दुवा मे याद रखना, बस!

"बघा ना काही होतंय का ते..."
"काय बघणार साहेब?...तुम्हाला माहितचे"
"नाही... पssण.."
"कसंय साहेब, आमच्या हातात काही नसतं.
रेकॉर्डनुसार जायला लागतं. प्रोशिजर असते साहेब."
"पण एवढा मोठा माणूस, बायका पोरं, घरदार..सामाजिक कार्य..."
"आम्ही चेक करूनच हात लावतो साहेब.
ह्याच रेकॉर्ड दाखवू?
४ बायका, ८ पोरं, गडगंज श्रीमंतय
वडील गेलेत,
आय जिंदा आहे.
१० दिसांपासून आजारी आहे...
पन आमच्या वहीत अजूनपर्यंत येक्काची बी नोंद नाय जो हा जगावा म्हणून दुवा मागतोय.
अगदी ह्याच्या आयची पण नाही!!"
"ठीके..." सायबांनी सुस्कारा सोडला.
नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या दप्तरातून फास काढला आणि पेशंटच्या गळ्याला लावला.
दहा मिनिटात टीव्ही वर बातमी
अमुक देशाच्या ढमुक हुकुमशाहाचे निधन.

वाचने
3504
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली आहे कथा, अजुन ही जास्त
+1
+ 1
+१
बाप्रे !
+1
हुकूमशहा सामाजिक कार्य करतात
+१