✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

shinchan :एक उत्तम स्ट्रेस बस्टर

P
Prajakta२१ यांनी
Fri, 05/08/2020 - 00:44  ·  लेख
लेख
सध्या लॉकडाऊनमुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे घरून काम करून आणि बाकीची कामे, फोनाफोनी करून झाल्यावर तेवढाच विरंगुळा उरतो टीव्ही सोडून करण्यासारखे खूप आहे हे कळते तरी वळत नाही असो पण सारख्या न्यूज चॅनेलवरच्या करोनाच्या घाबरवणाऱ्या बातम्या,सासू सुनांच्या कौटुंबिक भांडणाच्या अमरत्व लाभलेल्या सिरिअल्स ,त्यातच पौराणिक देवादिकांच्या अमरचित्रकथा ,तेच ते चित्रपट (उदा. सोनी -सूर्यवंशम ,झी-हम आपके है कौन ,हम साथ साथ हे आणि राजश्री production चे सिनेमे ,कलर्स -कारण जोहर चे सिनेमे ) ते संपले कि दक्षिण भारतीय डब केलेले अतर्क्य आणि अचाट सिनेमे ह्यातून बघायला काहीच उरत नाही. पाककृती चॅनेल्स बघून आपल्याकडे ते सामान नसल्यामुळे फॅन्सी रेसिपी करता न येण्याचे दुःख नको म्हणून त्या बंद आणि वेब सेरीजचे प्रोमोज बघूनच त्याला आपला पास देऊन टाकला होता नाही म्हणायला गाण्याची चॅनेल्स होतीच पण ती पण एका लिमिट नंतर कंटाळवाणी झाली जुन्या विनोदी सिरिअल्स -देख भाई देख,हम पांच इ.पण चालू केल्या आहेत पण त्या बघून हसू यायचे बंद झाले होते कपिल शर्मा आणि चला हवा येऊ द्या मधले ओढून ताणून केलेले आचरट विनोद आणि पंचेस ने हसणेच विसरले होते अशातच सहजच shinchan बघितले आणि खूपच रिलीफ मिळाला घरचे लहान आहेस का म्हणून ओरडायला लागले तरी पण बघतच राहिले इतक्या वर्षांनी तोच ताजेपणा आणि हसायला मिळाले एका ५ वर्षांच्या जपानी मुलाचे सहजसुंदर जीवन आणि रेखाटलेले भावविश्व,त्याला पडणारे प्रश्न आणि त्याची त्याने केलेली उकल त्यातून घडणाऱ्या गमतीजमती ह्या सगळ्यामुळे एक वेगळीच भट्टी जमून आलीये shinchan ,त्याची बहीण हिमवारी,त्यांचे पालक,श्वान मित्र शिरो आणि शाळेचे सोबती ह्या पात्रांवर रेखाटलेली एक धम्माल कार्टून सिरीज म्हणजे shinchan रोजच्याच जीवनातले साधे प्रसंग घेऊन त्यातून कशी धम्माल विनोद निर्मिती करता येते त्याचे मस्त ऍनिमेशन कम चित्रण आहे जपानी संस्कृतीचे चित्रण आणि डबिंग voice ओव्हर आर्टिस्ट्स ची मेहनत पण उल्लेखनीय (८०% श्रेय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट्स चेच आहे खरे तर ) कुतूहल वाटून गूगल केले तर वेगळीच माहिती आली एवढ्या धम्माल विनोदी पात्राची खरी माहिती करुण आहे शिनोसुक नोहारा नावाच्या एका ५ वर्षीय मुलाने आपल्या बहिणीला वाचवायला प्राण दिले असे काहीसे लिहिले होते दुर्दैवाने दोघेही रोड accident मध्ये गेले त्या धक्क्याने निराश होऊन त्यांच्या आईने (मिस्सीने )त्यांची रेखाटने करायला सुरुवात केली आणि ते असते तर कसे प्रसंग घडले असते असे इमॅजिन करायला देखील ती रेखाटने shinchan चे जनक Yoshito Usui ह्यांना मिळाली त्याने प्रेरित होऊन त्यांनी हि कार्टून सिरीज बनवली अशी वदंता आहे ह्याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत (लिंक-https://www.quora.com/What-is-the-real-story-behind-the-character-Shin-chan) https://en.wikipedia.org/wiki/Crayon_Shin-chan ह्या लिंकवर shinchan सिरीजची माहिती मिळते ह्या लिंकवर वरील गोष्टीचा उल्लेख नसल्यामुळे ती वदंताच मानवी लागते तसेच भारतीय पालकांनी shinchan बद्दल तक्रार केल्याची पण रंजक माहिती मिळाली shinchan chi उद्धटता आपल्या संस्कृतीशी मिळत नसल्याने आणि ते बघून मुले बिघडत असल्याने shinchan चे बरेच भारतीयीकरण करण्यात आले (जसे कि अल्कोहोल च्या जागी juice आणि काही सीन्स सेन्सॉर करण्यात आले ) मी पूर्वी बघितलेले shinchan आणि आत्ताचे shinchan ह्यात फरक जाणवतो तरी पण विनोद उणावत नाही पण सौम्य केल्याने चांगले वाटते इतकेच लॉकडाऊन चालू होण्याआधी पण जेव्हा ऑफिस मधून आल्यावर बघायचे तेव्हा एकदम ताणरहित फ्रेश झाल्यासारखे वाटायचे बाकी कार्टून्स कधीच बघितली नाहीत सध्या बघायचा प्रयत्न करते पण नाहीच आवडत shinchan शी जसे कनेक्ट होता येते तसे हल्लीचे कुठलेच कार्टून वाटत नाहीये (काही काहींची थिम चांगली असूनदेखील बघावीशी वाटत नाहीत) पूर्वीची लहानपणीची आत्ता relate होत नाही फक्त shinchan च कालातीत वयातीत राहिलाय अजून कोणी आहे का shinchan आवडणारे? अवांतर - मस्ती चॅनेल वर अन्नू कपूरचा गोल्डन इरा विथ अन्नू कपूर हा कार्यक्रम पण चांगला असतो जुन्या गाण्यांसोबत गीतकार,संगीतकार आणि गायक ,नटांचे वेगवेगळे किस्से पण सांगतो
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
4809 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

वाचनाबद्दल सगळ्यांचे आभार

Prajakta२१
Sun, 05/10/2020 - 00:02 नवीन
वाचनाबद्दल सगळ्यांचे आभार
  • Log in or register to post comments

छान

ब्रिटिश टिंग्या
Mon, 05/11/2020 - 00:52 नवीन
शिनचान मस्तच आहे. कार्टुनमध्ये वैयक्तिकरित्या मला टॉम अ‍ॅन्ड जेरी सर्वात बेस्ट स्ट्रेसबस्टर वाटतं. इतके वर्ष बघतोय पण कधी कंटाळा नाही येत. - टिंग्या
  • Log in or register to post comments

मी आजही कार्टुन्स बघणारी

मन्या ऽ
Mon, 05/11/2020 - 01:18 नवीन
मी आजही कार्टुन्स बघणारी एन्जॉय कराणारी एकटीच नाहीये हे वाचुन किती किती छान वाटतंय.. :) शिनचॅन, डोरेमॉन, मि.बीन बघते, पण टॉम& जेरी इव्हर ग्रीन आहे.कधीही बघु शकते. निव्वळ आनंद देणार कार्टुन! आणखी एक कार्टुन लागायचं आधी. नाव लक्षात नाही. एक आजी बाई आणि तिने पाळलेल प्राणी. त्यातली ट्विटी प्रचंड आवडायची मला..(अवांतर होईल थांबते आता)
  • Log in or register to post comments

लूनी ट्यून्स ट्विटी अँड सिल्वेस्टर

सुमो
Mon, 05/11/2020 - 07:59 नवीन
  • Log in or register to post comments

हेच ते!

मन्या ऽ
Mon, 05/11/2020 - 08:32 नवीन
पुन्हा लहान व्हाव अस वाटायला लागलंय..
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार

Prajakta२१
Tue, 05/12/2020 - 21:44 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

मुलगा लहान असताना बर्‍याच

राजाभाउ
Wed, 05/13/2020 - 11:21 नवीन
मुलगा लहान असताना बर्‍याच वेळा त्याच्या बरोबर बघायचो, मस्त आहे शिनचान. पण मस्त आयडिया दिलीत, आता परत बघायला हरकत नाही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा