शोध (अंतिम भाग)

शुभांगी दिक्षीत's picture
शुभांगी दिक्षीत in जनातलं, मनातलं
1 Nov 2019 - 12:39 am

विनित ने कंप्लेंट केल्यानंतर त्याची केस मी वरिष्ठांना सांगून माझ्याकडेच घेतली. आता मला त्या आय पी ॲड्रेस चा शोध लावायचा होता. ते आय पी ॲड्रेस आत्ता तरी ॲक्टीव्ह दाखवत नव्हते. मी सिस्टीम वरून सर्च केलं तर त्यांचं लोकेशन मुंबईपासून खूप लांब एका घनदाट जंगलात दाखवत होतं. असेलही त्यांची एखादी गुप्त जागा किंवा एखादं घर. न जाणो ते आय पी ॲड्रेस आता अस्तित्वात असतील की नाही. या केसचं सारं काम मी घरूनच करत होतो. विनितला मी स्वतः सांगितलं होतं. केस सोडविली की मी स्वतःहून भेटेन तोपर्यंत लॅपटॉप वापरू नको असंही सांगितलं.

आता ही गँग होती की एकच माणूस होता हेही माहीत नव्हतं पण एका वेळी पाच सहा आय पी ॲड्रेस बनवणं आणि ते ऑपरेट करणं हे एका व्यक्तीचं काम असू शकत नाही. असं मला वाटत होतं. पण तपास करणं महत्वाचं होतं. शेवटी एकटं जाऊन पाहून यावं म्हणून सिस्टीमवर जे लोकेशन दाखवत होतं तिथे गेलो. जर छापा टाकला असता तर ते सावध होण्याचे चान्सेस जास्त होते. पक्षीनिरीक्षक बनलो मी आणि त्या लोकेशनवरून जरा लांब बाईक पार्क केली. जवळचा बसस्टॉपही पाहून ठेवला. पाठलाग झाला तर पटकन बसस्टॉपवर जाता येईल. त्या लोकेशनवर पोहचल्यावर दुर्बिणीतून पक्षी पहात आहे असे वाटत होते पण आजूबाजूस काही घर किंवा ती जागा कुठे दिसते का ते पहात होतो.

थोडावेळ गेल्यानंतर अचानक माझ्या खांद्यावर एक हात पडला. गुंड सारखा दिसणारा माणूस विचारीत होता. "कौन है बे तू?"
"पक्षीयोंका निरीक्षण कर रहा हूं सहाब." मी घाबरल्याचं नाटक केलं
"यही जगह मिली थी क्या तेरेको?? निकल यहाँ से. ये प्राईवेट प्रॉपर्टी है। यहाँ आना मना है।"
"अच्छा, मुझे मालूम नही था।"
"अभी मालूम हो गया ना? निकल यहा से फिर अगर दिखा तो तेरी रूह घुमती फिरेगी दुनिया में समझा?? निकल जल्दी."
मी गुपचूप परत आलो. तिथूनच जाणारी एक बस दिसली हात दाखवून थांबवलं आणि तिथून कसातरी सुटलो. माझ्या बाईकची चावी एका मित्राला दिली आणि बाईक आणण्यास सांगितली.
आता फायनल ॲक्शनची वेळ आली होती. नक्कीच त्या लोकेशनवर काहीतरी भयंकर घडत होतं. पायरसी नाही तर अजून खुप काही पण हा प्लॅन कसा आखणार. कशा रीतीने बनवणार. सावजाला बिळाच्या बाहेर काढायचं असेल तर काहीतर शिकार ठेवलीच पाहिजे.

एका खोट्या नावाने मीही इमेल आयडी बनवलं. आणि अशाच काहीपण कथा कविता लिहायला सुरवात केली. आणि एक दिवस सावज सापळ्यात अडकलं. मला मेल आला. विनितला आला तसाच. मी लिंकवर क्लिक केलं आणि वेबसाईट ओपन झाली. ती वेबसाईट तशीच ठेवून मी दुसर्‍या लॅपटॉपवर चेक केलं तर ते फेक आय पी ॲड्रेस ॲक्टीव होते. आमच्या टीम ला कॉल केला. त्या लोकेशन वर सर्च टिम गेली. त्या जंगालाच्या आतल्या बाजूला त्यांचा अड्डा होता. अलगद सगळे हातात आले. दहा बारा जण होते.

मुख्य म्हणजे त्यांना शंकाही आली नव्हती की असं काही होईल. छापा टाकल्यानंतर त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल्स, हार्डड्राईव्हस्, पेन ड्राईव्हस् असं खुप काही हस्तगत केलं गेलं. चौकशीत धक्कादायक सत्य सामोरं आलं. खोट्या वेबसाईटच्या लिंक पाठवून त्यांनी अनेक जणांचे लॅपटॉप, पिसी, मोबाईल हॅक केले होते. त्यांतून त्यांची माहिती, बॅकांचे डिटेल्स, ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन्स हेई हॅक केलं होतं.

पुस्तकांबाबत विचारलं असता, जर कोणी लिहित असेल तर त्या कथेचं किवा लेखाचं ते इंग्रजीत भाषांतर करत. एक माणूसही ठेवला होता त्यांनी त्यासाठी. विनितचं पुस्तक दाखवलं तर, तो भाषांतर करणारा माणुस नेमका त्यावेळी नव्हता. त्यामुळे ते पुस्तक मराठीतच आणावं लागलं आणि तीच चुक झाली. हे ही त्यांनी कबूल केलं. सट्टा बेटींग पण तिथूनच चालत असे.

शेवटी पाठलाग संपला. विनितला मेसेज केला, "भेटायचं आहे. हॉटेल सरासाहुसाल. दोन वाजता. लंच पण एकत्रच घेऊ." भेटल्यावर विनितला सारं काही सांगितलं आणि पुन्हा कोणतीही अनोळखी लिंक तो क्लिक करणार नाही हे वचनही घेतलं. तसंच एक जनहितार्थ सुचना ही आम्ही सगळीकडे पसरवली की, 'असा काही अनोळखी लिंक चा मेल आला तर त्वरीत आम्हाला संपर्क करा.' तात्पुरता तरी हा शोध संपला पण ही कदाचित एक साखळी होती. या साखळीला जोडून अजून किती साखळ्या आहेत याचा शोध अजून बाकी आहे..

अंतिम भाग : शोध (समाप्त)

कथा

प्रतिक्रिया

कथा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद
अपेक्षाभंग न झाल्याचे पाहून आष्चर्य वाटले.
जसे अपेक्षीत होते तसेच झाले. खूपच बाळबोध लिखाण आहे.
रहस्य कथा लिहीताना विषयाचा योग्य अभ्यास असावा, तसेच कथेत रंजकता यावी या साठी धक्का तंत्राचा वापर करावा. खरेतर कथा सूत्र चांगले आहे अधीक फुलवता आले असते.
पण असो. तुमचा कदाचित पहिलाच प्रयोग असावा.
पुढील कथा अधीक अभ्यासपूर्ण लिहाल अशी आशा ठेवतो
त्या साठीच इतके स्पष्ट मत दिले .
राग मानू नये

शुभांगी दिक्षीत's picture

1 Nov 2019 - 11:05 am | शुभांगी दिक्षीत
शुभांगी दिक्षीत's picture

1 Nov 2019 - 11:05 am | शुभांगी दिक्षीत
शुभांगी दिक्षीत's picture

1 Nov 2019 - 11:05 am | शुभांगी दिक्षीत
शुभांगी दिक्षीत's picture

1 Nov 2019 - 11:08 am | शुभांगी दिक्षीत
जॉनविक्क's picture

1 Nov 2019 - 4:55 am | जॉनविक्क

फार वेगळ्या विषयाला हात घालायचे धाडस केले तुम्ही मस्त लिहलय, ते आयपी अडड्रेस वगैरे तांत्रीक तपशील तर काहीच कळत नाही म्हणून कुचंबणा झाली पण साधारण कथानक लक्षात आले, तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करू नये हे फारच परिणामकारक ठसले. पुढील दिवाळी अंकात एखादी कथा पाठवायची विंनती आहे.

धन्यवाद.

असा मेल मालकांनी साहित्य संपादकांना व साहित्य संपादकानी मिपा लेखकांना पाठवावा अशी जणहितहार्ट विनंती आहे.

शुभांगी दिक्षीत's picture

1 Nov 2019 - 11:21 am | शुभांगी दिक्षीत

प्रयत्न करेन..
आयपी ॲड्रेस बद्दल थोडंसं...

IP address म्हणजे Internet Protocol address. Computer Network सोबत जोडल्या गेलेल्या कोणत्याही डिवाईस साठी हा Numerical ॲड्रेस महत्वाचा असतो. यामुळे डिवाईसचे
Identification बारकोडद्वारे होते आणि दुसरी गोष्ट या
ॲड्रेसमुळे  ते डिवाईस कोणत्रा लोकेशन वरेन संवाद साधत आहे ते समजते.
आपला मोबाईल जर Computer Network सोबत जर जोडला गेला असेल त्याचाही आयपी ॲड्रेस असू शकतो.

मग तर जनग्लात आयसोलेटेड ठिकाणी गुन्हा करणे तर आगीशी खेळ झाला की

वकील साहेब's picture

1 Nov 2019 - 8:43 am | वकील साहेब

धक्कांतिकेची अपेक्षा असतांना धक्का न मिळणे हा ही एक धक्काच नाही का?

शुभांगी दिक्षीत's picture

1 Nov 2019 - 11:23 am | शुभांगी दिक्षीत

सुरुवातीला बावरायला होते, आपल्याशी विनाकारण लोक विचित्र वागत आहेत असे भास होउ लागतात पण नंतर सगळे मित्र बनतात तुसी लिखते रहो

श्वेता२४'s picture

1 Nov 2019 - 10:59 am | श्वेता२४

चांगला प्रयत्न. लिहीत रहा

शुभांगी दिक्षीत's picture

1 Nov 2019 - 11:23 am | शुभांगी दिक्षीत

नक्कीच प्रयत्न करेन.

जव्हेरगंज's picture

1 Nov 2019 - 6:34 pm | जव्हेरगंज

जरा वेगळी कथा लिहायला घ्या. आणि एकाच भागात संपवायचा प्रयत्न करा!!
शुभेच्छा!!!

आनन्दा's picture

1 Nov 2019 - 10:41 pm | आनन्दा

खरं सांगायचे तर कथा आवडली नाही.
चांगली नाहीये म्हणून नाही, तर या कथेमध्ये एक मोठा टेक्निकल लूपहोल आहे म्हणून.

पट्टीचा हॅकर कधीच आपला खरा आयपी कोणाला समजू देत नाही, त्यामुळे या कथेचा मूळ पायाच डळमळीत होतोय. पहिल्या भागात छान रंगवली होती, पण या भागात सगळा विचका करून टाकलात राव.

अहो त्यांना खूप टेक्निकल नॉलेज आहे आता फक्त थोडं लिखाणदोष काढून टाकावे लागतील.

सुचिता१'s picture

1 Nov 2019 - 11:18 pm | सुचिता१

पहिलीच कथा आहे म्हटल्यावर, बर्याच पैकी जमली आहे. फक्त IP address इतक्या सहजतेने सापडला , त्यामुळे विरस झाला. तुलनेने
पहीला भाग आवडला.