माैन
लेखनविषय:
शब्दांचा प्रवास
काहीच फर्लांग
माैनाचा थांग
निरंतर...॥
शब्दांचा अर्थ
कळे यथामती
माैनाची महती
कोणा कळे ॥
शब्दांचे शस्त्र
जिव्हारी घाव
अंतरीचा ठाव
माैन घेई ॥
शब्दांचे धन
उजळली आभा
माैनाचा गाभा
अंधारात ॥
शब्दांचे नाते
नांदे जिव्हेसंगे
मनासवे रंगे
माैन परि ॥
वाचने
4607
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
आवडली आणि मौनाचा खरा अर्थ
व्वा वाह्...
छान !
शब्दांचे शस्त्र
फार सुंदर!!!
अतीव सुरेख कविता
फार सुंदर. मला आवडली पण मला
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,
(No subject)
अप्रतिम काव्य!
वाह!! सुरेख!!
नमस्कार ,