--- ओढ वादळी ...(सवंगलता छंद) ---

केशवटुकार's picture
केशवटुकार in जे न देखे रवी...
24 Nov 2008 - 6:39 pm

काल प्रातःस्मरणीय नित्यवंदनीय गुरुवर्य केशवसुमार स्वप्नात आले, म्हणाले "आंद्या शिंच्या अरे झोपतोस काय ? उठ भाड्या .. मोठ्या विश्वासाने तुमच्या खांद्यावर काही जबाबदारी टाकली होती .. तुम्ही पार चिंध्या केल्या रे विश्वासाच्या !!" ... गुरुवर्याचा क्रोधित स्वर ऐकुन अंमळ घाबरलोच .. गुरुबंधु रंगारावाला फोन लावावा म्हटला तर गुरुदेव कडाडले .. "थांब जरा !! .. आज आलोच आहे तर हा द्वंद .. सॉरी छंद शिकुन घे !" ..

त्यांनी शिकवला तो सुरेख असा "सवंगलता छंद" ... अन आमची प्रेरणा मनिषाताईंची ही कविता ओढ वादळी ...(लवंगलता छंद)

तर मेहेरबान कदरदान पानदान थुकदान ... सादर आहे ...

--- ओढ वादळी ...(सवंगलता छंद) ---

नको नको चकली
बेसन पीठाची
साद देतो मार्ग मला
पुरे रे पुरेरे !

पाउलांना ओढ माझ्या
एकांत वासाची
झटक्यात उतरली
पातळी टाकिची !

घोंघावती दरीतूनी
अनावर वारे
वैतागली टीमही
बोंब बोंब मारे |

फराळास आवरा
दिवाळी नकोहो
सौदामिनी कडाडते
कडा काळजीची |

सर्दलेल्या चिवड्याची
गाज मनी राही
वादळी ही ओढ अशी
उमलते देही |

गुंजन हे मंद नको
वास जिव घेई
साद द्यावी त्याने, ज्याचे
पंख गरुडाचे |

-
आपलाच छंदबद्ध छंदोपंत

केशवटुकार

विडंबन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

24 Nov 2008 - 6:47 pm | लिखाळ

सवंगलतेतलीकविता खमंग आहे (उगीच शब्दच्छल).

साद देतो मार्ग मला
पुरे रे पुरेरे !
हा हा.. कविता छान आहे.
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2008 - 11:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सवंगलतेतलीकविता खमंग आहे (उगीच शब्दच्छल).
हाहाहा ...

झकास कविता आणि लिखाळकाकांचा प्रतिसादही! :-D

सहज's picture

25 Nov 2008 - 11:38 am | सहज

असेच म्हणतो.

विजुभाऊ's picture

24 Nov 2008 - 7:02 pm | विजुभाऊ

इतका छन्दिष्टपणा बरा नव्हे केशवटुकारभौ
पण काही म्हणा तोडलेत तोडलेत हो तुम्ही ;)

मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मनीषा's picture

25 Nov 2008 - 9:38 am | मनीषा

पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा !!!