एकतारी
धपापता ऊर
गातसे ललित ।
हळवे ते सूर
जीवघेणे ।।
विरहाने चूर
ठिणगी विदेही।
जाणवतो धूर
काळजात ।।
वेदनेचा पूर
क्षितिज ओलांडे
वासुदेव दूर
भिजे स्वतः ।।
राऊळीं कापूर
एकटा झुरतो ।
ज्याची हुरहूर
तोच जाणे ।।
चांदण्या फितूर
दिसे कृष्णमेघ ।
वाजे कणसुर
एकतारी ।।
- अभिजीत
सुरेख रचना !
कणसुर
सुरेख
वाह!