Skip to main content

सामान्य माणूस....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी गुरुवार, 10/12/2020 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस... वर्गात लोकं म्हणती स्कॉलर, जपतो आमची स्वच्छ कॉलर, सहसा नशिबी नसतात डॉलर, खिशात फक्त ओंजळभर चिल्लर... रांगोळीत आमच्या सजते, आकांक्षांची नक्षी, स्वप्नांच्या झाडावर रोज, नव्या इच्छांचे पक्षी... मनातल्या नकाशावर, आयुष्याची रूपरेखा, वाळूत काढतो रेषा, ते आम्ही पांढरपेशा... सुख दुःखाच्या प्रसंगी, आम्हा सोडत नाही चिंता, डोळ्यासमोर सतत फिरतो, महागाईचा वरवंटा.. कोणतीही असो दशा, आम्ही सोडत नाही दिशा, कर्तृत्वाला झळाळी देते, आमच्या मनातली आशा.. गरजा कंठशोष करून सांगतात, तू क्षणभर नको थांबूस, छातीवरलं बिरुद अभिमानाने मिरवतो, "मी सामान्य माणूस"....! जयगंधा... १०-१२-२०२०.
लेखनविषय:

वाचने 1765
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सहसा नशिबी नसतात डॉलर, अमेरीकन सा.माणूस?