मंडळी ही पाककृती अतीशय सोपी आणि हमखास प्रतिसाद देणारी आहे.
साहित्य :
साहित्य हे तुम्ही भारतात आहात की परदेशात ह्यावर अवलंबुन आहे. भारताता असाल तर एक मोबाईलफोन आणि (किमान) तीन-चार मित्र/मैत्रिण. परदेशात असाल तर एखादा ओळखीचा/जवळापासचा कुणीही आणि एक कॅमेरा.
कृती:
इथेही तुम्ही देशातच असाल तर अतीशय सोपी कृती आहे.
पूर्व तयारी :मोबाईलचा वापरकरुन ३-४ मित्रांना शनिवारी रात्री कुठेतरी जेवायला जायचा प्लॅन करायचा. जेवणाआधी मद्यपान/धुम्रपान केल्यास असात्विक कट्टा होतो मद्यपान आणि धुम्रपान टाळल्यास सात्विक कट्टा होतो.
प्रत्यक्ष कृती: झालं!! रवीवारी सकाळी भिंतीवर तंगड्या पसरुन कंटाळा आला की संगणकावर जाऊन वृत्तांत लिहुन टाकायचा.
तुम्ही परदेशात असाल तर मात्र थोडी वेगळी कृती आहे.
पूर्व तयारी: प्रथम तुमच्या ओळखीच्याने तुम्हाला जेवायला बोलावले आहे का बघावे. नसल्यास तुम्ही कुणाला जेवायला बोलावणार आहात का ते पहावे. एकदा सदर व्यक्तीस जेवायला बोलावले की मस्त पैकी चिकन/मटन, श्रीखंड/गुलाबजाम असा भरगच्च मेनु आणि अर्थातच मिसळपाव स्टार्टर अशी तयारी करावी. (मिसळपाव वगैरे बनवणे कटकटीचे वाटत असेल तर कुठलीही उसळ बनवुन त्याला तुम्ही राहत असलेल्या देशाच्या नावाप्रमाणे नाव द्यावे. उदा. मिसळपाव खास बुरुंडी श्टाइलची!)सदर व्यक्ति मिपावर आधीपासुनच असेल तर प्रश्नच नाही अन्यथा सदर व्यक्ती आपल्या घरी आल्यावर त्याने पाण्याचा घोट देखिल घ्यायच्या आधी सरळ संगणकावर नेउन त्या सदस्याला मिपाचे सदस्यत्व घ्यायला भाग पाडावे आणि यथासांग कट्ट्याला सुरूवात करावी. (म्हणजेच गप्पा टप्पा मग जेवण आणि मग निरोप! शिंपल!) आणि हो..पदार्थांचे फोटू काढण्यास मात्र विसरु नये.
प्रत्यक्ष कृती: दुसर्या दिवशी फोटोसहीत कट्टा कसा रंगला ह्याचे वर्णन सुपुर्त करावे. "कोण कुठला ओळखीचा ना पाळखीचा, निव्वळ मिपामुळे आज आमच्या घरी गिळून गेला! त्याबद्दल इथल्या सरपंचाचे आणि सर्व संपादकांचे अभिनंदन! " असे डेकोरेशन केले की झाले.
अधिक टीपा:
हा पदार्थ अनेकांना चघळायला पुरतो. असल्या डिशेसवर लोकं अक्षरशः तुटून पडतात! कित्येक प्रतिसाद गोळा होतात. 'हा अन्याय आहे' 'काय जाच आहे' प्रतिसादांच्या असल्या शिर्षकांनी मात्र घाबरुन जाऊ नये. तुम्ही दिलेले फोटो बघुन उत्साहात अनेक मंडळी असे प्रतिसाद देतात. 'छ्या! आज नेमका लंच टाईमच्या आधी तुमचा वृत्तांत वाचला आणि बादलीभर लाळ गळली, आता मुकाट्याने डब्यातील गोवारीची भाजी खावी लागणार' असा मजकुर बघुन खात्री करुन घ्यावी.
(विरंगुळा/मौजमजा सदरखाली लिहिलेले देखिल जड घेणार्यांनी) कृपया हलके घ्यावे!
प्रतिक्रिया
19 Nov 2008 - 2:21 am | छोटा डॉन
कोलबेरशेठ आज भयंकर फॉर्मात आहेत बॉ, एकावर एक सिक्सर ...
अगदी तंतोतंत वर्णन आहे, पुराव्याने शाबित करुन दाखवावे असे ...
मजा आली, येऊ द्या अशा अजुन पाककॄत्या !!!
=)) =)) =))
बेक्कार हाणला भौ ... मस्तच !!!
चला आम्ही निघतो, गवारीची भाजी खायची वेळ झाली आमची ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
19 Nov 2008 - 3:50 am | टारझन
१ . वाह काय पाकृ आहे .. आत्ता करूनच बघते - (सर्वचिकनचापी) टार्जू
२. भंजाळलो, फुटलो, बहिसटलो, हसुन हसुन पडलो, खुळा झालो ....च्यायला काय भारी वृत्तांत लिहला आहेस बे, लै भारी तु आता खरेतर "घाऊक भावात वृत्तांत " लिहुन देण्याचे दुकान उघड, लै चालेल ...एकंदरीत लै भारी कट्टा आणि वॄत्तांत तर लै लै लै भारी .... - छोटा ट्रॉन
३. कट्टा छानच झालाय , जळवा आम्हाला .. नुसती वर्णने ऐकून खलास झालो आहे. वर कट्टा आयोजकांच पोटभर
कवतिक .. (इतकं की तो देव असता तर प्रसन्न होउन एक वरदान मिळालं असतं ) - टारसुनीत
४. लै लै भारी वृत्तांत रे .. अगदी वृत्तांत शोभावा असा वृत्तांत !! ह ह पु वा. - टार्नंदयात्री
५. (कट्टा चुकलेल्या मेंबरला) अरे कधीही ये आमच्या कडे, तुझंच घर आहे - टारोधरा
६. (शब्दचेंगटपणाचा कळस) मस्तच/फारच छान/उत्तम/भारी झाला कट्टा - टारस्वी
७. मला वृत्तांत वाचताना मधेच चि. वि. जोशी यांची आठवण येत होती. - टारेवती
८. लय भारी ... लगे रहो .. मजा आली .. - १६_१२ टाटा टरक
९. पोटात दुखणार आता तुमच्या सगळ्यांच्या. - टार्पिन कार्यकर्ते
१०. कट्टा एकदम आवडेश - घाटावरचा बाटा
११. कट्टा मस्तच रंगलेला दिसत आहे - टितल
१२. मित्रांनो, तोडलत!! - टपिल टाळे
१३. तमाम जालावरच्या नावांना लाभलेल्या चेहर्यांच्या दर्शनाने आनंद झाला,वृत्तांत तर लै भारी!... वृतांत देण्याची इष्टाईल आवडली - टाऋषीकेश
१४. +१ , सहमत , असेच म्हणतो , अशीच लाळ गाळतो :)
१५. आम्हालाही मैफिलीत सामील झाल्यासारखे वाटले. - टारलव्य
१६. कट्टा सह्ह्हीच झाला.. खाणं-पिणं,गप्पा गॉसिपिंग .. फुल्ल टू धमाल! - टार्ग्यश्री
१७. कट्टेकरांचं अभिनंदन. - समर्थ टारदास
१८. अरे वा ! थाटात आणि पोटभर कट्टा झालेला दिसतोय.सर्वांना भेटून आणि वृत्तांत वाचून मजा आली.असेच सर्वत्र कट्टे होवोत ! - टिकाळ
१९. कट्टा आयोजकांना पाहून अंमळ चक्रावलो , कारण माझ्या डोक्यातला ह्याची छबी वेगळीच होती.जेवणाच्या मेजावरची एवढी रेलचेल बघून खात्रीच पटली की त्यांचे घर हे सुगरणीचे घरटे आहे - टारुरंग
२०. खालुन एकशे विसावे वरुन पस्तिसावे आणि मधले छायाचित्र पाहुन कळवळलो - टाराजी तानाजी
२१. मिपाचा कट्टा म्हणजे खाद्य पदार्थाची रेलचेल असे समजायला हरकत नाही. सध्या मिपाचे इतके सदस्य वाढत आहे की गावोगावी कट्टा व्हायला हरकत नाही. - टारंत्री
२२. हा कट्टा आहे की कट्ट्याला हजर राहू न शकलेल्या 'खवय्या' सदस्यांची जीवघेणी थट्टा?काय दणदणीत मेन्यू आहे....! - सदाशिवपेठकर
क्या बात है, क्या बात है..! सुंदर, सुरेख वृत्तांत आणि फोटू..! के व ळ अ प्र ति म !!! - टारोबा खेचर
आमची बादलीभर लाळ गळाली भो , अजुन एक कट्टा मिस झाला , अंमळ भुक खवळली - टारझन
ता.क. : ह.घ्या. लिहीणे विसरलो आहे
19 Nov 2008 - 3:50 am | कपिल काळे
टा टा, टारु, टुझी टतिभा टाज, टोलबेर टमाणे टैल टालेली टिसते.
टावडला टुझा टतिसाद
http://kalekapil.blogspot.com/
19 Nov 2008 - 4:11 am | भाग्यश्री
वा.. काय अभ्यास आहे! काय व्यासंग आहे! :)))))))
http://bhagyashreee.blogspot.com/
19 Nov 2008 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी टमटमीत प्रतिसाद. टार्या टोमॅटो खाऊन बसलास का रे प्रतिसाद लिहायला? ;-)
आणि पाकृ झकासच!
19 Nov 2008 - 3:36 pm | मृगनयनी
टार्या, टु ट्रेट आहेट......
मस्ट!!!!
इटकी सखोल लाळ गाळल्लीयेट्स!!!
+१.... टहमत!!! =)) =))
जबरदस्ट टॉन्ट टाकलायेस.......टट्ट्ण्णा ला....!!
मस्त!!.... मूळ विषयापेक्षा तुझी प्रतिक्रिया भन्नाट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट च आहे!!!
कीप ईट्ट अप.....
->
'टृगनयनी'
;)
19 Nov 2008 - 9:11 pm | कोलबेर
टारझन भाऊ हे सगळ्यात बेष्ट!
19 Nov 2008 - 9:21 pm | पिवळा डांबिस
टार्या, मी हे रेफरन्स मटेरियल म्हणून वापरणार आहे.....
पुढल्या वेळी कुणाला प्रतिक्रिया द्यायची वेळ आली तर सरळ "कॉपी ऍन्ड पेस्ट"!!!!
:)
20 Nov 2008 - 9:19 am | विजुभाऊ
कोलबेर काका तुम्ही ही वर्णने वाचली आहेत का?
!!!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १ http://misalpav.com/node/1232
आणि मिपा - अभिरूची कट्टा....(पोथी) http://misalpav.com/node/3208
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
20 Nov 2008 - 10:51 am | टारझन
का कुणास ठाव .. माला या प्रतिसादाचं प्रयोजण कळलं णाही. ज्यांचे प्रतिसाद होते त्यांना ते कुठूण आले ते माहित असावं ... असो .. चालू द्या
-टारूभौ
19 Nov 2008 - 2:21 am | आजानुकर्ण
निवासी कट्ट्याच्या खाद्यपदार्थांचे वर्णन न केल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. हा अन्याय आहे. ;)
आपला,
(सूचक) आजानुकर्ण
19 Nov 2008 - 2:24 am | छोटा डॉन
+१, सहमत आहे.
मी पण निषेध व्यक्त करतो ....
पण आजानुकर्णशेठ, निवासी कट्ट्याचे खाद्यपदार्थ यांची व्याख्या काय आहे ?
काहीही असु द्यात , आम्ही सहमत आहोतच
( निवासी कम अनिवासी )छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
19 Nov 2008 - 2:24 am | वाटाड्या...
=)) =)) =))
"'हा अन्याय आहे' 'काय जाच आहे' प्रतिसादांच्या असल्या शिर्षकांनी मात्र घाबरुन जाऊ नये. तुम्ही दिलेले फोटो बघुन उत्साहात अनेक मंडळी असे प्रतिसाद देतात. 'छ्या! आज नेमका लंच टाईमच्या आधी तुमचा वृत्तांत वाचला आणि बादलीभर लाळ गळली, आता मुकाट्याने डब्यातील गोवारीची भाजी खावी लागणार' असा मजकुर बघुन खात्री करुन घ्यावी." --१ लंबर...
ह्या ह्या....सहीच...
19 Nov 2008 - 2:24 am | वाटाड्या...
=)) =)) =))
"'हा अन्याय आहे' 'काय जाच आहे' प्रतिसादांच्या असल्या शिर्षकांनी मात्र घाबरुन जाऊ नये. तुम्ही दिलेले फोटो बघुन उत्साहात अनेक मंडळी असे प्रतिसाद देतात. 'छ्या! आज नेमका लंच टाईमच्या आधी तुमचा वृत्तांत वाचला आणि बादलीभर लाळ गळली, आता मुकाट्याने डब्यातील गोवारीची भाजी खावी लागणार' असा मजकुर बघुन खात्री करुन घ्यावी." --१ लंबर...
ह्या ह्या....सहीच...
19 Nov 2008 - 2:27 am | विसोबा खेचर
धम्माल लेख...!
कट्टापाकृच्या सर्व टिप्पण्या केवळ खास...! :)
प्रत्यक्ष कृती: दुसर्या दिवशी फोटोसहीत कट्टा कसा रंगला ह्याचे वर्णन सुपुर्त करावे. "कोण कुठला ओळखीचा ना पाळखीचा, निव्वळ मिपामुळे आज आमच्या घरी गिळून गेला! त्याबद्दल इथल्या सरपंचाचे आणि सर्व संपादकांचे अभिनंदन! "
ते तर मानवेच लागणार बॉस! :)
साला, शक्तिवेलूच्या काळात झाले होते का कधी असे जागतिक लेव्हलचे कट्टे? तिथे विल्मिंगटनचा विन्या सदा रुसलेला.. आणि बाकी मंडळी संस्कृत, प्रमाणभाषा, शुद्धलेखन आणि शुद्धिचिकित्सकात बारमाही अडकलेली..! आणि उरलेली मंडळी निरनिराळ्या गझल-टोळ्यांच्या राजकारणात अडकलेली! साला, मनमोकळेपणानं एकमेकांना भेटणं होणार तरी कसं? :)
असो.. आज तात्याला टार्गेट करणारी कविता आणि आता हा समस्त कट्टेकरी मिपाकरांना टार्गेट करणरा लेख..! दोन्हीही खासच तिच्यायला! जियो...! :)
आपला,
(समस्त कट्टेकरींच्या अभिनंदनास आणि धन्यवादास पात्र!) तात्या सरपंच! :)
19 Nov 2008 - 9:17 pm | कोलबेर
तात्या, (आता ब्रेकअप झालं असलं तरी) तुमच पहिलं प्रेम आहे ना ते. ;) त्याविषयी इतकी कटूता?
आणि तिकडच्या कट्ट्यांचे देखिल ग्रुप फोटो तुमच्याच खरडवहीत बघीतले होते. तसेच त्या पिरंगुटच्या बंगल्यावर जरा जास्तच मनमोकळेपणाने भेटलेले कट्टेकरी पण आठवतात हो! :)
(एक्स मनोगती) कोलबेर
19 Nov 2008 - 2:29 am | चतुरंग
(खुद के साथ बातां : आत्तापर्यंत एकाही कट्ट्याला यायची संधी न मिळाल्यामुळे कोलबेराला अंमळ जळजळ होते आहे का रे रंगा? एखाद्या कट्ट्याला हजेरी लागताच दलबदलूपणा करुन गाईलच गोडवे रसभरीत पदार्थांचे, जिभल्या चाटत चाटत! अंमळ ह.घ्या. ;)
चतुरंग
19 Nov 2008 - 2:34 am | बिपिन कार्यकर्ते
आज कोलबेरशेठ बर्याच दिवसांनी लिहिते झाले, मज्जाच मज्जाच.
सदर व्यक्ति मिपावर आधीपासुनच असेल तर प्रश्नच नाही अन्यथा सदर व्यक्ती आपल्या घरी आल्यावर त्याने पाण्याचा घोट देखिल घ्यायच्या आधी सरळ संगणकावर नेउन त्या सदस्याला मिपाचे सदस्यत्व घ्यायला भाग पाडावे आणि यथासांग कट्ट्याला सुरूवात करावी.
ठ्ठो........ =)) =)) =))
अवांतर: बघ कुंदन, म्हणूनच तुला म्हणलं होतं की आपण मज्जा करू, कट्टा करू, वृत्तांत वगैरे लिहायचा नाय... बरं झालं की नाही!!! ;)
बिपिन कार्यकर्ते
19 Nov 2008 - 2:52 am | मुक्तसुनीत
डब्बल सेंचुरी !! लगे रहो ! ;-)
19 Nov 2008 - 4:57 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो...
19 Nov 2008 - 2:56 am | कपिल काळे
मस्त फक्कड पाकृ.
फोटोंची फोडणी चमचमीत.
भराभर प्रतिसादांची मोहरी चांगली तडतडली आहे.
http://kalekapil.blogspot.com/
19 Nov 2008 - 3:49 am | सर्किट (not verified)
पाककृतींच्या मालिकेतली ही नवीन पाककृती वाचून धन्य झालो. (आता आम्ही सुखाने डोळे मिटतो.)
-- (बाजीप्रभू) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
19 Nov 2008 - 12:08 pm | रामदास
आतापर्यंतची आपली (आ.ब.) ब्याटींग एका बाजूला सचीन आणि दुसर्या एंडला हेमांग बदाणी अशी होती .आता अदर एंड ला भक्कम खेळाडू आला आहे . होउन जाउ द्या नविन इनींगची सुरुवात.
अवांतर : टारझन भाऊंनी वेळीच तडका दिला .तडका जितका दूरून घालावा तेव्हढी खेच जास्त.
19 Nov 2008 - 6:16 am | रेवती
करमणूक झाली.
टार्या के साथ बातां : घरी ये मग बघते तुझ्याकडे.
(लाटणेधारी)रेवतीकाकू
19 Nov 2008 - 11:15 am | टारझन
लाटणेधारी रेवतीकाकूंके साथ बातां : ते लाटणे अंमळ हिर्याचे किंवा स्टिलचे असुनच्या काकूसाहेब. इतिहासात लै लाटणी तुटलीत .. :) हा त्ये कोल्हापुरी चपलीला घाबरला पायचे .. आता इस्ट कोस्टात आलो तर ड्याबिशाची भिती कमीच ..
(कवचकुंडलधारी) टार्ण
19 Nov 2008 - 9:39 am | पिवळा डांबिस
कोलबेरभाऊ अभिनंदन!!
पण एकदा तुमच्याकडे कट्टा जमवा नायतर इतर कोणाकडे सहभागी तरी व्हा!! तुमचे मत बदलेल!! याबाबतीत चतुरंगाशी सहमत!!!!:)
पाककृतींच्या मालिकेतली ही नवीन पाककृती वाचून धन्य झालो. (आता आम्ही सुखाने डोळे मिटतो.)
-- (बाजीप्रभू) सर्किट
इतक्यात मरू नका!!! तोफेचे आवाज व्हायचेत!!!!
अजून कोलबेरभाऊच्या हाताला सर्किटण्णा उडप्याच्या हाताची चव नाय आलेली...
ती एकदा आली की मग सुखाने डोळे मिटा....
टार्या के साथ बातां : घरी ये मग बघते तुझ्याकडे.
(लाटणेधारी)रेवतीकाकू
सहमत!!!!
-(कोलापुरी चप्पलधारी) टवळा टांबिस
19 Nov 2008 - 9:45 am | सर्किट (not verified)
इतक्यात मरू नका!!! तोफेचे आवाज व्हायचेत!!!!
अजून व्हायचेत ???
काय सांगता ? मग आम्हाला ते मोठ्ठे आवाज कुठले ऐकू आले ?
अच्छा ! इस्ट कोस्ट वरून काही पर्यावरण-विरोधकांनी मिथेन ग्यास चा भडीमार केलेला दिसतोय ??
(अनिवासी ब्राह्मणाचा शापः त्यांच्या घरी तात्या येवो, आणि त्यांची मोरी तुंबवो.)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
19 Nov 2008 - 9:16 pm | पिवळा डांबिस
काय सांगता ? मग आम्हाला ते मोठ्ठे आवाज कुठले ऐकू आले ?
अहो ते बुरुंडी मिसळ अंमळ जास्त झाल्याचे आवाज होते....
रंगाभाऊ, मुक्तसुनीत आपली माणसं आहेत, त्यांना जरा ब्रेक द्या.....
(अनिवासी ब्राह्मणाचा शापः त्यांच्या घरी तात्या येवो, आणि त्यांची मोरी तुंबवो.)
तथास्तू!!!!! (दुसर्या अनिवासी ब्राम्हणाचा आशीर्वाद!!!)
ढामढुमे पादे उत्तमे टाराटुरीच मध्यमे|
पादानाम फुस्कुली राणी तस्य घ्राणे न जायते||
-(विसूनाना यांचे सौजन्याने!!!)
:)
19 Nov 2008 - 9:56 am | विजुभाऊ
मस्त कोलबेर्शेठ
काही अचानक कट्टॅ अस्तात. त्याचे वर्णन क्रमशः मधे करा की
गटण्याने आयोजेत केलेल्या साग्रसम्गीत कट्ट्याला तुम्ही हवे होतात.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
19 Nov 2008 - 12:16 pm | आनंदयात्री
लै भारी ... अजुन एका साहित्य प्रकाराची मारलीत !! धन्य धन्य !!
तोडलत तुम्ही .. तोडलत !!
-
आपलाच
डांबरलाडु
19 Nov 2008 - 12:32 pm | स्वाती दिनेश
अरे क्या बात है!
सर्केश्वर चिफ शेफ आणि कोलबेरपंत,तुम्ही अगदी शेफसाहेबांच्या पावलावर पाऊल..
रेशिपी भन्नाट जमलीय बरं का..
स्वाती
19 Nov 2008 - 3:26 pm | सुनील
कोलबेरराव, देरसे आये, दुरुस्त आये!
टार्या, उत्तम निरीक्षण, चांगली टोलवाटोलवी.
मजा आली.
(अद्याप एकाही मिपा कट्ट्याला न गेलेला) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Nov 2008 - 3:42 pm | ब्रिटिश टिंग्या
छान पाककृती आहे! एकदम झानटामाटिक!
एकदा करुन पहायला हवी!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
19 Nov 2008 - 4:20 pm | लिखाळ
वा वा ... पाकृ एकदम आवडली :)
आम्ही अश्याच तर्हेने पण थोड्या वेगळ्या पद्धतीने केला होता कट्टा ! पुढल्या वेळी तुमची पद्धत वापरुन कट्टा करु. कट्टा चांगला झाला की फोटो टाकिन ;)
आमच्या कट्ट्याला आम्ही ग्यासुद्दिनला बोलावणार आहोत आणि सर्व जण मिळून 'जो जीता वोही बंदर' की कुठलासा चित्रपट पाहणार आहोत... खरडवहितून बेत ठरायला लागले बर्रंका !
टारुचा प्रतिसाद आणि त्याची टार्ण वगैरे नावे मस्त :)
-- लिखाळ.
19 Nov 2008 - 6:15 pm | ऋचा
मस्त्च!!!!!
टारे तु काय ल्हितो रे.....
तुला लहानपणी 'ट' ची बाराखडी मारुन मारुन पाठ करायला लावली होती का?
--ट्रुचा
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
19 Nov 2008 - 6:19 pm | विनायक प्रभू
चांगलेच कोलले की हो.
19 Nov 2008 - 9:17 pm | अभिज्ञ
कोलबेर शेठ,
पाकृ लै भन्णाटच हाय.
तरिबी एक सांगावेसे वाटते,
ह्ये पाकृ वगैरे प्रकार सर्किट लोकच चांगली करत्यात.
तुमचा प्रयत्न चांगलाच हाय पण त्यात सर्किट ची फोडणी घावत नाय.
त्यामुळे खमंगपणा वाईच कमी झालाय बगा.
:)
असो.
अभिज्ञ.
19 Nov 2008 - 10:01 pm | प्राजु
सर्किट काकांच्या झार्यावर झाराच की...
करमणूक झाली वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Nov 2008 - 11:14 pm | विसोबा खेचर
अजून कोलबेरला त्याच्या गुरुइतकं (काय पण गुरू निवडला आहे!) खास लिहिता येत नाही हे खरंच.. परंतु अजून थोड्याश्या प्रयत्नाने जमू शकेल..
आपला,
(गुरूंचा गुरू!) तात्या.
19 Nov 2008 - 11:20 pm | कोलबेर
बरोब्बर!! तुम्ही जसे गरिबांचे पुलं तसे आम्ही गरिबांचे सर्किट :)
19 Nov 2008 - 11:23 pm | विसोबा खेचर
बरोब्बर!! तुम्ही जसे गरिबांचे पुलं तसे आम्ही गरिबांचे सर्किट
हा हा हा! :)
गरीबांचे का होईना, परंतु "पुलं" असं सम्बोधून आपण आमचा सन्मान केला आहे! :)
आम्ही ती दोन अक्षरं खूप मोलाची मानतो..!
आपला,
(गरीबांचा पुलं) तात्या.
19 Nov 2008 - 11:44 pm | सर्किट (not verified)
पुलं ? अरे असा कसा रे भोटम तू शिष्य कोलबेर ?
अरे, खरा वाक्प्रचार "गरीबांचे भाईकाका" असा आहे.
-- (जॉन स्ट्युअर्ट) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
19 Nov 2008 - 11:36 pm | मुक्तसुनीत
गरीबांचा काजू : शेंगदाणा
गरीबांचा अमिताभ : मिथुन चक्रवर्ती
गरीबांची मल्लिका शेरावत : राखी सावंत
गरीबांची लता मंगेशकर : अनुराधा पौडवाल
गरीबांचा रेहमान : हिम्मेस
गरीबांची मर्सेडीझ : मारुती ८००
गरीबांचे पुल : तात्या
गरीबांचे दादा कोंडके : विप्र
गरीबांचे जेरी यँग : सर्कीट
गरीबांचा श्वार्झेनेगर : टारूबाळ
गरीबांचे कॉमेडी सेंट्रल कोलबेर : मिपावरचे "कोलबेर"
गरीबांचे जी ए कुलकर्णी : नाव काढायची बंदी असलेले एक सदस्य
गरीबांचे बोरीस स्पास्की : चतुरंग
गरीबांचे केशवकुमार : केशवसुमार
19 Nov 2008 - 11:41 pm | लिखाळ
:)
-- (गरीब) लिखाळ.
20 Nov 2008 - 12:10 am | संजय अभ्यंकर
मुसुभाऊ!
लै भारी!
:)) :)) :))
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
20 Nov 2008 - 12:11 am | संजय अभ्यंकर
मुसुभाऊ!
लै भारी!
:)) :)) :))
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
20 Nov 2008 - 12:25 am | सर्किट (not verified)
गरीबांचे जी ए कुलकर्णी : नाव काढायची बंदी असलेले एक सदस्य
गरीबांचे "नाव काढायची बंदी असलेले एक सदस्य" : आजानुकर्ण
गरीबांचे (च्या) धारप, किंवा गरीबांचे (च्या) मतकरी: प्रियाली
गरीबांचे अमर्त्य सेनः नाना चेंगट
गरीबांचे मर्ढेकरः मुक्तसुनीत
गरीबांचे दळवी: ड्यांबीसखान
गरीबांचा केशवसुमारः आनंदयात्री
आणि मुख्य म्हणजे,
गरीबांचे मनोगत : मिसळपाव
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
20 Nov 2008 - 12:31 am | विसोबा खेचर
गरीबांचे मनोगत : मिसळपाव
हा हा हा! हे अवश्य चालेल...! :)
सतत बाप वारल्यासारखे चेहेरे असलेल्या, सभ्यता आणि सुसंस्कृतपणाच्या दांभिक शाली पांघरलेल्या श्रीमंतांच्या मनोगतापेक्षा हे गरीबांचं मनोगत असलेलं मिपा केव्हाही बरं! :)
तात्या वेलणकर.
20 Nov 2008 - 1:08 am | टारझन
सतत बाप वारल्यासारखे चेहेरे असलेल्या,
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
शब्दशः लोळतोय ... बाकी इतिहास आपल्याला ठाव णाय .. पात तात्याच्या ह्या कोटीला कोटी कोटी प्रणाम ..
गरिबांची शिवास रिगल = हातभट्टी
गरिबांची ब्लॅक लेबल = चपटी
गरिबांचा रुपया = डॉलर ( होय ब्रोब्र लिहलय, कारण आम्ही रुपयाला मौताल म्हणून डॉलरवेधी झालोय.)
गरिबांचा बाल्या = ब्रिटीश
गरिबांचा समुपदेशक = प्रभू देवा
गरिबांचा शिवाजीनगर = टारझन म्हंटल्यामुळे छाती अंमळ फुगून आली, आज दोन बेंचसेट जास्त मारतो.
तात्याला "खौट शेंगदाणा" हा अजुन एक खास असल्या प्रतिसादांसाठी नविन आयडी काढावा असा आघाउ सल्ला देऊ इच्छितो
- (कुबट ) कुबड्या खविस
20 Nov 2008 - 11:02 am | वेताळ
तात्या महाराज मस्तच शालीतुन जोडे मारता हो तुम्ही.
वेताळ
20 Nov 2008 - 1:33 am | कोलबेर
ठ्ठो!!!!
(गरीब नवाज) कोलबेर
20 Nov 2008 - 1:36 am | आजानुकर्ण
गरीबांच्या सर्किटरावांशी सहमत आहे.
आपला
(ठ्ठो) आजानुकर्ण
20 Nov 2008 - 12:56 pm | विसोबा खेचर
गरीबांचे "नाव काढायची बंदी असलेले एक सदस्य" : आजानुकर्ण
क्लास! :)
20 Nov 2008 - 2:03 am | घाटावरचे भट
=)) हसून हसून फुटलो....
20 Nov 2008 - 12:30 am | चतुरंग
गरिबांच्या तरला दलाल : स्वाती दिनेश
गरिबांचे पानवलकर/गंगाधर गाडगीळ : रामदास
गरिबांचे रवींद्र पिंगे : नंदन
चतुरंग
20 Nov 2008 - 10:09 am | आनंदयात्री
=)) =)) =))
हसुन हसुन मेलो !!