Skip to main content

लवंगलता एक प्रयत्न

लेखक चेतन यांनी बुधवार, 26/11/2008 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवर्य धोंडोपंतांच्या लवंगलता छंदातिल रचना वाचुन खरच येड लागले. म्हणलं आपण पण एक प्रयत्न करावा (ग्रुहपाठ #:S अनुष्टभ फारच जड आहे) माझा हा एक प्रयत्न जाणकारांनी चुका किंवा बदल जरुर सुचवावेत. दर्शनाने गणेशाच्या, मन होई शांत | राहो तुझी क्रुपाद्रुष्टी, अनादि अनंत || प्रसन्न ही तुझी मुद्रा, मन आनंदते | पाणिदार डोळ्यांमध्ये, भान हरपते || आगमन होता तुझे, घरी सणवार | ढोलताशे गजरात, चैतन्य अपार || लाल फुले जास्वंदीची, माथ्यावर दुर्वा | विघ्नहर्ता गणेशा तू, बुध्दी देइ सर्वा || आरती तुझी गाईन, पूर्ण मनोभावे | सुख येथेही नांदते, तुझ्या क्रुपाभावे || फुल, केवडा अर्पुन, भजावे वरद | मोदक व करंजीचा नारळी प्रसाद || टाळ म्रुदुंग भजने, रात्र जागवती | निराळेच रुप तुझे कर जोडवती || निरोप तुला देताना, पाणवती डोळे | भेट नाही लवकर, मन कळवळे || चैतन्याचा तुच स्त्रोत, देव गणाधिष | सुखकर्ता, दु:खहर्ता ओंकार गणेश || (गणेशभक्त) नवशिका चेतन अवांतर : मिपावर आता छंदशास्त्र नावाचा नवीन साहित्य प्रकार सुरू करण्यात आलेला आहे. कृपया यापुढे छंदबध्द काव्य तेथे प्रकाशीत करावे. हा पर्याय मला तरी अजुनही कुठेही दिसत नाही आहे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1441
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया