बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
9 Jun 2020 - 1:31 am

सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे.

त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत.

विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे.

शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्‍या चिनी नागरिकांच्या आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हिताचं आहे.

या अभियानामुळे सर्व जगाचं अर्थकारण बदलू शकेल आणि विकासाच्या संधीचं विकेंद्रिकरण होईल.

या अभियानासाठी करोना ही जगाला लाभलेली उत्तम संधी आहे असं सोनम यांचं म्हणणं आहे.

त्यानिमित्तानं हा विषय इथे मांडला आहे.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 6:05 am | शाम भागवत

सहमत आहे.

मूकवाचक's picture

9 Jun 2020 - 3:25 pm | मूकवाचक

+१

मी त्या कुठल्याहि मुलाखती बघितल्या नाही..
वेळ मिळाल्यावर पाहतो.. आणि मगच प्रतिसाद देतो...
बातम्याच कमी केल्याने जास्त माहीत नाही..

त्यात फेसबुक वरून, उठ सूट काहीही फॉरवर्ड करणारे लोक मी unfriend केल्याने तिथे हि माहिती नाही जास्त.. काय.चालू आहे..

सो ऐकून मत देतो.. link open झाली नाही मला.

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 8:29 am | शाम भागवत

लिंक गंडलीय
मला कधी “गंडलीय“ हा शब्द वापरावा लागेल असं वाटलं नव्हतं. :)

ही लिंक वापरून पाहिलीय. ती गंडवत नाहीये.
https://www.youtube.com/watch?v=A2n7z65a-HA&feature=share

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2020 - 9:10 am | संजय क्षीरसागर

धन्यवाद !

तुमची लिंक बरोबर आहे. मी ती एंबेडेड विडिओ म्हणून पेस्ट केल्यामुळे घोळ झाला असावा.

करेक्शनसाठी संपादकांना विनंती केली आहे.

दरम्यानच्या काळात सदस्यांनी भागवतांच्या प्रतिसादातली लिंक व क्लिक करावी.

अर्धवटराव's picture

9 Jun 2020 - 8:23 am | अर्धवटराव

देशी उत्पादनं, देशी व्यापाराचा अग्रक्रमाने विचार करुन ते एक जन-अंदोलन झालं तर चांगलच आहे.
या प्रक्रियेला योग्य नेतृत्व आणि पारदर्शक यंत्रणेची गरज आहे... टाटांसारखे उद्योगपती, पोपटराव पवारांसारखे ग्रामीण स्तरावरचे नेते, अगदी बेडेकर सारखे कुटीर उद्योग चालवणार्‍या संस्था... असं सगळं एका प्लॅटफॉर्मवर येऊन काहि सकारात्मक घडलं तर छानच.

सुरुवात महाराष्ट्राने व्हावी... गणरायांचे आगमन लवकरच होणार. या आंदोलनाचा शुभारंभ करायला योग्य मुहुर्त आणि संधी आहे. अगदी आरास करायल म्हणुन जे साहित्य लागतं तेव्हढ्याने श्रीगणेश करावा या आंदोलनाचा.
स्काय इज द लिमीट.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2020 - 8:40 am | ज्ञानोबाचे पैजार

हा विचार वारंवार समोर येतो पण आपण बाजारात गेलो की हटकून चिनी वस्तुच समोर येतात. आणि तुलना करायला गेलो तर चिनी वस्तु जास्त सुबक आकर्षक आणि स्वस्तही असतात. मग अशा परिस्थितीत ग्राहकाला तीच वस्तु च्यावीशी वाटली तर त्याचा दोश काय?

एक गोष्ट मात्र जाणवते आहे, की जागतिक स्तरावर हा विचार पुढे येत आहे, पण याचा फायदा भारतिय उद्योजकांनी घेतला पाहिजे नाहीतर आपण चिनी वस्तु घ्यायच्या नाहीत म्हणुन अमेरीकन वस्तु घ्यायला लागू इतकाच काय तो फरक होईल.

पैजारबुवा,

संडासातल्या कागदावर वादग्रस्त चित्र छापले म्हणून आंदोलन सुरू झाले. पण कंपनीने त्याला भीक घातली नाही. मग मुस्लिम संघटनांनी त्या कंपनीच्या सर्व उत्पादनांवर संघटीत बंदी लादली. कंपनीचा खप झपाट्याने घसरला. नाक दाबले गेले. कंपनीने माफी मागून माघार घेतली.

मला वाटते हेच उदाहरण सतत पुढे केले पाहिजे. कोकाकोला, पेप्सी सारखी कंपनीसुध्दा सरळ येईल. भारताचा स्वाभिमान (अभिमान नव्हे) जेव्हा जागा होईल, तो सुदीन असेल.

पहिल्या स्तरावर चिनी वस्तू न वापरणे हे योग्य आहे .
पण दुसऱ्या स्तरावर भारतात उत्तम दर्जा च्या वस्तूंचे उत्पादन होणे अपेक्षित आहे आणि ते पण योग्य किमतीत उपलब्ध असावे.
भारता उत्पादन करताना चीन सारखे कामगारांचे शोषण न होता उद्योगात लोकांचा सहभाग असावा .
कच्चा माल आणि जोडणी ह्या मध्ये लोकांना सहभागी करून लघु उद्योगांना प्रोत्साहन दिले तरच रोजगार निर्मिती पण होईल.
नाहीतर रोजगार विरहित उद्योग भारताला फायदा देणार नाहीत.

चौथा कोनाडा's picture

9 Jun 2020 - 1:37 pm | चौथा कोनाडा

हा आणखी एक विचार फेसबुकवर वाचायला मिळाला. मला पटला.
तुम्हाला काय वाटतं ?

**************************************************************
चहा, चीन अन समृद्धीचा महामार्ग!
- प्रसाद शिरगावकर

मला रोज चहा प्यावासा वाटतो, त्यासाठी दुधाची गरज असते. मी ते दूध डेअरीमधून विकत आणतो. डेअरीवाला लिटरमागे पाचसात रुपये नफा कमावत असावा. पण मला त्याविषयी तक्रार नसते. गाय पाळणे, ती मेंटेन करणे आणि रोज दूध काढणे ह्यात माझा जे पैसे, वेळ आणि कष्ट (resources) खर्च होतील ते करण्यापेक्षा डेअरीवाल्याने दोन पैसे कमावले तर माझी हरकत नसते.

माझे वाचलेले रिसोर्सेस मी त्याहून जास्त productive कामासाठी वापरू शकतो अन त्यातून कित्येकपट जास्त पैसे कमावू शकतो.

हेच मी अन्न, वस्त्र, निवारा अशा माझ्या सर्व गरजांच्याबाबत करतो. माझ्या वेळ, कष्ट आणि पैसे ह्या रिसोर्सेस च्या खर्चापेक्षा जे स्वस्त मिळेल ते मी बाहेरून विकत घेतो आणि माझे वाचलेले रिसोर्सेस वापरून मी जास्त प्रॉडक्टिव, जास्त उत्पन्न देणारं काहीतरी करतो

.

हे जे व्यक्तीच्या आयुष्यातलं सत्य आहे तेच आंतरराष्ट्रीय व्यापारातलंही सत्य आहे.

एखादी वस्तू आपल्या देशात बनवण्यासाठी जे रीसोर्सेस खर्च करावे लागतात त्यापेक्षा इतर कोणत्या देशातून आयात करणं स्वस्त पडत असेल तर ते आयात केले जातात. अन ते तसं करणं देशासाठी योग्यच असतं.

कारण ते वाचलेले रिसोर्सेस त्याहून जास्त productive कामासाठी आपण वापरू शकतो अन जास्त समृद्धी निर्माण करू शकतो, करायला हवी.

त्यामुळे चीनचा निषेध, चीनचा धिक्कार करायचा असेल तर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याऐवजी जास्तितजास्त भाव पाड़ून अन स्वस्तात त्या विकत घ्याव्यात. अन त्या वस्तूंची निर्मिती करण्याचे आपले जे रिसोर्सेस वाचतील त्यातून त्याहून जास्त productive आणि innovative असं काहीतरी करून ते जगभर विकायला पाहिजे.
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याऐवजी त्या स्वस्तातल्या स्वस्त विकत घेऊन, त्यातून वाचलेले रिसोर्सेस योग्य पद्धतीने वापरून value chain मध्ये त्यांच्याहून खूप वरचढ होण्यासाठी काम करणं ही खरी देशभक्ती ठरेल!

त्यामुळे उगाच Apps uninstall करत, जुने फोन फोडत अन झेंडे जाळत बसू नका. स्वस्तातल्या स्वस्त गोष्टी चीनमधून विकत घ्या अन महागातल्या महाग गोष्टी अन सेवा जगभराला विकत रहा...

समृद्धीचा हा एकच महामार्ग आहे!
- प्रसाद शिरगावकर

****************************************************

तुम्हाला काय वाटतं ?

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 2:10 pm | शाम भागवत

हे कितीही बरोबर असलं तरी त्यामुळे आपले चीनवरचे अवलंबित्व वाढत जाते. युरोपिअन देशांचे व अमेरिकेचे हेच झालंय. त्यांनी वस्तू स्वस्त मिळतात म्हणूनच चीनशी जवळीक वाढवली. पण आता चीनवर जास्त अवलंबून राहणं धोक्याचे आहे हे त्यांच्या लक्षात आलंय.

भारताने चीनवर कोणत्याही बाबतीत अवलंबून राहू नये असं मला वाटतं. कोणत्या क्षणी तो आपली अडवणूक करेल सांगता येत नाही.

किंमत हाच मुख्य मुद्दा आहे

पण ते दुष्टचक्र आहे.
चीनी वस्तु स्वस्त म्हणून प्रत्येक जण त्या घेऊ लागला तर
इथले व्यावसाय बंद पडत जाऊन एक दिवस सर्वस्वी चीनवर अवलंबून रहावं लागेल.

त्यामुळेहा उपक्रम तीन स्टेजेसमधे राबवण्याचा आहे

१. रिप्लेस चायना सॉफ्टवेअर्स अँड अ‍ॅप्स विथ इंडीयन ऑप्शन्स
२. किंमतीत झेपणारा फरक असेल तर भारतीय वस्तुंची निवड
३. चीनला स्वस्तात कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून वस्तू आयात करण्याऐवजी देशात त्या वस्तुंची किफायतशीर निर्मिती कशी होईल याचा विचार (लाँग टर्म प्लान)

पैकी १,२ हे नागरिकांच्या सहकार्यावर अवलंबून आहेत आणि ३ सरकारच्या धोरणावर आणि व्यावसायिकांच्या पुढाकारावर.

Nitin Palkar's picture

10 Jun 2020 - 8:00 pm | Nitin Palkar

एक वेगळाच विचार....या दिशेनेही विचार करायला हवा.

चौकस२१२'s picture

9 Jun 2020 - 2:31 pm | चौकस२१२

अनेक देशांना त्यांच्या कमी लोकसंख्येमुळे चीन वर अवलंबून राहावे लागते मग त्यात गरीब देश फक्त नाहीत तर अनेक यूरोपीय आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड सारखे देश त्यामुळे आम्हाला पर्याय नाहीत
उलट भारत हा असा एक देश आहे कि ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे , त्याची स्वतःची बाजारपेठ पण एवढी मोठी आहे कि भारतीय बाजारपेठेसाठी आणि निर्याती साठी उत्पादन विकसित करता येतात
भरतोय जनतेचे कौतिक कि तुमच्या कडे अनेक स्वदेशी इंडस्ट्री अस्तित्वात तरी आहे ..उदाहरणार्थ गाड्या बनवणे.. इकडे तो उद्योग कधीच मेला
अहो तुम्हाला निदान राष्ट्रीय सुरक्षिततेचं उद्योगनसाठी ( विमान रेल्वे बनवणे) तरी इतर देशावर अवलंबून राहावे लागत नाहीये ..
भारत सध्याच्या परिस्थितीचा दुहेरी फायदा उठवू शकेल पण त्यासाठी सरकार आणि जनता दोघांनी काम करणे जरुरीचे आहे

१) निर्यात वाढवणे आणि काही बाबतीत तरी चीन ऐवजी आमच्यकडून घ्या हे जगाला सांगणे
२) काही चिनी उत्पादांना पर्याय निर्माण करणे
एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे कि एखाद्या देशाने आयटी वर बंदी घातली तर त्यांचं निर्याती वर पण बंदी येऊ शकते .. तिथे तक्रार करता येणार नाही
दुर्दवाने लोकांना आज "मेक इन इंडिया कशाला" काय नारेबाजी असल्या वितंडवादात अडकून पडायचे आहे ..
( मी एकदा हॉटेल इंडस्ट्री ला लागणाऱ्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या उत्पादक बरोबर येथील त्याच्या ग्राहकांकडे गेलो होतो .( घाऊक ) . तेवहा तिथे असे दिसले कि या क्षेत्रात ३ प्रकार ची आयात होत होती १) भारत २) चीन आणि उच्च दर्जाचे यूरोपीय .. भारतातील माल खपत होता पण तक्रार हि कि - धड पॅकेजिंग नाही , सातत्य नाही...
स्वस्तातल्या स्वस्त गोष्टी चीनमधून विकत घ्या अन महागातल्या महाग गोष्टी अन सेवा जगभराला विकत रहा...
हे अगदीच चुकीचे नाहीये . एक शास्त्र म्हणून आंतराष्ट्रीय राजकारणात भारताने "चिनी नको" हे धोरण अवलंबले तर काही जगावेगळे नाही

असे सतत होत असते.. उद्धरण देतो ऑस्ट्रेलिया पिटुकला असून सतत अमेरिकेची बाजू घेतो असा चीन चा दावा आहे म्हणून ऑस्ट्रेलिया ला धडा शिकवण्यासाठी मागील महिन्यात ऑस्ट्रेलियातील बार्ली वर ८०% आयात कर लावला ...आता भारत घेणार आहे म्हणे .. बघा तुमची पुढची बिअर म्हणजे माझी रोजी रोटी...( हाहाहाहा )
बिअर वरून आठवलं कोणी मंदिर उत्पादन आणि वितरण क्षेत्रात आहे का हो... तेवढा "ओल्ड मंक" ला जर भारतातील मुख्य अंतरराष्ट्रीय विमानतळावर करमुक्त दुकानात विकायला ठेवा म्हणावं .. मेक इन इंडिया .. झिंदाबाद असे आम्ही म्हणू दोन घोट घेत घेत ... तुम्ही ठेवता नाही म्हणून आम्ही मग मेक इन जमेका घेतो ... तोटा तुमचाच..आम्हाला काय जमेका काय किंवा भारत काय शेवटी हवेतच तरंगत जायचंय ना ..

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 3:16 pm | शाम भागवत

मलेशियाचे पाम ॲाईल भारताने नाकारल्यावर लागलीच चीनने ते विकत घ्यायचे मान्य केले. त्याला दिलेले उत्तर आहे. शिवाय मद्य उत्पादन तेवढे चीनचे कमी होणार व भारताचे वाढणार. मद्य चीन ऐवजी भारताकडून आयात केले की, ॲास्ट्रेलीयाचे काम झाले. भारताची निर्यात वाढते. चीनची कमी होते.
पाम ॲाईल मात्र चीन विकत घेते. फक्त आयात वाढते. ३७० कलम निर्मुलनाला मलेशियाने विरोध केल्याबद्दलचा चीनचा कळवळा फक्त दिसला. बाकी फायदा काही नाही.

या अगोदर भारताचा एवढा त्रास चीनला कधीच झाला नव्हता. का नाही तो ठणठणाट करणार. :)

चौकस२१२'s picture

9 Jun 2020 - 2:35 pm | चौकस२१२

अर्रर्रर्रर चुकून "मंदिर उत्पादन" म्हणालो .. मदिरा म्हनायचे होते ..

स्वच्छंद's picture

9 Jun 2020 - 3:05 pm | स्वच्छंद

चिनी उत्पादनावर ग्राहकाने बहिष्कार टाका असे म्हणणे म्हणजे घरात बिस्किटांचे पुडे आणून मुलांना खाऊ नका यासारखे झाले. सरकार पातळीवर परदेशी उत्पादनावर अँटी डंपिंग कर लादून त्या वस्तूंची किंमत स्वदेशी एवढी किंवा त्यापेक्षा जास्त करता येते आणि बहिष्कार पेक्षा हीच योग्य पद्धत आहे. पण सरकारने कुठल्या कुठल्या देशाशी कसले कसले व्यापार करार केले आहेत, ते बदलण्याची हिम्मत सरकार करेल का?

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 3:23 pm | शाम भागवत

अहो, ते आंतरराष्ट्रीय करार आहेत. दोन देशातील करार नाहीत.
भारत सरकार जाहीररित्या चीनी मालावर बंदी लादू शकत नाही.
अँटी डंपिंग कर असा एकदम लावता येत नाही. त्यासाठी आधी तक्रार करायला लागते, पुरावे द्यावे लागतात.
अमेरिका या प्रोसिजरला केराची टोपली दाखवू शकतीय कारण त्यासाठीच्या कोणत्याही परिणामांना तोंड द्यायला ती समर्थ आहे. भारताचे तसे नाही. भारतीय नागरिक मात्र चीनी मालावर बहिष्कार घालू शकतात व त्याबाबत चीनला आंतरराष्ट्रीय समुदायापुढे कोणतीही तक्रार करता येत नाही.

स्वच्छंद's picture

9 Jun 2020 - 5:07 pm | स्वच्छंद

अगदी योग्य म्हणणे आहे आपले. पण बहिष्कार हा मार्ग अगदीच तोकडा आहे. अर्थात त्याला माझा विरोध नाहीच. पण अमेरिका समर्थ आहे असे म्हणालात तसेच सामर्थ्य भारत दाखवू शकतो का? हाच माझा प्रश्न आहे.

हे लॉजिक असंय :
आपण भिमसेनसारखं गाऊ शकू का, मग कशाला गाणं म्हणायचं ?

तुम्ही गायलाच नाही तर सगळ्याच शक्यता मावळल्या.
किमान गायला सुरुवात तर करा.

आणि त्या पलिकडे सध्या तुमच्या हातात काय आहे ?

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 5:51 pm | शाम भागवत

अहो, तिथेच तर आपल्याला पोहोचायचं आहे.

१९७७ साली जनता सरकारने आलेली संधी वाया घालवली. अमेरिकन कंपन्यांना हाकलून लावले. नेमके त्याचवेळेस चीनने त्याचा फायदा उठवला. सर्वांचा विश्वास मिळवला. त्यावेळेस चीन भारतासारखाच गरीब होता. तंत्रज्ञान व भांडवल मिळवले. भूमिअधिग्रहण कायदा, कामगार कायदा असले काही प्रकारच नव्हते. चीनने सगळ्यांच्या सगळ्याअटी मान्य करून टाकल्या. त्यामुळे चीनचा अविश्वास वाटण्यासारखे काही राहिलेच नाही.

मात्र चीनने एक अट मात्र मान्य करून घेतली. पांच किंवा काही ठराविक कालावधीनंतर तंत्रज्ञान हस्तांतरण झाले पाहिजे. ही अट मान्य झाली व इथेच चीनने भारतावर पुढाकार मिळवायला सुरवात केली.

जपानने हेच केले. फक्त वेगळ्या पध्दतीने. सरंजामशाही संपवल्यावर, राजाने परदेशात शिकायला माणसे पाठवली. ती माणसे शिकून परतही आली. मग जपान पुढे जात राहिला. दुसऱ्या महायुध्दानंतर ह्या सगळ्याची गती खूपच वाढली. जपानमधे अमेरिकन तंत्रज्ञान व भांडवलाचा पाऊस पडला. त्यात सैन्यावरचा जपानचा सगळा खर्च वाचला.

आता भारताची वेळ आलीय. ही संधी भारत साधतो आहे का ते पाहायचं आहे. जपान व चीनपेक्षा भारताला जास्त संधी आहेत. तरूणांची अफाट संख्या. सरासरी वय ३० च्या आंत. २०५० पर्यंत भारत अजून तरूण होत जाणारेय. त्यावेळची सरासरी वय २० असणार आहे. विकसीत जग त्यावेळेस आणखीन म्हातारे झालेले असणार आहे. इंग्लीश बोलणाऱ्यांची मोठी संख्या हा पण मुद्दा आहे. जर विजेचे उत्पादन वाढले व बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वाढल्या तर आयातीचा ताणच निघून जाणार आहे. असो.

मी तरी आशावादी आहे. :)

अभ्या..'s picture

9 Jun 2020 - 5:56 pm | अभ्या..

सध्या बाजारात येणाऱ्या इलेक्ट्रिक तू व्हीलर मध्ये चिनी उत्पादनांची संख्या लक्षणीय आहे. तेथून पार्टस किंवा पूर्ण वाहन आणून इथे लोकल नावाने विकण्याची पद्धत भारतात केव्हाच सुरू झालीय.
थिंक नेक्स्ट

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 6:01 pm | शाम भागवत

तेलाचा आयातीचा ताण.

सतिश गावडे's picture

9 Jun 2020 - 6:22 pm | सतिश गावडे

तेथून पार्टस किंवा पूर्ण वाहन आणून इथे लोकल नावाने विकण्याची पद्धत भारतात केव्हाच सुरू झालीय.

मायक्रोमॅक्स आपले "भारतीय" बनावटीचे फोन अशाच पद्धतीने भारतात "बनवायची" :)

आता गम्मत म्हणजे टाटा पॉवर ने मॉरिस ग्यारेज (तीच एमजी हेक्टर वाली) सोबत इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन सोबत टायाप केलेत. एमजि जन्माने ब्रिटिश असली तरी आता ती चायनीज आहे.
म्हणजे हेक्टर चिनी म्हणून नाकारली तरी त्यांच्या पॉवर स्टेशनवर टाटा नेक्सोन इव्ही ला चार्ज करावे लागेल. अशा वेळी काय करावे?

Nitin Palkar's picture

10 Jun 2020 - 8:07 pm | Nitin Palkar

मी तरी आशावादी आहे..... खूपच छान आणि बरोबरच आहे. केवळ सकारात्मक विचारांनी देखील सकारात्मक बदल घडू शकतो...

गोंधळी's picture

9 Jun 2020 - 3:23 pm | गोंधळी

डोकलाम च्या वेळी अशीच चर्चा होत होती. चीनी सामानावर बहीष्कार वगैरे.
बाकी चांगला भावनिक मुद्दा आहे.

disclaimer- माझा फोन्,लॅपटॉप,पावर बँक,....... मेड इन चायना आहे.

या साठीच संक्षींनी लिहलंय की,

त्यामुळेहा उपक्रम तीन स्टेजेसमधे राबवण्याचा आहे
१. रिप्लेस चायना सॉफ्टवेअर्स अँड अ‍ॅप्स विथ इंडीयन ऑप्शन्स
२. किंमतीत झेपणारा फरक असेल तर भारतीय वस्तुंची निवड
३. चीनला स्वस्तात कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून वस्तू आयात करण्याऐवजी देशात त्या वस्तुंची किफायतशीर निर्मिती कशी होईल याचा विचार (लाँग टर्म प्लान)

पैकी १,२ हे नागरिकांच्या सहकार्यावर अवलंबून आहेत आणि ३ सरकारच्या धोरणावर आणि व्यावसायिकांच्या पुढाकारावर.

सध्यातरी १,२ बद्दल चर्चा चाललीय.
पण ३ नंबरचा मुद्याचा आधार प्रथम घ्यायचा व त्याद्वारे पहिले दोन मुद्दे खोडायचा प्रयत्न करणे योग्य होणार नाही.

प्रोसेसर चीपचे उत्पादन भारतात होतच नाही. आपण उत्तम डिझाईन करू शकतो. पण ते तंत्रज्ञान व भांडवल मिळवायचा भारताने प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी परिस्थिती पण अनुकूल आहे. तोपर्यंत आयात चीनकडून करायला लागेल. पण पर्याय मिळाला तर मात्र ताबडतोब चीनकडूनची आयात थांबवायची. हे नागरिकच करू शकतात.

उदा. जपानच्या खूप कंपन्या इंडोनेशियामधे जाताहेत. त्यांचे उत्पादन सुरू व्हायला वेळ लागेल. पण जेव्हा त्या वस्तू उपलब्ध होतील तेव्हा त्यांनाच प्राधान्य द्यायला लागेल.

भारतीय बेरोजगारीचा विचार करता, चीन भारताचा एक नंबरचा शत्रू आहे हे जेव्हां भारतीयांच्या लक्षात येईल त्या दिवसापासून भारतातील बेरोजगारीचा राक्षस प्रथम मोठा व्हायचा बंद होईल आणि त्यानंतर तो राक्षस आकुंचन पावत जाईल. पण भारतीय नागरिकांच्या सहभागाशिवाय हा लढा जिंकणे अवघड आहे.

चीन च्या वस्तूंवर बहिष्कार घाला, त्या वस्तु वापरू नका हे सांगणे सोपे आहे पण खरा प्रश्न आहे तो म्हणजे चीन च्या वस्तूंना दुसरा किफायतशीर आणि स्वस्त पर्याय आहे का?
उदाहरण च द्यायचे झाले तर चीन च्या शाओमी कंपनी ने काही दिवसापूर्वी MI 10 लाँच केला. किंमत जवळपास 40-50 हजार.
आता मला त्याच स्पेसिफिकेशन आणि बिल्ड क्वालिटी चा दुसरा कोणताही स्वदेशी फोन अव्हेलेबल नाहीये. इतर ब्रँड जसे सॅमसंग, मोटो यांचे फोन MI 10 पेक्षा 10-15 हजारांनी महाग आहेत.

मग मला सांगा कि एक एन्ड user म्हणून MI चा फोन घ्यावा कि 10-15 हजार जास्त घालून इतर कंपनी चा?
आणि ते जास्तीचे पैसे देऊन मी माझी देशभक्ती प्रूव्ह करायची का?

भावनेच्या भरात चिनी मालावर बहिष्कार घालण्यापेक्षा चिनी वस्तूंना सक्षम आणि एफोर्डेबल स्वदेशी पर्याय निर्माण करण्यावर लक्ष द्यावे लागेल. दरवेळी चीन ने काही कुरापत काढली कि जनतेत असंतोष निर्माण होतो. दरवेळी चिनी वस्तु वापरायच्या नाहीत अश्या आणाभाका घेतल्या जातात.. काही दिवसांनी पुन्हा जैसे थे.

आणि अश्या प्रकारचा असंतोष फक्त जनतेमध्येच दिसून येतो. सरकार कडून किंवा व्यापारी संघटना कडून कधीही अश्या प्रकारची विनंती किंवा जाहिरातबाजी केली जात नाही.
सरकार कडून तर कधीच होणार नाही कारण चीनच्या वस्तूंना पर्याय निर्माण करणे म्हणजे आपल्या देशातील रिसर्च आणि डेव्हलोपमेंट ला, गुंतवणुकीला, छोट्या मोठ्या व्यवसायांना, उद्योगधंद्यांना पायाभूत सुविधा निर्माण करणे जे त्यांच्याकडून गेल्या 70 वर्षात झालेले नाहीये. मग चीन च्या वस्तु वापरू नका म्हणून कोणते सरकार आपले स्वतः चे पितळ उघडे करेल? प्रत्येक सरकार आपण पायाभूत सुविधा द्यायला कमी पडलोय हे लपवून ठेवते.

त्यामुळे जनतेने स्वतः जरी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायचे ठरवले तरी कोणतेही सरकार कधीही या भावनिक आवाहनाला प्रतिसाद किंवा सहमती देणार नाही.

जर चीन ला शह द्यायचाच असेल तर चीन पेक्षा कमी किंमतीत आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू आपल्या इथे तयार झाल्या पाहिजेत. स्वदेशी गोष्टींना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. आणि जनतेने सरकार वर त्यासाठी दबाव आणला पाहिजे.
हा लॉन्ग टर्म प्लॅन आहे पण आजच्या ग्लोबल युगात हाच एकमेव मार्ग आहे.

> घालायचे ठरवले तरी कोणतेही सरकार कधीही या भावनिक आवाहनाला प्रतिसाद किंवा सहमती देणार नाही.

२. किंमतीत झेपणारा फरक असेल तर भारतीय वस्तुंची निवड

हा सध्या हाताशी असलेला पर्याय आहे आणि तो यशस्वी करण्याची जवाबदारी नागरिकांची आहे.

नागरिकांनी कोणत्या वस्तू निवडाव्या हे सरकार ठरवू शकत नाही किंवा चायनीज वस्तूच घ्या असा दबावही आणू शकत नाही.

एकदा भारतीय वस्तुंची मागणी वाढली की व्यावसायिकांना हुरुप येऊन ते चायनाला टक्कर देण्यासाठी किंमती आपसूक खाली आणतील आणि याप्रकारे देशांतर्गत उद्योग वाढेल असा सरळ मुद्दा आहे.

अभ्या..'s picture

9 Jun 2020 - 5:46 pm | अभ्या..

नुसती वस्तूची मागणी आणि त्यामुळे आलेल्या हुरुपामुळे किमती कमी होणार नाहीत.
मागणीचा अभ्यास, त्यात संशोधन, कारखाने उभारताना लाल फितीचा अडसर, कामगार कायदे, मानवाधिकार, उत्पादनाचे विपणन, वितरण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यातल्या सुधारणा मुळापासून करणे गरजेचे आहे. किंबहुना त्यावर केलेली गुंतवणूक सामान्यांच्या पटकन लक्षात येणार नाही इतका वेळ घेतीलच. त्या कालावधीत परत चीनाबद्दल धोरण बदलले तर? किंवा चीननेच धोरण बदलले तर?
बहिष्कार हा तात्कालिक हत्यार म्हणून सोयीचा असेल पण तोही वापरणे आणि दूरदृष्टीने पुढील आखणी करणे हे बहुतांशी सरकार करू शकते.

मराठी कथालेखक's picture

10 Jun 2020 - 11:55 pm | मराठी कथालेखक

मागणीचा अभ्यास, त्यात संशोधन, कारखाने उभारताना लाल फितीचा अडसर, कामगार कायदे, मानवाधिकार, उत्पादनाचे विपणन, वितरण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यातल्या सुधारणा मुळापासून करणे गरजेचे आहे.

+१

शा वि कु's picture

9 Jun 2020 - 4:42 pm | शा वि कु

+१

गोंधळी's picture

11 Jun 2020 - 3:15 pm | गोंधळी

xiaomi फक्त मोबईलच नाही तर बुट्, ४के डिव्हाईस्, टि.व्ही., बल्ब, स्पिकर्, ईअर फोन अशा अनेक प्रकारे बाजार्पेठ वाढवते आहे. आता त्यांचा लॅपटॉप ही लाँच झाला आहे.
i ball, intex, micromax या सारख्या कंपन्या मार्केट मधुन हद्दपार झालेल्या दिसतात.

बाप्पू's picture

9 Jun 2020 - 6:23 pm | बाप्पू

संजय क्षीरसागर जी,
तुमचा मुद्दा योग्य आहे.

किंमतीत झेपणारा फरक असेल तर भारतीय वस्तुंची निवड

पण करणार कोण? इथे 1 रुपयांचा फरक जरी असला तरी आपले पब्लिक विचार करतेय.. मग देशभक्ती गेली तेल लावत.
पब्लिक च जाऊदे.. मी स्वतः गेल्या वर्षी MI चा फोन विकत घेतला.
आणि एक ग्राहक या नात्याने मला त्यात काहीच चुकीचे वाटले नाही. कारण मला हवा तसा फोन मला परवडणाऱ्या किमतीत मिळाला.
मी समजा 2-3 हजार रुपये जास्त घालून दुसरा फोन घेतला असता तर त्यामुळे दुसऱ्या एखाद्या देशातील कंपनी चा फायदा झाला असता.

आपल्याला चीन चे नुकसान करण्याची नाही तर भारताचा फायदा करण्याची गरज आहे आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपल्याकडे पर्याय उपलब्ध असेल.

हा फक्त वस्तु विकत घेण्याचा प्रश्न नाहीये. हा सर्व सरकार च्या फेल झालेल्या उद्योग नीतीचा दोष आहे. यामध्ये सरकार ला स्वतः काहीतरी प्रयत्न करावे लागतील. आपल्या देशात निश्चित च चीन ला टक्कर देण्या इतके टॅलेंट आणि मनुष्यबळ आहे. पण प्रॉब्लेम इथल्या पॉलिसी मध्ये आहे. उद्योग धंद्यासाठी लागणाऱ्या बेसिक सुविधा जसे वीज, पाणी, चांगले रस्ते, निर्यात असिस्टंनस, मोकळ्या जागा आणि विशेष आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्ज आणि सरकारी परवानग्या हे सर्व govt ने विनात्रास उपलब्ध केले पाहिजे. पण इथे एखाद्या साध्या फुटकळ सरकारी कामासाठी सुद्धा खेटे घालावे लागतात.. मग कोण धाडस करेल इथे नवीन व्यवसाय उभे करण्यासाठी.. ??

बिहार मद्धे तयार झालेल्या मालाला मुंबई पर्यंत आणण्यासाठी ची ट्रान्सपोर्टेशन कोस्ट चीन ते मुंबई पर्यंत च्या ट्रान्सपोर्टेशन कोस्ट पेक्षा जास्त आहे.

इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर या क्षेत्रात चीन चा दबदबा आहे. जर चीन करू शकतो तर आपण का नाही?? मला MI ला टक्कर देणारा आणि पूर्णपणे मेड इन इंडिया फोन माहिती नाही. याचा अर्थ असा आहे का कि आपल्याकडे ते टॅलेंट नाहीये??

हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि डेकोरेशन च्या सामनाबाबत. इतक्या लांबून चीन वरून सामान येते आणि आपण इथल्या इथे त्याला affordable पर्याय तयार करू शकत नसू तर मग घंटा उपयोग आपला??

प्रॉब्लेम उद्योग धंद्या साठी नसलेल्या पोषक वातावरणाचा आहे. सुधारणा तिथे केल्या पाहिजेत.

आपण 135 कोटी लोकांना अमुक एक वस्तु घ्या किंवा अमुक घेऊ नका असं नाही बोलू शकत. सक्षम पर्याय उपलब्ध असेल तर लोकं आपसूक च भारतीय वस्तु घेतील

हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि डेकोरेशन च्या सामनाबाबत. इतक्या लांबून चीन वरून सामान येते आणि आपण इथल्या इथे त्याला affordable पर्याय तयार करू शकत नसू

यावर कोल्हापूरजवळ एका गृहोद्योगाने अशा लाईटच्या माळा तयार केल्याचे पेपरात वाचलेले आठवत आहे. त्याचे पुढे काय झाले माहिती नाही..

प्रॉब्लेम उद्योग धंद्या साठी नसलेल्या पोषक वातावरणाचा आहे. सुधारणा तिथे केल्या पाहिजेत.

सहमत..!!

मोदक तुला दिलेले जुने उत्तर या निमित्त्याने आठवले बघ ! :)

हँहँहँ... मोदक असं करुन नये बरं चच्चा आहेत ते ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2020 - 8:58 pm | संजय क्षीरसागर

लोकं आपसूक च भारतीय वस्तु घेतील !

१. त्यासाठी ही साधी गोष्ट खरेदीच्या वेळी पाहता येईल :

आपल्या देशाचा बार कोड - 890 पासून सुरु होतो. आत्ता लगेच घरातले कोणतेही उत्पादन घ्या, साधा बिस्कीट पुडा सुद्धा ... बार कोड बघा 890 पासून सुरु झाला असेल. याचा अर्थ हा माल Made in India आहे .

२. दुसरी अत्यंत महत्त्वाची लाईफ स्टाईल चेंजींग गोष्ट सोनमनी सांगितलीये

स्वस्त मिळतायंत म्हणून एकदम चार वस्तू एकावेळी घेऊ नका !
सध्या एकच लागतेयं ना ? मग एकच घ्या.

त्यामुळे व्यापारी स्टॉक कमी करतील
परिणामी आयातीवर जबरदस्त रेस्ट्रीकशन्स येतील
एकदा आयात घटली की चायनाला उत्पादन घटवावं लागेल.

इतका साधा उपाय करायला काय हरकत आहे ?

धनावडे's picture

10 Jun 2020 - 11:59 am | धनावडे

बारकोड 890 म्हणजे वस्तू made in india अस नाही तर तो बारकोड भारतात generate झालाय.

संजय क्षीरसागर's picture

10 Jun 2020 - 1:19 pm | संजय क्षीरसागर

मी आता तो फॅक्ट चेक बघितला.

त्यामुळे हा मुद्दा रिलेवंट होईल :

It’s true that 690 to 699 prefixes are assigned to GS1 China, but that doesn’t mean products with those prefixes are made there.

ते डिजीटस चायनाला असाइन केल्यामुळे वस्तू कुठेही तयार झाली तरी ती चायनाची आहे हे कळू शकेल.

तेजस आठवले's picture

9 Jun 2020 - 7:44 pm | तेजस आठवले

२/४ महिने आरडाओरडा होईल. पुढे काहीच होणार नाही.

माझे वाचलेले रिसोर्सेस मी त्याहून जास्त productive कामासाठी वापरू शकतो.
अन त्या वस्तूंची निर्मिती करण्याचे आपले जे रिसोर्सेस वाचतील त्यातून त्याहून जास्त productive आणि innovative असं काहीतरी करून ते जगभर विकायला पाहिजे.

अहो वाचलेला वेळ इथे कुणाला वापरायचाय ? आम्हाला इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात, जगातल्या यच्चयावत लोकांची अक्कल काढण्यात, माझ्या जातीतला माणूस ४०० वर्षांपूर्वी तुझ्या जातीतल्या माणसाला काय म्हणाला आणि त्यावर आता कोणाच्या नाड्या आवळता येतील का ह्यातच जातो.

सरासरी वय ३० च्या आंत. २०५० पर्यंत भारत अजून तरूण होत जाणारेय. त्यावेळची सरासरी वय २० असणार आहे.

आत्ताही अमेरिकेतले म्हातारे भारतातील तरुणांच्या तोडीस तोड काम करतात. तेव्हाही करतील. आम्ही फक्त कोणता हा झेंडा घेऊ हाती म्हणत म्हणत अक्कल गहाण ठेवल्यासारखे फिरू, मोर्चे काढू. आंदोलनं करू, जमेल ते करू. जाळपोळ करू. नाहीतर आळश्यासारखे पडून राहू. आम्हाला पूर्वजांच्या पूर्वपुण्याईवर बसल्या खाटेवर खायला मिळालं पाहिजे. सरकारी नोकरी पायजे. हे ही पाहिजे आणि ते ही पाहिजे.

सगळीच परिस्थिती अशी नाहीये अर्थात. पण आपल्या कडे बर्याच लोकांचा कल हा असाच आहे.
हा प्रतिसाद कोणालाही वैयक्तिकरित्या नाहीये.
जिथे शक्य आहे तिथे तिथे स्थानिक वस्तू घ्यायचा प्रयत्न करायलाच हवा ह्याबद्दल दुमत नाही. पण एकूणच वस्तूची गुणवत्ता आणि गुणवत्तेतले सातत्य ह्या गोष्टीला आपल्याकडे फारसे महत्व देत नाहीत हे ही तितकेच खरे.

पण असंही असेल कि चांगल्या वैचारीक पर्यायांच्या अभावी अशी सामाजीक किडकी मनस्थिती तयार झाली.
योग्य दिशेच्या अभावाने मराठे मुघल आणि आदिलशहासाठी एकमेकांचे गळे कापत होते, भारतीय गोर्‍यांच्या आज्ञेत राहात होते. मनाला पटणारा आणि प्रॅक्टीकली शक्य असा पर्याय समोर आल्यावर तेच लोकं कंबर कसुन तयार झाले.

हे देखील एक प्रकारचे स्वातंत्र्ययुद्धच आहे... थोडं काल्पनीक आहे मात्र :)

कानडाऊ योगेशु's picture

10 Jun 2020 - 10:46 am | कानडाऊ योगेशु

प्रतिसादातल्या त्राग्याशी सहमत.
राजकिय पातळीवरच्या विचारसरणीत बदल होणे अत्यावश्यक आहेत.एखादे दोन चारित्र्यवान नेते पुढे आले तरच सकारात्मक बदल होणे शक्य आहे.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2020 - 9:43 pm | प्रसाद गोडबोले

जीवनावश्यक आणि ज्यांच्यावर जीवन अवलंबुन आहे अशा गोष्टी वगळता मी तरी नेहमीच मोस्ट ऑप्टिमल गोष्टीच निवडनार !

जर मोदी सरकारला किंव्वा अन्य कोणालाही देशभक्तीचा झटका आला असेल तर त्यांन्नी उत्पादकांना सबसिड्या देऊन भारतीय माल चीनच्या मालापेक्षा स्वस्त होईल असे काहीसे करावे ! किंव्वा मग वाढीव किमतीने देशी उत्पादने विकत घेणार्‍यांना इन्कम टॅक्स मध्ये वाढीव किमतीवर टॅक्स रिफंड क्लेम करायची सुविधा उपलब्ध करुन द्यावी !

चौथा कोनाडा's picture

10 Jun 2020 - 12:23 pm | चौथा कोनाडा

उत्पादकांना सबसिड्या देऊन भारतीय माल चीनच्या मालापेक्षा स्वस्त होईल असे काहीसे करावे !

अश्या अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आता हिच बातमी पहा:

UNLOCK

आणि गंमत म्हणजे संबंधित फुडारी "टिम-बारामती" मधून "टिम-कमळ" मध्ये सामील झालेली आहेत !

चौथा कोनाडा यांच्याशी सहमत.

मी ही हेच म्हणतो.
भारतात चीन इतकेच किंवा जास्त मनुष्यबळ आणि टॅलेंट आहे. गरज आहे ती उद्योग धंद्यांना पोषक वातवरण निर्माण करण्याची. बाकी
थोड्याच दिवसात हे बायकोट चिनी प्रॉडक्ट अभियान गुंडाळले जाईल हे नक्की.. कारण आजपर्यंत हेच होत आलेय. मिपावर देखील चीन च्या प्रत्येक कुरापती नंतर असा धागा उगवतो आणि महिनाभर ट्रेंडिंग वर राहून कुठंतरी गुडूप होऊन जातो.

त्यामुळे जर खरच असं वाटत असेल कि चीन शी दोन हात करायचेत तर सरकारला आपल्याकडचे उद्योग धंदे बळकट करून त्याचे ग्लोबल ब्रॅण्डिंग करता आले पाहिजे.

हा मुद्दा भावनिक पातळीवरून हाताळला जातोय.

ग्लोबलाझएनच्या जमन्यात असं कोणाला भहिष्कृत करणं शक्य नाही. त्याला बरेच पदर असतात.

- (प्रॅक्टीकल) सोकाजी

त्यामुळेहा उपक्रम तीन स्टेजेसमधे राबवण्याचा आहे

१. रिप्लेस चायना सॉफ्टवेअर्स अँड अ‍ॅप्स विथ इंडीयन ऑप्शन्स
२. किंमतीत झेपणारा फरक असेल तर भारतीय वस्तुंची निवड
३. चीनला स्वस्तात कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून वस्तू आयात करण्याऐवजी देशात त्या वस्तुंची किफायतशीर निर्मिती कशी होईल याचा विचार (लाँग टर्म प्लान)

पैकी १,२ हे नागरिकांच्या सहकार्यावर अवलंबून आहेत आणि ३ सरकारच्या धोरणावर आणि व्यावसायिकांच्या पुढाकारावर.

यात भावनांचा प्रष्ण कुठेयं ?

सोत्रि's picture

11 Jun 2020 - 5:18 pm | सोत्रि

- (प्रॅक्टीकल) सोकाजी

सोत्रि's picture

13 Jun 2020 - 6:04 am | सोत्रि
रविकिरण फडके's picture

10 Jun 2020 - 2:17 pm | रविकिरण फडके

हे अभियान काय प्रकरण आहे? मोहीम असा छान शब्द होता त्याला घालवून देऊन हे अभियान आलं! 'शिवाजी महाराज सुरतेच्या अभियानावर गेले' कसं वाटतं ?
आपण नुसतेच बोलघेवडे लोक आहोत. नुसतं मराठी मराठी करायचं, पण आपल्या भाषेची बूज मुळीच राखायची नाही, हाच आपला बाणा आहे. दिल्लीहून 'सर्वशिक्षा अभियान' आलं की आपणही 'चला, सर्वशिक्षा अभियान राबवूया' असं म्हणतो. वर सह्याद्रीचा फालतू गर्व.
हे विषयांतर आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण काय आहे, जर आपल्याला आपल्या मातृभाषेचीही फिकीर नसेल, तर मग आणखी कसली असणार? आणि ती नसेल तर ह्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत.
जाऊ दे. कोणीही काहीही करणार नाही. माहीत आहे, नुसतं अरण्यरुदन. पण राहावत नाही कधीकधी.

संजय क्षीरसागर's picture

10 Jun 2020 - 2:38 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला हवा तो शब्द वापरा पण व्यक्तिगत जीवनात त्यासाठी जे काही करता येईल ते करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश जाऊ द्या, ही इच्छा.

मराठी कथालेखक's picture

11 Jun 2020 - 12:04 am | मराठी कथालेखक

दिल्लीहून 'सर्वशिक्षा अभियान' आलं की आपणही 'चला, सर्वशिक्षा अभियान राबवूया' असं म्हणतो

सहमत.

भाषेबद्दल विचार करणारा, आग्रह धरणारा "uncool" (म्हणजे मुर्ख) समजला जातो. "मुदा समजला ना , मग बास तर.." ही प्रवृत्ती वाढते आहे. असो..

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2020 - 5:32 pm | चौथा कोनाडा

हिंदी शब्दांच्या अश्या वाढत्या भेसळीनं महाराष्ट्र हा हिंदी भाषिक प्रदेशच आहे असा भारतीयांचा आणि जगातल्या सर्वांचा समज होत चालला आहे !
मायबोलीच्या र्‍हासातील आणखी टप्पा !
आपले राजकिय नेतृत्व देशपातळीवर "मराठीच्या" बाबतीत पराभूत मनोवृत्तीनं वावरत आहे हे क्लेशदायक आहे !

सोनम वांगचुक नावाचा किमयागार आपल्या देशासाठी वरदान आहे. लडाख च्या पाणी प्रश्नावर काढलेला हिमस्तुप रुपी तोडगा खुप प्रभावी आहे त्यांचा. या लढ्यात त्यांनी पडायचं कारण त्यांना सिमेवरचा तणाव जवळुन दिसतो आहे. त्यांची I live simply मोहीम सुद्धा खुप गरजेची आहे. खाली दिलेल्या लिंक वर हा माणूस सिंधू च्या थंडगार पाण्यात साध्या राहणीच्या समर्थनार्थ पोहताना दिसतोय https://youtu.be/T5UQyF8xs-k

>आपल्या देशासाठी वरदान आहे !

एकदम बरोब्बर बोललात !

त्याचं हे अभियान लोकसहभागावर अवलंबून आहे.
लोकांनी ते स्पिरीट लक्षात घेऊन काही साध्या गोष्टी जरी जीवनात आणल्या तरी देशाच्या अर्थकारणात मोठा बदल घडू शकेल.

पण कोणी सांगितले की चिनी वस्त घ्या म्हणून?
मग आता घेऊ नका हा प्रचार कशाला?

आमची दिवाळी, गणपती सजावट स्वस्तात कशी होऊ लागली?
अमचेच मोबाईल घ्या असा आदेश काढला होता? आम्हीच अर्ध्या तासात फ्लेश सेलमध्ये घेत होतो.

कुणीही सांगितलं नव्हतं,
पण आता तो विचार करायला हवा यासाठी हा धागा आहे.

मराठी कथालेखक's picture

11 Jun 2020 - 12:07 am | मराठी कथालेखक

व्हॉट्स अ‍ॅप वर आलेला एक फॉरवर्ड संदेश.. मला आवडला आणि पटलाही

चिनी मालावर बहिष्कार घालण्याबद्दल जो तो मला सुचवत आहे. पण मला प्रश्न पडला की मी तर कधी गेलो नाही चीनला पिशवी घेवून सामान आणायला

कोहंसोहं१०'s picture

11 Jun 2020 - 5:20 am | कोहंसोहं१०

चायना प्रोडक्ट बॅन करण्याची मोहीम फारशी यशस्वी होईल असे वाटत नाही. याची अनेक करणे आहेत.
१. पहिले म्हणजे आपल्या भारतीयांची स्मरणशक्ती अतिशय थोडाकाळ राहणारी आहे. काही दिवस हे सर्व चालते पुन्हा काही काळ गेला की येरे माझ्या मागल्या. जेथे स्वतःच्या फायद्यासाठी १ जानेवारीला घेतलेला संकल्प फारसा टिकत नाही तिथे फक्त भारतीय मालाचं घेण्याची आणि प्रत्येक वेळी जो माल येईल तो चायना माल नाही हे तपासून पाहण्याची सवय लागणे आपल्या भारतीयांना खूप अवघड आहे. अगदी अल्प काळासाठी कदाचित फायदा होईलही परंतु लॉन्ग टर्म साठी अवघड वाटते. आणि शॉर्ट टर्म साठी होणारे ठोसे नुकसान चायना मधले ट्रेडर्स दुसरीकडून भरून काढू शकतील कारण भारतीयांना होणारी निर्यात ही त्यामाने कमी आहे आणि मलेशियासारखा केवळ भारत निर्यातीवर खूप ट्रेडर्स अवलंबून असतील याची शक्यता कमी आहे.
२. सांगायला दुःख होते पण सत्य आहे ते म्हणजे भारतीयांमध्ये फारसा न रुजलेला राष्ट्रवाद. २०व्या शतकात युद्धाच्या वेळी केवळ एक वेळ जेऊन राहा या आवाहनाला जितक्या भारतीयांनी प्रतिसाद दिला होता तितका आजचा भारतीय सध्या चाललेल्या सॉफ्ट युद्धासाठी देत नाही आहे हे सत्य आहे. आजचा भारतीय राष्ट्रवादाआधी स्वतःच्या फायद्याचा आधी विचार करतो त्यात करोना सारखे संकट त्यामुळे प्रत्येकाचा कल पैसे वाचवण्यावर आणि स्वस्तात खरेदी करण्यावर आहे त्यामुळे अनेक जणांचा पवित्रा चायना मालाबद्दल 'वही वाली क्वालिटी काम दाम मे मिले तो फिर ये क्यों नही' असाच आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली की चायना कंपनीच्या नवीन स्मार्ट वॉचची ऑनलाईन विक्री २ मिनटात १५००० झाली आणि उदंड प्रतिसादामुळे अजून एक राउंड काही दिवसात येणार आहे. हेच अगदी नुकत्याच लाँच झालेल्या प्रसिद्ध चायना कंपनीच्या मोबाईलच्या ब्रॅण्डच्या बाबतीतही खरे ठरण्याची शक्यता खूप जास्त आहे. काही दिवसात आकडे येतीलच बाहेर.
३. भारतात अनेक लोक फसवणूक करायला खोटे बोलायला मागे पुढे बघत नाहीत. छोट्या छोट्या चायना प्रोडक्ट्स नी आपले भारतीय मार्केट असे व्यापले आहे की कळत सुद्धा नाही की विकत घेणारा माल चायनाच्या आहे की नाही. आणि अश्या वस्तूंवर मेड इन चायना वगैरे लिहिण्याची अजिबात गरज नसते (उदा चित्रकलेचा पेपर, आकाशकंदील, माळ, पूजेचे साहित्य आणि बरेच काही). दुकानदार असे प्रोडक्ट्स चायना चे असले तरी स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलून माल गळ्यात मारायला मागेपुढे बघत नाहीत.
४. स्वयंपूर्णतेचा मुद्दा बरोबर आहे पण अडचणी बऱ्याच आहेत. मेक इन इंडिया ला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. कारणे अनेक असतील पण वस्तुस्थिती हीच आहे. दुसरे आणि अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरण ज्याकडे खूप कमी लक्ष वेधले गेले आहे. काही गोष्टी आपल्या देशात तयार करणे पर्यावरणाच्या दृष्टीने आत्यंतिक घटक आहेत आणि त्या बाहेरून मागवणेच योग्य ठरते. उदा कच्चा माल म्हणून वापरली जाणारी केमिकल्स. आपल्या कडे आधीच नद्या खूप प्रदूषित आहेत आणि अजून पर्यावरण खराब होणे परवडणारे नाही.

यावर शॉर्ट टर्म उपाय म्हणजे काहीही करून चायनाचा माल आपल्या देशी मालापेक्षा स्वस्त असणार नाही याची काळजी घेणे हाच आहे. मग डम्पिंग वाढवणे असो किंवा क्वालिटीचे कारण देऊन काही प्रकारचा चायना माल भारतात येऊच न देणे असो. चायनाचा माल विकत घेण्याची भारतीयांची सवय मोडायची असेल तर आधी चायना माल इतर मालापेक्षा स्वस्त नाही हे पाहिलेच पाहिजे. त्यावर दुसरा इलाज नाही. फोन घेताना जेंव्हा सॅमसंग आणि वन प्लस च्या किमती आणि फिचर्स एकसमान असतील तेंव्हाच राष्ट्रवाद आठवेल नाहीतर नाही. आणि हे सगळ्यालाच लागू आहे. १३० कोटी जनतेला भावनिक आवाहन करून मिळणारे यश फार मर्यादित आणि अल्प काळासाठी टिकणारे आहे. शक्य असेल तिथे स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न चालू ठेवावेत पण जोवर ते शक्य नाही तोवर चायना माल स्वस्तात विकला जाऊ नये हे पाहणे खूप महत्वाचे आहे.

फारशी यशस्वी होईल असे वाटत नाही ?

ते बहुतांशी नागरिकांच्या सहभागावर आहे. किमान तीन गोष्टी तर प्रत्येक जण सहज करु शकेल :

१. स्वस्त आहेत म्हणून एकदम चार वस्तू घेण्याऐवजी सध्या गरज आहे म्हणून एकच वस्तू घेणं

२. अत्यंत गरज असेल तरच वस्तू खरेदी करणं.
उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं

३. जिथे परवडण्यासारखा फरक आहे तिथे जाणीवपूर्वक भारतीय वस्तूच खरेदी करणं

मराठी_माणूस's picture

11 Jun 2020 - 11:20 am | मराठी_माणूस

काही चायनात नोकरी करत असतील, काहींचे चायनाशी व्यावसायिक संबंध असतील , त्यांनी काय करावे ?

मराठी कथालेखक's picture

11 Jun 2020 - 11:52 am | मराठी कथालेखक

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे (सरदार पटेलांचा पुतळा ) सुमारे ६० की ७०% भाग हे मेड इन चायना आहेत हे तिथल्या अधिकृत गाईडने (व्युविंग गॅलरीमधली) सांगितले.

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2020 - 12:29 pm | संजय क्षीरसागर

> सुमारे ६० की ७०% भाग हे मेड इन चायना आहेत.

आपण सगळ्या जगापेक्षा भारी आहोत कारण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच पुतळा कुठे आहे ?
आणि त्या निर्मितीचे जनक कोण ?

हे सवाल इतिहास विचारेल तेंव्हा एकमेव नांव समोर यायला हवं.
भले सामन्य माणसाला त्याचा शून्य उपयोग असला तरी हरकत नाही.

अर्धवटराव's picture

11 Jun 2020 - 7:24 pm | अर्धवटराव

आपल्या रोजच्या जगण्यात देखील हज्जारो गोष्टी दिसतील मेड इन चायना. पुढे देखील ते एका दिवसात रिप्लेस होणार नाहि. १००% रिप्लेस तर कधीच होणार नाहि. तसा विचार देखील नाहि.
या व्यापारी घडामोडींमधे आपलं घोडं किती आणि कसं पुढे दामटता येईल, ते टिकवुन कसं ठेवता येईल, वृद्धींगत कसं करता येईल, याचा विचार आता मेनस्ट्रीम व्हावा आणि तो विचार, त्यानुसार कृती भारतीय समाज जीवनाचं अंग बनावं, अशी स्थिती आहे.

बाकी स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचे प्रोस्पेक्ट्स वादातीत आहे.

ऋतुराज चित्रे's picture

11 Jun 2020 - 12:16 pm | ऋतुराज चित्रे

आंतरराष्ट्रीय व्यापार युध्दाला त्या त्या देशातील सरकार व तेथील उद्योगधंद्यांनी तोंड द्यायचे असते. देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे हे त्या देशातील सरकारचे व उद्योगधंद्यांचे कमकुवतपणाचे लक्षण आहे.

१. स्वस्त आहेत म्हणून एकदम चार वस्तू घेण्याऐवजी सध्या गरज आहे म्हणून एकच वस्तू घेणं

२. अत्यंत गरज असेल तरच वस्तू खरेदी करणं.
उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं

३. जिथे परवडण्यासारखा फरक आहे तिथे जाणीवपूर्वक भारतीय वस्तूच खरेदी करणं

हे एकदा नागरिकांनी मनावर घेतलं की चीनकडून होणारी बेफाम आयात आपोआप मंदावेल.

संगणकनंद's picture

11 Jun 2020 - 2:13 pm | संगणकनंद

उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं

किती उच्च प्रतीचा दांभिकपणा करता हो तुम्ही. केवळ तुमचा धागा आहे म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे विधान केलंय तुम्ही.
हेच विधान कुणा दुसर्‍या सदस्याने केले असते तर गणपतीच्या अस्तित्वापासून ते समई लावून मन प्रसन्न होत नसते इथपर्यंत आपलया अगाध अध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय ज्ञानाची उधळण करत इतर सदस्यांसोबत किमान दोन दिवस प्रतिसाद प्रतिसाद खेळला असता तुम्ही. किंबहूना तुम्ही ते काही धाग्यांवर नामस्मरण आणि जपाबद्दल आता करतच आहात.

इथे बरी गणपतीसमोर समई लावून मनाला मिळणार्‍या प्रसन्नतेचे समर्थन करत आहात, तुमचा मुद्दा आहे म्हणून. देव गणेशाने तुम्हाला सद्बुद्धी दिली तर :)

चित्तप्रसन्न होण्यासाठी मला कशाची गरज नाही.

तुम्ही पुन्हा एकदा आपलं नांव सार्थ केलं आहे.

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2020 - 2:33 pm | संजय क्षीरसागर

.

संगणकनंद's picture

11 Jun 2020 - 3:00 pm | संगणकनंद

हे विधान गनपती बसवणार्‍यांसाठी आहे

हो का? पण मग ते इथेच कशाला? इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.

चित्तप्रसन्न होण्यासाठी मला कशाची गरज नाही.

तुमचे कसे काय बुवा चित्त प्रसन्न होते? तुम्ही तर चित्ताच्या पलीकडे गेलेले आहात ना? तुमचे चित्त तर निर्भाव असायला हवे ना? की नुसत्याच बोलायच्या बाता?

तुम्ही पुन्हा एकदा आपलं नांव सार्थ केलं आहे.

तेच बरं आहे. लोक सोडून देतात आमच्यासारख्यांना "जान देव भाय त्याचू हय वह" म्हणत. तुमच्या सारख्यांना मात्र लोक "अति शहाणा त्याचा बैल रिकामा" म्हणत फिदीफिदी हसतात. :)

धागा कशाविषयी आहे ते वाचा.

संगणकनंद's picture

11 Jun 2020 - 3:14 pm | संगणकनंद

नावाचं सोडा हो, नावाचं काय घेऊन बसलात. नावात काही नसते हे एका "ज्ञानी" माणसाला सांगावं लागण्याची वेळ यावी ना.

धागा कशाविषयी आहे ते वाचा.

धाग्याचं सोडा, मुद्द्याचं बोला. :)

इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.

झाली ना बोलती बंद.

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2020 - 3:23 pm | संजय क्षीरसागर

> बरोब्बर ! पण ते तुम्ही स्वतः घेतलंय ना !

त्यामुळे ते सारखं सार्थ होतंय.

आता पुन्हा एकदा धागा काय आहे ते पाहा : 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट'

तुमच्यासारखे त्याचू लोक धारणा सोडायला तयार नाहीत म्हणून दोन्ही कामं करायला लागतात.
त्यांच्या धारणा निस्सरित करणं, आणि
त्यांना चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं

संगणकनंद's picture

11 Jun 2020 - 3:37 pm | संगणकनंद

धाग्याचा हेतू चांगला आहे याबद्दल दुमत नाही. मात्र "आपल्या" विचारांचे समर्थन करताना तुमचा ढोंगीपणा उघड झाला आहे त्यावर बोला ना काही.

इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.

यावर तुमची बोलती बंद झाली आहे.

इथला तुमचा विचार स्पृहणीय आहे, ते विजेच्या माळांचे उदाहरणही योग्य आहे. मग इथे जर तुम्ही देवतेचे, तिच्यासमोर समई लावून मनाला मिळणार्‍या प्रसन्नतेचे समर्थन करत आहात, तुम्हाला चुकीच्या वाटणार्‍या गोष्टीला पर्याय सुचवत आहात तर मग इतर ठिकाणी तुमची बुद्धी का माती खाते? तिथे का श्रद्धेवर, देवता पुजनावर, देवासमोर समई लावण्यांसारख्या साध्या साध्या कृतींवर, नामजपावर काहीही कारण नसताना आगपाखड करत असता? हा विरोधाभास नाही का?

काही डोक्यात शिरलं असेल तर काही चांगला मुद्दा मांडाल. नसेल शिरलं तर माझ्या नावावर अजून एखादी बालिश कमेंट कराल. माणूस स्वतःहून जेव्हा एखादं नाव घेतो तेव्हा त्या नावाने त्यास कुणी हाक मारल्यास त्याला काही फरक पडणार नसतो एव्हढी साधी गोष्टही तुम्हाला कळत नाही. बसलेत माझ्या नावाचा जप करत. :)

पुन्हा वाचा :

तुमच्यासारखे त्याचू लोक धारणा सोडायला तयार नाहीत म्हणून दोन्ही कामं करायला लागतात.
त्यांच्या धारणा निस्सरित करणं, आणि
त्यांना चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं

________________________________

जेंव्हा धारणा निस्सरित करायचा धागा असेल तेंव्हा तिथे ते काम करतो.

जेंव्हा चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं असतं तेंव्हा ते काम करतो.

थोडक्यात, त्याचू लोकांना विचारांची योग्य दिशा देतो.

संगणकनंद's picture

11 Jun 2020 - 3:54 pm | संगणकनंद

बोलती बंद झाल्यावर गोलमाल प्रतिसाद देण्याची कला तुम्ही चांगलीच आत्मसात केली आहे. :)
असो, धागा चांगला आहे, त्यावर अधिक अवांतर नको.

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2020 - 4:32 pm | संजय क्षीरसागर

त्याचू लोकांना विचारांची योग्य दिशा देण्याचं काम सतत करायला लागतं

बर्‍याच वेळानं का होईना, धागा काय आहे आणि आपण काय विचारतोयं हे तुम्हाला समजलं !

बघा :

धागा चांगला आहे, त्यावर अधिक अवांतर नको

Jayant Naik's picture

11 Jun 2020 - 2:21 pm | Jayant Naik

एका चांगल्या विचारांना वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

अर्जुन's picture

11 Jun 2020 - 3:17 pm | अर्जुन

आंतरराष्ट्रीय व्यापार युध्दाला त्या त्या देशातील सरकार व तेथील उद्योगधंद्यांनी तोंड द्यायचे असते. देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे हे त्या देशातील सरकारचे व उद्योगधंद्यांचे कमकुवतपणाचे लक्षण आहे.काळ, अर्थातच स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचा!!
वरील मत वाचल्यावर, आताच जालावर वाचलेले आठवले, सर्व जबाबदारया सरकारवर लादण्यापेक्षा आपण देशासाठी आपले कर्तव्य पार पाडु या, व सरस्वती राजमणीसारख्या अनेकांच्या श्रमाचे चीज करु या !!!
स्थळ : रंगून, ब्रम्हदेश (आताचे मायनामार)
रंगूनमधील सोन्याच्या खाणींचे एक भारतीय मालक - ब्रम्हदेशातील श्रीमंत भारतीयांपैकी एक! मनात जाज्वल्य देशभक्ती आणि ब्रिटिशांबद्दल आकस!!
नेताजी सुभाषचंद्र बोस त्यावेळेस रंगूनमधून आपली सूत्रे हलवत असत. असेच एकदा त्यांच्या सभेला गेली, त्यांची कन्या - राजमणी…
नेताजींनी सभेत आझाद हिंद फौजेसाठी निधी देण्याचे आवाहन केले. सोळा वर्षीय राजमणी त्यांच्या भाषणाने भारावली…
आपले सर्व दागिने आणि पैसे तिने दान केले!
एक १६ वर्षाची तरुणी इतके दागिने आणि पैसे दान करते हे नेताजींच्या नजरेतून निसटलं नाही. त्यांना ते योग्य न वाटल्याने ते सरस्वती राजमणी ह्यांच्या घरी आले. त्यांच्या वडिलांना नेताजी दागिने परत करत असताना खुद्द नेताजींना सरस्वती राजामणी ह्यांनी उत्तर दिलं,

'ते दागिने, पैसे माझे आहेत. त्यांच काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी ते तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही'.

एका १६ वर्षाच्या मुलीच्या शब्दांची धार खुद्द नेताजींना निशब्द करून गेली. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी त्यावर तिला सांगितलं,

'लक्ष्मी येईल आणि जाईल. पण सरस्वती तशीच रहाते. तिचा वरदहस्त तुझ्यावर आहे. म्हणून तुझं नाव आजपासून 'सरस्वती'
त्याअगोदर, जवळजवळ ८३ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी १९३७ सालच्या आसपास रंगूनला गेले होते. राजमणीच्या कुटुंबियांच्या घरी ते पाहुणे म्हणून गेले होते. स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधींचं नाव आणि व्यक्तिमत्व सगळ्यांना आकर्षित करेल असं होतं. त्यांच्या भेटीसाठी त्या घरात लगबग चालू होती. सगळे त्यांना भेटण्यास आतुर झालेले असताना लक्षात आलं की घरातली लहान मुलगी गायब आहे. तिचा शोध सगळीकडे सुरु झाला. खुद्द महात्मा गांधी ह्या शोधकार्यात जुंपले. थोड्या वेळाने ती मुलगी घराच्या मागच्या बाजूला बंदुकीने आपलं लक्ष्य वेधण्याचा सराव करत असताना आढळली. महात्मा गांधी नी तिला जाऊन सांगितलं की,
'तू इतकी लहान असताना हिंसेच्या रस्त्यावर का जात आहेस? आपण अहिंसेने ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देतं आहोत. तेव्हा बंदुकीची गरज नाही. तू सुद्धा अहिंसेच्या मार्गाने त्यांच्या विरुद्ध लढा दे. '
त्यांच बोलून संपत नाही तोच खुद्द महात्मा गांधी ना त्या १० वर्षाच्या मुली नी उत्तर दिलं,
'आपण चोरांना आणि लूट करणाऱ्या लोकांना मारतो. नाही का? मग ब्रिटिश चोर आहेत, लुटेरे आहेत. त्यांनी भारताला लुटलं आहे. भारतात चोरी केली आहे. मी मोठी झाल्यावर एका तरी ब्रिटिशाचा माझ्या बंदुकीने नक्की वेध घेईन'.
न घाबरता भारताच्या आणि पूर्ण जगाच्या अहिंसेच्या सगळ्यात मोठ्या व्यक्तिमत्वाला अवघ्या १० व्या वर्षी आपल्या शब्दांनी उत्तर देणारी ती मुलगी म्हणजेच भारताची आजपर्यंतची सगळ्यात तरुण गुप्तहेर ज्यांच नाव आहे 'सरस्वती राजमणी'.
त्यांचं कुटुंब मुळचं भारतातल्या त्रिची इथलं. अतिशय श्रीमंत आणि स्वातंत्र्य लढ्याशी निगडित असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून भारताला ब्रिटिशांपासून स्वतंत्र करण्याचं वेड त्यांना होतं. 'लोहा लोहे को काटता हैं' हा बाणा त्यांच्या अंगात लहानपणापासून होता. मोठं झाल्यावर त्यांचा कल ह्याच बाण्याचं नेतृत्व करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्याकडे वळला.
सरस्वती राजामणी ह्यांनी नेताजींना त्यांच्या आझाद हिंद सेनेत घेण्याची विनंती केली. अश्या तऱ्हेने त्यांची नियुक्ती आझाद हिंद सेनेच्या गुप्तहेर खात्यात झाली. ह्या खात्याकडे मुख्य जबाबदारी ही ब्रिटिश सेनेतील गुप्त संदेशांना आझाद हिंद सेनेकडे देणं ही होती. सरस्वती राजमणी सोबत अजून ४ सहकारी गुप्तहेर म्हणून रुजू झाल्या. त्या सगळ्यांना आपला पेहराव बदलताना पुरुषी रूप धारण करावं लागलं. सरस्वती राजामणी आता १६ वर्षाचा मिसरूड फुटलेला 'मणी' झाल्या होत्या. मुलगा बनून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात त्यांनी काम करायला सुरवात केली. काम करता करता त्यांच्याकडे संदेश, सैन्याच्या हालचालींची माहिती गुप्तपणे आझाद हिंद सेनेकडे देण्याचं काम होतं. हे काम करताना त्यांच्या एका मैत्रिणीचं बिंग फुटलं आणि ब्रिटिशांनी तिला कैदेत टाकलं. आपल्या साथीदाराला ब्रिटिशांच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं. पकडले गेल्यावर आपली काय हालत होईल हे माहित असताना त्यांनी एका नर्तकी चा वेष करून त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दारू पाजून आपल्या साथीदारांसह तिकडून पोबारा केला.

ब्रिटिश सैनिकांना ह्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघींचा ब्रिटिश सेनेने पाठलाग केला. ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात एक गोळी सरस्वती राजामणी ह्यांच्या उजव्या पायाला लागली. गोळी लागलेल्या पायाने धावता येत नसताना ब्रिटिश सैनिकांना चकवा देण्यासाठी ह्या दोघी चक्क झाडावर चढल्या. तब्बल तीन दिवस जोवर ब्रिटिश सैनिकांची शोध मोहीम संपत नाही तोवर झाडावरच बसून होत्या. गोळी लागलेला पाय घेऊन अन्न, पाण्याशिवाय तीन दिवस झाडावर बसून राहणं काय असेल ह्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. त्या गोळीमुळे आजही त्यांच्या उजव्या पायात बळ नाही. पण सरस्वती राजमणी ह्यांनी त्याचा अभिमान बाळगला.

दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचे कुटुंबीय सर्व काही तेथेच सोडून भारतात परतले, मद्रास (चेन्नई) ला स्थलांतरीत झाले. एकेकाळी गडगंज श्रीमंत असणाऱ्या सरस्वती राजमणी जवळपास ७० वर्ष एका छोट्या खोलीत रहात होत्या. शासनांनं त्यांची दखल घ्यायला स्वातंत्र भारताची सात दशकं जावी लागली! तामिळनाडू सरकारने त्यांना घराची व्यवस्था केली. फाटके कपडे जमवून ते शिवून पुन्हा गरीब लोकांना दान करण्याचं काम त्या आयुष्याच्या शेवटा पर्यंत करत होत्या. २००६ सालच्या त्सुनामीच्या प्रकोपात नाममात्र मिळणारं सरकारी पेंशन सुद्धा त्यांनी मदत कार्याला दान केलं होतं. अश्या ह्या सरस्वतीने १३ जानेवारी २०१८ ला शेवटचा श्वास घेतला.

आम्ही भारतीय करंटे आहोत! आम्हाला खऱ्या इतिहासाची जाणीव ना कोणी करून दिली न आम्ही ती करून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय मिळालेले संविधानाचे हक्क, लोकशाही, सार्वभौमत्व हे फक्त आणि फक्त राजकारण आणि स्वतःच्या फायद्यासाठी! मग ते शिक्षण, नोकरी अथवा पैसा किंवा आता सोशल मिडिया सगळ्यांसाठी वापरण्याचा करंटेपणा आजतागायत करत आलेले आहोत. त्याचा आम्हाला माज आहे कारण देशभक्ती काय असते हेच आम्हाला कळलेले नाही.
१५ चित्रपट करणाऱ्याला आम्ही देशाचा हिरो मानतो, १० सामने खेळलेला भारताचा स्टार होतो पण अंगावर गोळी झेलून त्याच्या होणाऱ्या यातनांना आपला अभिमान मानणाऱ्या सरस्वती राजमणी ह्यांच्या कर्तृत्वाचं न आम्हाला काही पडलेलं असते न ते कोणत्या पद्म सन्मानाच्या कक्षेत येते. कारण आमच्या हिरो बनवण्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही इतिहासावर फक्त आणि फक्त नाव ठेवायला तयार असतो इतिहास घडवायला नाही. इतिहास घडवणारी सरस्वती देवींसारखी माणसे वेगळ्याच रक्ताची होती. जरी देशाने त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली नाही तरी देशासाठी रक्त सांडल्याचा आणि त्या इतिहासात सहभाग देण्याचा तसेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी योगदान देण्याचा त्यांना अभिमान होता.

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2020 - 4:36 pm | संजय क्षीरसागर

इतकं तरी करु शकतो.

१. स्वस्त आहेत म्हणून एकदम चार वस्तू घेण्याऐवजी सध्या गरज आहे म्हणून एकच वस्तू घेणं

२. अत्यंत गरज असेल तरच वस्तू खरेदी करणं.
उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं

३. जिथे परवडण्यासारखा फरक आहे तिथे जाणीवपूर्वक भारतीय वस्तूच खरेदी करणं

हे एकदा नागरिकांनी मनावर घेतलं की चीनकडून होणारी बेफाम आयात आपोआप मंदावेल.

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2020 - 5:37 pm | चौथा कोनाडा

सरस्वती राजामणीची गोष्ट सर्व काही सांगून जाते !