Skip to main content

.. तम दाहक लहरी होते!

लेखक राघव यांनी मंगळवार, 31/03/2020 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
डोहातील गर्ता जर्द.. ते डोळे जहरी होते! खग निष्पाप जरी तो.. ते व्याधच कहरी होते! गावातील नाती तुटती.. ते कपडे शहरी होते... स्वातंत्र्य कुणाला येथे? [मन स्वतःच प्रहरी होते..] पणतीची वातीवर भिस्त! तम दाहक लहरी होते! -- तृष्णांची मनात वस्ती.. अन् मुखात श्रीहरी होते.. राघव
लेखनविषय:

वाचने 1797
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आवडली रचना. लिहितं राह्यचं. -दिलीप बिरुटे