स्टँनली मिलग्राम ,आज्ञाधारकता आणि मानसशास्त्र

आदित्य कनोजे's picture
आदित्य कनोजे in जनातलं, मनातलं
8 Oct 2020 - 12:19 pm

प्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ स्टँनली मिलग्राम यांनी १९६२ साली एक प्रयोग पूर्णत्वास नेला..जो समाजातील माणुसकीच्या वावराच्या वागणुकीचा एक्स-रे काढणार होता..ह्या प्रयोगाने नुसतं स्टँनली मिलग्रामचच आयुष्य बदललं नाही तर समूह मानसिकतेच्या संशोधनाच्या वाढीस चालना दिली..इतिहासाच्या घटनांना आणि त्यातील पात्रांना समजून घेण्यासाठी ह्या प्रयोगाने राजमार्ग दाखवून दिला.
आता जरा प्रयोगाकडे येऊयात म्हणजे एकूण पाश्वभूमी समजून घेता येईल.प्रयोगात दोन व्यक्तींना निवडलं गेल. यासाठी दोघांनाही पैसे देण्यात येणार आले..त्यामागे त्यांनी प्रयोग पूर्ण करणे आणि मार्गदर्शकाची आज्ञा मानने एवढीच अपेक्षा होती..लोकांची स्मरणशक्ती तपासण्यासाठी हा प्रयोग केला जातोय असे दोघांना सांगण्यात आलं. त्या दोघांना टीचर आणि लंर्नर असे पात्र देण्यात आलं. त्यातील लर्नर म्हणून काम करणारा व्यक्ति हा या प्रयोगाचाच एक भाग होता. मुळात तो स्टँनली मिलग्राम यांचाच माणूस होता. प्रयोगानुसार दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवन्यात आलं, जिथून दोघेही एकमेकांना पाहु शकत नव्हते. ज्या व्यक्तिला टीचर हा रोल दिला होता त्याच्यासमोर,त्याच्यासमक्ष मार्गदर्शकाने लर्नर रोल करणार्‍या व्यक्तिच्या दोन्ही हाताला वीज वाहन करणार्‍या कड्या बांधल्या. आणि दोघेही दुसर्‍या रूम मध्ये गेले जिथून त्यांचा आणि लर्नर चा संपर्क फक्त माइक मधून होणार होता. ज्या रूम मध्ये टीचर आणि मार्गदर्शक होते तिथे शोक जनरेटर मशीन होती.
प्रयोगानुसार टीचर लर्नर ला माइक द्वारे प्रश्न विचारणार आणि लर्नरने त्याच्याकडे असलेल्या मशीन द्वारे ए, बी, सी, डी अशा पर्यायानुससार उत्तरे द्यायची..जर उत्तर बरोबर असेल तर प्रश्न चालूच राहतील आणि जर चुकल तर लर्नरला शॉक देण्यात येईल...१ चुकला की १५ वोल्ट अस करत करत ४५०v पर्यंत जायचं.. मार्गदर्शक व्यक्ति टीचर सोबतच बसून त्याच्यावर लक्ष ठेवत होता. जसा प्रयोग चालू होतो ,तसा लर्नर पहिले सर्व बरोबर उत्तरे देतो पण नंतरनंतर ठरल्याप्रमाणे चुकीचे उत्तर देऊ लागतो..
“Wrong answer ! correct one is ‘blue’ ! ५०V” आस बोलून त्याला ५०वोल्टेज चा शॉक देतो ..
खरतर लर्नरच्या हाताला बांधलेल्या कड्या ह्या मुळात वीजवहन करतच नव्हत्या..तो फक्त टीचरची खात्री पटवण्यासाठी रचलेला डाव होता.
हे बराच वेळ सुरळीत चालू असत पण १५० वोल्टेज नंतर ठरल्यानुसार तो जोरात किंचाळायला लागतो..

“Uhhhhh!Get me out of here! Let me out !”

त्याच्या किंचाळन्याचा आवाज एकून टीचर मार्गदर्शकला बोलतो आपण इथेच थांबवायला हवं. त्या व्यक्तिला त्रास होत असावा.. पण मार्गदर्शक सौम्य (कोणतीही दडपशाही न करता) शब्दात सांगतो आपण प्रयोग थांबवू शकत नाही.. ठरल्याप्रमाणे लर्नर मध्ये मध्ये चुकीची उत्तरे देतच राहतो..
असं करत करत 200 वोल्टेज च्या वर गेल्यावर स्पीकरमधून पुन्हा त्याच्या किंचाळन्याचा आवाज येतो.आता रागाने तो जोरजोरात बोलू लागतो.

“I told you, I have heart problem ! My heart’s start bothering me! Let me out of here!Get me out!”
त्याची वाक्ये एकूण टीचर थोडासा बेचैन होऊ लागतो.
“मी पुढे हा प्रयोग पुढे नेऊ शकत नाही.समोरच्या व्यक्तिला काही झालं तर..त्याला जवाबदार कोण?”
“Resposibilty is mine ! Please continue teacher!” मार्गदर्शक म्हणतो.
असं त्याने म्हटल्याबरोबर अनपेक्षितपणे टीचर प्रयोग चालू ठेवतो ..जेव्हा वोल्टेज ४०० पर्यंत पोहोचतो तसं ठरल्याप्रमाणे लर्नर काही प्रतिसाद देत नाही..
“मला वाटतं समोरचा व्यक्ति मेला असावा..तो काहीच प्रतिक्रिया देत नाही आहे..”
“we can’t stop this experiment !Please continue! ” मार्गदर्शक तेच म्हणतो .
“I will not be responsible for anything happening!” टीचर ठणकावतो.
“correct! Resonsibilty is mine! Please continue!”
आणि आश्चर्य म्हणजे आपल्यावरची जवाबदारी झटकल्यावर तो ४५० वोल्टेज (dangerously severe shocks) जो त्या मशीन मधला शेवटचा आकडा असतो तो देतो..त्यावेळी त्याच्या मनात समोरचा व्यक्ति जीवंत आहे की नाही याबद्दल काळजी नसून आपण जवाबदारी पार पाडत आहोत असा आविर्भाव असतो.
शेवटच्या आकड्यावर पोहोचल्या नंतर प्रयोग थांबण्यात आला.त्यानंतर त्या रूममध्ये लर्नर व्यक्ति ठणठणीत अवस्थेत चालत येतो..हा प्रयोग रचलेला होता हे जेव्हा टीचर रोल मिळालेल्या व्यक्तिला सांगण्यात येत तेव्हा त्याला धक्काच बसतो..पुन्हा त्या व्यक्तिला विचारण्यात येतं,
“समोरचा व्यक्ति मरण्याच्या अवस्थेत असतांनाही तुम्ही प्रयोग चालू का ठेवला ?”
”कारण,मार्गदर्शक मला सांगत होता”
“तुम्ही ठरवलं असत तर त्यावेळी तुम्हाला प्रयोग थांबवता आला असता,पण तुम्ही तसं केलं नाहीत”
“हो..मी बराच प्रयत्न केला पण त्याने प्रयोग चालूच ठेवण्याची विनंती केली आणि सर्व जवाबदारी घायला तो तयार होता !”
“तुम्ही केलं ते योग्य केलत असं तुम्हाला वाटत का?”
“हो, मी थोडसं रुक्ष वागलो असेल ,पण मी माझी जवाबदारी पार पाडत होतो”
“तुम्हाला काय वाटत तुमच्यासारखंच काम जर १०० जणांना दिलं तर त्यातील किती लोक ४५० वोल्टेज पर्यंत वेदना देतील. ”
“मला वाटत की १०० पैकी ४ ते ५ लोकंच असं करतील..त्यातला मी एक असेल..(हास्य)”
“तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण १०० पैकी ६५ पेक्षा जास्त व्यक्तींनी आज्ञा पाळत शेवटच्या स्टेज पर्यंत वेदना दिल्यात”.
ह्या प्रयोगाचा उद्देश लोकांची आज्ञाधारकतेची मानसिकता जाणणे एवढाच होता.परिस्थिती आणि कारणे यानुसार हे आकडे कमी होऊ शकतात किवा चमत्कारिकपणे वाढूही शकतात. स्टँनली मिलग्राम यांच्या प्रयोगाला बरेच आयाम होते, तो फक्त त्या प्रयोगशाळेपर्यंत सीमित नव्हता..त्याचा आजूबाजूच्या घडणार्‍या,इतिहासात नोंद झालेल्या प्रत्येक घटनेशी निकटचा संबंध होता.
इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंद झालेल्या मानवतेच्या मूल्यांना काळिमा फासणार्‍या अनेक घटनांचा अन्वयार्थ या प्रयोगातून सिद्ध झाला. नाझीवादी लोकांनी concentration camp मध्ये ज्यु लोकांवर झालेला क्रूर अत्याचार किवा जालियनवाला बागेत जनरल डायर ने दिलेल्या आज्ञेवरुन सैनिकांनी गोळीबार करून केलेल्या निर्घुन हत्या या वरिष्ठ (higher authority) नि दिलेल्या आज्ञचे पालन (obedience) चाच प्रकार आहे..
आजही परिस्थिति बदलेली नाही..आजही तेच निकष लागू होतात अस मानसशास्त्रज्ञांच म्हणणं आहे.कोणताही व्यक्ति higher authority ची आज्ञा पाळताना कधीकधी नियम,मूल्ये ती विसरतात..हे आपल्या आजूबाजूच्या सामाजिक,राजकीय घटनांमध्ये सुद्धा दिसून येईल.higher authority म्हणजे फक्त बॉस च नाही तर एखादा नेता,संघटनेचा अध्यक्ष,आईवडील,मोठा भाऊ,अनुभवी व्यक्ति असं कोणीही असू शकतं. शेवटी आपण कितीही नकारचा पढा वाचला तरी कधीकधी आपणही चुकीच्या आज्ञाधारकतेला बळी पडतो..
बाकी विवेकाने निर्णय घेण एवढंच काय ते आपल्या हातात आहे...
.
आदित्य कनोजे ©
Alexander Milgram आणि Wesleyan University ने डॉक्युमेंट्री शैक्षणिक उपयोगासाठी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार..

समाजमाहिती

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

8 Oct 2020 - 1:32 pm | उपयोजक

लिहीत रहा! पु.ले.शु.

qलहान असताना मी चाचाकडे चिकन, मटण आणायला जात असे. चाचा मला विचारी, मेलेल्याच पाप कुणाला? मि सांगत असे मारणाऱ्याला. चाचा पुढे म्हणे मि तर तु सांगतोय म्हणुन मारत आहे. त्यावर मी म्हणत असे तुम्ही मारता म्हणून आम्ही विकत घेतोय. आज हे वाचून त्याचीच आठवण झाली. मारायला सांगु नये आणि मारु नये या दोन्ही निर्णयाची विवेक बुद्धी दोघांजवळ सुद्धा होती त्यामुळे जर निर्णय करायचा झाल्यास पाप सुद्धा वाटुन घ्यावे लागेल.

कुमार१'s picture

8 Oct 2020 - 7:49 pm | कुमार१

आवडले

आनन्दा's picture

9 Oct 2020 - 7:33 am | आनन्दा

प्रयोग एकांगी आहे.

मला वाटतं यात आज्ञापालन हा भाग कमी आहे.
यामध्ये कंमिटमेंट हा भाग जास्त महत्वाचा आहे.

एक बार मैने कंमिटमेंट कर ली तो फार मै अपने आप की भी नाही सूनता..

या गोष्टीमष्ये तो माणूस खरच मेला असता तर प्रयोगात असलेल्या लोकांनी हा प्रयोग पुन्हा करायला नकार दिला असता. कारण आपल्या एका चुकीमुळे एक माणूस मेळा हे त्यांना आयुष्यभर छळत राहिले नक्की.
तास प्रयोग कोणी केला आहे का? याच लोकांना लगेच अजून एक प्रयोगाची ऑफर द्यायची.. आत्तासारखेच कोणीतरी मरेल , आणि मी जबाबदारी घेतो याची कल्पना देऊन..
तरीही लोक तयार झाले असते तर आज्ञापालन किंवा अन्य काहीतरी आहे असे म्हणता येईल.
निष्कर्ष काढायला हा प्रयोग तोकडा आहे.