✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

अ — अनिल चव्हाण रामपुरीकर, Tue, 07/28/2020 - 13:15
आज सगळ जग डेवलप होतय , इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय , अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय | तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय , रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय, दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप || असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? मोठाले याप‍री ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात, देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात | पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार न ‌फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, || त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास , अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास | आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख, आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक || पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात, शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला, हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात | त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप, असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप || टिप : ही कविता मा.बो. वर आधिच प्रकशित आहे , अनिथ या माझ्याच आय डी ने. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
30155 वाचन

💬 प्रतिसाद (74)

मूळ मुद्दा समजून घ्या.

सुबोध खरे
Sat, 08/01/2020 - 12:37 नवीन
मूळ मुद्दा समजून घ्या. अलीला लागणारे अनेक परवाने (कुलन्ट गॅस विकत घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी यासारखे) शेतकऱ्याला तसेच्या तसेच लागतात का? दुकान रहिवासी क्षेत्रात चालवता येत नाही( निदान मुंबईत तरी कायदे बऱ्यापैकी कडक पणे पाळले जातात) . व्यावसायिक जागीच दुकान असावे लागते. त्याचे भाडे/ किंमत रहिवासी क्षेत्रापेक्षा भरपूर जास्त असते. अलीला बापजाद्यांकडून काहीही फुकट मिळालेले नव्हते. सरकारी अधिकारी आले कि त्यांचे "चहापाणी" करावे लागते. वीज फुकट तर नाहीच परंतु ११ रुपये युनिट ने घ्यावी लागते आणि दुरुस्त केलेला प्रत्येक ए सी चालू ठेवून थंड होतो कि नाही हे पाहण्यासाठी विजेचे भरमसाठ बिल येते. त्यातील एक दमडी कधीही माफ होत नाही. प्रत्येक व्यवसायाचे आपले प्रश्न वेगळे असतात उगाच अहमदशहा अब्दालीची शेंडी बाजीरावाला लावू नका मूळ मुद्दा समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

यात एकाही प्रश्नाचे उत्तर नाही

कपिलमुनी
Sun, 08/02/2020 - 00:54 नवीन
जमत नसेल तर राहू द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तात्पुरता उपाय म्हणून तुमचा सल्ला योग्य आहे

Rajesh188
Sat, 08/01/2020 - 13:29 नवीन
मुळात सर्व्हिस सेक्टर आणि उत्पादन सेक्टर हे दोन्ही भिन्न बाबी आहेत. सेवा क्षेत्रात एसी रेपैरिंग येते . शेती उत्पटन क्षेत्रात येते. दोन्ही च्या अडचणी वेगळ्या आहेत त्यांची मिसळ करायला नको. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधाण्यासाठी त्यांनी शहरात या आणि लहान सहान धंदे आणि नोकऱ्या करा हा तात्पुरता पर्याय झाला . झोपड्या ची वाढ होण्यास हेच कारणीभूत आहे. झोपडपट्टी राहणारे आणि किरकोळ काम करून पोट भरणारे ह्यांची अवस्था केविलवाणी होते शहरात. आणि बाकी असंख्य अडचणी निर्माण होतात त्या वेगळ्या. नियोजन बद्ध ग्रामीण विकास हाच शास्वत मार्ग आहे. आयटी इंजिियर्स ला मेडिकल क्षेत्रात काम असा सांगितले तर त्याचे लक्ष तरी लागेल का त्या कामात . आणि त्याच्या कडे ते स्किल सुद्धा नसेल. फक्त pattya टाकायचे काम करेल तो शेती ला पूरक व्यवसाय निर्माण झाले तर शेती व्यतिरिक्त पैसे कमविण्याची मार्ग मिळेल. शेती परवडत नाही तर ती सोडा आणि शहरात येवून वॉचमनी,करा,रस्त्यावर उभे राहून फेरीवाला बना,किंवा peoun बना हा काही उपाय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

you have to have employable

सुबोध खरे
Sat, 08/01/2020 - 19:26 नवीन
you have to have employable skills -- warren buffet
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

महाराष्ट्रातील विभागवार शेतकरी -१

कपिलमुनी
Fri, 07/31/2020 - 20:19 नवीन
महाराष्ट्रातील विभागवार शेतकरी पश्चिम महाराष्ट्र - सांगली , सातारा (माणदेश वगळता )आणि कोल्हापूर . या भागात मुबलक पाणी , कसदार जमीन , सहकार उद्योग , डेअरि उद्योग , साखर कारखाने , जागरुक मतदार यामुळे इथले शेतकरि उस , द्राक्ष , केळी अशी नगदी पिके घेतात , इथे तुम्हाला आत्महत्या केलेला शेत़करी सापडणार नाही. पुणे - नाशिक - उत्तम हवामान आणि भरपूर पाऊस यामुळे इथे पीक मुख्यत भाजि पाला उत्तम पिकतो , शहरी मार्केट जवळ असल्यने नगदि पिके घेतात आणि पैसे बरे मिळतात , सोबत पोळ्ट्री वगैरे व्यवसाय करतत. या भागात जमीनीचे रेट जास्त असल्याने आत्महत्या करण्यापेक्षा जमिनि विकून इतर उद्योग करतात . विदर्भ - सर्वाधिक आत्महत्या होणारे जिल्हे - अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा हे अत्महत्यांचे मुख्य केंद्र आहे. बेभरवशी हवामान, खासगी कर्जे , पाण्याचा अभाव आणि मुख्य म्हणजे गाव ना सोडण्याची वॄत्ती व १०० % शेतीवर अवलंबून कुटूंबे ही आत्महत्यांची कारणे आहेत.. सरकारने कितिही मदत केली तरि या भागात उद्योग , सिंचन आणि स्किलसेट आणि घर सोडण्याची मानसिकता तयार होत नाही तोवर इथल्या आत्महत्या अशाच राहणार पुढे चालू ..
  • Log in or register to post comments

शेती ची भरभराट ही देशाची गरज

Rajesh188
Fri, 07/31/2020 - 21:16 नवीन
शहरांची अवस्था गंभीर होवू नये म्हणून त्यांची काळजी घेणे पण सर्वांचीच जबाबदारी आहे. आताच पुणे,मुंबई,बंगलोर,सारख्या मोठ्या शहरांची अवस्था गंभीर झालेली आहे. ग्रामीण भागातून रोजगार साठी प्रचंड मोठी लोकसंख्या शहरात येत आहे. कसलेच नियोजन नसल्या मुळे शहर अस्ताव्यस्त वाढत आहेत. लोकांना चालायला जागा नाही तर मोकळ्या जागा तर असूच शकत नाही. हे असेच चालले तर एक दिवस भारतीय शहर मृत होतील. त्या मुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्र ह्या मध्ये बर्या पैकी यशस्वी आहे. कोकणात जबरदस्त ताकत आहे आहे . सहकारी साखर कारखाने,पाणी व्यवस्था,धरण,सहकारी दुग्ध व्यवसाय,वीज, रस्ते ह्या वर सरकारी खर्च झालाच पाहिजे. ग्रामीण भागात शेती आधारित उद्योग उभे राहिले तर लोकसंख्या शहरात येणार नाही. हीच ती वेळ आहे सावरायची. नंतर परिस्थिती हातात राहणार नाही.
  • Log in or register to post comments

सहकार क्षेत्र चा ज्यांनी पाया रचला

Rajesh188
Fri, 07/31/2020 - 21:22 नवीन
सहकार क्षेत्राचा ज्यांनी पाया रचला आणि तो सहकाराचा वृक्ष वाढवला त्या महान नेत्यांचा ,कर्मवीरांचे महाराष्ट्र शतशः ऋनी आहे. मुंबई,पुण्यात मराठी लोक कमी असण्याचे ते पण कारण आहे लोकांना गावातच रोजगार उपलब्ध आहे. त्या मुळे ते धाव घेत नाहीत. यूपी,बिहार सारख्या राज्यात ग्रामीण अर्थ व्यवस्था निर्माण च झाली नाही त्या मुळे प्रचंड स्थलांतर होत आहे. फक्त शहर वाढणे अभिमान ची गोष्ट नाही पुढल्या संकटाची चाहूल आहे.
  • Log in or register to post comments

आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर

पियुशा
Sat, 08/01/2020 - 21:40 नवीन
आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर ओतलेले दुधाचे can, टैंकर ओततना पाहुन मला तरी खुप वाइट वाटले , जे आपण इतक्या कषटाने कमवले तेच मातीमोल करण्याचा विचार तरी कसा येतो, कधी एखादा व्यवसाय बुडाला तर ते लोक आपले उत्पादन ऐसे रस्त्यावर फेकून देताना पाहिलेत का? एखादा फेब्रिकेशन वाला नांगर बनवनारा डुबीत निघाला कर्ज बाजारी झाला तर तो आपले नांगर फेकल का रस्त्यावर, हे फक्त एक उदाहरण ,ऐसे कितीतरी व्यसाय आहेत, पण शेतकरी बन्धु आपले पिकाला भाव नाही रस्त्यावर फेक, शेतात उभ्या पिकावर बुलडोज़र फिरव, दूध रस्त्यावर आतून दे , भाजी रस्त्यावर फेकून दे है असले प्रकार करतात त्याचे वाइट वाटते चीड़ येते, ज्या पिकानी, दुधानी आपल्याला तारल त्यालाच माती मोल करायचे धाडस फक्त " शेतकरी" करतो
  • Log in or register to post comments

लाल चिखल

कपिलमुनी
Sun, 08/02/2020 - 01:12 नवीन
शाळेत लाल चिखल नावाचा धडा होता , कुठे मिळाला तर नक्की वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@पियुशा..

गणेशा
Sun, 08/02/2020 - 06:44 नवीन
@पियुशा.. राजकीय, रयत क्रांती आणि विरोधक हे याला कारणीभूत आहेत, आणि दूध रस्त्यावर टँकर मधुन ओतणारे हीच लोकं आहेत.. मी तर म्हणतो फक्त दूध का.. पेट्रोल, गॅस, रस्त्यावरचे, खड्डे असे अनेक मुद्दे घेऊन आंदोलनं झाली होती पुन्हा तशीच सगळ्याची आंदोलने करा ना.. त्याला दम लागतो, आपन नक्की बोलाचीच कडी केली होती हे समोर येईल म्हणुन हे मार्ग.. खेदाने, करोना काळ.. केंद्र आणि राज्य दोन्हीकडे पैसेच नाहीयेत जास्त.. आणि अश्या वेळेस पुन्हा शेतकर्या मागून राजकारण करणाऱ्या लोकांची कीव वाटते.. आणि शेतकर्या नी राजकारण्या कडून काही अपेक्षा करू नये असे बिन्धास्त बोलणारे यामागून चाललेले राजकारण कसे पाहू शकतात.. दूध सोडून मुळ मुद्द्यावर बोलतो - पायाभुत सुविधा सरकार ने दिल्या पाहिजेत.. मग यात शेतकरी, गावाकडचे, शहरी... मध्यमवर्ग असले येतेच कोठे..? सरकार कोणाचे असुद्या त्यांनी मूळ काम हे केले पाहिजेच.. पण शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवायची नाही.. अरे.. मग काय करायचे.. त्याला भिकारी, कटोरा घेऊन उभा राहणारा ह्या नजरेने बघणे आपण सोडून द्यावे.. सरकार ने मग काय, फक्त शहरातले डांबरी रस्ते उचकटवुन सिमेंट चे रस्ते करायचे, बुलेट ट्रेन शहरांना जोडायची हेच करायचे का.. असो.. शेतकऱ्यांच्या मालावर सरकार, दलाल यांचा अंकुश असतो.. मग असा इतर कुठला उत्पादक आहे, ज्याच्या मालाचा दर सरकार ठरवते? आता कांदा नाशिक ला 2 रुपय किलो ने विकला जातोय, शेतामधून माल मार्केट ला पोहचण्यास जितका खर्च येतोय ना तितका ही माल विकून मिळत नाहीये.. मग काय करायचे आता शेतकाऱ्याने.. घाईत लिहिलं आहे आता.. बोलणार नव्हतो पण लिहिले. जुन्या चर्चेची लिंक डेतो.. पुन्हा तोच पाढा सुरु झालाय.. शेतकरी हा विषय निघाल्यावर, ती चर्चा मध्यमवर्गीय.. किंवा राजकीय विषय यावर येऊन ठेपते हे समाजाचे दुर्दैव आहे.. असो थांबतो.. आज पासून सायकलिंग करायला लवकर उठलो.. आणि येथेच टाइम जातोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मग काय करायचे आता शेतकाऱ्याने

सतिश गावडे
Sun, 08/02/2020 - 10:24 नवीन
मग काय करायचे आता शेतकाऱ्याने
पुर्णतः शेतीवर अवलंबून राहायचे नाही. जोडधंदे, पर्यायी व्यवसाय, नोकरी अशा गोष्टी करायच्या. पोटापूरते पिकवून चार पैसे कमवण्यासाठी इतर मार्गाला लागायचे. आपण जगाचे अन्नदाता आहोत आणि आपण नाही पिकवलं तर जग उपाशी मरेल या भ्रमात राहायचं नाही. जग त्याचं पाहून घेईल, आपण आपलं पाहायचं. कोकणात फक्त आणि फक्त भातशेती होते आणि बहुतांश ठिकाणी ती ही फक्त उन्हाळ्यात. आणि तरीही कोकणातील शेतकरी रडत नाही. कारण तो कधीच फक्त शेती एके शेती करत नाही. शेतीची कामे नसतील त्या दिवसात तो ट्रकवर हमाल म्हणून जातो, वीट भट्टीवर रोजंदारीने जातो, गाई म्हशी पाळतो कोंबड्या पाळतो. मोठ्या शेतकर्‍यांकडे बांधबांधवली करायला मजूरीने जातो, अगदीच काही होत नसेल तर मुंबई गाठतो. पण गळा काढत आणि कर्जमाफीकडे डोळे लावून बसत नाही. मी शेतकर्‍याचा मुलगा असून शाळा कॉलेच्या दिवसांत कंबरडं मोडेपर्यंत भातशेतीची कामं केलेली आहेत. त्यामुळे शेतीकामातील कष्टांची मला पूर्ण जाण आहे. बिगर कोकण प्रांतातील शेतकर्‍यांना त्यांचे प्रश्न सुटावे असे वाटत असेल तर त्यांनाच आपला मार्ग काढावा लागेल. शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण करणार्‍यांपासून चार हातात दूर ठेवावे लागेल. शेतकरी संमेलनं भरवून तिथे कविता वाचून शेतकर्‍यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यानं फक्त शेतकरी नेते म्हणून मिरवणार्‍यांचा, संमेलनं भरवणार्‍यांचा राजकीय फायदा होईल. समूह माध्यमांवर कविता लिहीणार्‍याला तात्पुरते आपण शेतकर्‍यांच्या प्रश्नाला वाचा फोडली असे वाटेल. मात्र त्याने शेतकर्‍यांच्या परिस्थितीत काडी इतकाही फरक पडणार नाही. कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः १. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? २. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का? ३. करत असल्यास ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का? ४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का? ५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्‍यांना उद्युक्त केले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

होय

अनिल चव्हाण रा…
Sun, 08/02/2020 - 12:57 नवीन
१. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? २. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का? ३. करत असल्यास ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का? ४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का? ५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्‍यांना उद्युक्त केले आहे का? होय. मी एक शेतकर्‍याचा मुलगा आहे, आणि शेतीतील कामे ही करतो. अधुनिक आणि सुधारित बी-बियाणे वापरतो. गावातील इतरांना पण वापरायला लावतो.जास्त अधुनिक नाही पण ऑर्ग्यानिक शेती करण्याचा प्रयत्न करतो. फुल शेती काही जण करतात अगदी बोटावर मोजण्याइतके,, मत्स्यशेती इकडे होत नाही, एक दोन शेततळी, गोदावरी नदीत मासेमारी फक्त भोई समाज करतो,, कितीही आग्रह केला तरिही मत्स्य शेती, मधुमक्षीका पालन कोणीही करत नाही. ,, आणि जोड धंदे फक्त दुग्धव्यवसाय ,, बाकी काही जण कुक्कुट पालन , शेळी पालन करतात,, सध्या जुन्या मंडळीला न जुमानता जोडधंद्यात वाढ होत आहे हि एक समाधान कारक बाब. अजुन काही असल्यास मोकळेपणाने विचारावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वयक्तिक झालाय रिप्लाय..

गणेशा
Sun, 08/02/2020 - 15:01 नवीन
मित्र या नात्याने तू वयक्तिक पणे बोलू शकतो, नव्हे पार शिव्या पण घालू शकतो, पण कवी बीवी काय राव.. मी स्वतःला कवी म्हणवून घेत नाही.. असो.. मजेचा भाग सोडला तर उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो..
पण गळा काढत आणि कर्जमाफीकडे डोळे लावून बसत नाही.
प्रिय मित्रा, 1. शेतकऱ्याने काय करावे ही लाईन तू उचलली.. त्याने पायाभूत सुविधांची अपेक्षा करू नये का ही ती लाईन आहे.. यात कोकण किंवा गैर कोकण असाही मुद्दा नाही.. hope u understand, पायाभूत सुविधा मिळवणे हे फक्त शेतकऱ्याचेच नाही, तर सर्वांचे अधिकार आहेत.. आणि कर्ज माफी याबद्दल मी लिहिलेले आहे खूपदा, कर्ज माफी हे सोल्युशन नाहीये..शेतकऱ्यांना फक्त सुविधा नीट हव्यात.. पण राजकारण करणारे हे का करतील.. .. 2. कोकणातील शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी अशी तुलना आपण का करतोय.. तर ते आहे त्यात समाधानी आहे म्हणुन? कोकण पाऊस पाण्याचा आणि आंबा काजू ह्यांचा भाग.. मला जास्त माहित नाही, पण एकदंरीत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे माझ्या भागातून ही कोणीच काही फाशी वगैरे घेत नाही.. आणि जोडधंदा म्हणत असशील तर ते मुद्दे बरोबर आहे, आणि तो ते करतो.. फरक इतका की कोकण शेतकरी या आपल्याकडील भागाचा अभिमान असल्याने तुम्ही पाहत नसाल ते.. पण फक्त संकोचित आपल्या भागा पुरता विचार का? समस्त प्रोब्लेम चे मूळ शोधले पाहिजे.. 3. कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः १. आपण शेतकर्‍यांमध्ये मिसळता का? येथे लिहिणारे कोण आहे असे.. नसल्यास त्यांनी त्यांचे बघावे, शेतकरी कर्ज मागतो म्हणे.. ज्या राजकारण्यांना कर्ज आणि त्यावरील राजकारण करायचे आहे त्यांना तुम्ही का कर्ज देता असे कधी विचारले आहे का? माझे मत आधी मांडल्या प्रमाणे स्पष्ट आहे.. कर्जाची भीक नकोच.. पायाभूत सुविधा पुरवल्या तरी खुप आहे, माझा लेख पूर्ण त्यावर आहे.. कर्ज माफ करणे हे long term solution नाहीच.. आणि ते करू नये.. उलट कर्ज मागूच नये यासाठी सोयी, सुविधा, किंमत शेतकर्यांना मिळावी.. वयक्तिक शेतकऱ्यांत मिसळता का हा प्रश्न.. मी कधी काव्य वाचनात मिसळत नाही.. शेतकरी कुटुंब ..नातेवाईक.. मित्र सगळे शेतकरी.. Image removed. माझ्या जिरायती असलेल्या शेतात, ज्वारी पेरलेली आहे.. आणि एक माझ्या शेतावर कधी मी लोन घेतले नाही ना मी बुडवले आहे.. येथे लिहिणारे स्वतःला काय समजतात काय माहित, पूर्ण शेतकरी म्हणजे कर्जा कडे डोळे लावून बसलेले आहे हे चित्र का रंगवले जातेय? 2 आणि 3 आणि 5
आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का?
वयक्तिक हे करणे जमत नसले तरी, बारामती अग्रो ची मेन ब्रँच, सुरुवात होण्या पासून भाऊ आहे तेथे.. कुकूट पालन माहिती, त्यांचे खाद्य.. फायदे या साठी कायम फिरती वर.. पंचक्रोशीत माऊली /अग्रो म्हणा मध्ये कळेल, कधी सोबत फिरलोय.. बारामती agro कडून चालणारी कामे माहित नसतील तुम्हाला.. या कधी तुम्हाला पण देऊ.. लोणी भापकर कमी पाऊस भाग, तेथे ही मामाला पोल्ट्री टाकून दिल्यात.. बर बारामती म्हणजे राजकीय घेऊ नये.. मामा भाजपा तालुका उपाध्यक्ष, नीरा कृषी समिती चा संचालक, बाकी इतर पक्षात.. राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्ही आमच्या घरात आणि नातेवाईका मध्ये आहेत.. असो.. 3. फुलशेती मत्स शेती आमच्या कोरड वाहू भागात नाही जमणार.. तरी पुरंदर च्या भागात, सीताफळ आणि फुलांच्या शेती मध्ये फिरलोय.. वयक्तिक नाही माहिती दिली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

@गणेशा "कवीस" म्हणजे तुला उद्देशून नव्हे रे :)

सतिश गावडे
Sun, 08/02/2020 - 16:13 नवीन
"कवीस" म्हणजे हा कविता धागा टाकणारा कवी यांना उद्देशून होते ते. तुला काही विचारायचे असते तर सरळ फोन नसता का केला मित्रा. असो. प्रश्न संकोचित आपल्या भागापुरता विचार करण्यापूरता नाही. आमच्या रायगड जिह्यात ना हापूस आंबा होतो ना काजू. आंबा आणि काजू आमच्या खालील दोन जिल्हे, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग. आमच्याकडे फक्त आणि फक्त भात पिकतो. पावसाळ्यात जो थोडाफार भाजीपाला अंगणात, परसदारी किंवा शेताच्या बांधावर पिकतो तो घरापूरता असतो. राहीली गोष्ट पावसाची आणि पाण्याची. पाऊस मुबलक असला तरी अवकाळी पाऊस कोकणातही होतो आणि त्यातून होणारे नुकसान कोकणी शेतकर्‍याचेही होतेच. आणि इतर भागात ज्याअर्थी पिके घेतली जातात त्याअर्थी तिथे पाणी ही समस्या नाही. पाणी नसते तर पिकच घेता आले नसते. त्यामुळे माझा रोख कोकणातील शेतकरी आपल्या परीने अडचणींवर मात करुन मार्ग काढतो तर मग ते इतर भागातील शेतकर्‍यांना का जमत नाही, ते ही मोठी शेती असताना, पिकांची विविधता असताना याकडे आहे. थोडा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते की शेतकर्‍यांना मदत कुणाला करायचीच नाहीये. केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे राजकारण करुन आपली पोळी शेकून घ्यायची आहे. तसे नसते तर कर्जमाफी आणि विजबिल माफी अशा तात्कालिक मागण्या पुन्हा पुन्हा करत राहण्यापेक्षा तू म्हणतोस त्या पायाभूत सुविधा मागितल्या गेल्या असत्या. त्यांची पुर्तता व्हावी म्हणून पाठपुरावा केला गेला असता. तसे होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मी म्हणुन रिप्लाय देत नव्हतो

गणेशा
Sun, 08/02/2020 - 15:24 नवीन
मी म्हणुन रिप्लाय देत नव्हतो येथे . एकदा दिले की उत्तरे द्यावेच लागतात.. माझ्या आधीच मूळ धागा कर्त्याने पण रिप्लाय दिलाय.. मी कर्जमाफीची मते वरती जी माझी लिंक दिली आहे त्या बद्दल माझा लेख असे लिहिले आहे.. ---- बाकी कवी कविता हा वेगळा विषय आहे, आणि त्याचा मला काडीमात्र अभिमान नाही.. माणसाने माणसात रहावे.. त्याला समजावे.. जगावे.. Problem सगळीकडे असतात, ते पहावे.. पण मुद्देसूद लिहिताना ही मध्यमवर्गीय माणुस, शेतकर्यांना कडू नजरेने बघणे सोडेल तर ना.. वरती परत.. शेतकार्यांचे कैवारी धावून येतात, अरे, येथे सगळे वाचले तरी कळेल.. कोणाला जास्त बोलायचे आहे.. असो. मी तर, मध्यमवर्गीय माणूस पण problem घेऊन जगतोय हे मान्य करतो.. पण म्हणुन त्याने दुसऱ्याला तुच्छ लेखावे.. मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि आमची जुनी मैत्रिण पियुशा ला रिप्लाय दिला असे वाटते आहे.. माणुस म्हणून पाहायचे सोडून आम्ही कर भरतो फलाना.. उद्या मोठे उद्योजक म्हणाले आम्ही जास्त कर भरतो.. आम्ही म्हणेल तसेच झाले पाहिजे तर..? किती कर भरता तुम्ही? मी स्वतः कर भरतो म्हणुन माझ्या शेतकरी बांधवाना मी तुच्छ नजरेने, दूषित नजरेने पाहिचे? सरकारने शेतकऱ्यांना सुविधा देऊ नये, त्यांचे त्यांनी पहावे असे म्हणताना आपल्याला काहीच वाटत नाही? मी तर पुढे जाऊन म्हणतो, लावा कर शेतकऱ्यांना पण.. काही हरकत नाही.. पण मग त्याच्या उत्त्पनाच्या किंमती वर तुम्ही बंधन घालणे बंद करा, दलाल बंद करा.. तो शेतकरी कसा त्यांचा माल विकेल तो बघेल.. नाही विकला तर नाही.. पण मग सरकार, आणि इतरांनी नाक खुपसू नका.. तेव्हडी हिम्मत आहे का? बळीराजा म्हणुन फायदा उठवतायेत वाटते ना.. आणि बाहेरून माल मागवू.. मग जा बिनधास्त.. आणि कर काय, लाईट बिल काय नका माफ करू.. पण पायाभूत सुविधा, व्यवस्था देण्यात प्रत्येक सरकार नपुसंक आहे हे ही मग मान्य करा.. आणि ते सरकार चे काम नाही हे म्हणणे असेल तर मग सरकारे का हवीत? अवघड आहे.. थांबतो.. का उगा टाइम पास करताय आणि करायला लावताय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आधीची चर्चा लेख.

गणेशा
Sun, 08/02/2020 - 06:49 नवीन
आधीची चर्चा लेख. आणि सुबोध जी आणि इतर जे येथे मुद्देसूद लिहीत आहे, त्याची प्रत्युत्ततरे तेव्हढ्याच मुद्देसूद तिकडे दिलेत.. पुन्हा तेच तेच लिहिण्यात काही अर्थ वाटत नाही.. थांबतो. http://misalpav.com/node/45446 Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

प्रश्न जेव्हडा सोपा तेव्हडच उत्तरही

अनिल चव्हाण रा…
Sun, 08/02/2020 - 13:10 नवीन
एक शेतमजुर दिवसाला ३००-५०० ₹ घेतो + वाहतुक खर्च कधी कधी भाव नाही लागला तर हा खर्च पण निघत नाही,, मग नाईलाजाने फिरवावा लागतो नांगर ,, आधि केलेला बी बीयाणांचा खर्च खत , फवारण्या , खुरपणी , पाळी इत्यादि पण निघत नाही काही वेळा.. महत्वाच फेकाफेकी करणारे फक्त ५-१०% शेतकरी असतात ते पण संतापुन,, बाकी सर्व राजकीय आंदोलने असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

थोड शेतकऱ्या विषयी

Rajesh188
Sat, 08/01/2020 - 23:20 नवीन
शेती वाडी असल्या मुळे शेती विषयी अनुभव आहे. एका गोष्टीचे मला नेहमी आश्चर्य वाटत eji कडे शेती तोट्यात आहे असं म्हणायचं पण कारण शोधून त्या वर उपाय पण करायचे नाहीत. सरकार काही तरी करेल ह्या वर विसंबून राहायचे .. मग कर्ज माफी, ची मागणी असेल किंवा हमी भाव. फक्त एका गावाचा विचार केला तर 1 टक्के पण शेतकऱ्यांचा शेतात फळ झाड नाहीत , शेवगा, जांबुळ,अंबा, आवळा,चिंच अशी विविध प्रकारची झाडे 1 टक्के शेतकऱ्या कडे पण नाहीत.. सोयाबीन तर सर्व सोयाबीन च करणार मग भाव पडेल नाही तर काय होईल. कित्येक वर्ष शेती तोट्यात आहे ना . मग एकत्र येवून पिकांची रचना आणि नियोजन का केले जात नाही. शेतीमाल शेतकरी मंडईत जावून कमी भावात विकतो पण कोण्ही विकत मागितले तर तो बाजारातील खरेदी भाव लावतो. व्यापारी समजा गाजर 60 रुपये किलो नी विकत आहे तर तो शेतकऱ्या कडून 15 रुपये किलो नी खरेदी करतो . पण तोच शेतकरी गाजर 20 रुपया किलो नी बाजारात विक्री करू लागला तर किती तरी फायद्यात जाईल तुफान विक्री होईल पण तसं घडत नाही . आता 20 रुपये लिटर नी dairy la देईल पण 25 रुपये लिटर नी लोकांना देणार नाही त्यांना 45 रुपये बाजाराचा दर सांगेल. 25 रुपये लिटर नी शहरात शेतकरी दूध विकू लागला dairy var अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यावाद.

अनिल चव्हाण रा…
Sun, 08/02/2020 - 11:52 नवीन
वर दिलेले सर्व प्रतिसाद मी वाचले, थोडीफार नविन महिती पण वाचयला मिळाली,, पण काही प्रतिसादांशी मी सहमत नाही. कारण शेती ही पुर्णतः निसर्गावर अवलंबुन आहे. प्रत्येक भागात जसा कमि जास्त पाउस तसच पिक परंतु पिक कितीही चांगल आल तरिही एक अवकाळी जोराचा पाउस खुप काही करुन जातो. अशाच अवकळी ने मार खाल्लेल्या , सतत नापिकी व कर्जबाजारी पणामुळे कंटाळुन फाशी घेतलेल्या एका शेतकर्‍याच्या मुलाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. आपण दिलेल्या सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद. लोभ असु द्या.
  • Log in or register to post comments

दोन्ही बाजू

चौकस२१२
Sun, 08/02/2020 - 19:39 नवीन
कोणत्याही देशात शेती हा "देशहितासाठीचा" व्यवसाय म्हणून समजला जातो आणि तो बुडून आपण परावलंबी होऊ नये म्हणून सरकार काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते १) पण तो व्यवसाय असतो...हे विसरून "सरकारने आणि समाजाने " केलेली मदत म्हणजे जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी समजू नये .. आणि २)बिगर शेतकऱ्यांनी शेतीचा मान हि ठेवावा .. दोन्ही बाजू टोकाला जायला लागल्या कि असा चुथडा होतो आपला.. एका शेतीप्रधान देशाचा रहिवासी ( येथे देशातील ७०% शेतीमाल निर्यात होतो https://www.dfat.gov.au/trade/organisations/wto/Pages/agricultural-trade#:~:text=We%20currently%20export%20more%20agricultural,total%20goods%20and%20services%20exports.)
  • Log in or register to post comments

ययातीचे मढे

Gk
Mon, 08/03/2020 - 16:33 नवीन
1950 आजा - 20 एकर मग त्याला 4 पोरे --- म्हणजे शेती प्रत्येकी 4 एकर मग त्याला 4 पोरे ... शेती प्रत्येकी 1 एकर मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , 1 एकर शेती म्हणजे ययातीचे मढे असते. एवढ्या काळात मुंबईत एक चाळीत घर , एक डोंबिवलीत व एक नेरळला घर होते आणि वारस किती ? एक मुलगा सून नैतर एक मुलगी जावई
  • Log in or register to post comments

मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 ,

गणेशा
Mon, 08/03/2020 - 17:30 नवीन
मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , 1 एकर शेती म्हणजे ययातीचे मढे असते.
मग ते मुंबई पुण्यात येऊन चाळीत राहतात.. मग त्यांची पोरे शेतकरी आणि शेती पेक्षा शहराला जास्त योग्य समजतात.. मग त्यांची दोन आणखीन घरे होतात..
  • Log in or register to post comments

2 रुपये

Gk
Mon, 08/03/2020 - 20:55 नवीन
शहरातील एकुलती एक पोरे 2 रुपयेवाली असतात , बापाचा रुपायाही पोराला आणि आईचाही पोराला शेतकऱ्याला 4 पोरे , तर एकेक पोर चार आणेवाले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

हो मग तेच म्हणतोय ना मी..

गणेशा
Mon, 08/03/2020 - 21:27 नवीन
हो मग तेच म्हणतोय ना मी.. चारआनेवाला पोरगा मुंबई किंवा पुण्यात येतो.. मग तो चाळीत राहतो.. त्याला एक पोरगा होतो.. तो पोरगा शेतीवाले आणि शेतकरी हे कसे बिनडोक असे समजतो.. मग तो शहरात वाढतो.. त्याची आणखिन 2 घरे होतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा