शोध बांग्लादेशींचा एक वेगळ विश्लेषण

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
3 Feb 2020 - 12:32 am

trends.google.com हि एक गूगलची रोचक सेवा आहे. जिचा आधार मिपावर माझी विश्लेषणे देण्यासाठी मी वेळोवेळी केला आहे. महाराष्ट्र विधानसेभेच्या निवडणूकपुर्व काळात शरद पवारांची शोधप्रीयतेचा आलेख चढतो आहे हे मी सांगितल्यानंतर बहुतेकांना माझ्या विश्लेषणांवर विश्वास वाटला नव्हता. असो, या वेळी गूगल ट्रेंडच्या साहाय्याने जरासे वेगळे विश्लेषण विश्लॅषण भारतातील बांग्लादेशींचे!

मी सुरवातीसच गूगल ट्रेंडचा दुवा दिला आहे. मी म्हणतो तशा पद्धतीने आपणही गूगल ट्रेंड्सवर शोध देऊन विवीध शक्यतांचा अभ्यास करू शकता. trends.google.com वर शोध घेतला तर आधी आमेरीकेतील शोध येतात त्या खिडकीत ईंडिया आणि भारतातील विवीध राज्यांची नावे टाकून तुलना बघू शकता. गूगल ट्रेंड्स मध्ये किती जण शोधत आहेत याचा आक्डा फ्री मिळाला नाही तरी सर्वाधिक शोध कशाचा आणि कुठे घेतला जातो आहे याची माहिती मिळून सर्वाधिकास १०० पकडून त्याच्या तुलनेत इतर शोध किती होतोय याचे प्रमाण दिले जाते. एक्झॅक्ट आकडेवारी मिळाली नाही तरी ट्रेंडचे आकलन बरेच सुलभ होते. गूगल ट्रेंड्सचा सातत्याने अभ्यास करणार्‍यांच्या गूगल ट्रेंड्स मुलतः शोधप्रीयता दाखवत असलेतरी लोकप्रीयतेसच अधिक शोधप्रीयता मिळते असा सर्वसाधारण ट्रेंड माझ्यासारखे विश्लेषक अनुभवाने स्विकारु लागले आहेत. ज्यांना विश्वास ठेवायचा नसेल त्यांचे राहीले नो अर्ग्युमेंट्स

बांग्लादेश शब्द इंग्रजीत Bangladesh आणि बंगालीत বাংলাদেশ असा लिहिला जातो.

भारतात Bangladesh शब्द अपेक्षेप्रमाणे बांग्लादेशला टच करणार्‍या भारतीय राज्यात अधिक पश्चिम बंगालात शोध प्रमाण १०० आसाम ९१ त्रिपुरा ६२ मणिपूर ६३ मेघालय २१ अरुणाचल प्रदेश ७ मिझोराम आणि नागालँड ८ इतर भारतीय राज्ये पाहू झारखंड ५ बिहार ७ ओडीशा ८
छत्तीसगढ आणि आंध्र (तेलंगाणा धरुन) मध्यप्रदेश राजस्थान गुजराथ पंजाब उत्तरप्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रत्येकी ३ महाराष्ट्र तामीळनाडू जम्मू काश्मिर व हरीयाणा प्रत्येकी ४ केरळ ८ (केरळ २०१६ नंतर शोधवाढ बरीच आहे याची चर्चा नंतर करुया) कर्नाटक ५

बंगालीत বাংলাদেশ असे लिहून घेतला जाणारा शोध पश्चिम बंगाल १०० आसाम ४९ मणिपूर ४३ त्रिपूरा २० ; मेघालय बिहार प्रत्येकी ४ ओडीशा ३, राजस्थान कर्नाटक तामीळनाडू प्रत्येकी २ झारखंड १ पेक्षा कमी, दिल्ली, हिमाचल उत्तरप्रदेश हरयाणा मध्यप्रदेश गुजराथ महाराष्ट्र प्रत्येकी १ केरळ ४ (केरळ पुन्हा एकदा नोंद घ्या)

हे लोक काय शोधतात याचा अंदाज घेतला तर अगदी इंग्रजीत बांग्लादेश शब्दास सोबत नोंदवले जाणारे बरेच शोध शब्द बंगाली आणि बांग्लादेश संबंधी येतात . सहाजिक पण बर्‍याच वाचकांच्या मनात पश्चिम बंगालचे लोकही तर बंगालीत शोध घेऊ शकतात हे ओघाने आले असेल. शंका रास्त आहे. म्हणजे बांग्लादेशी कार्टून्स आणि व्यंगविनोदही पश्चिम बंगाली माणूसही शोधू शकतो मान्य आहे. आता खालील निरीक्षणे वाचून तुमचे मत काय बनते ते सांगा

१) अश्लिलतेचा शोध तरुणाईतून घेतला जाणे शक्य आहे पण पशिम बंगालातून घेतलेलेच शोध बघीतले तर बांग्लादेश शब्दा सोबत घेतले जाणार्‍या शोधात अश्लिलतेचे प्रमाण अधिक मिळते तर बांग्ला शब्दाच्या शोधात संगित गाणीच पण पश्चिम बंगाली अभिरूची संपन्नताही नांदताना दिसते. अभिरूची संपन्नतेचा अभाव बांग्लादेश शब्दा सोबत घेतल्या जाणार्‍या भारत भरातील शब्दासोबत अभाव प्रकर्षाने जाणवतो

२) बांग्लादेश शब्दा सोबत बांग्लादेश প্রতিদিন (प्रतिदीन) या ऑनलाईन वृत्तपत्राचा शोध दिसून येतो.

३) अजून एक महत्वाचे आणि रोचक - तुम्ही कधी परदेशात राहून भारतात पैसे पाठविले आहेत ? जर पाठविले असतील तर तुम्ही भारतीय रुपयाचा चलनदर काय आहे याचा नक्कीच शोध घेतला असेल नाही का?

Bangladeshi taka या श्ब्दांवर अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक शोध पश्चिम बंगालातून १०० त्याच्या तुलनेत इतर राज्यातील शोध प्रमाण पहा त्रिपुरा ५३ आसाम ३५ मणिपूर २३ मेघालय १८ अरुणाचल ८ नागालँड ५ बिहार १९ झारखंड ९ ओडिशा ११ उत्तर प्रदेश ९ उत्तरा खंड, जम्मु काश्मिर प्रत्येकी ६ , हिमाचल ७ पंजाब १२ , राजस्थान मध्यप्रदेश प्रत्येकी ८ गुजराथ ९ महाराष्ट्र १४ कर्नाटक ८ आंध्र २, तामीळनाडू ५ केरळ ३

Bangladesh currency शब्दावर शोध इथे त्रिपूरा १०० पश्चिम बंगाल ३८ आसाम २७ , झारखंड १८ , छत्तीसगढ १३ ओडीशा ८ आंध्र१३ केरळ तामीळनाडू प्रत्येकी ८ कर्नाटक १५ महाराष्ट्र १४ , उत्तर प्रदेश १३ , मध्य प्रदेश ६ उत्तराखंड २२ हिमाचल १३ काश्मिर १६ पंजाब ३१

अद्याप काही शंका मते मनात येणे स्वाभाविक आहे, प्रतिसादानुसार चर्चा करु

अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे शुद्धलेखन व्याकरण चर्चा व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार

वावरमाहिती

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

3 Feb 2020 - 4:29 am | आनन्दा

अरे वा!

हे सगळे अतिशय नॉर्मल दिसत आहे. बांगलादेशी म्हणजे घुसखोरच असा पूर्वग्रहीत समज ठेवून आकडे बघितले तर वेगळे वाटू शकते.

माहितगार's picture

5 Feb 2020 - 1:32 pm | माहितगार

;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2020 - 2:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण.

०दिलीप बिरुटे