धर्म इथे बेताल झाला

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
2 Mar 2020 - 1:45 pm

धर्म इथे बेताल झाला

उठतासुटता जहाल झाला

वापरले कैक रंग त्याने

कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ...

किती चढले सुळावर त्याच्यानावे ,

मारणारे गनीम आणि मरणारेही ..........

पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे

पण .........जो तो हलाल झाला

जन्नत नसीब झाली कुणा

तर कुणी स्वर्गात पोहोचले

अरे पण त्यांचे काय झाले असेल ?

ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले

अपराध कुणाचा , कुणी भोगला

कामकऱ्याला जागेवरी ठोकला

मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी

हिरवा भगवा पुढे नाचला

हिजडे हरामी धर्मवेडे

रंगबिरंगी धर्मांमध्ये

फुका पाजती विषाचा प्याला

माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला

इतिहासडावी बाजूमत्स्याहारीव्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Mar 2020 - 4:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

भावना पोचल्या, आणि वेदनाही,
पैजारबुवा,

गोंधळी's picture

2 Mar 2020 - 9:06 pm | गोंधळी

सहमत.