घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या

Primary tabs

हस्तर's picture
हस्तर in जनातलं, मनातलं
10 Jun 2020 - 8:52 pm

घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या
एकटे राहणाऱ्या आणि खास करून पुरुष माणसाने खोली मध्ये मध्ये काय काय फळे किंवा भाज्या लावता येईल ?
मला काही माहीत आहे जसे
गाजर ,कडीपत्ता, लिंबू, मिरची आल, कोथींबीर, पुदिना,टोमॅटो

ह्यातील कुंडीशिवाय कोणती लागवड करता येते ?
नेहमी उपयोगी पडणारे लागवड कोणते ?

शेती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

10 Jun 2020 - 9:50 pm | कंजूस

खोली मध्ये !!

खोलीच्या खिडकीत किंवा बाल्कनीत रोज तीन तास ऊन येत असेल तर पुढे सांगता येईल.

भाज्या या शोभेची झाडे नसतात. नुसत्या उजेडावर जगत नाहीत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jun 2020 - 9:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

कोथिंबीर. मिरची,मोहरी, पालक, कढीपत्ता आहेतच. अजुनही काही असतील. पण उन लागेल, सावलीत वाढणार नाहीत.

गवती चहा, आले, मिरच्या, पालक हे चांगले येते

पहाटवारा's picture

11 Jun 2020 - 1:57 am | पहाटवारा

घरातल्या घरात बिना उन्हाशिवाय ऊगवायला मायक्रो-ग्रीन्स चा प्रयोग करा.
मूग , वाटाणे, कडधान्ये ऊत्तम ऊगवतात.
https://www.allthatgrows.in/blogs/posts/how-to-grow-microgreens-home

पहाटवारा's picture

11 Jun 2020 - 2:02 am | पहाटवारा

घरातल्या घरात बिना उन्हाशिवाय ऊगवायला मायक्रो-ग्रीन्स चा प्रयोग करा.
मूग , वाटाणे, कडधान्ये ऊत्तम ऊगवतात.
मायक्रो ग्रीन्स कसे ऊगवाल

रमेश आठवले's picture

12 Jun 2020 - 8:17 am | रमेश आठवले

आम्ही ओवा लावला होता. त्याची उगवलेली पाने काही भाज्यांमध्ये वापरता येतात. तसेच त्या पानांचं भजी करता येतात . काही वेळातर आम्ही घरी पिझ्झा बनवताना त्यावर हि पाने वापरत होतो. त्याचा स्वाद चांगला येतो. अर्थात हे सगळे सौ. करायची.

मिरच्या कश्या लावायच्या? मागे मी बी पेरलं तर उगवलंच नाही आणि नंतर एकदा छान रोपं उगवली पण कबूतरांनी खाऊन टाकली. मिरच्या घरात लावण्याची खूप इच्छा आहे.

भाजी बाजारातूनच तांबड्या झालेल्या मिरच्या आणून वाळवून सुकवा. मग ते बी मातीवर टाका. पाणी फार टाकायचे नाही. वरती जाळीची चाळण ठेवा. कबुतरं बी खातात, चिमण्या उगवलेल्या रोपांची पाने खातात.
चार पाच इंचांची वाढलेली रोपे तीनतीन एका ठिकाणी वेगळी करून लावा. त्या मातीत अर्धे शेणखत हवे.

मी मसल्यातल्या सुक्या मिरचीचे बी पेरले होते. आता तुम्ही म्हणताय तसं करुन पाहीन.

मसल्यातल्या सुक्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या या मिरच्याच असतात पण चटणी, भाजीत,भेळेत ओल्या मिरचा चिरून टाकतो त्यांचा स्वाद हा महत्त्वाचा असतो. तोही वेगवेगळा असतो. लोणच्यासाठीच्या आणि भरून वाळवायच्या आणि तळायच्या जातीही ठरलेल्या आहेत या सर्व हिरव्या लागतात. त्या आपल्याला घरच्या बागेत कुंडीत हव्या असतात. वाळवून फक्त मसाला करण्यासाठी नाही।

नर्सरीतून बी आणले तरी खात्री नसते की आपल्याला हवे असलेले हेच आहे.

त्यामुळे भाजीतून आलेली हवी तशी मिरची दिसली की त्यातल्या थोड्या जून/ पिवळ्या लाल पडलेल्या आणल्यास वाळवून पेरणे हाच मार्ग बरा.
एक दोन प्रयोगात जमेल. ( पावसाळ्यात हिरवी मीरची वाळणार नाही, कुजेल. एक उभी चीर मारून कुंडीत लावून टाका.)

सान्वी's picture

16 Jun 2020 - 1:03 pm | सान्वी

धन्यवाद कंजूसजी