'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते'
या धागा लेखाचे आधीची शीर्षके 'पुणेकरांनो, आतातरी भानावर या' दैनिक सकाळच्या हेडलाईन वरून घेतले. प्रतिसादातून वीषाणूशूर बेफिकीर प्रतिसाद बघीतल्या नंतर शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला. व शीर्षक तुमची बेफिकीरी इतर काहींच्या मृत्युस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणीभूत ठरू शकते केले तरीही 'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते' तेव्हा शीर्षक अजून एकदा बदलवून घेत आहे.
........दाट लोकवस्तीच्या भागात मात्र कोरोना रुग्णांची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत असले तरी सोसायटीबहूल परिसरात मात्र रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे...........
.......ग्रीन झोनमध्ये असलेल्या या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढून आकडा हजारांच्या पार गेल्याने परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करत खबरदारीने वागण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक गर्दी टाळून मास्क, सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर ठेवून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे......मजकुर आणि लेख शीर्षक सौजन्य दैनिक इ-सकाळ वृत्त दिनांक २० जुलै २०२०. मजकुर * (नुसत्या आकडेवारीचे काही वाटेनासे होते, म्हणून मुद्दाम टाळली) एक बातमी आहे पिंपरी चिंचवडची एक विनालक्षण स्त्री ११ जुलैला करोना पॉझीटीव्ह आढळते, होम क्वारंटाईनला न जुमानता १७ जुलैला थेट दुबई गाठते आणि तिथून करोना निगेटीव्ह आल्याचा संदेश पाठवते. (संदर्भ) अशी बातमी वाचून टेस्टींगची पिंपरी चिंचवडची यंत्रे बिघडली की दुबईची असा प्रश्न कुणाच्या डोक्यात येईल पण दोन्ही टेस्टींग बरोबर असू शकते. पिंपरीतील टेस्टींग आजाराच्या नंतरच्या स्टेजला केले तर पॉझीटीव्ह येईल आणि लौकर बरा होईलही पण तुमची पॉझीटीव्ह आल्या नंतरची आजाराची स्टेज किती दिवसात बरी होण्याची आहे हे नेमके सांगणे कठीण. असे बेफिकीर वागणे करणे इतरांना वीषाणू वाटण्यास आणि त्यातील काहींना गंभीर आजार देण्यास कारणीभूत होऊ शकते हे माहित असूनही शिक्षीत मंडळी अशी बेजबाबदार कशी वागू शकतात ? आमेरीकेत काही अतीशहाण्या बहाद्दरांनी जाणीवपुर्वक कोविड झालेल्यांसोबत आपोआप इम्युनिटी येईल समजून पार्ट्या केल्या आणि त्यातील काही हकनाक जीव गमावून बसले. लोक असे बेजबाबदार कसे वागू शकतात ? दुसर्या मिपा धाग्यावर सायली राजाध्यक्षांच्या ब्लॉगचा उल्लेख झाला आहे . त्या वृत्त्तांताचा काही भाग त्यांच्याच शब्दात क्वोट करणे श्रेयस्कर असावे.
बुधवारी दुपारी टेस्ट रिझल्ट आले. .........आम्ही दोघे पॉझिटिव्ह होतो. .......आम्ही दोघे घरातच आयसोलेट झालो. खरं सांगायचं तर घरातच होतो त्याआधीही कित्येक दिवस. फक्त भाजी आणायला बाहेर पडायचो ते सोडलं तर.याचा अर्थ भाजीच्या ठिकाणी सुरक्षीत अंतर पाळण्याच्या गरजेचे उल्लंघन झाले.
मुळात मला कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासूनच हे आपल्यालाही कधी ना कधी होणार आहे याची जाणीव होतीच. कारण येत्या काही महिन्यांमध्ये सगळ्यांनाच यातून जावं लागणार आहे. त्यामुळे मला भीती अजिबातच नव्हती. झाल्यावरही मला क्षणभरही काळजी वाटली नाही.ब्लॉग वाचताना सहज लक्षात येत नाही पण टेक्निकली हा बेजबादारपणा आणि अती आत्मविश्वास आहे.
....मला वाटलं होतं की मला संसर्ग होईल तेव्हा लक्षणं नसतील इतका माझा स्वतःच्या इम्युनिटीवर विश्वास होता. पण तसं झालं नाही मला त्यानं चांगला दणका दिला. उलट निरंजनला नेहमी ताप येतो तर त्याला फक्त दोन दिवस आणि तोही १०० ताप आला. आमच्या कॉलनीत १३ लोक पॉझिटिव्ह आहेत. त्यातल्या फक्त ६ जणांना लक्षणं आहेत बाकीच्यांना लक्षणं नाहीत. आता कॉलनीत कुणीतरी सुपरस्प्रेडर असणार....हा असा अती आत्मविश्वास घेऊन वागणारेच लोक बेफिकीर वागले तर सुपरस्प्रेडर ला आधी बळी पडतात आणि त्यातील काही बेफिकीरी चालू ठेऊन स्वतः सुपरस्प्रेडर बनतात.
......सोशल डिस्टंसिंग पाळाच, सॅनिटायझरचा वापर करा, सतत साबणानं हात धुवत राहा, गरज नसताना गर्दीत जाऊ नका. मास्क वापरा. इतकं करूनही संसर्ग झालाच तर मात्र घाबरू नका. आणि कृपया ज्यांना संसर्ग झालाय त्यांना वाळीत टाकण्याचे फालतू प्रकार करू नका. ही वेळ उद्या आपल्यावरही येणार आहे हे पक्कं ध्यानात असू द्या...... - सायली राजाध्यक्ष (संदर्भ)* How Pune became India's biggest coronavirus hotspot * अनुसषंगिका व्यतरीक्त अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्ध लेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अजुन एक घ्या !
नवी मिपा म्हण :)
सहमत.
येत्या दिड महीन्यात किती
संस्थळ को?रोना? मुक्ती साठी
लोकसंख्या विकेंद्रीकरण
http://misalpav.com/node
जुलै संपत आला
जबाबदारी आणि कॉमन सेन्सचा काय संबंध ?
सोशल distance
एक्सक्युजेस कशासाठी
जी काटेकोरता सांगीतली जातिय ,
अतर्क्य घसरगुंडी
थेरोटेकलि बरोबर आहे, पण
माझ्या मी /(तुम्ही) / (आपण)..
ह्यांना सांगता येइल का
नको नको
जनता गांभीर्याने घेत आहे
इच्छा ठेवा मार्ग मिळतात.
हात धुण्याची सवय लागलीच आहे
नामांतराची घ्या हो एक.. करा
जिलेबी गोड की कडू हे कुणि सांगू शकत नाही, मग हुशार्या कशापायी?
माहिती गार
ईंडीयन एक्सप्रेस वार्ताहर
बेफिकीरीपुढे बिचारे प्रशासनही हतबल
असंही होत तर