मोदक आणि पातोळे.

Primary tabs

सेफ्टीपिन's picture
सेफ्टीपिन in पाककृती
26 Apr 2020 - 10:57 pm

'लॉकडाउनच्या' या परिस्थितीत जिथे साधी भाजी बाजारात मिळणं आणि ती घरी घेऊन येणं सुद्धा अवघड झालं आहे तिथे रोज जेवणात वेगळं काय बनवायचं हा यक्षप्रश्न सध्या प्रत्येक घर 'फेस' करतं आहे. हे काम कितीही आव्हानात्मक असलं तरीही एकदा का ठरवलं घराच्या बाहेर अगदी आवश्यक असल्याशिवाय अजिबात जायचं नाही की मग घरात जे सामान उपलब्ध आहे त्यातच वेगवेगळे ऑप्शन्स आपोआप सुचायला लागतात.

पातोळे, दक्षिण कोकण किंवा गोव्याच्या मातीत बनणारा एक 'गोड गोड' पदार्थ तर उकडीचे मोदक हा खास कोकणातील पदार्थ. पातोळे बनवायचे म्हणजे हळदीची पाने अगदी मस्ट खरंतर आणि मोदकांसाठी तांदळाची पिठी. पण नसतील हळदीची पानं किंवा पिठी तरी its ok असा विचार करून त्यांचं रूप थोडंफार बदलून पातोळे कम मोदक बनवायचं ठरवलं.

तर यासाठी लागणारे जिन्नस ;

तांदूळ, आंबेमोहोर किंवा बासमती - 3 वाट्या

ओलं खोबरं - 2 नारळांचं

गुळ बारीक चिरून जितकं ओलं खोबरं असेल त्याच्या पाऊण पट किंवा गोड आवडत असेल तर थोडा अजून घेतला तरी चालेल. मी पाऊण पटापेक्षा थोडा जास्त घेतला.

साजूक तूप साधारण 4-5 चमचे

खसखस - 3 चमचे

वेलची पूड - अर्धा चमचा

मीठ - अर्धा चमचा

कृती : 3 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन साधारण 3 तास भिजत ठेवायचे.

सारणासाठी ओलं खोबरं(3 चमचे खोबरं बाजूला काढून ठेवायचं) आणि गुळ एकत्र करून मिश्रण एक चमचा साजूक तुपावर परतायला घेतलं. त्यातच 3 चमचे स्वच्छ धुवून घेतलेली खसखस आणि चिमूटभर मीठ घातलं. गुळ व्यवस्थित विरघळला की त्यानंतर साधारण 5-7 मिनिटांमध्ये सारण तयार होतं. साखरेच्या सारणाइतका वेळ गुळाच्या सारणाला लागत नाही. सारण होत आलं की त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड घालायची.

तांदूळ 2-3 तास भिजल्यानंतर जेवढे तांदूळ घेतले होते तितक्याच वाट्या पाणी घेतलं. तांदूळ उपसून मिक्सरमध्ये घालून त्यात 2 ते 3 चमचे ओलं खोबरं(जे आपण सारणातून वगळलं होतं ते), पाऊण चमचा गुळ आणि साधारण अर्धा छोटा चमचा मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून अगदी 'फाईन' वाटून घेतलं. हे होईस्तोवर कुकरमध्ये थोडं पाणी घालून कुकर गॅस वर ठेवला होता.
तांदळाचं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं पीठ एका पातेल्यात घालून त्यावर झाकण ठेवून कुकरमध्ये साधारण 15 मिनिटं मोठ्या फ्लेम वर आणि मग अजून 4 ते 5 मिनटं मंद गॅसवर कुकरची शिट्टी काढून टाकून वाफवून घेतलं.

हा प्रयोग अगदी पहिल्यांदाच करत असल्याने धाकधूक होती कारण पीठ बऱ्यापैकी पातळ होतं. पण कुकरचं झाकण उघडलं तेंव्हा अतिशय मस्त तांदळाची उकड तयार झाली होती.

मग नेहेमीप्रमाणे उकडीचे मोदक केले. अगदी काही मोदकांमधलं सारण 'लॉकडाउन' चा नियम मोडून बाहेर आलं खरं पण नेहेमीपेक्षा अतिशय लुसलुशीत झाले होते हे मोदक हे मात्र अगदी खरं.

(मोदकाची उकड असो की सुरळीच्या वड्यांची, नेहेमी कुकर मधेच काढते, कुकरची शिट्टी काढून टाकून.. अगदी मस्त होते, वेळ वाचतो, आणि अगदी शेवटपर्यंत उकड गरम आणि मऊ राहते).

तोंडी लावायला तिळाची चटणी, सुक्या मिरच्यांचा खरडा आणि बटाट्याचे भरीत केले होते.

-----------------

पातोळे करतांना तांदळाचं वाटलेलं पीठ साधारण डोश्याच्या पीठा इतकं दाट असतं. हळदीच्या पानांवर हे पीठ पातळ पसरवून त्यात गुळ-खोबऱ्याचे सारण भरून हळदीचे पान दुमडून ते मोदकांप्रमाणेच मोदक पात्रात किंवा कढईत चाळणीवर वाफवून/उकडून घेतात.

D

C

B

A

मोदक

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

26 Apr 2020 - 11:47 pm | Prajakta२१

'लॉकडाउनच्या' या परिस्थितीत जिथे साधी भाजी बाजारात मिळणं आणि ती घरी घेऊन येणं सुद्धा अवघड झालं आहे तिथे रोज जेवणात वेगळं काय बनवायचं हा यक्षप्रश्न सध्या प्रत्येक घर 'फेस' करतं आहे. हे काम कितीही आव्हानात्मक असलं तरीही एकदा का ठरवलं घराच्या बाहेर अगदी आवश्यक असल्याशिवाय अजिबात जायचं नाही की मग घरात जे सामान उपलब्ध आहे त्यातच वेगवेगळे ऑप्शन्स आपोआप सुचायला लागतात.
+१११११११११११११११११११११११११११११११११११

आजच एक पनीर उत्तप्पा जमला आणि फसला इथे प्रकाशित करायचा प्रयत्न करतीये पण होतच नाहीये आणि ती मुगाची खिचडी सहज लिहून काढली तर ती प्रकाशित झाली

प्रकाशित करताना मजकुरात स्माईली अथवा तत्सम चिन्हे असतील तर ती काढून परत प्रयत्न करा.

सेफ्टीपिन's picture

29 Apr 2020 - 12:14 pm | सेफ्टीपिन

धन्यवाद

Prajakta२१'s picture

27 Apr 2020 - 3:24 pm | Prajakta२१

धन्यवाद

हो SMILEY होत्या त्या काढल्यावर लेख प्रकाशित झाला

प्रचेतस's picture

27 Apr 2020 - 3:26 pm | प्रचेतस

मस्तच झालीय पाकृ

सेफ्टीपिन's picture

29 Apr 2020 - 12:13 pm | सेफ्टीपिन

धन्यवाद

विनटूविन's picture

7 May 2020 - 8:51 pm | विनटूविन

मोदकने पातोळे केले की काय