मी आणि माझा न्यूनगंड - 2

Primary tabs

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
12 Dec 2020 - 10:06 am

हो मला माझ्या न्यूनगंडाचा अभिमान आहे!!

चक्रावलात? चक्रावण्यासारखेच आहे. मोठाच विरोधाभास आहे ना? पण विश्वाच्या पसाऱ्यात मी इतका क्षुद्र आहे की मला न्यूनगंड आलाच पाहिजे.

जगात जे शून्य आहे तेच जरी माझ्यात असले, तरी मेंदूच्या रासायनिक अभिक्रिया आणि त्यातून उठणारे हार्मोन चे कल्लोळ यातून अजूनतरी मी मुक्त नाही..

साक्षीभाव श्रेष्ठ की आनंद श्रेष्ठ हे अजूनही मला कळले नाही. काहीवेळा वाटते की साक्षीभाव आला की आनंद आपोआप येईल , तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे.

शेवटी मी म्हणजे कोण?
हा देह? नाही नाही
मग या देहातील अस्तित्व?

अस्तित्व म्हणजे काय?
ज्यामुळे देहाला देहत्व येते.. अस्तित्व गेले की उरते ते प्रेत. पण मग माझ्या इच्छा आकांक्षा या माझ्या देहाशी निगडित आहेत की अस्तित्वाशी? मग देह संपला की माझ्या वासनांचे काय होते? त्या पण देहाबरोबर जळतात का?
जळत असतील तर मग अस्तित्वाचे काय प्रयोजन?
मग असे काही आहे का जे देह आणि अस्तित्व यांच्यामध्ये आहे? असे काही आहे का जे देहाशी अस्तित्वाला जोडून ठेवते?

मग मी म्हणजे कोण? देह, अस्तित्व की हा दुवा? माझा देह संपल्यानंतर देखील हा दुवा अस्तित्वात राहणार का?व्हायरस च्या receptor सारखा? जोडणारी पेशी मिळाली की पुन्हा छापखाना सुरू?

मग यातून सुटणार कसे? आणि असे किती receptor असतील?
हे व्हायरस किंवा receptor निकामी केले तर? मला जाणवणारे माझे अस्तित्व मुळात त्या receptor मुळेच आहे, नाही का?
ते receptor गेले तर मग मी पुन्हा अनंत अविनाशी होणार!! पण मग त्यात मजा काय आहे?

मी अनंत अविनाशी असण्यात काय आनंद आहे? ते तर मी आहेच..
शरीर म्हणून माझा आनंद हा मी अविनाशी असण्याच्या जाणिवेमुळे आहे.. एकाच वेळी आपण देहात आहोत आणि अविनाशी पण आहोत या जाणिवेत आहे.. मुळात आनंद ही संकल्पनाच एकप्रकारे शारीर आहे, नाही का? ती देखील एक भावनाच आहे.

म्हणजे आनंद हवा असेल तर शरीर हवे. पण सत्याची जाणीव पण हवी..

तुका म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हांसी.
गुण गाईन आवडी
हेचि माझी सर्व जोडी.

आम्ही छोटे असण्यातच आमचा आनंद सामावलेला आहे, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.

सगळेच कसे एकत्र मिळणार? पुन्हा न्यूनगंड!!

पण आपण सगळे एकाच रस्त्यावरचे प्रवासी.. कोणाचा मुक्काम आधी येतो तर कोणाचा नंतर.

तो माझ्या आधी पोचला तर? मला भीती वाटते? पण मला का भीटी वाटावी? त्याने वाटचाल कधी सुरू केली मला कुठे माहितेय?

त्याचा पाय घसरला तर? मी त्याला ओळखतो, त्याचा पाय घसरू नये..
अरे पाय घसरत आहे हे ठरवणारा तू कोण? अस्तिव, जे अमर आहे ते ठरवेल ना..

पण मी त्याला ओळखतो..

तू कोणाला ओळखतोस? त्या देहाला, की त्या अस्तित्वाला? देहाला ओळखत असलास, तर जे मुळातच भासमान आहे त्याच्या अधःपतनाची तुला कसली भीती? जर अस्तित्वाबद्दल बोलत असशील तर अस्तित्व मुळात अपरिवर्तनीय आहे.. त्याचे कसले आलेय अधःपतन?

गरगरायला झालंय!

ठेविले अनंते तैसेचि राहावे
चित्ती असू द्यावे समाधान.

न्यूनगंड अच्छे होते है.. आपल्याला काही कळत नाही ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी असते.. आपण आताशी पहिली पायरी चढतोय.. पुढच्या पायऱ्या यथावकाश येतीलच..

प्रत्येक वेळी हीच पहिली पायरी आहे याची जाणीव असेल तर आनंद काही फार दूर नाही!

काय म्हणता?

(समाप्त.. काही भाग मिपावरच्या काही चर्चांसाठी प्रतिक्रियात्मक म्हणून आलाय, पण तो आता काढून टाकावसा वाटत नाहीये)

संस्कृतीप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

12 Dec 2020 - 12:36 pm | प्रकाश घाटपांडे

जगायला काहीतरी गंड लागतातच न्युनगंड असो वा अहंगड. झेपले तेवढे मी बाळगतोच.

खरे आहे तुम्ही म्हणताय ते.

उत्तर
प्रश्न
शब्दाचा अर्थ's profile picture
शब्दाचा अर्थ
स्वभाव's profile picture
स्वभाव
न्यूनगंड म्हणजे काय ?
१ उत्तर
न्यूनगंड…
सर्वप्रथम न्यूनगंड म्हणजे काय हे समजून घेऊ, न्यूनगंड या शब्दात दोन उपघटक आहेत पहिला न्यून म्हणजे कमी, कमतरता अर्थात न्यूनता असे हि मनता येईल व दुसरा म्हणजे गंड, गंड या शब्दाला इंग्लिश मध्ये complex म्हणतात, आता हि व्याख्या झाली पुस्तकातील, साध्या आणि सोपी भाषेत सांगायचं मनल तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेली कमीपणा, आपण स्वतःला इतरापेक्षा कमी आखण्याची वृत्ती, न्यूनगंड म्हणजे आपल्यात असलेली आत्मविश्वासाची कमतरता.
आपण प्रत्येक काम दोन टप्प्यात पूर्ण करतो, पहिले त्या कामाविषयी मनात एक चित्र बनवतो, नंतर ते काम प्रतेक्षात पारपाडतो, न्युनगंडाची विशेषता म्हणजे अशी कि जेव्हा आपण कामा बद्दल चित्र बनवत असतो तेव्हा काही नकारत्मक विचार मनात आणतो. जसे, आपण हे काम करू शकत नाही, इतका हुशार मुलगा नाही करू शकला तर आपण काय करू शकणार, फेल झालो तर लोक काय म्हणतील, दोन गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग आणि निंदकाचे घर असावे शेजारी. लोक बोलणार आहेत बोलू द्या, दूरऱ्याच्या बोलण्याने सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो.

कपिलमुनी's picture

13 Dec 2020 - 12:01 am | कपिलमुनी

सर्वज्ञानी गेले आणि मज्जा गेली

Bhakti's picture

13 Dec 2020 - 5:16 pm | Bhakti

धन्य!!:)

आनन्दा's picture

13 Dec 2020 - 8:25 pm | आनन्दा

हो ना.. आता ही पोस्ट वरातीमागून घोडं असल्यासारखी वाटतेय.. :)

विजुभाऊ's picture

13 Dec 2020 - 9:55 am | विजुभाऊ

रगरतंय? मेलोय वाचताना असे वाटतय.

प्रत्येक वेळी हीच पहिली पायरी आहे याची जाणीव असेल तर आनंद काही फार दूर नाही!

..
बर ते ..देह आणि अस्तित्व..या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजायला अजून थोडा वेळ लागेल..:)

सोत्रि's picture

16 Dec 2020 - 5:36 pm | सोत्रि

तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे.

हे उलट असायला हवं, आनंद हे बायप्रोडक्ट!

- (प्रोडक्टीव्ह) सोकाजी

असे का बरे वाटते तुम्हाला?