चारित्र्य

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2020 - 10:25 pm

स्त्रियांच्या चारित्र्याला समाज जेव्हढी किंमत देतो त्या कैक पट जादा किंमत पुरुषाच्या चारित्र्याला देत असतो .
समाज तुमच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करत असतो
लफ़ंग्या -बाई बाटलीचा नाद -खोटे बोलणे हे चारित्र्य असलेल्या पुरुषाला समाजात किंमत नसते -समाज किंमत देत नाही
मित्र व जवळचे जरी त्याची रंगेल -दिलदार -रसिक आदी कौतुक करत असले तरी त्याला घरी नेणं टाळतात
एम आय डी सी ला एक असा रसिक सर्वगुण संप्पन मित्र होता
चांगली कमाई होती मजा चालू असायची
एकदा दिवस फिरले -व्यवसायात असे कायम होत असतेच
२ लाख रु ची अर्जंट नड उत्पन्न झाली
माझ्याकडे आला अन पैशाची मागणी केली
मजकडे त्या वेळी इतके खुले पैसे नव्हते
मी त्याला नाही म्हटले पण म्हणालो माझा एक मित्र ओळखीचा आहे त्याला विचारून बघू का?
अरे बघ रे फार अर्जंट नड आहे -तो म्हणाला
ठीक आहे मी बोलतो -मात्र व्याज परत फेड आदी ची चारचा त्याच्याशी डायरेक्त्त कर -
मी मित्राकडे कडे गेलो अन त्याचे नाव सांगत त्याला २ लाख हवे असे सांगितले वर व्याज आदी देण्यास तयार असेही म्हणालो
त्या वर मित्र म्हणाला -अरे कुणा साठी शब्द टाकतो याच तरी भान असू दे
त्या माणसाला मी ओळखतो -दोन लाख घेऊन बाई बाटली वर उधळले तर कोण वसूल करत बसणार?
माफ कर मला हे शक्य नाही
समाज तुमच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करत असतो
स्त्रियांच्या चारित्र्याला समाज जेव्हढी किंमत देतो त्या कैक पट जादा किंमत पुरुषाच्या चारित्र्याला देत असतो .

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Mar 2020 - 9:33 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"लफ़ंग्या -बाई बाटलीचा नाद -खोटे बोलणे हे चारित्र्य असलेल्या पुरुषाला समाजात किंमत नसते -समाज किंमत देत नाही"
बहुतांशी राजकरणी,सी.ई.ओ. मोठे व्यावसायिक ह्यांच्यात हे गुण थोड्या फार प्रमाणात असतात की.