✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

आषाढाच्या एक दिनी

न — नूतन, Tue, 07/28/2020 - 14:41
आषाढाच्या एक दिनी... कुंद,सावळ्या वातावरणी आषाढाच्या एक दिनी हिरवा डोंगर झाकून जाई पाऊसभरल्या मेघांनी स्तब्ध तरूंवरी स्तब्ध पाखरे लोकालयीही तीच स्तब्धता वाराही जणू रुसून बसला मनात भरवूनी उदासीनता अशात कुठुनी चुकार बगळा कापत जाई मेघांना भेदरलेली चिमणी बसली मिटून अपुल्या पंखांना असाच काही काळ लोटला अन् डोलू लागले वृक्षलता वा-यासंगे जणू मिळाली वर्षागमनाची वार्ता झरझर,सरसर पडू लागल्या धवल शुभ्र पाऊसधारा उदासलेल्या चराचरावर हो चैतन्याचा शिडकावा

प्रतिक्रिया द्या
2499 वाचन

💬 प्रतिसाद (5)

आषाढ मस्तच वर्णन केलाय,

गणेशा
Tue, 07/28/2020 - 19:16 नवीन
आषाढ मस्तच वर्णन केलाय, आवडली कविता
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/28/2020 - 19:35 नवीन
सुरेख वर्णन, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त आहे कविता.. पण ह्या

मन्या ऽ
Wed, 07/29/2020 - 11:42 नवीन
मस्त आहे कविता.. पण ह्या वर्षी आषाढ कोरडाच गेला...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Wed, 07/29/2020 - 13:47 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

प्राची अश्विनी
Wed, 08/05/2020 - 17:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा