस कोठे टाकावा ?

लेख विभागात हरकत नसावी.

अशा वाईट चालीरितींना, जो पहिल्यांदा विरोध करतो, त्याला प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागते ....

उदाहरणे देतो ....

1. सती प्रथा बंद करणे
2. विधवा विवाह
3. स्त्री शिक्षण
4. समलैंगिक विवाह

बाप्पू's picture

11 Feb 2021 - 12:28 pm | बाप्पू

हलाला या विषयावर एक सुंदर चित्रपट काही वर्श्यापूर्विच येऊन गेला.

हिंदू लोकांना काही देणेघणे नसल्याने त्यांनी तो बघितला नाही.
आणि मुस्लिम लोक स्वतः ला अरबी तुर्की समजत असल्याने ते मराठी चित्रपट बघत नाहीत. त्यामुळे तो पिक्चर कधी येऊन गेला ते कोणालाच समजले नाही.

कदाचित तो चित्रपट हिंदी भाषेत आला असता तर आत्तापर्यंत निर्माते कलाकार यांचे गळे कापून सुद्धा झाले असते. वाचले बिचारे. !!!

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 1:38 pm | चौकस२१२

हो तोच चित्रपट .. विषय चांगला हाताळला
लेखक = राजन खान
निर्माता= लक्ष्मण आणि अमोल कागणे
दिग्दर्शक = शिवाजी लोटनपाटील
कलाकार विजय चव्हाण आणि प्रियदर्शन जाधव , चिन्मय मांडलेकर
त्यातील एक प्रसंग दिग्दर्शकाने फार उत्तम टिपला आहे ( प्रेमळ समाजातील प्रेमळपणामुळे इतरांना किती जपून त्यांचंही वागावे लागते ते दाखवले आहे .. नाहीतर फुकाचंच इस्लमोफोबिया चा आरोप व्हायचा ब्रुक बॉण्ड चाय जाहिराती )
घटस्फोटामुळे मुस्लिम कुटुंबात निर्माण झालेला पेच कसा सोडवायचा य साठी गावाच्या वडीलधारी a मंडळींना बोलवले असते , पाटील सरपंच हिंदू असतात... ते सगळं ऐकून घेतात आणि काहीसा अश्या प्रकारचे बोलतात "
हा प्रश्न तुमच्या धर्माची बाब आहे .. ती तुम्ही सोडावयाची .. आम्ही कसे बोलणार ..एवढे सांगतो कि आमचं धर्मात हा प्रश्न आला नसता फारसा .." नक्की संवाद आठवत नाही पण असेच काहीसे

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2021 - 5:22 pm | चौथा कोनाडा

आणि मुस्लिम लोक स्वतः ला अरबी तुर्की समजत असल्याने ते मराठी चित्रपट बघत नाहीत.

असहमत. महाराष्ट्राच्या शहरी, ग्रामीण भागातील मुस्लिम लोक, ज्यांचा मराठीशी संबंध येतो, मराठी समाजते ते मराठी चित्रपट पाहतात.
बरेच मुस्लिम लोक मराठी चित्रसॄष्टीत काम करतात.

असहमत. महाराष्ट्राच्या शहरी, ग्रामीण भागातील मुस्लिम लोक, ज्यांचा मराठीशी संबंध येतो, मराठी समाजते ते मराठी चित्रपट पाहतात.
बरेच मुस्लिम लोक मराठी चित्रसॄष्टीत काम करतात

असहमत. तुम्ही म्हणता अश्या लोकांचे प्रमाण खूप कमी आहे.

चौथा कोनाडा's picture

12 Feb 2021 - 1:19 pm | चौथा कोनाडा

प्रमाण किती का असेना पण "मुस्लिम लोक स्वतः ला अरबी तुर्की समजत असल्याने ते मराठी चित्रपट बघत नाहीत" असं सरसकट म्हणणं योग्य नाही.

चौकस२१२'s picture

12 Feb 2021 - 7:10 am | चौकस२१२

मुस्लिम लोक स्वतः ला अरबी तुर्की समजत असल्याने ते मराठी चित्रपट बघत नाहीत
शहरी भागात असेल कदाचित तुम्ही म्हणता तसे जर जास्त पण निम शहरी किंवा ग्रामीण भागात (सांगली / मिरज , इस्मापूर) स्थानिक मुस्लिमांचा मराठी शी (किंवा " भाजीलेनेको घर गया है" असल्या खास मराठीशी ) संबंध येतो त्यामुळे तिथे मराठी चित्रपट बघणार्यांचे प्रमाण बऱयापैकी असते
आपण हालाला मधील गाव आणि त्यातील पात्रे बघितली तर निश्चित असे वाटते कि हि लोक करमणुकीसाठी मराठी चित्रपट नक्कीच बघत असतील

दुरी बाजू : अर्थात हे हि खरे कि वहाबी पद्धती कश्या जास्त करून लादल्या जातील हा हि भाग असतो ( उदाहरण इंडोनेशियातील वाढणारी कट्टरता तेथील संस्कृती आणि धर्म यातील विसंवाद ) आणि त्याचा भाग म्हणजे स्थानिक संस्कृती कडे दुर्लक्ष करा
गोव्यातील एक उदाहरण आठवते एक उत्तम दर्जाचं हॉटेलात संध्यकाळी जो सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यातील गोव्यातील हिंदू चालीरीतीलतील काहीच नवहते .. सगळे गोवयवरील क्रिस्टी पोर्तुगीज संस्कृतीचे दर्शन... हे लक्षात आल्यावर तिथे विचारले तर काहीतरी गुळूमुलीत उत्तर मिळाले )
किंवा कोकणी चा गोव्यातील ख्रिस्ती बांधवांना अभिमान आहे आणि ते बोलतात पण देवनागरीतील वाचता किती जणांना न येता? कोकणी चा उगम माताही आणि पर्ययाने देवनागरीतून झाला ना .. मग असे का? कारण त्यामागची विचारसरणी हि कि देवनागरी म्हणजे हिंदूंची "नेटिव्ह"
असो
किंवा पाकिस्तान मध्ये जास्तीत जास्त अरबी संस्कृती जणू काही आपली आहे यावर भर देणं हे हि त्या जगव्यापी कब्जा करण्याचे एक रूप

चौथा कोनाडा's picture

11 Feb 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा

हलाला आणि दशक्रिया सिनेमा बद्द्ल माहिती होतं. दशक्रिया पहिला होता, आवडलाही होता.
कानभट्ट बद्दल प्रथमच वाचलं. धन्यवाद.
खाली त्याची क्लिप देत आहे.

सिनेमा "झी" समुहाचा आहे, व्यवस्थित प्रसिद्धी व्हायला हरकत नसावी.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कानभट’चा दबदबा

काळे मांजर's picture

11 Feb 2021 - 7:38 pm | काळे मांजर

कायच्या काय अपेक्षा लोकांच्या

सिनेमाच्या तिकिटावर मनोरंजन कर छापलेला असतो , लोकांना शाळा शिकवावी म्हणून सिनेमे असते तर त्यावर गुरुदक्षिणा छापली असती

चौथा कोनाडा's picture

12 Feb 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा

कानभट्टच्या टीमशी ऑनलाईन बातचित
मटा कल्चर क्लबच्या फेसबुक पेजवर लाइव्ह मुलाखती
दि. १३-०२-२०२१, शनिवार, संध्याकाळी ६ वाजता.

चौकस२१२'s picture

12 Feb 2021 - 3:02 pm | चौकस२१२

"पोप ची निवड" या वादग्रस्त विषयांवरील एक सुंदर चित्रपट म्हणजे टू पोप्स
Jonathan Pryce and Anthony Hopkins