दोसतार-४०

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Mar 2020 - 6:47 am

वाया नाही गेला. मी शिकले की त्यातून. मी घाबरले असते तर त्या पोरांनी रडवलं असतं मला." पण आता जर पुन्हा कधी अशा वर्गावर जायची वेळ आली तर अजिबात भिती वाटणार नाही."
अरेच्चा हे पण आहेच की. शिकवताना आपण बरेच शिकत असतो.

मागील दुवा : http://misalpav.com/node/46141

हे पण बरोबर आहे. आता चा तास एल्प्या घेणार. तो तासावर गेलाय. टंप्या एका शालाप्रमुख सरांच्या मागे मागे म्हणजे आजच्या दिवशीच्या शालाप्रमुख दत्ताराम च्या मागे कसलीतरी फाइल घेवून कॉरीडॉरमधून फिरताना दिसतोय टंप्याला नक्की काय काम लावलंय ते कळायला काहीच मार्ग नव्हता.
वर्गात ज्याचे तास होते ती मुले अभ्यास ककरताहेत . ज्यांचे तास घेऊन झाले आहेत ते ज्याना तास घ्यायचे काम नव्हते त्यांच्याबरोबर बोलबोलताहेत . पण हे करताना नेहमी सगळ्यांच्याया बोलण्याचा येतो तसला तो फरफर्‍या स्टोव्ह सारखा आवाज अजिबात येत नाहिय्ये. कदाचित आम्ही सगळेच जण काहिना काही मनापासून करत असल्यामुळे असेल.
बुध्याकाकाची ती गोष्ट पुन्हा पुन्हा आठवून आता पाठ झाली आहे. ती कुणालातरी सांगितल्याशिवाय कसे कळणार की मी कसा सांगतोय ते. इथे कुणालाच माझी गोष्ट ऐकण्यासाठी वेळ नव्हता. श्रीप्या आणि मंद्या त्यांचे त्यांचे तास घेऊन परत वर्गात यायला हवे होते. काय माहीत ते कुठे गेले आहेत. निदान श्रिप्याला तरी सांगता आली असती गोष्ट . अर्थात त्याला गोष्ट सांगायची म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. कोणतीही गोष्ट तो पूर्ण ऐकूनच घेणार नाही. गोष्ट चालू असताना मधेच त्याला काहितरी आठवणार आणि त्याबद्दल विचारत रहाणार. म्हणजे आपन जर बुध्या काकाची गोष्ट सांगायला गेलो ना की" आटपाट नगर होते. तेथे एक बुध्या काका रहात होता. तो बुध्याकाका त्याची शेती संभाळून गावात कोणकडे काही कार्य असेल तर तेथे भजने गायला जायचा. खूप गोड आवाजात भजने गायचा अशी त्याची अवघ्या पंचक्रोशीत ख्याती होती." इतकी गोष्ट सांगून झाली की श्रिप्याचा प्रश्न येणार. आणि तो ही गोष्टीशी सम्बंधीत असेलच असे नाही. त्याच्या प्रश्नामुळे मूळ गोष्ट बाजूलाच रहाणार आणि आपण त्याच्या प्रश्नावरच बोलत बसणार. पण एक आहे. श्रीप्याला गोष्ट सांगायला लागलो तर नक्की चांगली प्रॅक्टीस होईल. त्याच्या प्रश्नांना जरा बाजूला ठेवायचे.
वर्गात गेल्यावर गोष्ट सांगताना मुले प्रश्न विचारतीलच की.. अर्थात हे सगळे आपल्याला तास घ्यायला मिळाल्यावर.
इतर कोणी नसेना का आपण वर्गावर तास घेतोय असे समजून या भिंतीलाच गोष्ट सांगूया. तीच प्रॅक्टीस समजायची. नाटकात नाही का प्रॅक्टीस करताना एखादे पात्र आलेले नसेल तर ते तिथे आहे असे समजून आपण बोलतो. तसंच हे. वर्गात गोष्ट सांगायची ती पण एकदम स्टाईलमधे. पोरांच्या कायमची लक्ष्यात रहायला हवी.
कसली स्टाईल घ्यायची? शोलेतल्या ठाकुरची स्टाईल मारायची का. मी मनातल्या मनात भिंतीला गोष्ट सांगतोय. खांद्यावर शाल पांघरुन . तो ठाकूर " ये हाथ मुझे दे दे गब्बर" म्हणताना दात ओठ पिसून बोलतो तसे मी म्हणतोय " आटपाट नगर होते. तेथे एक बुध्याका रहात होता....." छॅ … नाही जमत. तो ठाकूर रागावलेला होता. शिवाय त्याला हात नव्हते. हातवारे केल्याशिवाय काही सांगणार तरी कसे. मग त्या बीरुच्या स्टाईलमधे सांगून पाहुया. मी मनातल्यामनात गोष्ट सांगतोय " गाववालो ……." म्हणताना बीरु पाण्याच्या टाकीवर चढला होता मी वर्गातल्या टेबलावर चढून सांगतोय " आटपाट नगर होते. तेथे बुध्याकाका रहात होता...…" टेबलावर चढून गोष्ट सांगायची म्हणजे कायच्या कायच.
नाहीतर मग बसंती च्या स्टाईल मधे. ती टांगा चालवते. आपण त्याच स्टाईल मधे बाकावर उलटे बसून बोलुया. " हा तो देखनेवाली बात ये है के धन्नो घोडी होकर टांगा चलाती है तो बसंती लडकी होकर टांगा क्यूं नही चला सकती…" मी त्याच स्टाईल मधे बोलतोय" बुध्याकाका त्याची शेती संभाळून गावात कोणाकडे काही कार्य असेल तर...…." बापरे. या वेगात गोष्ट सांगीतली तर पाचव्या मिनीटात सम्पेल. पुन्हा मुलांना कळेल की नाही कोण जाणे.
फिल्मी स्टाईल नकोच. त्यापेक्षा आपले एखादे सर ती गोष्ट कशी सांगतील तशी सांगूया. घाटे सर गणीत सांगताना त्यांचा एखादी गम्मत सांगत असावेत असे साम्गतात. सोनसळे सर मराठीची कविता शिकवताना किती छान सांगतात. दहा पंधरा ओळींची कविता अख्खा तास शिकवतात.
मी डोळे मिटून घाटे सरां नी सांगितली असती तसे काहितरी गम्मत सांगतोय तशा आवाजात भिंतीला गोष्ट सांगतोय . " खूप गोड गळ्याने भजने गायचा अशी त्याची पंचक्रोशीत ख्याती होती."
माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारतय. छे मुलांनी शंका विचारताना अशी सरांच्या खांद्यावर थाप मारायची नसते….
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ, लै भारी लिहित आहात. मजा येतेय वाचताना.

श्वेता२४'s picture

5 Mar 2020 - 10:37 am | श्वेता२४

पु.भा.प्र.

विजुभाऊ's picture

5 Mar 2020 - 12:14 pm | विजुभाऊ

हो टाकतोय

बांवरे's picture

6 Mar 2020 - 11:59 pm | बांवरे

वाचतोय हो विजुभाउ.
टंकायला मदत हवी असेल तर कळवा.

विजुभाऊ's picture

7 Mar 2020 - 6:16 am | विजुभाऊ

_/\_