मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[कविता' २०२०] - फरक

साहित्य संपादक · · स्पर्धा

फरक




जागत्या वैराण राती देह माझा थरथरे मन होई सैरभैर मुके होऊनि झुरे अबोल श्रांत डोळ्यांचे अश्रू बोलके वाहती प्रश्न तुझ्या लोचनांत मला काही विचारती सांडतो मी शब्द शब्द वेच तुझी तू उत्तरे स्वप्नही तुला कधी दु:खाचे पडत नाही दु:ख रोज पांघरतो त्याशिवाय झोप नाही कसे ऐकवू तुला मी अंगाईगीत कण्हणारे? माळू कशा, खोट्या आशा सावरलेल्या तुझ्या केसात? कष्टाची काजळी ल्यालो मी सुवर्णअंजन तुझ्या डोळ्यांत जखडून मी गेलेला जग तुझे स्वैर फिरे काळोखाचे गाणे माझ्या उद्याच्याही निवाऱ्याचे तुझी खुलती दालने गीत गात प्रकाशाचे तुझी पहाट गुलाबी गहरी माझी सांज रे होईल का भेट कधी चंद्र-सूर्याची आकाशी? तुझी आस मखमली माझी कुवत जराशी साद तुझी दबकते पाय माझेही बहिरे!


वाचन 5847 प्रतिक्रिया 0