गायीचे दूध, गोमूत्र, इ.

रविकिरण फडके's picture
रविकिरण फडके in काथ्याकूट
25 Oct 2019 - 11:50 am
गाभा: 

मला पडलेला एक प्रश्न असा आहे की, गायीच्या दुधाचे - आणि तुपाचे, गोमूत्राचेही - जे फायदे वर्णन केले जातात त्यात खरोखरच काही तथ्य आहे की त्या सर्व गप्पाच hearsay असतात?

शोध घेतला तर असे समजते की गायीच्या दुधात जे प्रोटीन्सचे molecules (रेणू?) असतात ते म्हशीच्या दुधातल्याहून आकाराने लहान असतात त्यामुळे गाईचे दूध पचायला जास्त सोपे असते. बाकी अन्य प्रकारच्या दुधापेक्षा त्यात काही खास गूण नाहीत.

ह्याहून अधिक माहिती मला तरी मिळालेली नाही.
बाकीचे सर्व फक्त सिद्ध न झालेले दावेच आहेत का? उदा. माझा एक कोकणातील मित्र म्हणाला की, गायीच्या शेणाने जर जमीन सारवलेली असेल तर तिथे मुंग्या येत नाहीत. तेच जर म्हशीचे शेण असेल तर एक दिवसातच मुंग्या लागतात. हे असे दावे मी तरी पुरेशा पुराव्याच्या (empirical डेटा) अभावी केवळ दावे म्हणून सोडून देतो.
जेव्हा म्हैस भारतात आली नव्हती, तेव्हा फक्त गायीचेच दूध होते. आणखी काही असतील: शेळीचे, गाढविणीचे, इ. त्यामुळे जर आयुर्वेदात गायीचे दूध असा उल्लेख असेल तर तो स्वाभाविकच म्हणावा लागेल. परंतु तो काही पुरावा होत नाही.

ह्याबद्दल कुणा मिपाकरांना काही अधिक माहिती असेल तर ती शेअर करावी, ही विनंती.

ह्या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास संपादकांनी हा धागा उडवावा, ही विनंती. (पण माझे कुतूहल शिल्लक राहीलच.)

धन्यवाद.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

25 Oct 2019 - 1:30 pm | गामा पैलवान

रविकिरण फडके,

हॉलंडचे नागरिक डच लोकं जगात सर्वात उंच वंश आहेत. ते गाईचं दूध व तज्जन्य पदार्थ सेवन केल्यामुळे झालेत असं म्हणतात.

त्याबद्दल एक इंग्रजी लेख सापडला : https://www.bbc.co.uk/news/magazine-34380895

उपरोक्त लेखात म्हंटलंय की हॉलंडमध्ये स्थायिक झालेल्या स्थलांतरित लोकांच्या बाबतीतही ते मूळदेशी लोकांपेक्षा अधिक सुदृढ झाल्याचं आढळून आलंय. मात्र तशा अर्थाचा अभ्यास केल्याचा दुवा नाहीये.

मात्र हे सांगायला हवं की युरोपात ज्याला गाय म्हणतात ती वैदिक गाय नाही. भारतीय गाईस गळ्याखाली झालर व पाठीवर वशिंड असतं. या दोन्ही गोष्टी युरोपीय गाईकडे नाहीत. ज्याअर्थी अवैदिक गायीचं दूध पिऊन जर सुदृढता येते त्याअर्थी वैदिक गाईचं दूध निश्चितंच प्रभावी असावं.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

25 Oct 2019 - 2:15 pm | जॉनविक्क

देशी आणि विदेशी गाई मधील फरक माहीत होता, वैदिक आणी अवैदिक गाई यामधे नेमके कुणाचे अध्यात्म श्रेष्ठ आहे ? आणी का यावर माहिती हवी होती ?

गामा पैलवान's picture

25 Oct 2019 - 6:25 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

वैदिक साहित्यात जिचं वर्णन आलंय ती वैदिक गाय. पण गायीचं अध्यात्म असा काही उल्लेख वैदिक साहित्यात माझ्या मते तरी नाही. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला तरी माहित नाही.

आ.न.,
-गा.पै.

ओम शतानन्द's picture

25 Oct 2019 - 4:54 pm | ओम शतानन्द

वैदिक आणि अवैदिक म्हणायच्या ऐवजी भारतीय- देशी व विदेशी- संकरित म्हणा

सर टोबी's picture

25 Oct 2019 - 8:08 pm | सर टोबी

शरद पोंक्षे येऊन गेले आणि त्यांनी केमोथेरपीमुळे नष्ट होणाऱ्या रक्तातील पेशींची परत समाधानकारक वाढ व्हावी म्हणून गोमूत्र प्राशन करण्याचा प्रयोग केला हे सांगितले. पण हे सत्य असेल तर त्याचा गाय पवित्र असण्यापेक्षा गोमुत्रातील विशिष्ट रासायनिक संरचनेचा तो परिणाम असू शकतो आणि त्या वस्तुस्थितीचा शास्त्रीय दृष्टिकोनातूनच विचार करण्याची गरज आहे. गोहत्या करायची नाही तर तो न्याय म्हशींना पण लावला पाहिजे.

जाता जाता: ऍग्रोवनच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात असे निरीक्षण आले आहे कि गायी जोपासण्याचा कल आता कमी होत चालला आहे. हा स्पष्टपणे गोहत्या बंदीचा परिणाम असू शकतो. मी व्यक्तिशः शाकाहारी आहे परंतु त्याचा मी अभिमान बाळगू शकत नाही. दूध आणि दुधाचे पदार्थ जो पर्यंत आपण वापरतो तो पर्यंत व्यवसायाची अपरिहार्यता म्हणून भाकड जनावरे नष्ट करावीच लागतील.

.......गायी जोपासण्याचा कल आता कमी होत चालला आहे. हा स्पष्टपणे गोहत्या बंदीचा परिणाम असू शकतो. ......

सर टोबींना जेवढ्या गाई मारल्या गेल्या तेवढी नोबल पारितोषिके खालील अटींवर देतो *

१) ज्यांनी गाई पाळल्या होत्या अशा महाराष्ट्रातील शंभर गावातील शंभर ६०+ वयोमान असलेल्या शेतकर्‍यांकडून लेखी स्टँपपेपरवर दुजोरा आणून दाखवावा.

२) पंढरपूरला आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला वेगवेगळ्या वारीतील १०० शेतकर्‍यांकडून लेखी स्टँपपेपरवर दुजोरा आणून दाखवावा.

(* vyangyokti aahe gohatyeche samarthan navhe he vegale sangane na lage)

आता कुणी मोठे रोग झाल्यावर विदेशी औषधयोजना करतानाच गायीचं दूध,गोमूत्र याचाही प्रयोग करतात व अनुमान यामुळेच गुण आला काढतात. ते चूक आहे.

गोमूत्राचा औषध म्हणून वापर करताना मर्यादा आहेत. कोणालाही गोमूत्र औषध म्हणून वापरता येत नाही. कारण गोमूत्र उष्ण आहे आणि त्याचे अतिसेवन घातक ठरू शकते. वैद्याच्या सल्ल्यानुसार गोमूत्र वापरले पाहिजे.

विजुभाऊ's picture

26 Oct 2019 - 1:09 am | विजुभाऊ

गोमुत्राचे अतीसेवन ?????????????

अतिसेवन म्हणजे वैद्याचा सल्ला न घेता निव्वळ सांगोवांगीच्या माहितीवरून गोमूत्र सेवन. माझी शब्दयोजना चुकलीच आहे.

जयन्त बा शिम्पि's picture

26 Oct 2019 - 7:29 pm | जयन्त बा शिम्पि

भायन्दर( मुंबई ) जवळ ,उत्तननगर येथे भारतीय जनता पक्षाने, " केशव स्रुश्टी " उभारली आहे. तेथे गोमुत्रापासून औषधांची निर्मिती केली जाते.ही औषधे मुम्बईत विक्रीसाठी उप्लब्ध आहेत. केशव स्रुष्टी यांचेकडे चौकशी करुन पहावी.

गोमुत्र, त्रिफळा काढा, वगैरे मूळ औषध नसून इतर औषध निर्मितीत त्याची भावना (भिथवून वाळवणे, असे तघन चार किंवा अधिक वेळा करून ) देऊन गुण वाढवतात.
आरोग्यवर्धिनीसाठी गोमुत्र.
काही इतर उदा ज्येष्टमध काढा, ताक, च्यवनप्राश इत्यादी अनुपान आहेत. चूर्णवगैरे खाऊन हे घ्यायचे असते.

रघुनाथ.केरकर's picture

30 Oct 2019 - 9:52 am | रघुनाथ.केरकर

नमस्कार,
माझ्या मित्राच्या गावी पुष्कळ प्रमाणात गायी आहेत. केवळ दूध आणि थोड्याफार प्रमाणात राब सोडला तर त्यांच्या कडे अन्य काही उपयोग नाहीय. मला त्यांच्या गावी गोमूत्र संकलन केंद्र उभे करायचे आहे जेणेकरून मी गोमूत्र संकलित करून ते कोकणात माझ्या गावी आंबा बागायतदारांना विकेन.
अर्थात ह्या सगळ्या कल्पना फक्त डोक्यातच आहेत. जर कुणाला गोमुत्राच्या फळझाडांवर फवारणीचा अनुभव असेल तर कृपया मार्गदर्शन करावे.

रघुनाथ

नुसते गोमूत्र विकून काही फायदा तर होणार नाही पण तोटा व्हायचीच शक्यता जास्त आहे.
त्यापेक्षा शेणावर आणि गोमूत्रावर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन करता येईल. अधिक माहिती हवी असल्यास विचारा.

कंजूस's picture

30 Oct 2019 - 10:24 am | कंजूस

जर कुणाला गोमुत्राच्या फळझाडांवर फवारणीचा अनुभव असेल

विचारून सांगतो. गेले दोन वर्षं मित्र करतोय.

फक्त देशी गायीचंच मूत्र वापरा म्हणतात पण एक लिटर दूध देणाऱ्या देशी गायी फक्त यासाठी कोण संभाळणार हा प्रश्न उरतोच.

रघुनाथ.केरकर's picture

30 Oct 2019 - 11:11 am | रघुनाथ.केरकर

खरंतर माझ्या मित्राच्या गावी त्यांना सांभाळतच नाही. वर्षभर त्या गाई भीमाशंकर च्या आसपास च्या रानात फिरत असतात फक्त त्या गर्भार राहिल्या कि त्यांचे आदिवासी मालक त्यांना दावणीला आणून बांधतात बऱ्याच वेळा प्रसूती नंतर त्या गोठ्यात आणल्या जातात. किंवा जर जंगली श्वापदांच्या हल्ल्याच्या बातम्या कानावर आल्या तर ह्या गाईंना दावणीला आणलं जातं

कंजूस's picture

31 Oct 2019 - 11:47 am | कंजूस

गोमुत्राच्या फळझाडांवर फवारणीचा अनुभव

गोमुत्र फवारणीने पाच दिवस तुडतुडा मोहरावर येत नाही. दर सहाव्या दिवशी फवारणी करत राहावे लागते. मोहोर आल्यावर फलधारणा होईपर्यंत सतत करावे लागते. परंतू पूर्णपणे रासायनिक फवारणी बाद करता येत नाहीच. इतर काही रोगांसाठी ती लागतेच.
खतं घालणे.- शेणखत घालावेच लागते. पर्याय नाही.

((मित्राने ही माहिती दिली. दापोली तालुका, आंबा कलमं. अनुभव.))

संतोष गोरे's picture

8 Jan 2022 - 12:06 am | संतोष गोरे

माफ करा, सदरील लेखात अनेक त्रुटी आहेत. यात तथ्य कमी आणि तर्कशास्त्र जास्त वापरल्या गेले आहे असे मला वाटते.
जसे की,
१) बाकी अन्य प्रकारच्या दुधापेक्षा त्यात काही खास गूण नाहीत.
२) जेव्हा म्हैस भारतात आली नव्हती, तेव्हा फक्त गायीचेच दूध होते.

१) चे उत्तर - आता विशेष गम्मत म्हणजे हा लेख ऑक्टोबर २०१९ मधील आहे. सदरील लेखकाला आता पर्यंत A2 दुधाबद्दल माहिती असायला हवी होती.

२) चे उत्तर - भारतीय म्हशीला वॉटर बफेलो किंवा रिव्हर बफेलो म्हणतात. विदेशात स्वाम्प बफेलो असते. असो. भारतात खूप वर्षांपासून म्हैस अस्तित्वात आहे. भारतात शेतीसाठी बैल, रेडा, मिथुन, याक, उंट इत्यादी प्राणी वापरले जातात. मग इतर सर्व प्राण्यांना गाय-बैला इतके महत्व का प्राप्त झाले नाही याचा जरा विचार करून पाहावे. उगाच गाय आणि म्हैस यांची तुलना करून उपयोग होणार नाही. असो, तर याचे साधे कारण म्हणजे, भारत हा सम-शितोष्ण आणि उष्ण कटिबंधातील देश आहे. या वातावरणात (म्हणजे संपूर्ण भारतात) इतर प्राणी वर्षभर काम करू शकत नाहीत. जसे की पूर्वीपासून बैल हा शेतीसाठी, प्रवासासाठी, वजन वाहून नेण्यासाठी, मोटं ने पाणी काढण्यासाठी, २/४/६ बैलांचा नांगर ओढण्यासाठी, धान्याचे खळे करणे, कोलू द्वारे तेल काढणे, लांबपल्ल्याचा प्रवास करण्यासाठी, युद्धात किंवा एका गडावरून दुसऱ्या गडावर अवजड तोफा ओढून नेने, पोषक खते, औषधी गुणधर्म असलेले गोमूत्र, ( भारतीय गायीच्या शेणात अनेक जातीच्या मित्र बॅक्टेरिया असतात) या अशा अनेक प्रकारच्या कामासाठी गाय-बैल जोडी उपयोगी पडत असे. ही कामं इतर जनावर करू शकत नाहीत. जसे की उंट फक्त वाळवंटात काम करू शकतो. रेडा फार फार तर चिखलात (भात शेतीत) काम करू शकतो. मिथुन आणि याक डोंगराळ प्रदेशात काम करू शकतात. पण बैल भारत भर सर्वत्र काम करू शकतो. रेडा/म्हैस उन्हात थकतात. त्यांना भर उन्हात कोणतेही अखंड काम करता येत नाही. असे अनेक गुणधर्मामुळे गाय-बैल जोडी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. यामुळे केवळ गाय दूध कमी देते आणि म्हैस दूध जास्त देते, किंवा गाईच्या मागे देव उभा असतो तसा म्हशीच्या मागे उभा नसतो, गाईच्या आणि म्हशीच्या शेणात मूत्रात काहीही फरक नाही.... असे अनेक "तर्क" जोडून आजकाल चर्चा सुरू असतात. तेव्हा पहिले शेती उपयुक्त जनावरांचा वापर, काम करण्याची क्षमता, त्यांची आदेश पाळण्याची आकलनशक्ती हे असे अनेक गुणधर्म तपासून पाहावेत.