कुणीतरी..
कुणीतरी माझच मला,
नव्यानं ओळखायला शिकवलं..
आरशाचं स्थान जनात नसून,
मनात असलेलं दाखवलं..
विचारांच्या पसारा-याला,
मनातच आवरायला शिकवलं..
बावरलेल्या मनालाही,
आशाकिरणांनी सावरलं..
सैरभैर चित्ताला त्यानं,
विवेक देऊन स्थिरावलं..
कोमेजलेलं चैतन्य,
एका आशीर्वादानं फुलवलं..
बदक नाही, प्रत्येक जीव,
राजहंसच आहे हे जाणवलं..
"त्याच्या"कडे बघताना,
"त्याची"च हो, हे समजावलं...!!
जयगंधा..
३०-११-२०२०.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3173
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
धन्यवाद
In reply to छान by छोटा चेतन-२०१५
छान
धन्यवाद
In reply to छान by आर्णव
मस्त छान आहे कविता आवडली
कल्पना चांगली. पुलेशु.
सर्वांना धन्यवाद.