मिंट मधील मधले ठाकरे ह्यांचे चरित्र

साहना's picture
साहना in काथ्याकूट
27 Nov 2020 - 3:34 am
गाभा: 

ठाकरे परिवार आणि बोंबे-स्कॉटिश (मुंबई नव्हे) ह्या शाळेचे संबंध ह्याविषयावर मी मागे लिहिले होतेच. पण मिंट मधील उद्धव ठाकरे ह्यांचे चरित्र विचार करायला लावणार आहे. मराठीच्या नावाने बोंब मारणाऱ्या समस्त मराठी बांधवानी ह्यावर विचार करावा.

१. लेखकाची मराठी आणि मराठमोळ्या संस्कृतीशी असलेली घृणा अगदी स्पष्ट दिसते. हि घृणा लेखकाची असली तरी माझ्या मते एक फार मोठ्या तथाकथित सुशिक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व लेखक करत आहे.

२. बोंबे स्कॉटिश चा विद्यार्थी असलेल्या आदित्य विषयी लेखकाला पान्हा फुटला आहे आणि ह्या शाळेचा परिणाम म्हणून शिवसेना अचानक बदलली आहे असे मत लेखक व्यक्त करतो.

अर्थांत ह्यांत थोडी अतिशोयक्ती आहे आणि थोडे तथ्य सुद्धा आहे. शाळा आणि शिक्षण व्यवस्था समाजांत आमूलाग्र बदल घडवून आणायचे साधन आहे ह्यावर दावे लोक तसेच ख्रिस्ती प्रभाव असलेले लोक विश्वास ठेवून आहेत आणि त्याच मुले हिंदू लोकांना त्यांचा शाळा चालवायचा अधिकार द्यायचा नाही असे कायदे त्यांनी पास केले आहेत. ह्यावर मूग गिळून गप्प असलेले तथाकथित हिंदू-हृदय सम्राट इत्यादी ह्या ह्रासाला कारणीभूत आहेत.

शिक्षणव्यवस्था हे माझे एकच तुणतुणे मी सगळीकडे वाजवते. इथेही पुन्हा वाजवत आहे.

मराठी लोकांनी हे मिंट मधील लेखन जरूर वाचले. पाहिजे.

https://www.livemint.com/news/india/how-uddhav-thackeray-is-becoming-a-m...

In Thackeray’s and Sena’s makeover, Aaditya has had a role to play. “Aaditya has a great positive influence on his father. He, unlike Uddhav, doesn’t come from Marathi-medium middle-class upbringing; his worldview is from Bombay Scottish School–St Xavier’s College and brings that sensibility," remarked Wagle. Added Palshikar: “Uddhav is redefining the party based on his personality. Bal Thackeray’s last message to sainiks was to request cooperation for Uddhav and Aaditya, so they will fall in line even if unhappy."

मराठी शाळेंत गेलेल्या आम्हा सर्व लोकांनी लक्षांत घेतले पाहिजे कि आम्ही बाळ ठाकरे ह्यांच्या प्रमाणे 'unwashed masses` आहोत. आमच्या डोक्यांत सेन्स नाही त्यासाठी बोंबे स्कॉटिश मध्ये जाणे आवश्यक आहे !

प्रतिक्रिया

अथांग आकाश's picture

27 Nov 2020 - 8:24 am | अथांग आकाश

मराठीच्या नावाने बोंब मारणाऱ्या समस्त मराठी बांधवानी ह्यावर विचार करावा.

विचार बिचार करायचे कष्ट कशाला घेईल मराठी माणूस? त्यापेक्षा बुद्धी एखाद्या पक्षाच्या दावणीला नेऊन बांधायची किंवा नेत्याच्या चरणी अर्पण करायची एवढा सोपा पर्याय आहे की त्याच्याकडे! आधी डून स्कूलचे स्तोम माजवून झाले आता बॉम्बे स्कॉटीशचे तुणतुणे वाजेल. त्यांच्या मागे जायला मेंढरे तयार आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Nov 2020 - 9:04 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ते मत निखिल वागळे ह्यांनी दिले आहे.वागळेंचे विचार ऑक्टोबर २०१९ पासुन बदलले आहेत. आधी शिवसेना 'कम्युनल' होती.शिवसेनेच्या विरोधात काही लिहायचे असेल तर वागळे माहिती पुरवत. आता सेना-भाजपाचे फाटल्याने, व 'सर्वात मोठा शत्रू' भाजपा असल्याने वागळ्याना सेना हवीहवीशी झाली आहे. असो.
मराठी उच्च मध्यम वर्गाला सेनेविषयी तिटकारा होता/आहे. पुर्वी लहान असलेला हा वर्ग आता जगभर पसरलेला आहे. समाजमाध्यमांवर सतत व्यक्त होणार्या ह्या भाजपा समर्थक वर्गावर छाप पाडणे व रावडी शिव्सैनिकाना सॉफेस्टिकेटेड बनवणे हे उद्धव डॅडीनी सन आदित्यला दिलेले टास्क आहेत असे ह्यांचे मत. त्यामुळे बाँबे स्कॉटिश वगैरे ह्या त्या पी.आर.चा भाग आहे. बाकी सोडून द्या.

आह ! ज्याच्या तोंडाला काळे फासून ज्याची शिवसैनिकांनी धिंड काढली होती तोच हा निखिल वागळे का ? तोच असेल तर खरोखर निर्लज्ज माणूस आहे !

नारायण राणे ह्यांच्यावर टीका केली म्हंणून शिवसैनिकांनी ह्याची धिंड काढली होती ! कालाय तस्मय नमः ! आणखीन काय.

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2020 - 5:21 pm | चौथा कोनाडा

हे वाक्य ....

तोच असेल तर खरोखर निर्लज्ज माणूस आहे !

हे वाक्य आवडलेले आहे !

माई, बऱ्याच दिवसांनी "ह्यांनी" मत सांगितले तुमच्या.. ते परवाचे विडंबन वाचून "हे" परत आले की काय?

बाकी, अनावश्यक एकांगीपणा टाळल्यामुळे आता तुमची मते अधिक माहितीपूर्ण आणि वाचनीय वाटत आहेत. शुभेच्छा!!

चलत मुसाफिर's picture

27 Nov 2020 - 11:25 pm | चलत मुसाफिर

1. तो लेख लिहिणारी पत्रकार मराठीच आहे.
2. शिवसेनेने लव्ह जिहाद मुद्द्यावर अत्यंत संतापजनक भूमिका घेतलेली आहे. इतकेच नव्हे तर लव्ह जिहादछाप चवन्नी नटी उर्मिला माटोंडकर हिला पक्षाची उमेदवारी देऊ केली आहे. आता फक्त मातोश्रीवर इफ्तार पार्टी झोडायला ओवेसी आणि अबू आझमीला बोलावणे शिल्लक आहे. तेवढे एकदाचे झाले की ठाकरे अधिकृतरीत्या धर्मनिरपेक्ष होतील.

रामदास२९'s picture

28 Nov 2020 - 1:40 pm | रामदास२९

ठाकरे अधिकृतरीत्या धर्मनिरपेक्ष होतील.

आवडल ..