प्रतिमांचे शिकार
आपण वेगवेगळ्या प्रतिमांचे नकळतपणे शिकार होत असतो. कुठले तरी ठिकाण, एखादा सिनेमा, एखादं हॉटेल खूप छान आहे अशी प्रसिध्धी असते. त्या ठिकाणी आपण जातो परंतु कित्येक वेळेला येणार अनुभव जे काही ग्रेट वगैरे ऐकलेले असते त्याच्या जवळपास तर सोडाच पण भिकार म्हणावा इतका वाईट असतो. आपण किती भिडस्त किंवा फटकळ आहोत त्यानुसार आपण जमेल तसा आपला अनुभव व्यक्त करतो. पण काही प्रतिमा तर त्याहून बळकट असतात. म्हणजे इतक्या कि जर आपल्याला सर्वमान्य अनुभव आला नाही तर आपल्यातच काही तरी उणीव आहे म्हणून आपण स्वतःला दोष देतो. माझ्या मागच्याच धाग्यावर काही भरकटलेले परंतु अतिशय सर्वमान्य सदस्याकडून काही प्रतिसाद आले आणि या धाग्याचा विषय बीज देऊन गेले. त्या सदस्याच्या प्रतिसादांचा समाचार घेणं हा धाग्याचा उद्देश नाही हे अगोदरच नमूद करतो.
लोकशाहीमधील हि एक आदर्श समाज व्यवस्था आहे असे मानणं आणि मुद्द्यावरून गुद्द्यावर येणं म्हणजे स्वतःचा आणि आपल्या भूमिकेचा नैतिक पराभव आहे या त्या दोन प्रतिमा.
सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊ कि आपल्याला स्वातंत्र्य झगडून मिळाले. दीडशे ते दोनशे वर्ष्यांचीं गुलामगिरी, लूट, स्वतंत्र सेनानींच्या घरादाराची धूळदाण एव्हडी मोठी किंमत देऊन आपण ते मिळवलं आहे. त्यामुळे त्यावर घाला घातला जातो असा वास जरी आला तरी सगळे मतभेद आणि अडचणी विसरून आपण पुन्हा एक होतो. पण तसे लोकशाहीचे नाही. ती आपल्याला पहिल्या दिवसापासूनच फुकट मिळाली आहे. चीन किंवा लोकशाहीसाठी झगडणाऱ्या देशांमध्ये जेंव्हा लोकशाही अवतरेल तेंव्हा तिचे तिथले राबवणे भारतातील राबवण्यापेक्षा जास्त प्रगल्भ असेल हे नक्की.
आपल्या लोकशाहीचे म्हणाल तर ती फार कमी लोकांचा सहभाग असलेली आहे. लोकशाहीने (किंवा इतर कुठल्याही समाज व्यवस्थेने) मूलभूत समजल्या जाणाऱ्या गरजा भागवण्याची हमी देणे (यात रोजगार देखील आला) अशी आपली भूमिकाच नाही आणि त्यामुळे या लोकशाहीने आपल्याला इतक्या वर्षात काय दिले याचा ताळेबंद आपण मांडतच नाही.
लोकशाही हि कल्पना म्हणून आदर्श वाटते यातच तिचे सर्वमान्यत्व आहे. परंतु लोकशाहीमधील सहभाग हा बेबंद स्वरूपाचा आहे. कोणी तरी छुपा अजेंडा घेऊन लोकशाहीच्या तरतुदींचा गैरवापर करतोय हे दिसत असून देखील त्या व्यक्तीचा अथवा संघटनेचा हस्तक्षेप थांबवता येत नसेल तर बहुमताच्या जोरावर होणारा लोकशाहीचा गैरवापर पदोपदी सहन करावी लागणारच. मला वाटते कि लोकशाहीचे बहुमत हि फार आदराने स्वीकारले जाऊ नये. एवढा उहापोह केल्यानंतर हाय मॉरल ग्राउंड स्वीकारणे एकवेळ शहाजोग पणाचे असेल पण त्याज्य नक्कीच नाही हे समजण्यात अडचण येऊ नये. आणि हो, लोकशाहीतील मतांतरे याला देखील फार आदर देण्याची गरज नाही!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रत्येक राज्यपद्धतीत दोष
अडाण्यांच्या लोकशाहीची किंमत
कमावत्या जनतेला फुकट खाण्याची
लोकशाही हि लग्न संस्थेसारखी
काळाची उबळ नी अर्बन नक्षलवादाचे समर्थन ?
भाजपला सरसकट पाठिंबा अजिबात
माझे दोन लेख
खर तर राजकीय धाग्यांवर प्रतिक्रीया द्यायला आवडत नाही
काहि लोक
मिपा मालक / संपादकमंडळ माहितीस्तव लक्षवेध
मला वाटते कि लोकशाहीचे बहुमत हि फार आदराने स्वीकारले जाऊ नये.
सर टोबी,