दृष्टी
आता तिची दृष्टी परत मिळाली होती तिला
तिची भिरभिरती नजर शोधत होती
त्या राजकुमाराला
...
म्हणजे तिने तरी त्याला
आपल्या मनःचक्षु समोर असचं
रेखाटले होते
तरुण, लकाकणार्या निळ्या डोळ्यांचा
भुरभुरणार्या सोनेरी केसांचा
...
रोज पहाटे उठून
घराबाहेरच्या अंगणात
अंदाजाने फुलं वेचायची
चाचपडत,
अंधारामुळे नाही.. अजिबात नाही
अंधार तर तिचा जुना सोबती
तिची दृष्टी गेली बालपणी, तेव्हापासून
पण
कळी खुडली जाता कामा नये, हि भीती
....
एक दिवस अवचित या राजकुमाराची
अन् तिची गाठभेट झाली
अगदी कादंबरीतील प्रसंगासारखा तो प्रसंग
...
एका अंध लाचार फुलवालीची
प्रेमाने विचारपूस करुन
तिची सगळी फुलं एका झटक्यात विकत
घेतली होती त्याने
...
त्याच्या त्या मधाळ शब्दांनी
तिला मोहून टाकले
किती सहज त्याने आपलेसे केले
...
आज ती त्याला प्रत्यक्ष बघणार होती
त्याने वचन दिल्याप्रमाणे
तिची दृष्टी परत मिळवून दिली होती त्याने
...
त्याला शोधतांना
समोर एक भडंग, रस्त्यावर राहणारा
जगाने झिडकारलेला
गबाळा तरुण दिसला
...
त्याच्या करुण डोळ्यात पाहताच
तिला भरुन आलं,
नव्या तजेल डोळ्यात
झरकन पाणी तरारलं
.
तिला तिच्या राजकुमाराची
ओळख पटली होती
.
आता तिची दृष्टी परत मिळाली होती तिला
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१५/१०/२०१९)
(चार्ली चाप्लिन यांच्या सिटी लाईट्स या सिनेमाच्या कथेवरुन प्रेरीत)
आहा!! मस्तंच.
+१
छान
प्रेमाला अंतःचक्षूंनीच पाहता
मिकाची अन तुमची कविता छानच
धन्यवाद पाभे आणि मिका शेट
नाही हो. काही विचार
मस्त रे मिका...
हे
नेहमी प्रमाणे एक उत्कृष्ट
छान.
चांगली झालीये
त्याच्या करुण डोळ्यात पाहताच