✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पदर

व
विनायक प्रभू यांनी
Sun, 11/23/2008 - 20:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17118 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/24/2008 - 17:17 नवीन

सहमत पण

तुमच्याशी सहमत पण तरीही ... चांगल्या घरातली मुले वहावत गेलेली दिसतात. (चांगले घर - सुशिक्षित आईबाप, मध्यमवर्गीय कुटुंब इ.इ.) सुशिक्षित आणि साक्षर (+ पदवीधर) यामध्ये गल्लत होत आहे का? चांगलं घर म्हणजेच चांगलं संगोपन असा विचार योग्य आहे का? प्रेशर टाकणारे पियर्स भलतेच पुढे गेलेले असतात. 'गेमिंग झोन' च्या नावाखाली सायबर कॅफेमध्ये पाचवीपासूनची मुले सर्रास पोर्न पाहतात हे माहित आहे. लहानपणापासून केलेल्या संगोपनाचा मुलांना आपले 'पिअर्स' निवडताना मदत करू शकत नाही का? किंवा आपल्यालाही नकाराधिकार असतो आणि तो योग्य वेळी वापरायचा असतो याचा वस्तुपाठ किती मुलांना खरोखरच मिळतो? लाड करावेत, कौतुक करावे, स्वातंत्र्य द्यावे याबरोबरच लक्ष द्यावे, नियंत्रण ठेवावे हेही पालकांचे कर्तव्यच आहे. योग्य त्या भूमिकेत शिरल्यावर आपसुकच असं शहाणपण येतं. अनेक पालकांच्या बाबतीत असं होतंही (माझे पालक कमी पडले नाहीत असं वाटतं), पण खरंच प्रत्येक पालकाच्या बाबतीत असंच होतं का? जसं या एका उदाहरणावरुन संपूर्ण पिढी चुकीच्या दिशेने जात आहे असा निष्कर्ष काढू नये तसंच, सगळेच शिकलेले, पदव्यांची माळ असणारे पालक "सुशिक्षित" असतात यावर विश्वास ठेवावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
ल
लिखाळ Mon, 11/24/2008 - 17:00 नवीन

घरातले

घरातले वातावरण आणि नव्याने मिळालेली लैंगिक जाणिव-माहिती यामुळे अशी समस्या निर्माण होऊ शकते. नव्हे आपल्यातल्या अनेकांना सर्वप्रथम जेव्हा समजले की स्त्री-पुरुषांतले लैंगीक संबंध कसे असतात..वगैरे तेव्हा ते पचायला काही दिवस लागले असतील. त्या काळात या समाजात आपले स्थान एक नर किंवा मादी असे आहे की आज पर्यंत समजत होतो तसे आईचा मुलगा, आजीचा नातू इत्यादी आहे असे प्रश्न पडले असतील. ज्यांच्या घरात मोकळे वातावरण आहे किंवा ज्यांना सुबुद्ध मित्र-मैत्रिणी मिळाल्या त्यांच्या बाबतीत असा गोंधळलेला काळ बराच कमी आणि कमी तीव्रतेचा असणार. वरील उदाहरणात सनातनी सोवळ्या घरातल्या मुलावर 'पावित्र्याचेच' संस्कार असणार. अश्या वेळी त्याचा झालेला गोंधळ अधिक तीव्र आणि जास्त काळ टिकणारा असणार. पॉर्नोग्राफि हा एक पैलू आहे आणि त्यावर प्रतिसादांत मते आहेतच. पण अशी समस्या पौंगडावस्थेत पॉर्नोग्रफिच्या शिवायही निर्माण होते / होऊ शकते. घरातले आपुलकिचे मोकळे वातावरण आणि चांगली संगत हाच मुख्य उपाय वाटतो. (थोबाडित मारणे आणि समस्या दाबणे अथवा थोबाडित मारुन आपण समस्येला एक हात दूर लोटणे हे बरोबर वाटत नाही.) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Tue, 11/25/2008 - 03:07 नवीन

हम्म...काही विचार पटले..काही नाही...जसे..

सनातनी सोवळ्या घरातल्या मुलावर 'पावित्र्याचेच' संस्कार असणार. अश्या वेळी त्याचा झालेला गोंधळ अधिक तीव्र आणि जास्त काळ टिकणारा असणार....असं मला नाही वाटत...कारण की तुम्ही मुलाना कस वळण लावता ह्यावर मुलं किती परिपक्व असतात हे ठरतं...जसं "मी" म्हणतात की "मला वाटतं पालक आणि पाल्य यांच्यातला सुसंवाद हेच यावरचं एकमेव उत्तर आहे. पाल्याला समजलं पाहिजे, आपल्याला का नाही म्हणताहेत. शिवाय अफाट उत्साहावरही नियंत्रण हवच." ह्याचाच अर्थ वळण लावण आणि ते संवादातुन बरचसं आणि थोडं धाकातुनही. आमचं घर सनातनी होते पण आमचा काडीचाही गोंधळ नाही...उलट आम्ही ठरवलं की हे आपल क्षेत्र नाही आणि त्यापासुन पहिल्या पायरी आधीच लांब गेलो. तात्या म्ह्मणतात तसे : "प्रभूसर, दोन सणसणीत कानशीलात भडकावल्याने बरेचसे प्रश्न सुटतात असा माझा विश्वास आहे..तेच सर्वात उत्तम समुपदेशन आहे!.." आपण तात्यांच्या बरोबर आहे. इकड तिकड न बघता दोन कानशिलात ठेऊन देणे हाच मार्ग, कारण जर मुलाला पॉर्न बघणं जमु शकतं/कळु शकत तर ते बघु नये हेही कळल पाहीजे तितकी मुलं मोठी असतात नक्की... गट्ण्या म्हणतो तसं "उगाच नको त्या लोकांना मानवाधिकार दिल्याने फुकट डोक्याला त्रास होतो." एकदम सहमत.... एक निश्चित चांगला विषयावर चर्चा घडवुन आणल्याबद्दल प्रभुसरांचे आभार... (अश्या बाबतीत मारकुटा) मुकुल...
  • Log in or register to post comments
म
मृदुला Tue, 11/25/2008 - 04:23 नवीन

तीन वर्षं?

विविध प्रतिसादांतले २००५ सालाचे उल्लेख, व मूळ लेखातील तीन वर्षं मागे असल्याचा उल्लेख समजला नाही. अदिती, नाना चेंगट व महेश हतोळकर यांचे प्रतिसाद बहुतांशी पटले. योग्य वयात व टप्प्याटप्प्याने लैंगिक 'शिक्षण' मिळणे आवश्यक आहे. त्यातही प्रत्येक माणसाची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. मला स्वतःला बारा पूर्ण तेरा चालू, इयत्ता आठवी या वयात पुष्कळ मूलभूत गोष्टी समजल्या. एका शिकवणीच्या बाईंनी एका तासाला चित्रे वगैरे काढून व्यवस्थित माहिती दिली. त्यानंतर मला सगळ्या व्यवस्थेबद्दल साधारण कोणत्याही वैज्ञानिक गोष्टीबद्दल (उदा क्ष किरण कसे काम करतात) कळल्यावर वाटते तसेच 'अमेझिंग' वाटले होते. तर माझ्या शेजारी बसणार्‍या मुलीला आईवडिलांविषयी 'घाण' वाटायला लागले होते! प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा. लहानपणापासून होणारे संस्कार महत्त्वाचे. जर ह्या सगळ्या गोष्टी बाजारू, घाण, वाईट, पापयुक्त वगैरे आहेत असे संस्कार झाले असतील तर लेखातल्या मुलाची प्रतिक्रिया झाली तशी होण्याची शक्यता आहे असे वाटते.
तुम्हाला शीमेल ही काय भानगड असते ते माहित आहे काय?
शीमेल म्हणजे धड पुरुष नाही ना स्त्री. ह्यात जनुकीय दोषामुळे काही स्त्रीची तर काही पुरुषाची जननेंद्रिये (अंडाशय, गर्भाशय, बाह्य जननेंद्रिये इ.) एकाच माणसात प्रकटतात. माणसाच्या तेवीस गुणसूत्रांपैकी एक जर एक्सवाय जोडी असेल तर तो पुरूष, एक्सएक्स असेल तर स्त्री हे सहसा आपल्याला माहित असते. जर गर्भधारणेच्या वेळेला अपघाताने, एक्सएक्सवाय असा चुकीचा तिढा त्या जागी आला तर शीमेल व तत्सम माणसे जन्मतात. इतर अनेक जन्मजात अपंगत्वांप्रमाणे हे एक. त्यांच्याविषयी घृणा वाटू नये, करुणा वाटावी.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 11/25/2008 - 09:52 नवीन

"जर

"जर गर्भधारणेच्या वेळेला अपघाताने, एक्सएक्सवाय असा चुकीचा तिढा त्या जागी आला तर शीमेल व तत्सम माणसे जन्मतात. इतर अनेक जन्मजात अपंगत्वांप्रमाणे हे एक. त्यांच्याविषयी घृणा वाटू नये, करुणा वाटावी." खरय, पण, काहीजनं पैसे खर्च करुन शिमेल बनतात, तथाकथीत "स्त्री"मानसीकता असते म्हनुन. ही सारी "होमो"गिरीची लेकरंबाळ आहेत. मुळात या अशा विक्रुति ज्यांना पाळायच्यात त्यांनी पाळाव्यात, पण समाजाने त्यांना मान्यता देवू नये. पोर्नसंबधी महत्वाचा मुद्दा म्हणजे, जे खरं किंवा नैसर्गीक नसतं(थोडक्यात कॉमन नसत) तेच तेथे वारंवार दाखवंल जातं. अनवधानाने, मुल, त्यालाच खरं समजतात. " इन्सेस्ट" "animal"नावाचे विक्रुत प्रकारही अस्तित्वात आहे आणि त्याचे बरेच चाहतेहि आहेत. म्हणुन, ऊबंरठ्यावरच्या मुलांना, त्यातलहि चांगल- वाइट(खरं-खोटं) काय हे सांगन गरजेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृदुला
व
विनायक प्रभू Tue, 11/25/2008 - 11:38 नवीन

येस स्रर

दाखवलेले जाणारे क्तिती खरे आणि किती खोटे हे समजवुन सांगणे महत्वाचे पण तितकेच अवघड.शीमेल ने पुरुषाच्या मुसक्या वळुन त्याच्यावर अनैसर्गिक बलात्कार करणे ह्या क्लिप्स ना विषेश मागणी आहे असे कळते.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 11/25/2008 - 12:08 नवीन

खरतरं या

खरतरं या अशा मंडळींना "cult" समजुन त्यांना "cultism prevention " चे कडक कायदे लावले पहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा