Skip to main content

घटस्फोटाच प्रमाण

अविनाशकुलकर्णी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं आहे त्यात लक्षणीय वाढ होण्यात अनेक कारण असतील हि पण मुलीची आहि हिचा मुलीच्या संसारात जास्त लक्ष घालणे काय चालले याची बारीक चौकशी हे कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ? मुलगी व जावयाला त्याचे प्रश्न सोडावयास भाग पाडणे गरजेचे आहे का ? सासूची लुडबुड परिस्थिती विस्फोटक ठरते आपले काय मत आहे ?
माईसाहेब कुरसूंदीकर

लुडबुड पुर्वीच्याकाळी पण असायची रे अवी. स्वतःबद्दलचे गैर्समज आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या अपेक्षा ही प्रमुख कारणे आहेत असे आमचे मत. दरवर्षी फिरायला जायचेच,तिशी ओलांडायच्या आत फ्लॅट घेतलाच पाहिजे.. अमुक वयात प्रमोशन झालेच पाहिजे.. ह्यामुळे तणाव वाढतात.
10/11/2019 - 11:12 Permalink
पाषाणभेद

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

खूप कारणे आहेत या प्रश्नासाठी. आई आणि मुलगी यांचे विवाहानंतर खूप सारे संभाषण होते. अगदी दोन दोन तास मुली माहेरच्यांशी बोलत असतात. जुनी नाळ तोडल्या जात नाही. नवीन नाळ जुळवली जात नाही. नको तितके माहेरच्यांचे आपल्या मुलीकडे विवाहोत्तर लक्ष असणे हे मुख्य कारण आहे. थोडी धरसोड करावीच. इतर भरपूर कारणं आहे. एक प्रबंध होवू शकतो इतके. सामाजिक दुष्परीणाम जास्त गडद करणारा हा प्रश्न आहे.
11/11/2019 - 08:48 Permalink
धर्मराजमुटके

चालायचचं ! बायकांनी तरी एक मोबाईल किती दिवस वापरायचा :)
10/11/2019 - 11:41 Permalink
जॉनविक्क

तर त्यात हळूच विषप्रयोगाचा प्रयत्न करणे कसे वाटते? नाही असे अजिबात करायचे नाही पण उपाय योग्य वाटतो का ?
11/11/2019 - 09:00 Permalink
नाखु

लग्न कारणीभूत आहे आणि एकदा लग्नाच्या ऐवजी समांतर व्वस्थेला समाजमान्यता मिळाली की हा प्रश्न आपोआपच निकाली निघेल. वाचकांचीच पत्रेवाला संसारी नाखु
11/11/2019 - 13:53 Permalink
सुमो

जाऊ द्या हो बारा गडगड्याच्या व्हिरित... Divorce ला मराठीत घटस्फोट हा शब्द कुठून आला म्हणतो मी .... काडीमोड पण म्हणत्यात की !!!
11/11/2019 - 14:01 Permalink
खिलजि

घटस्फोटाला कारणीभूत , विभक्त कुटुंब पद्धती आहे . सध्या विभक्त कुटुंब पद्धतीबरोबरच हे जे नोकरीधंद्यामंध्ये पुढे जायची चढाओढ आहे त्यामुळे भरपूर ओढाताण होत असणार .. पण गुरुदेव एवढे हळवे विषय का काढताय चर्चेला ? आम्हाला आपल्याला वेगळ्या रूपात बघायचंय .. सांगा ना .. दाखवाल ना पुन्हा ते रूप ? गुरुदेव हा अर्जुन कम खिलजी आपला निस्सीम चाहता झालेला आहे .. आपण लवकरात लवकर ते चिंधड्या चिंधडया उडवणारे सुदर्शन चक्रधारी लिखाण करावे ,, हि नम्र विनन्ती .. हा पामर , तुमच्या चतुरस्त्र लिहानाकडे डोळे लावून बसलेला आहे ..
11/11/2019 - 14:13 Permalink
पाषाणभेद

In reply to by खिलजि

हळवा विषय? ते धागे उघडा. बघा बघा. तेथे अनेक शंभर प्रतिसादी धागे दिसतील. त्यातलाच हा विषय आहे. धागाकाढू माणूस!
11/11/2019 - 16:10 Permalink
चाणक्य

अहो चुंबनांचा वर्षाव न होणे हे एक महत्त्वाचं कारण आहे घटस्फोट होण्याचं.
16/11/2019 - 07:42 Permalink