लॉकडाऊन : पहिला दिवस
नमस्कार मिपाकर्स,
कसे आहात? ... घरातच आहात ना?
कोरोनावर मात करण्यासाठी मा. पंतप्रधान यांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला त्याचा आज पहिला दिवस.
इतर देशात मुख्यता इटली, स्पेन, अमेरीका येथिल परिस्थिती वरुन आपल्याला अंदाज आला असेलच कि किति मोठ संकट आपल्यासमोर आहे.
या काळात काय करावे काय करु नये याबाबत विविध माध्यमातुन आपल्याला माहिती मिळत आहेच यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे बाहेर न पडणे. ही सुचना वारंवार मिळत असुन सुद्धा लोक बाहेर पडतच आहेत म्हणुन आज पासुन २१ दिवस लॉकडाउन घोषित केला आहे. सर्वांना विनंती आहे कि याचे स्वता पालन करा व आपल्या प्रियजनांना पण सांगा.
यावेळी आपण घरात राहुन काय काळजी घेतो, वेळ घालवण्यासाठी काय काय करतो यावर चर्चा येथे करु या.
तसेच व्यायाम, प्रानायम, पाकृ.... याची सुद्धा माहिती
कोरोना विषाणुविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारतीय बनावटीची कोरोना (कोविड १९) टेस्ट किट बनवण्यात मायलॅब कंपनीला यश मिळाले आहे या संशोधनात आपले मिपाकर श्री. शैलेंद्र कवाडे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे त्याबद्दल त्यांची टिम व त्यांना शुभेच्छा.
.
आणि हो.
नववर्षाच्या, पाडव्याच्या शुभेच्छा मंडळी.
इडा पिडा टळो, वैश्विक संकटाशी लढण्याचं बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभो.
- प्रशांत
आणि हो.
नववर्षाच्या, पाडव्याच्या शुभेच्छा मंडळी.
इडा पिडा टळो, वैश्विक संकटाशी लढण्याचं बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभो.
- प्रशांत
प्रतिक्रिया
बरंय!
माझ्यासाठी नवीन नाही
शैलेंद्र -खूप खूप अभिनंदन आणि
सुट्टी असल्याने घरातली इतकी
टाईमपास साठी ....
आणखी एक फायदा ...
पत्ते ?
३०४ लै जबरदस्त आहे, जाम मजा
कोण काय डाव खेळत असेल .. एक कल्पनेची आयडिया
पवार -- बदाम सात ..... का ?
मिपावर पूर्वी एका धाग्यात
कमाल आहे , मिपाकरानी कोरोना
आॅफिस मधील कलिगची मुलगी
काल गुढीपाडवा होता पण
मायलॅब ला सलाम..
Pagination