दर्शनमात्रे मनकामना पूर्ती
गणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का ? आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी ..... पण एक महत्वाची वाटणारी गोष्ट मागितली तीही दिली नाही तर आता कशाला काय मागू , आता काय राहिलं आहे .. असा विचार आल्याशिवाय राहत असेल का लोकांच्या मनात .... जर नशीबातल्या गोष्टी तशाच होणार असतील तर 'असं कर' म्हणून प्रार्थना का करायची , जे व्हायचं तेच होणार असेल तर .... की आपण चांगले भक्त वगैरे नव्हतो :
; आपणच कुठेतरी भक्तीत कमी पडलो , नशीबातच होतं त्याला देव तरी काय करणार म्हणून आपली मागणी ऐकली गेली नाही अशी समजूत करून घेतात लोक ? तेच विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ... आयुष्यात वाईट परिस्थिती असली तर ही आरती म्हणताना मनाला काही जाणवत नसेल का , की कुठे आहे विठोबा , काय करतोय ...
लोकांची भक्ती श्रद्धा ठेवण्याची कपॅसिटी जबरदस्त आहे आपल्याकडे ; की बोलून दाखवत नसतील श्रद्धेला ठेच लागली तरी ? उगाच का बोलून इतरांची मनं दुखवा किंवा कदाचित भीती सुद्धा देवाची .... किंवा आपणच देवाने आपलं गाऱ्हाणं ऐकावं एवढ्या लायक नव्हतो अशी स्वतःची समजूत करून देऊन .... किंवा जरी एक मागणं पूर्ण नाही झालं तरीसुद्धा मानसिक गरज असतेच पाठीराखा आहे , यावेळी नाही केली तरी पुढच्यावेळी गरज पडली तर करेल मदत असा सबकॉन्शस विचार असतो .... माझ्याबाबतीत तसं म्हणता येईल .. मी नास्तिक होऊ शकत नाही .... मला देव प्रिय आहेत , गणपती सुद्धा ... आजोळी घरच्या गणपतीला लहानपणापासून इतकी वर्षं जात असे आमच्याकडे नसतो त्यामुळे ... पण आता जात नाही .. त्या किंवा कुठल्याही घरातल्या गणपतीसमोर उभं राहिलं तर मागितलेली आणि न पूर्ण झालेली इच्छा आठवून लोकाच्या घरी डोळ्यात पाणी येऊन सिन होईल म्हणून गणपती उत्सव माझ्यापुरता तरी कायमचा संपलेला आहे .
प्रतिक्रिया
डायरेक्ट विषयालाच हात घातला की.
पण एक महत्वाची वाटणारी गोष्ट मागितली तीही दिली नाही तर आता कशाला काय मागू , आता काय राहिलं आहे .. असा विचार आल्याशिवाय राहत असेल का लोकांच्या मनात ....हो. माझ्या मनात तसा विचार आला. पण गरजवंताला पर्याय नसतात. त्यामुळे हा विचार प्रत्येकजण अमलात आणेलच असे नाही. म्हणजे अमक्याने अमुक दिले नाही म्हणून आता तमक्याकडे तमुक मागून बघावे असे सुद्धा होतेच जर निष्पक्ष परिक्षणाची सवय नसेल तर. उदा. मिपावर प्रतिसाद आले नाही म्हणून कोणी इतर संस्थळावर लिहणे थांबवतात का ? नाही. उलट लोकात मिपाच्या नावानेही बोंब मारली जाऊ शकते. अथवा तुम्ही नाही का हा धागा टाकलात ? मी नाही का न पटणाऱ्या गोष्टीवर टीका करत ? मनुष्य हा आस्तिक असो वा नांस्तिक तो फक्त एक पॅटर्न फॉलो करत राहणारा प्राणी आहे. एखादा पॅटर्न समजून घ्यायचा प्रयत्न करताना त्यात अपयश आले म्हणून तो चटकन हार मानेल असेही घडूच शकत नाही(व्यक्तिपरत्वे याची तीव्रता कमीजास्त) आणि ज्याला जो पॅटर्न समजला अनुभवाला आला तो त्याला फॉलो करत राहातो. आणि त्यासाठी एकमेकांची डोकीही फोडत राहतो.जर नशीबातल्या गोष्टी तशाच होणार असतील तर 'असं कर' म्हणून प्रार्थना का करायची , जे व्हायचं तेच होणार असेल तर .... की आपण चांगले भक्त वगैरे नव्हतो :सर्वात पहिला विचार आपणच भक्तीमधे कुठेतरी कमी पडलो असा येउन मन अत्यन्त उदास होते. अन्नपाणीही गोड लागत नाही. अर्थात याचे गांभीर्य तुम्ही समर्पित किती व्हायला तयार होता यावर ठरते. पण ही खिन्नता आपल्यालाच दोषि करार देते. मग आठवते ते नशिब, प्रारब्ध, आणि जगप्रसिद्ध मागच्या जन्मातील कर्माचे तत्वज्ञान... :) म्हणजे आंनंदी आंनद. त्याच्या सत्यअसत्यतेचा पुरावा सोडा निदान तत्वज्ञान म्हणून तरी त्यात विरोधाभास कसा हा एक प्रश्नच आहे.तेच विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळीअध्यात्मात काव्यरस आल्याने त्याचा आध्यात्मिक विकास किती झाला की काव्यातील कलात्मकतेत रमलेला व्यक्ती भकास किती झाला हा स्वतंत्र धाग्याचा विषय असेल.लोकांची भक्ती श्रद्धा ठेवण्याची कपॅसिटी जबरदस्त आहे आपल्याकडे ; की बोलून दाखवत नसतील श्रद्धेला ठेच लागली तरी ? उगाच का बोलून इतरांची मनं दुखवा किंवा कदाचित भीती सुद्धा देवाची ....PEOPLE COMES WITH ALL SHAPES, SIZE, AGE, SEX AND SPIRITUAL OR RELIGIOUS ATTITUDE.गणपती उत्सव माझ्यापुरता तरी कायमचा संपलेला आहेनक्कीच. पण याचा अर्थ इतरांनाही तसेच असावे असे अजिबात होत नाही. ज्या मुहूर्तावर धागा लिहलाय ते पाहता तुम्ही इतरांच्या समोर तुमच्या बाप्पा बाबतच्या व्यथीतपणामुळे नक्कीच सिन केला असेल/असता याची खात्री पटली.धन्यवाद ... पहिल्यांदा तुम्ही
धन्यवाद ... पहिल्यांदा तुम्ही
धन्यवाद ... पहिल्यांदा तुम्ही विचार करून प्रतिसाद दिल्यासारखा वाटत आहे ..असं म्हणता ? हरकत नाही, जमेल हळू हळू, आणि लक्षात येईल की विचारपूर्वक लिहलेला हा माझा पहिला प्रतिसाद न्हवे.लोकांच्या बहुतेक धाग्यांवर खोचक प्रतिसाद देत असता .. काहीवेळा तर उगाच टीज करण्यासाठी :) असं मी नोटीस केलं आहे तुमचे सगळे प्रतिसाद पाहून ...निरीक्षण शक्ती उत्तम आहे. पण वापर पुरेसा वाटत नाही. तसेच आपण हा धागा काढणे, एखाद्याने मिपाबाबत भलतीकडेच काही लिहणे, आणि व्यक्तीच्या श्रध्दांना धक्का बसल्यास अध्यात्मिक निष्ठा बदलली जाणे या तीन बाबी मी एकाच माळेत का ओवल्या हे समजले नसल्यानेही आपण जरा नाराज वाटता. असो. कितपत बरोबर आहे माहीत नाही.प्रत्यक्ष उत्तर नको असतं , वादातच आनंद मिळतो काहींना त्यातला स्वभाव आहे तुमचा:) अपूर्ण उत्तर मी पूर्ण मानत नाही आणी नेमकं ह्याचाच राग मनात धरून लोक निष्कारण वाद घालतात आणि आम्ही बदनाम होतो. पण त्याचीही फिकीर करायचे कारण नाही... ....फक्त एकमेव दुर्दैव इतकेच आहे की ज्या विषयावर मी विचार करून प्रतिसाद दिलाय असे चक्क आपणास वाटते तिथे धाग्याबाबत चर्चा बाजूलाच ठेऊन इतर धाग्यावर मी काय गुण उधळले आहेत या अवांतरात आपणास जास्त स्वारस्य दिसत आहे :( त्यातही काही वाईट म्हणायचं नाही , फक्त एक नोंद केली स्वभावाची ..पण याचा अर्थ इतरांनाही तसेच
सुखकर्त्या दुखहर्त्या
धन्यवाद _/\_ पाहू आता काय
सॉरी. आपले माज्यावर रागावणे मी आता समजू शकतो.
अहो मी नव्हतेच रागावले ,
आता माफीच मागत आहात तर प्रश्नच मिटला
धीराची आहे की नाही माहीत नाही
देवावरचा विश्वास म्हणजे,
डोळ्यात पाणी येऊन पाप कसे होईल ??
डोळ्यात पाणी येऊन सिन होईलडोळ्यात पाणी येऊन पाप कसे होईल हे कळले नाही ??सिन - sin नाही scene या
कुठेतरी काहीतरी चुकते आहे .......
वा!
सहमत
आपण गणपतीबाबत बोलत आहात म्हणूनच विस्तारात जात नाही
जॉन राव _/\_
अगोदरच्या प्रतिसादात ......
तुटक वाटले पण आवडले. स्फुट