(मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही?)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in काथ्याकूट
4 Sep 2020 - 2:57 pm
गाभा: 

पेरणा
मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही?

मटा, सकाळ, लोकसत्ता इत्यादी इ पेपरांचे व इतर इ-मंचावचे वाचक बरेचदा खोटेपणा, बेरकीपणा इत्यादी 'गुणांचा' आधार घेत प्रतिक्रीया लिहिताना दिसतात. मिपावर मात्र बरेचदा प्रामाणिक, प्रांजळ,अभ्यासपूर्ण प्रतिक्रियां मधून सदस्यांचा एकमेकांबद्दल आदर वात्सल्य भाव आणि विषय समजून घेण्याची तळमळ दिसून येते.
त्यामूळेच कदाचित नवकवी नवा लेखक इथे मोकळे पणाने लिहू शकतात.

जितका लेख प्रामाणिक तितका खरेपणा प्रतिक्रियां मध्ये ओतप्रोत भरलेला असतो.

हे खरे मानले तर तसे का आहे?

असे असेल तर मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही?

(निरागस) पैजारबुवा,

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Sep 2020 - 5:01 pm | कंजूस

म्हणजे काय?
इतर ठिकाणी रामराज्याचा हैदोस चालू आहे काय?

1)बंद ग्रुप असल्या मुळे सभासद च्या व्यक्त होण्यावर बंधन आहे .
२)शिव राळ भाषा इथे वापरली जात नाही.
३)सभासद जे मिपा चे आहेत ते शिक्षित आणि खुल्या विचाराचे आहेत.
4) सदस्य संख्या किती ही असली तरी लीहणार आणि प्रतिक्रिया देणारे ठराविक च सदस्य आहेत.
अनेक दिवसाच्या सहवास मुळे त्यांना एकमेका विषयी आदर आहे.
प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी सर्व एकमेकाच्या ओळखीचे आहेत.
हीच कारण आहेत.
मीपा आणि बाकी ठिकाणच्या प्रतिसाद च्या भाषेच्या दर्जात.

गामा पैलवान's picture

4 Sep 2020 - 7:10 pm | गामा पैलवान

ज्ञापै,

रामराज्यातली प्रजा मोक्षप्राप्तीची साधना करण्यासाठी जन्मास येत असे. एका नवमातेने अंगावर पाजतांना बाळाला म्हंटलेलं की बाळा, तू रामराज्यात जन्मला असल्याने हा तुझा शेवटचा जन्म आहे. यापुढे तुला मातृपानाचं सुख मिळणार नाही. तेव्हा तू माझं अमृत तू भरपूर पिऊन घे.

याउलट, मिपावर साधना करून मोक्ष मिळायची कुणाचीच इच्छा नाही. कारण की मिपा हा साक्षात वैकुंठ आहे. आहात कुठे! ;-)

आ.न.,
-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2020 - 4:24 pm | संजय क्षीरसागर

फक्त प्रशासनानं व्यक्तिगत प्रतिसाद आल्याआल्या उडवले पाहिजेत आणि कोणत्याही सदस्यानं असा तीसरा प्रयत्न केला की आयडी उडवायला हवा.

व्यक्तिगत रणधुमाळी थांबली की रामराज्य सुरु !

पण प्रशासनाचं धोरण इतकं उदार आहे की व्यक्तिगत प्रतिसाद न देण्याची जवाबदारी त्यांनी सदस्यांवर टाकली आहे.

मुद्दा पटला नाही किंवा स्कोअर सेटल करायची संधी दिसली की सदस्य व्यक्तिगत प्रतिसाद सुरु करतात. काही सदस्य तर विषयातलं काहीही गम्य नसलं तरी स्वतःचं फ्रस्ट्रेशन धाग्यावर (किंवा खफवर) काढतात किंवा तद्दन भिकार विडंबनं पाडतात (अशा विडंबनांना मग इतर पराभूत लटकतात) . प्रशासनाकडे तक्रार केली तर उदार धोरणामुळे (म्हणजे सदस्यच सुसंकृतपणे वागतील या आशेनं) दखल घेण्यात दिरंगाई होते. तेंव्हा पेशंन्स संपतो मग रणधुमाळी सुरु होते.

आनन्दा's picture

7 Sep 2020 - 10:11 am | आनन्दा

शंभर टक्के खरे.
या यादीत अजून दोन गोष्टी वाढवल्या पाहिजेत..

ती म्हणजे नवोदितांना खिजवण्यासाठी एखाद्याच्या तरल लेखनावरती पाचकळ विनोद करणे, किंवा विचारले नसताना ज्ञान वाटून समोरच्याच्या बुद्धीमत्तेचा उद्धार करणे.

या दोन गोष्टी पण मिपा मालकांनी या यादीत वाढवून एक निषिद्ध गोष्टींची यादीच बनवून ठेवावी म्हणतो.

प्रत्येक प्रतीसादाबरोबर (धागा किंवा खफ) सहमत, असहमत, आवडले , नाही आवडले ( फक्त असंबधीत, अयोग्य ), व्यक्तीगत अशी एक ड्रॉपडाउन लिस्ट किंवा आयकॉन्स असावेत ( नाहीतर प्रतीसाद Cluttered दिसेल )

प्रतीसादाखाली फक्त आत्तापर्यंत रजिस्टर झालेल्या कॅटेगरीजचा टॅग आणि काउंट दिसावा.
+१ , सहमत, असहमत वगैरे जास्तीचे प्रतीसाद द्यावे लागणार नाहीत. शिवाय फक्त वाचनमात्र लोकांनाही आपले मत प्रतीसाद न देताही रजिस्टर करता येईल

३ किंवा जास्त "नाही आवडले" (खरोखरच अयोग्य किंवा असंबधीत असावा ) किंवा एक व्यक्तिगत रिपोर्ट झाले तर तो प्रतीसाद आपोआप (संबधितांना आणि प्रशासकांना नोटीस जाउन) Reported स्टेटस मधे जाउन फक्त Collapse mode मध्ये दिसावा आणि संपादकानी अप्रुव केल्याखेरीज उघडता येऊ नये.

आपापल्या Discretion नुसार याचा योग्य वापर करावा .
-------------------------------------------------------------------------------

धाग्यांसाठीही अशी प्रोविजन असावी ( त्याचे नोटिफिकेशन संपादकांना जाउन तो ठेवावा कि ऊडवावा याचे हक्क राहतील).
-------------------------------------------------------------------------------

असे केल्यास मिपा ऑटो पायलट मोड मधे चालेल आणि आत्ताच्या नोंदवा आणि दखल घ्या अशा संपादनाची फार गरज राहणार नाही. वेळ आणि श्रम वाचतील.

उपयोजक's picture

6 Sep 2020 - 1:26 am | उपयोजक

मोफतच्या संकेतस्थळावर इतक्या सुविधा देणे परवडेल का?

उन्मेष दिक्षीत's picture

6 Sep 2020 - 1:51 pm | उन्मेष दिक्षीत

व्यनि , खरडवही, वाचनखुणा या सुविधा आहेत, पण वर सुचवलेल्या (इथले वातावरण हेल्दी राहावे यासाठी) या संकेतस्थळासाठीच्या जास्तीच्या सुधारणा आहेत.
(याशिवाय शुद्धलेखन, सर्च स्ट्रिंग, टॅग्स या उपयुक्तता बाकिच्या मोफत मराठी संस्थळावर आहेतच).

इथे प्रत्येकाचे एक प्रायवेट पेज द्या असे म्हटले असते तर वेगळे होते.

मदनबाण's picture

6 Sep 2020 - 10:47 am | मदनबाण

ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० :- https://misalpav.com/node/47411 हा धागा मी सुरु केला होता,हा धागा आता अप्रकाशित केला किंवा उडवला आहे.

रामराज्य सोडाच इथे शिवशाही देखील अवतरीत होउ शकत नाही !

अवांतर :- काही काळापूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरुन परत एकदा राजकारण केलं गेलं होत.

'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणा; शरद केळकरचा व्हिडिओ व्हायरल
VIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा…

आता हे मी इथे का सांगतोय तर... ज्या धाग्यात मला लिहण्याची इच्छा होती तो आता मला लिखाण करण्यास उपलब्ध नाही.

या संजयवाणीतुन निघाले काही शब्द :-
१] आपका भी बाप दिखाइयें
२] क्या होता है कानुन ?
३] हरामखोर लडकी
४] शिवाजी महाराज

इथे छत्रपती शब्दाचा वापर केला गेला नाही, हे वाचक आणि श्रोत्यांनी लक्षात घ्यावे.

जाता जाता :- या मुक्त मंचावर प्रामाणिकपणे लिखाण करावे का ? कारण लिखाण करणार्‍यांना उपद्रव निर्माण करणार्‍यांना मुक्तरान देउन अभय दिले जाते असे चित्र मात्र मिपा वाचकांना सातत्याने दिसते. तसेच अश्या आयडीज अ‍ॅक्टिव्ह होण्यास परवानगी दिली जाते जिथे अनेक लिखाण करण्यास उत्सुक असणार्‍या आयडीज मात्र अ‍ॅक्टिवेट होण्याच्या प्रतिक्षेत असतात ! उपद्रव निर्माण करणार्‍या आयडीज नक्की कोण अ‍ॅक्टिव्ह करतो आणि का ? हे २ गहन प्रश्न आहेत.
माझ्या १२ वर्ष ६ महिन्यातील इथल्या प्रवासात मला मिपा प्रशासनाने इथे लिखाण करु दिले हे अधोरेखीत करतो. आता मात्र हे प्रशासन खरचं तसे राहिले आहे का ? असा प्रश्न मात्र निर्माण होण्यास वाव निर्माण झाला आहे हे खेदाने नमुद करावेसे वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war

मराठी_माणूस's picture

6 Sep 2020 - 4:18 pm | मराठी_माणूस

तो धागा का अप्रकाशीत झाला ?

तो धागा का अप्रकाशीत झाला ?
मलाही ते ठावूक नाही. प्रशासनास त्या धाग्यातील काही भाग अयोग्य वाटला असु शकतो,असे केवळ अंदाजाने सांगु शकतो. संपूर्ण धागा अप्रकाशित करण्या ऐवजी, जो भाग अयोग्य वाटतो तो काढुन धागा तसाच ठेवता आला असता असे मल वाटते. मी त्यांना या बद्धल कोणताही प्रश्न विचारलेला नाही किंवा आक्षेप घेतलेला नाही, केवळ धागा उपलब्ध नाही एव्हढेच नमूद केलेले आहे.
मी व्यक्त केलेले मत हे उपद्रव करणार्‍या आयडीं बद्धलच आहे हे लक्षात घेण्याची आवशक्यता आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war

मराठी_माणूस's picture

6 Sep 2020 - 6:35 pm | मराठी_माणूस

जो भाग अयोग्य वाटतो तो काढुन धागा तसाच ठेवता आला असता असे मल वाटते.

सहमत.

बहुदा नविन साहित्य संपादकांची नेमणुक झालीये. नवि विट्टी नवे राज्य नवे नियम.

कोहंसोहं१०'s picture

6 Sep 2020 - 8:06 pm | कोहंसोहं१०

उपद्रव निर्माण करणार्‍या आयडीज नक्की कोण अ‍ॅक्टिव्ह करतो आणि का ? हे २ गहन प्रश्न आहेत. >>>>>>> मलाही हे दोन प्रश्न पडले होते जेंव्हा ३ वर्षानंतर अचानक एक आयडी अ‍ॅक्टिव्ह झाला आणि आल्याआल्या त्याने सुरुवातच वादग्रस्त मुद्द्यावर धागा काढून आणि प्रतिसाद देऊन केली आणि हा सिलसिला आजतागायत सुरूच आहे. हल्लीच वाचनात आले की खफ वर पण असाच उपद्रव मांडलेला या आयडीने.
हा एक अनुत्तरित प्रश्नच आहे की बॅन झालेला आयडी अचानक अ‍ॅक्टिव्ह करण्याची अशी काय कारणे असावीत? ज्याला लिहायचेच आहे तो सरळ दुसरा आयडी घेईल आणि लिहील. उपद्रवी बॅन आयडी ऍक्टिव्ह होत राहिले तर काही वर्षात चांगले कसदार लेख येण्याऐवजी उपद्रवी आयडीच इथे धुमाकूळ घालत बसतील. त्यांच्यासाठी ती एक मोठ्या दिलास्याची गोष्ट आहे.
एकदा बॅन झाल्यावर उपद्रवी आयडी पुन्हा ऍक्टिव्ह केला जाणार नाही अशी कठोर भूमिका प्रशासनाने घ्यावी असे मला वाटते. बाकी मिपाचे मॅनॅजमेण्ट (त्यांना जरी मी ओळखत नसलो तरी) मिपाचा दैनंदिन कारभाराचे व्यवस्थापन उत्तमरीतीने करतात यात कोणताच वाद नाही.

ज्याला लिहायचेच आहे तो सरळ दुसरा आयडी घेईल आणि लिहील.
आयडी बदलले तरी त्यामागचा व्यक्ती आणि त्याची मानसिकता बदलत नाही, एकाच वेळा अनेक आयडी बनवुन ठेवले असण्याची शक्यता अधिक दिसते. एक बॅन केला की तो दुसरा वापराला लागतो. अश्या पद्धतीने वर्तन करणे ही एक मानसिक विकृती आहे. वेळीस मनास लगाम घालणे ज्या व्यक्तीस जमत नाही तो यात अधिक अडकत जातो आणि असे वर्तन करण्यातच आनंद मानु लागतो.
आयडी अ‍ॅक्टिव्हेट केला जाताना तो कोणी अ‍ॅक्टिव्हेट केला याचा लॉग सेव्ह करण्याची जर सोय असेल तर भविष्यात असे आयडी अ‍ॅक्टिव्हेट होणार नाहीत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional war

कोहंसोहं१०'s picture

7 Sep 2020 - 12:46 am | कोहंसोहं१०

आयडी बदलले तरी त्यामागचा व्यक्ती आणि त्याची मानसिकता बदलत नाही, >>>>
सहमत. परंतु प्रत्येकजण तसे करेलच असे नाही. म्हणूनच मी म्हणालो होतो "ज्याला लिहायचेच आहे तो". कारण नवीन आयडी घेऊन अकाउंट बनवणे उपद्व्याप प्रत्येक जण करेल याची शाश्वती नाही.
आता हेच बघा ना, ३ वर्षांपूर्वी बॅन झालेला एक आयडी दुसरा आयडी घेऊन आल्याची शक्यता कमी होती कारण त्याने तसे केले असते तर त्याच्या विशिष्ट लेखनशैलीमुळे लगेच पकडला गेला असता. यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळे, निदान त्या व्यक्तीने (कदाचित) नवीन आयडी धारण केला नाही, परिणामी एका आयडीचा उच्छाद ३ वर्षे तरी बंद होता इथे. परंतु अचानक तो ऍक्टिव्ह केला गेला आणि आल्या आल्याच त्याने बॅन होण्यापुर्वीचे रंग उधळायला सुरुवात केली (जे अजुनपण सुरूच आहे).
बॅन झालेल्या जुन्या आयडी चे पुनरुज्जीवन करणे एकतर बंद झाले पाहिजे किंवा ते केल्यास एका धाग्याद्वारे त्यामागची पार्श्वभूमी/कारणे देखील प्रशासनाने सर्व सदस्यांना दिली पाहिजे असे मला वाटते.

विजुभाऊ's picture

10 Sep 2020 - 3:20 am | विजुभाऊ

शंभर टक्के सहमत मदनबाण.
मी शिवसेनेच्या कालच्या मोडामोडीवर एक लेख लिहीला होता. तो दिसत नाहीये.
तो कोणी आणि का उडविला याची काहीच कल्पना नाही.
मिपावर इतकी वर्षे मिपावर वावरतोय पण असे कधीच झाले नाही.
सदस्यांना व्यनी ने त्यांचे लिखाण आक्षेपार्ह आहे हे कळवले जायचे. आणि मगच उडवले जायचे.
ज्या कोणी लेख उडविला त्यानी किमान कारण कळवण्याइतके सौजन्य दाखवले असते तर बरे झाले असते

कपिलमुनी's picture

6 Sep 2020 - 12:05 pm | कपिलमुनी

मिपावर सध्या रामराज्य आहेच .
एवढ्या पाट्या टाकून सदस्य ऍक्टिव्ह आहेत , फेक न्यूज टाकून आयडी उडाले नाहीत , अजून किती रामराज्य हवंय ?

चालू आहे ते छान आहे. अजून रामराज्य हवे असेल तर सकस लिहा, कॉपी पेस्ट मारू नका , आणि काहीजण लाल बत्ती दाखवत हिंडतात त्यांच्याबदल बोलणे एवढी त्यांची पात्रता नाही

रामराजालाही ट्रोल करून बायको सोडायला लावलीच होती.

उपयोजक's picture

7 Sep 2020 - 12:17 pm | उपयोजक

करणार्‍या सदस्यांनी संपादक किंवा मिपाप्रमुख यांना काही संदेश पाठवल्यास आणि तो दखल घेण्याजोगा असेल तर त्वरीत कार्यवाही व्हावी किंवा उत्तर तरी दिले जावे. संदेश पाठवणार्‍या व्यक्तीचा व्यासंग , प्रत्यक्षात किंवा फोनवर आपण संदेश पाठवणार्‍याला भेटलोत का? वगैरे निकष लावून सदर व्यक्तीच्या संदेशाला उत्तर द्यावे की नाही हे ठरवले जाऊ नये.साम्यवाद असावा.

कपिलमुनी's picture

7 Sep 2020 - 1:51 pm | कपिलमुनी

यांव असावे त्यांव असावे म्हणणाऱ्यानी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असावे.
व्याप सांभाळून काडीचा फायदा नसताना खिशाला चाट लावून , स्वतःचा बहुमोल वेळ देऊन जे इतकी वर्षे उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ असावे . नाहीतर एकदा कैसी वरून अनुभव घेऊन यावे म्हणजे कंपूबाजी वगैरेचा खरा झटका बसेल

प्रचेतस's picture

7 Sep 2020 - 2:06 pm | प्रचेतस

अगदी सहमत.

गामा पैलवान's picture

7 Sep 2020 - 5:56 pm | गामा पैलवान

अगदी अगदी सहमत. ऐसीवर नाही पण माबोवरून कंपूबाजीमुळे ५ (अक्षरी पाच) वेळा हाकलला गेलोय.
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2020 - 7:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यांव असावे त्यांव असावे म्हणणाऱ्यानी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असावे.
व्याप सांभाळून काडीचा फायदा नसताना खिशाला चाट लावून , स्वतःचा बहुमोल वेळ देऊन जे इतकी वर्षे उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ असावे .

१०० % सहमत.

-दिलीप बिरुटे

Rajesh188's picture

7 Sep 2020 - 2:53 pm | Rajesh188

सहमत

Rajesh188's picture

7 Sep 2020 - 11:56 pm | Rajesh188

मिसळ पाव निर्माण करण्याचा हेतू हा एका ठराविक विचार श्रेणी ला promote करायचा नक्कीच नाही.
काही संकेत स्थळ ठराविक विचार promote करण्यासाठी प्रायोजित तत्वा वर चालू आहेत काय अशी जाणीव होते तिथे वेगळा विचार कोणी मांडला की कंपू बजीचा सामना करावा लागतो.
इथे सर्व प्रकारच्या विचाराचे स्वागत केले जाते.
व्यक्त होण्यासाठी हे स्थळ योग्य आहे..
मिसळ पाव हे अतिशय उत्तम संकेत स्थळ.
विविध विचार जिथे व्यक्त होतात त्याचे वेगळेच सौंदर्य असते.
आणि ते इथे आहे.