कान्हा अभयअरण्य अनुभव\ माहिती हवी आहे

Primary tabs

नानुअण्णा's picture
नानुअण्णा in भटकंती
5 Feb 2020 - 8:49 pm

कान्हा अभयअरण्याला भेट देण्याचा विचार आहे, एप्रिल महिन्यादरम्यान, अनुभव असेल तर, प्रतिक्रिया द्या, धन्यवाद

प्रतिक्रिया

मी गेलो नाही परंतू त्यांच्या पत्रकातून -

Map टुरिझम माहिती पत्रकातून.


ओनलाईन आरक्षण के लिए mptourism dot com वेबसाईट पर लॉगिन करे।

म प्र मुंबई ओफीस - 45, वल्ड ट्रेड सेंटर, कोलाबा, pin 400005
Email : mumbai@mptourism dot com

फोन 022221877603
02232539000

एन्ट्री गेट 'खटिया' आणि 'मुक्की' , 'छिल्पी'

नानुअण्णा's picture

6 Feb 2020 - 7:35 pm | नानुअण्णा

धन्यवाद, माहिती बद्दल..

चौथा कोनाडा's picture

6 Feb 2020 - 4:38 pm | चौथा कोनाडा

पिलीयन रायडर उर्फ पिरातै यांची लेखमाला वाचल्यास काही टिप्स मिळू शकतील.
सहा भागांची लेखमाला आहे, अनुक्रमणिका आहे, त्यामुळे सर्व लेख वाचणे सोपे जाईल.

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)

https://www.misalpav.com/node/26757

नानुअण्णा's picture

6 Feb 2020 - 7:35 pm | नानुअण्णा

पिलीयन रायडर यांनी सुंदर लिहिलंय, उपयोगी पडेल, धन्यवाद, माहिती बद्दल..

मी कान्हाच काय अजून कोणत्याच संरक्षित अभयारण्यात पैसे भरून गेलो नाही आणि जाणार नाही. हां तसा बोरिवली न्याशनल पार्कात '७८ मध्ये आणि चार वर्षांपूर्वी उपवनकडून बिनधास्त गेलोय. बिबळ्या दुपारी झोपतो त्यामुळे सुखरुप परतलो.
----
पिरांची वरची लेखमाला मात्र अफलातून होती. वाचायला मजा आली.
-----
२०१५ नंतर हळूहळू सर्वच लेखक लेखिकांनी सर्वच संस्थळांवरून काढता पाय घेतला. आता मोजकेच इथे येतात आणि लिहितात.
-------
बाकी नानुअण्णा काही अनुभव लिहितील ही अपेक्षा ठेवतो.

नानुअण्णा's picture

6 Feb 2020 - 10:13 pm | नानुअण्णा

नक्की लिहीन, मागील वर्षी एप्रिल मध्ये नागझिरा अभयअरण्याला गेलो होतो, जंगल बघण, अनुभवण म्हणजे काय? टे लक्षात आल.
अविस्मरणीय अनुभव, ४ दिवस होतो, आता ठरवलं आहे, जमेल तेवढ बघायचं (अनुभवायचं) जंगल.

चौथा कोनाडा's picture

7 Feb 2020 - 1:13 pm | चौथा कोनाडा

+१
नानुअण्णा, लेखनासाठी आताच आगाऊ शुभेच्छा देऊन ठेवतो

कान्हा राष्ट्रीय अभयारण्य मस्त सदाहरित जंगल असून एप्रिल महिन्यातसुद्धा सकाळच्या सफारीमध्ये सकाळी आठ वाजेपर्यंत चांगली थंडी वाजते. शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत. सकाळी थंडी वाजणार नाही आणि साडे आठ नंतर उन्हाचा तडाखा बसणार नाही.

एप्रिल महिन्यात साधारण ४४ डिग्री तापमान असतं पण जंगलात दुपारच्या सफारीसुद्धा खूप गरम होणार नाही. कानात जर कापसाचे बोळे ठेवले तर उन्हाचा त्रास होत नाही.

आम्ही टुल्ली रिसॉर्टवर राहिलो होतो. गेटपासून साधारण दहा मिनिटांवर आहे. रिसॉर्टमधून पाच वाजता जिप्सीने बाहेर पडून गेटवर नंबर लावावा लागतो. एका गेटमधून साधारण वीस गाड्या सोडतात एका वेळी.

नागपूरहून जाणार असाल तर कामटीमार्गे शक्यतो जाऊ नका. त्याऐवजी सन अँड sand हॉटेल मार्गे सरळ हैदराबाद नागपूर जबलपूर चौपदरी रस्ता घ्या. कान्हाला पोचायला साधारण पाच तास लागतील. रस्ता छान आहे.

जंगल खूप दाट आहे आणि ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पासारखं नाही. जंगलाचा आनंद घ्या. वाघोबा दिसले तर बोनस.

जंगल सफारी एन्जॉय करालचं. फोटो आणि वर्णन जरूर लिहा.

धन्यवाद.

मी २०१७ ला ऑक्टोबर महिन्यात कान्हाला जाऊन आले आहे. जंगल सफारीसाठी येथे चार मुख्य भाग (Core zone) आहेत.
१. कान्हा (Kanha) २ किसली (Kisli) ३ मुक्की (Mukki) ४ सार्ही (Sarhi)

रोज दोन वेळा सफारी असते. सकाळची वेळ- सूर्योदय ते ११.०० व दुपारची वेळ - ३.३० ते सूर्यास्त.

आमचे जंगल सफारीचे बुकिंग आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्यांनीच करून दिले होते. आपल्याला ज्या तारखेस कान्हाला जायचे आहे त्या दिवसाचे सफारीचे बुकिंग उपलब्ध आहे की नाही ते पाहणे व सफारीचे बुकिंग वन खात्याच्या खालील लिंकवर होऊ शकते.
https://forest.mponline.gov.in/searchNew.aspx?park=2
प्रत्यक्ष सहलीच्या वेळी जंगलाच्या प्रवेशद्वारावरील कार्यालयात तिकिटे व प्रत्येकाचे ओळखपत्र तपासणी करून आत सोडल्या जाते.

आम्ही तीन दिवसात चार सफारी केल्या. बरेच प्राणी, पक्षी पहिले पण वाघोबा नाहीच दिसले. उन्हाळ्यात प्राणी पाण्याच्या शोधात डोंगर उतरून पाणवठ्यावर येतात असे ऐकून आहे. आपली सहल एप्रिल महिन्यात असल्याने आपणास व्याघ्र दर्शनाच्या शुभेच्छा.
सकाळच्या सफारी साठी हॉटेलवाले सकाळी सहाच्या आधीच नाश्ता बनवून आपल्याजवळ देतात. मध्ये ठराविक ठिकाणी गाड्या थांबतात तेथे गाडीतून उतरून आपणास नाष्टा करता येतो.
कान्हाला जाण्यासाठी जबलपूर रेल्वे स्टेशन सोईस्कर आहे. जबलपूर ते कान्हा व परत या प्रवासासाठी आधीच गाडी बुक करून ठेवावी. खाजगी रिसॉर्टवाले राहण्याच्या खर्चाशिवाय अतिरिक्त भाडे आकारून ही सोय करतात. (जबलपूर ते कान्हा अंतर साधारण १७० किमी व चार तासाचा प्रवास आहे. )
शेवटच्या दिवशी सकाळी नाश्ता करून लवकरच हॉटेल सोडले. आमची रेल्वे गाडी संध्याकाळची असल्याने जबलपूरच्या आसपासची थोडी भटकंती केली. यात भेढा घाट, रोप वे, धुंवाधार धबधबा, चौसष्ट योगिनी मंदिर, बोटीतून फेरफटका व संगमरवरी डोंगर कपारींचे दर्शन झाले. धबधब्याला जास्त पाणी नव्हते त्यामुळे विशेष रौद्र वगैरे वाटला नाही. मंदिर छानच आहे. नर्मदा नदीत बोटीतून केलेली सफर खूपच आवडली. नावाडी आजूबाजूच्या परिसराविषयी धावते समालोचन देत असतात. यात बहुतेक थापाच असतात पण त्याची सांगायची शैली मस्तच असते. खूप हसवतात.
आपण कुठून जाणार हे माहित नाही पण मुंबईहुन जाणार असाल तर छशिमट -जबलपूर गरीब रथ प्रवासासाठी खूपच सोईस्कर. सकाळी सहाला जबलपूरला पोहचवते व परतीला संध्याकाळी सातला असते. तिकीट दर कमी व सोयीची वेळ असल्याने एखादा मुक्कामही कमी होतो व खर्चही वाचतो. मात्र गाडी रोज नसल्याने जाण्या येण्याचे दिवस विचारपूर्वक ठरवावे लागतात.

खर्चाच्या साधारण अंदाजासाठी आमचा सहल खर्च खाली देत आहे
मुंबई-जबलपूर-मुंबई प्रवास - १७००/- प्रत्येकी. (३ AC )
खाजगी १७ आसनी बस - १८००/- प्रत्येकी. यात भेडाघाट भटकंतीही आली.
हॉटेल खर्च (३ मुक्काम) - ८५००/- प्रत्येकी. यात राहणे, चहा-नाश्ता, दुपारचे, संध्याकाळचे जेवण सर्व समाविष्ट.
जंगल सफारी (एकूण-४) - ५०००/- प्रत्येकी
इतर खर्च - ५००/- प्रत्येकी (रोप वे, बोटिंग इ.)
एकूण खर्च - १७५००/- प्रत्येकी

सहलीसाठी परत एकदा शुभेच्छा !

नानुअण्णा's picture

7 Feb 2020 - 5:39 pm | नानुअण्णा

खुप धन्यवाद सगळ्यांचे, माहितीबद्दल