Skip to main content

[कविता' २०२०] - फरक

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/05/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.

फरक




जागत्या वैराण राती देह माझा थरथरे मन होई सैरभैर मुके होऊनि झुरे अबोल श्रांत डोळ्यांचे अश्रू बोलके वाहती प्रश्न तुझ्या लोचनांत मला काही विचारती सांडतो मी शब्द शब्द वेच तुझी तू उत्तरे स्वप्नही तुला कधी दु:खाचे पडत नाही दु:ख रोज पांघरतो त्याशिवाय झोप नाही कसे ऐकवू तुला मी अंगाईगीत कण्हणारे? माळू कशा, खोट्या आशा सावरलेल्या तुझ्या केसात? कष्टाची काजळी ल्यालो मी सुवर्णअंजन तुझ्या डोळ्यांत जखडून मी गेलेला जग तुझे स्वैर फिरे काळोखाचे गाणे माझ्या उद्याच्याही निवाऱ्याचे तुझी खुलती दालने गीत गात प्रकाशाचे तुझी पहाट गुलाबी गहरी माझी सांज रे होईल का भेट कधी चंद्र-सूर्याची आकाशी? तुझी आस मखमली माझी कुवत जराशी साद तुझी दबकते पाय माझेही बहिरे!


वाचने 5871
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

+१

क्या बात है। कविता आवडली..

+१ हे
माळू कशा, खोट्या आशा सावरलेल्या तुझ्या केसात? कष्टाची काजळी ल्यालो मी सुवर्णअंजन तुझ्या डोळ्यांत
आणि
होईल का भेट कधी चंद्र-सूर्याची आकाशी? तुझी आस मखमली माझी कुवत जराशी
हे... खासच! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अगदी. ही सुरेख कविता राहून गेली मत द्यायची.

चांगलंय.

छान!