टेस्ट
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अनेक दिवस काकांची भुणभुण चालू होती - आपण टेस्ट करून घ्यायला हवी. काकूनां वाटत होतं - काय जरूर आहे, सगळं व्यवस्थित तर आहे.
सकाळी उठल्यावर काकूंच्या लक्षांत आले - काका कधीच जामानिमा करून बाहेर पडले आहेत. काकूंनी फक्त खात्री करून घेतली, बाहेर पडण्याचे कारण म्हणून वापरायची ढाल - वाणसामानाची पिशवी - काकांनी न विसरता बरोबर घेतली आहे.
कांही वेळाने लॅच उघडतानांचे काकांचे जोरजोरातले गुणगुणणे ऐकू आले, तेव्हा काकू स्वतःशीच पुटपुटल्या - खुषीत दिसताहेत म्हणजे टेस्ट निगेटिव्ह आली असावी, आता भुणभुण तरी कमी होईल.
लॅच उघडून आंत आल्यावर काकांचे लक्ष काकूंकडे जाता क्षणी काका ओरडले - बघ, लौकर जाऊन लाईनीत उभा राहिलो म्हणून दोन तरी बाटल्या मिळाल्या, नाहीतर हात हलवत परत यावे लागले असते!!
काकूंच्याही चेहेऱ्यावर खुषी उमटली.
प्रतिक्रिया
=)) सही!
खल्लास!
भन्नाट!
फक्त त्यावेळी अजून लोक