ठाकरे परिवार आणि बोंबे-स्कॉटिश (मुंबई नव्हे) ह्या शाळेचे संबंध ह्याविषयावर मी मागे लिहिले होतेच. पण मिंट मधील उद्धव ठाकरे ह्यांचे चरित्र विचार करायला लावणार आहे. मराठीच्या नावाने बोंब मारणाऱ्या समस्त मराठी बांधवानी ह्यावर विचार करावा.
१. लेखकाची मराठी आणि मराठमोळ्या संस्कृतीशी असलेली घृणा अगदी स्पष्ट दिसते. हि घृणा लेखकाची असली तरी माझ्या मते एक फार मोठ्या तथाकथित सुशिक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व लेखक करत आहे.
२. बोंबे स्कॉटिश चा विद्यार्थी असलेल्या आदित्य विषयी लेखकाला पान्हा फुटला आहे आणि ह्या शाळेचा परिणाम म्हणून शिवसेना अचानक बदलली आहे असे मत लेखक व्यक्त करतो.