Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Jayagandha Bha… on गुरुवार, 11/26/2020 - 08:06
मजसी भेटवा.... कुणी असो सोवळा, कुणी तो बावळा, विठ्ठल सावळा, सर्वांना प्रिय.. कृपेची साऊली, उभी असे राऊळी, ती विठू माऊली, सर्वांना प्रिय.. क्षण जाई वाया, निरवी "तो" माया, ऐसा विठुराया, सर्वांना प्रिय.. वाजवू मृदुंग, गाउनी अभंग, मनी पांडुरंग, सर्वांना प्रिय.. मकरकुंडलांचा साज, डोळाभर पाहू आज, उभा केशीराज, सर्वांना प्रिय.. धरूनिया हात, करी जो सनाथ, असा पंढरीनाथ, सर्वांना प्रिय.. सोडवी आसक्ती, देई जो विरक्ती, तो रखुमापती, सर्वांना प्रिय... जिथे नामाचा गजर, तिथे जातीने हजर, सखा रखुमावर, मजसी भेटवा...!! जयगंधा.. २६-११-२०२०.

Submitted by प्राची अश्विनी on गुरुवार, 11/26/2020 - 20:45

Permalink

वाह!

वाह!
  • Log in or register to post comments

Submitted by Jayagandha Bha… on Mon, 11/30/2020 - 17:10

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on गुरुवार, 12/03/2020 - 09:48

Permalink

मस्त..

👍
  • Log in or register to post comments

Submitted by Jayagandha Bha… on गुरुवार, 12/10/2020 - 11:12

Permalink

धन्यवाद..

धन्यवाद..
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2270 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com