लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील?
माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही. आई वडील आहेत परंतु खर्चासाठी याच्यावर अवलंबून नाहीत आणि म्हातारे असले तरी पुढेही सधन असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नसतील असे त्याचे म्हणणे आहे.
पुण्यात स्वतःचे loan free घर आहे. हा व याची पत्नी अगदी frugal नसले तरी गरजेइतकाच पैसा खर्च करतात व त्यात समाधानी आहेत. दोघांना सध्यातरी कोणताही आजार नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा महिन्याचा सर्व खर्च पकडून सध्या २०-२५००० इतका होतो. तो सध्या लवकरच (२-३ वर्षात) रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. रिटायरमेंट नंतर आर्थिक कारणासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार नाही. पूर्ण वेळ छंदासाठी देणायचा त्याचा मानस आहे. आई वडील हयात असेपर्यन्त पुण्यातच राहण्याचा प्लॅन आहे. त्याची आणि पत्नीची जीवनशैली गेल्या अनेक वर्षांपासून साधी आहे आणि ती तशीच राहील किंबहुना रिटायरमेंट नंतर अजूनहि फ्रुगल होईल.
४८ व्या वर्षी रिटायर झाल्यास सध्याची जीवनशैली, वाढलेले आयुर्मान पाहता रिटायरमेंट घेण्याआधी किती पैसे लागतील असे आपल्याला वाटते?
एक विनंती: कृपया नोकरी बदल, पार्ट टाइम नोकरी यावर चर्चा नको. मी त्यावर २ तास वाद घातला पण पट्ठ्याने रिटायरमेंट चे नक्की केले आहे या निष्कर्षाप्रत आलो. त्याने हा विचार २-३ वर्षे आधी सुरु केला आणि तो अजूनही ठाम आहे. त्यामुळे चर्चा उरलेले सध्याच्या जीवनशैलीप्रमाणे जगायला आयुष्य जगायला किती पैसे लागतील यावरच मर्यादित राहिल्यास उत्तम.
प्रतिक्रिया
वीकेंडला चालणारे
पैसे कुणी द्यायचे? का पेट्रोल
त्यांचे हेच कर्तृत्व आहे की ते आधी जन्माला आले
सोप्पा उपाय ....
1 नंबर !
:)
मग फायनल आकडा किती ?
९ कोटी
.
आणि तेव्हढे जमतील?
गणिती भाग
टॅक्स वजा जाता...
धन्यवाद
उत्तम विश्लेषण.
शेवटचे वाक्य. ...
सुधीर, लै भारी कॅल्क्युलेशन्स
एक साधे गणित आहे. ...
काकामुवि रॉक्स
फक्त पैसेच नाही. ..
पटलं.
एक मिनिटं हं
हा हा हा !!!
थोडक्यात KBC चा विजेता
Pagination